|
Moodi
| |
| Sunday, August 13, 2006 - 8:25 am: |
| 
|
आस्मानी हे वाचुन बघ. विविधा मध्ये आहे. /hitguj/messages/103383/104500.html?1133978155
|
Farend
| |
| Monday, August 14, 2006 - 8:38 pm: |
| 
|
moodi धन्यवाद, अशीच माहिती मी पण शोधतोय. अजून १-२ प्रश्न: मध लहान मुलांना (३+ वर्षे) दिला तर चालतो का? इथले डॉ सांगतात की अगदी लहान मुलांना देऊ नका, पण भारतात बहुधा देतात. त्या वयात त्याचा काही विशेष फायदा आहे का? आणि आपण साखर जास्त खाण्याचे टाळत असलो, तर मध पर्याय म्हणून चालतो का
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 9:09 pm: |
| 
|
अमोल साखरेला पर्याय म्हणून गूळ चांगला आहे. मध चालू शकेल, पण तो गरम करता येत नाही. त्यामुळे त्यावर जरा मर्यादा येते. बाकी जाणकार सांगतीलच. काकवी तुला माहीत असेलच. काकवी लहान मुलांना ब्रेड किंवा पोळीबरोबर देता येते, मात्र जास्त स्वरुपात नाही. भारतात गेलास की जरुर आण. तिच्यात लोह असते. तरीही काकवी विषयी आपल्या भारतीय डॉक्टरना माहीत असते, परदेशातील नाही. मात्र औषध रुपात आपण मध वापरु शकतो. म्हणजे चाटण वगैरे तयार करुन. लहान मुलांना तो कसा आणि केव्हा देतात याबद्दल आश्विनीच सांगू शकेल.
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 9:11 pm: |
| 
|
अमोल ही लिंक बघ सकाळची, तू वाचली असशीलच. पण इथे असावी म्हणून देतेय. वाचनीय आहे. http://www.esakal.com/esakal/08142006/NT00C2DAC2.htm
|
Kahikhas
| |
| Friday, December 01, 2006 - 6:05 am: |
| 
|
पांढरा मुळा व लाल मुळा (वरुन लाल, म्हणजे skin लाल पण आत नेहेमी सारखाच पांढरा), या दोन्हीच्या पोषणमूल्यात काय फरक आहे. तसेच लाल मुळ्यात आरोग्याच्या द्रुष्टीने काही विषेश गुणधम आहेत काय? धन्यवाद.
|
Farend
| |
| Friday, January 19, 2007 - 12:44 am: |
| 
|
भारतात मिळणार्या मनुका आणि येथे मिळणारे raisin यात काही फरक आहे का? का फक्त जास्त वाळवतात मनुका? raisin मधे बाहेरून साखर घातल्यासारखी वाटते टिकवायला.
|
Maku
| |
| Monday, February 12, 2007 - 5:07 am: |
| 
|
मी विचारले पण कोनिच ans देत नाही. मी एकदा bee ला पण yoga चे विचारले होते पण त्याने सुद्धा ans दिले नाही. i think नवीन लोकांना तुम्ही ans देत नाही . मला खरेच वाईट वाट्ते सान्गायला maayboli site चांगली नहीये.
|
Bee
| |
| Monday, February 12, 2007 - 8:46 am: |
| 
|
मकु, माझ्याकडून काय माहिती हवी आहे त्याबद्दल परत एकदा मेल करा किंवा योगाच्या बीबीवर लिहा. मला खरच तुमचा मेल मिळाला नाही. बहुतेक spam मधे अडकला असेल...
