|
Dineshvs
| |
| Sunday, April 02, 2006 - 4:33 pm: |
| 
|
सुनिती, दुध स्किमड असावे. फ़ळे खाताना चिकु, आंबा अशी न खाता, भरपुर पाणी व चोथा असणारी खावीत. पपई, कलिंगड वैगरे. वरण मिश्रडाळीचे पण बिन फ़ोडणीचे असावे. पालेभाज्याहि कमी तेलात शिजवलेल्या असाव्यात, भाजलेले पदार्थ जास्त असावेत, तळलेले अजिबात नसावेत. ताकहि लोणी काढलेले असावे. न्याहारी हवीच, रात्रीचे जेवण कमी घ्यावे. तसेच नेमके किती वजन कमी करायचेय ते विचारुन घ्या. तेवढे कमी झाल्यावर नॉर्मल आहार घ्या. आणि व्यायामाचे कुठले प्रकार चालतील ते विचारुन घ्या. सकाळी फिरायला जाणे शक्य असेल तर अवश्य जा. आर्टिफिशियल स्वीटनर्स चालत असतील, तर ते वापरा.
|
सकाळची न्याहरी भरपुर घ्यावी, यामुळे दिवस्भर energy राहते. कुठेतरी असे वाचलेय न्याहरी राजासारखी, जेवण सरदारासारखे, तर रात्रीचे जेवण भिकार्यासारखे घ्यावे... थोडक्यात रात्री जास्त जेवणे चांगले नाही. तसेच सोयाबीन चा आहारत वापर वाढवावा, सोयाबीन जपानी आणि चीनी लोकं रोजच्या आहारात प्रचंड प्रमाणात वापरतात, त्यांच्यात स्थुलतेचे प्रमाण कमी आढळते. आहारात protein ची मात्रा वाढवावी low carb आहार घ्यावा त्यानेही cal कमी मिळतात आणि शरीराचे पोषण होते. शिवाय protein fats कमी करायला मदत करतात. इकडचे लोकांचा आहार कमी वाटला, पण break fast मात्र भरपुर असतो, मिठाचे प्रमाण अत्यल्प असते.. कारण त्यांना घाम येत नाही्अवामानामुळे. आपन आपलेच पदार्थ(मिठ घातलेले) खात राहीलो तर वजन वाढते. इथे त्यामुळे मिठाचे प्रमाण कमी करावे.
|
टोमॅटोच्या बियांचा (त्याचबरोबर ढब्बूच्या, वांग्याच्या बियांचा) मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो का? Please guide.
|
Dineshvs
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:28 pm: |
| 
|
जर तसा त्रास असेल तर या बिया न खाणे चांगले. वांगी, पालक, कोबी पण वर्ज्य असावा. मला १६ वर्षांपुर्वी हा त्रास झाला होता. तेंव्हापासुन मी काळजी घेतोय. मग त्रास नाही. त्यावेळी अलोपथिक ऊपचारांपेक्षा, पथरिना, आणि गोक्षुरदी गुग्गुळ, या आयुर्वेदिक गोळ्यांचा खुप फायदा झाला. मी अजुनहि या गोळ्या नियमित घेतोय.
|
Moodi
| |
| Sunday, April 23, 2006 - 5:17 pm: |
| 
|
गजानन दिनेश यांनी तर गोळ्यांची नावे दिली आहेतच. मलाही हा त्रास झाला होता. डॉ. नी मात्र टॉमेटो, वांगी, पालक हे खायला हरकत नाही, मात्र नंतर भरपूर पाणी पी हाच सल्ला दिला होता. मी भाज्यात, तुर, मुगाच्या आमटीत टॉमेटो बीया काढुन वापरते. फक्त रसम, टॉमेटो सारात बीयांसकट वाटुन घेते. मला आईने हे काटे गोखरु कुटुन वस्त्रगाळ पावडर घेऊन ती उकळवुन गाळुन काढा दिला होता. तेव्हापासुन याचा त्रास अजीबात नाही. गोक्षुरादी गुगुळ तर रेडीमेड चांगला उपायच आहे. सागाचे बी पण उगाळुन ते या काढ्यात घातले की खडे विरघळतात. मात्र या गोखरुचा काटा कुठे घरात पडु देऊ नये, तो जर चुकुन पायाला टोचला तर भयानक वेदना होतात.
|
दिनेश, मूडी धन्यवाद. नाही मला असा काही त्रास नाही. परवा लंचच्या वेळी मला ही (माझ्यासाठी धक्कादायक) माहिती समजली. पण मला ते पटले नाही कारण लहानपणापासून रोज शेकडो बिया माझ्या पोटात गेल्या असतील. पण असा त्रास कधी जाणवला नाही (अजूनतरी). पण तरीही राहावले नाही म्हणून (घाबरून! :-) ) विचारले. पण तुमच्या अनुभवांवरून त्यात तथ्य आहे म्हणायचे.
|
Dineshvs
| |
| Monday, April 24, 2006 - 5:08 pm: |
| 
|
मूडि, हे गोखरु एका सरपटत वाढणार्या वेलीला लागते. एकच मुळ असते व ती वेल वर्तुळाकार सरपटत जाते. पिवळी नाजुक फुले येतात. आणि हे गोखरु लागते. साधारण पावट्याएवढे असते व त्याला सगळ्याबाजुने काटे असतात. म्हणजे पाय कसाहि पडला तरी तो टोचणारच. सुकले तरी काटे कडकच असतात. पायाला काटा लागला तर अगदी मस्तकात कळ जाते. आता असल्या फळापासुन औषध करणारे आपले पुर्वज किती श्रेष्ठ असतील ना ?
|
Moodi
| |
| Monday, April 24, 2006 - 5:26 pm: |
| 
|
खरय हो दिनेश. आयुर्वेदाची ही महान परंपरा पुढेही चालु रहावी अन जगभर मान्यताप्राप्त व्हावी हीच इच्छा आहे. 
|
Moodi
| |
| Thursday, April 27, 2006 - 9:35 pm: |
| 
|
हा एक उत्तम लेख अती मीठ सेवनावर... http://www.pudhari.com/Archives/apr06/27/Link/P-arogyaI.htm अन हा दुसरा फळांविषयी. http://www.pudhari.com/Archives/apr06/27/Link/P-arogyaJ.htm
|
Divya
| |
| Friday, April 28, 2006 - 12:03 am: |
| 
|
मुडी दोन्ही लिंक छान आहेत. निसर्गोपचार केंद्रात जे पदार्थ दिले जातात त्यातही मीठ अतिशय कमी प्रमाणात व तिखट हि जवळजवळ नसतेच.दिर्घ लंघन केल्यानंतर फ़ळांचे रस आणि भाज्याचे सुप असा आहार काही दिवस देउन नन्तर रोजच्या जेवणावर आणले जाते. या लंघनानन्तर तुमची चव घेण्याची क्षमता पण इतकी चांगली होते कि मीठ आणि तिखट काहीही नसलेल्या भाज्या सुद्धा पेशंट आवडीने खातात. चमचाभर तेलात अथवा तुपात भाजी परतुन तिला वाफ़ आणुन मंद आचेवर या भाज्या शिजवल्या जातात. मसाले तिखट टाळलेच जाते आणि चवीला ही छान लागतात.
|
Amayach
| |
| Friday, April 28, 2006 - 2:00 pm: |
| 
|
वरील पुढारी मधल्या लेखात नाशपाती य फ़ळाचा उल्लेख आहे तर नाशपाती म्हणजेच अमेरिकेतील पेअर हे फ़ळ का??
|
Moodi
| |
| Friday, April 28, 2006 - 2:34 pm: |
| 
|
नाही नाशपाती ही सफरचंदाचीच एक जात आहे, ते गोड असते पण रंगाने गुलाबी वगैरे नसते, जरा हिरवटच असते. निदान माझ्या तरी माहितीत असे आहे, जर खरच नाशपाती पेअर वर्गीय असेल तर माफ करावे.
|
Arch
| |
| Friday, April 28, 2006 - 2:39 pm: |
| 
|
हो ग, पेअर म्हणजे नाशपती.
|
Moodi
| |
| Friday, April 28, 2006 - 4:25 pm: |
| 
|
सॉरी ग आर्च अन अमया. नाशपती हे पेअरच आहे हे माहित नव्हते. मात्र ते सफरचंदापेक्षा गुणकारी आहे असे म्हणतात. त्याचा गर बराचसा सफरचंदासारखा आहे. काश्मीरला तर अक्रोडच्या बरोबरीने याला मान आहे म्हणतात.
|
Moodi
| |
| Friday, April 28, 2006 - 5:36 pm: |
| 
|
दिव्या तुझा निसर्गोपचाराचा कोर्स झालाय मग त्यावर लिही ना एकदा. उरळीकांचन सारख्या ठिकाणी लोक जातात पण नेहेमीच्या चहा वगैरेसारख्या सवयी एकदम सोडुन कोमट पाणी वगैरे पिणे असे ऐकले की जरा दचकतात. पण तू जरा सविस्तर कल्पना दिलीस तर चांगले होईल. लिची हे फळ स्वच्छ धुवुन त्यातली बी काढुन ते नखाएवढे आल्याच्या तुकडा, थोडा लिंबुरस अन असेल तर पुदिना असे सर्व एकत्र करुन थोडे पाण्याबरोबर वाटुन घेऊन ते प्यावे. याने आम्लपित्त कमी होते. साखर चिमुटभर घालावी.