|
Zakasrao
| |
| Saturday, March 03, 2007 - 8:44 am: |
| 
|
जीवनसत्वे - -उपयोग -कशातून मिळते अ(A) प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते------- पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी ब१(B1) पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक ---------------हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस ब२(B2) मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते --------यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध ब३(B3) कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते --------हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट ब५(B5) शरीरातील शक्ती वाढवते----------------------- धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक ब६(B6) प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते -------------------------सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया ब१२(B12) पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग ---------------------------यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ फॉलिक ऍसिड लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते) ---------------------------------------गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस क(C) प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते-- ----------------------------------------लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे ड(D) कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)-- ---------------सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक इ(E) रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते ---------------लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा फ(F) कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते--- ----दाणे, काजू के(K) रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त) --------------------------यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक खनिजे लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक) ---चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते-- --------------दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर फॉस्फरस कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक ---------------------------------------दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम पोटॅशियम स्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते------------------- केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्या मॅग्नेशियम प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते ----------------------------------------हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ झिंक उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)------------------------------ -- केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ इंटरनेट वर मिळालेली माहिती. कोणी तज्ञ असेल तर थोडे detail द्यावेत.
|
Dineshvs
| |
| Saturday, March 03, 2007 - 5:04 pm: |
| 
|
झकासराव, पुरेशी आहे कि ही माहिती ! पण आपल्या भारतीय स्त्रीयाना, हे कधी समजणार ? पंडुरोगाचे, भयानक प्रमाण आहे आपल्याकडे.
|
Ksmita
| |
| Monday, September 17, 2007 - 10:13 pm: |
| 
|
Cholestorol control साठी आहाराच्या काही टिप्स देऊ शकेल का कोणी ? currently its 215 साधारण किती दिवस लागतील कमी व्हायला दुग्धजन्य पदार्थ पुर्ण बंद केले पाहीजेत का? trade mill शिवाय अजुन काय व्यायाम करता येईल? Health च्या BB वर पाहिले पण जास्त माहीती नाही मिळाली. Thanks in advance !
|
Karadkar
| |
| Monday, September 17, 2007 - 11:37 pm: |
| 
|
स्मिता, जमले तर अभय बन्ग यांचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग वाचुन काढ. त्यात खुपच चांगली माहिती दिलेली आहे. आणि ते स्वत्: डॉक्टर असल्याने त्यानी खुप गोष्टीचा विचार करुन ते लिहीले आहे. नक्की फ़ायदा होईल. दुधाबद्दल तर त्यामधे अतिशय उत्तम माहीती आहे.
|
Bee
| |
| Tuesday, September 18, 2007 - 2:17 am: |
| 
|
मला हे नक्की माहिती आहे की अनुक्रमे कपालभाती, प्राणायाम केले तर cholesterol कमी होती. एकूनच योगा शरिर आणि मन स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे.
|
Ksmita
| |
| Tuesday, September 18, 2007 - 6:10 pm: |
| 
|
Thanks Karadkar,bee बघते कुठे मिळते का ते पुस्तक तसेच योगावर पण शोधते जरा माहीती.
|
Ksmita
| |
| Wednesday, September 19, 2007 - 12:09 am: |
| 
|
karadkar तुला मेल केली आहे
|
Shonoo
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:35 pm: |
| 
|
अभय बंग ना ज्या पुस्तकावरून बरीच प्रेरणा मिळाली ते Dr Dean Ornish चे पुस्तक पण वाचायला हवे. इथल्या स्थानिक वाचनालयात सहज मिळतील Ornish ची पुस्तके.
|
Karadkar
| |
| Wednesday, September 19, 2007 - 4:05 pm: |
| 
|
smita, check your email. shonoo, I was thinking abt the same thing ... may in few days.
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 19, 2007 - 6:12 pm: |
| 
|
ksmita इथे बघा! /hitguj/messages/103387/106361.html?1172686478
|
Ksmita
| |
| Wednesday, September 19, 2007 - 10:48 pm: |
| 
|
Thanks prajaktad हा BB मी पाहीला होता. Shonoo, आजच बघते Dr. Ornish याचे पुस्तक मिनोती, तु दिलेली लिन्क खूपच helpful !! त्या पुस्तकासाठी तुला मेल करेन may be next week or so. Thanks All !!
|
Sonalisl
| |
| Saturday, February 16, 2008 - 12:02 am: |
| 
|
पांढरा कांदा, लाल कांदा अन ब्राऊन कांदा यापैकी कोणता आरोग्यास चांगला? कांदा अतिशय उग्र, तिखट असेल तर तो कमी करण्यासाठी काय करावे?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|