|
Garva
| |
| Friday, June 09, 2006 - 7:27 pm: |
| 
|
me pre-diabetic aahe ase mala dr.'ni saangitle...mhanun, mala jevanaver niyantran karayche aahe, specially starch n sugar.Me salad, fruits,veggies khatch aahe...pan chapati,bhat,varan, spices, dahi,butter, cheese...ya khanyala kahi alternatives aahet ka?? bhagar(instead of rice) khana kitpat yogya aahe? is it ok to have pulses, sagdya prakarche? ajun kay pathye kelyane mala fayda hoil? konala je kahi info asel ya baddal...pls ithe takal ka?
|
Moodi
| |
| Friday, June 09, 2006 - 9:51 pm: |
| 
|
गारवा तुझ्या डॉक्टरांनी योग्य ती औषधे अन पथ्ये सुचवली असतीलच. बाकी लिहीते ते बघ.दुपारची झोप टाळणे आवश्यक आहे, नुसती शरीराला आराम मिळेल अशी विश्रांती घे. विश्रांती घे, झोप मात्र टाळ. उपास करुच नकोस अन जागरणे पण नकोच. मिल्कशेक, लस्सी नकोच. फळांमध्ये द्राक्षे, आंबा, चिकु, केळे, अननस तसेच भाज्यांमध्ये बटाटा कमी कर. भात, मका, बीट, चवळी, बाजरी अन आंबट पदार्थ शक्यतो टाळ नाहीतर नियंत्रण ठेव. कारले, कोबी, मुग, नाचणी, तूर डाळ आहारात घे. खाण्यात नियमीतता ठेव, अन शक्य असल्यास थोडा चालण्याचा सराव ठेव. जांभळाचा ज्युस चालेल. मधुन मधुन आवळा, आवळकाठी खाल्ली तरी चालेल. अन ताजा आहारच घे. चिकन, मटण, अंडी कमी कर. बाकी साखर तपासणे वगैरे रुटीन तर डॉ. च्या सल्ल्यानुसारच कर. पण भाताला काय पर्याय आहेत ते डॉक्टर किंवा आहार तज्ञच सांगु शकतील. ही लिंक बघ. www.aarogya.com ही लिंक पुण्यातील सुप्रसिद्ध वैद्य नानल यांची आहे. मराठी, English अन गुजराथीत आहे.
|
Moodi
| |
| Friday, June 09, 2006 - 10:02 pm: |
| 
|
गारवा ही लिंक पण बघ. आपल्या आश्विनीने इथे जे सांगीतलेय ते पण वाच. भारतात जाणार असशील किंवा कुणी येणार असेल तर लागतील तशी औषधे मागवुन घे. नाहीतर भारत दौर्यात एकदा या लिंकमध्ये उल्लेखलेल्या वैद्याना भेटुन ये. /hitguj/messages/103387/106565.html?1107485024
|
गारव्या मी सुद्धा प्री डायबेटिक स्थितीत होतो. कारण माझे वाढलेले वजन! मी भरपूर खाऊन २ महिन्यात १६ किलो वजन कमी केले अन नाॅर्मल झालो.... आहे की नाही विनोद. पण माझी विल पाॅवर जबरी आहे. खाण्याच्या बाबतीत म्हणशील तर मला आवडीनिवडी नसल्याने मी अगदी गवत सुद्धा खाऊ शकतो.... आणि माझे माझ्या मुलांवर प्रेम आहे म्हणून त्यांच्या उपयोगी पडावे म्हणून माझी तब्येत ठणठणीत ठेवणे मला आवश्यक आहे. त्यासाठी ६ वर्षे सोडलेले nonveg मी पुन्हा सुरू केले
|
Shonoo
| |
| Sunday, June 11, 2006 - 3:05 am: |
| 
|
गारवा तुमच्या लोकल हॉस्पिटल मधे प्री- डायबेटिक लोकांसाठी क्लिनिक असतील तर जरूर जा. फार छान माहिती देतात. भारतीय किंवा इतर एथनिक आहाराला चालतील अशा टिप्स देतात. साधारण डोळ्याच्या अंदाजाने पोर्शन कन्ट्रोल कसा करायचा ते शिकवतात. ते फार उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे. दर ३-४ तासांनी काहीतरी खावे. प्रत्येक वेळी काही ना काही प्रोटीन युक्त खावे जसे सफ़रचंद खाल्ले तर त्याबरोबर १-२ बदाम किंवा अक्रोड किन्वा थोडे शेंगदाणे खावेत. साधारणपणे १५ ग्रॅम कार्ब असतील तर २ ते ४ ग्रॅम फ़ायबर असतील असे एक 'कार्ब' धरावे आणि या प्रमाणात good carb bad carb असतील असे पदार्थ खावेत. चण्याची डाळ, चणे, काबुली चणे यांचा glycemic index सगळ्यात कमी असतो अशा बर्याच गोष्टी तिथे सांगितल्या होत्या.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|