|
Moodi
| |
| Saturday, January 14, 2006 - 12:27 am: |
| 
|
रेणु अन सुनिती योगायोग बघा खालील लिंकमध्ये. http://www.esakal.com/20060114/sakalvis53.html
|
Pinkikavi
| |
| Monday, January 16, 2006 - 2:24 am: |
| 
|
thanks मूडी! आणी सगळ्यांचे मनापासून आभार! मला ही सगळी माहिती हवी होती........
|
Pinkikavi
| |
| Monday, January 16, 2006 - 2:27 am: |
| 
|
एक प्रश्न.......गरोदरपणी उकळलेले पाणी प्यावे की साधे, यावर तुमची मते काय आहेत?
|
Meggi
| |
| Monday, January 16, 2006 - 5:37 am: |
| 
|
आहारात नेहमी मीठाचे प्रमाण कमी असावे असे का म्हंटले जाते? आणि याला काही पर्याय आहे का? जसं साखरेला पर्याय म्हणुन मध अनि गुळ वापरतात तसा काही पर्याय आहे का? table salt च्या ऐवजि cooking salt जास्त खारट असतं, म्हणुन कमी लागतं. तर cooking salt चाच वापर करावा का?
|
Charu_ag
| |
| Monday, January 16, 2006 - 6:04 am: |
| 
|
मेगी, टेबल साल्ट ऐवजी सैंधव किंवा ज्याला ' काला नमक ' म्हणतात ते वापरावे. फ़्रुट चाट, लस्सी, दही, सरबत याना तर खुप छान चव येते.
|
Moodi
| |
| Monday, January 16, 2006 - 11:51 am: |
| 
|
पिंकी उकळुन गार केलेले पाणी प्रेग्नन्सीत अन डिलीव्हरीनंतर सुद्धा प्यायला हरकत नाही. पाचव्या महिन्यानंतर शिंगाड्याचा शिरा, दुधी हलवा असा हलका गोद आहार घ्यायला हरकत नाही फक्त गोड, तिखट, आंबट अन तुरट अश्या चवींचा अतीरेक करु नये. डिलीव्हरीनंतर पहिल्या तीन दिवसात एकदम मेथी, डिंकाचे लाडु, सुकामेवा असा पौष्टीक पण जड आहार एकदम सुरु न करता मुगाची मऊ खिचडी, वरण भात तुप अन लिंबु पिळुन किंवा भाताची हिंग अन तुप घालुन पेज घ्यावी म्हणजे पोटातील जो वात असतो तो कमी होवुन अन्न पचायला लागते. भाज्यांमध्ये दुधी अन भेंडी खुप उत्तम, कारण दुधी पचायला हलका अन भेंडीत जे calcium असते त्याने हाडांना मजबुती मिळते. नंतर हळू हळू डिंकाचे, मेथीचे लाडु, लोणी, खारीक, मनुका खाव्यात. भाज्यांमध्ये पालक, लाल माठ, चवळई, राजगीरा, अळु असु द्यावे कारण यात लोह खुप असते, मात्र पाणी पण भरपुर प्यावे. भाज्या फार मसालेदार अन तिखट न करता अर्धा टीस्पुन आले लसुण पेस्ट, धणे जीरे पावडर अन कढीपत्ता असे घालुन कराव्यात. तुपाची फोडणी पण चालते. भाज्या आमटीत गरम मसाल्या ऐवजी काळा गोडा मसाला वापरावा कारण हा कमी तिखट असतो.
|
Dineshvs
| |
| Monday, January 16, 2006 - 4:19 pm: |
| 
|
मीठाची आपल्याला अत्यल्प गरज असते, पण त्याशिवाय चालु मात्र शकणार नाही. तृणभक्षी जनावरे मीठाची भुकेली असतात. त्यांच्या आहारातुन त्याना मीठ मिळत नाही, म्हणुन ते जमिनीत जास्त खार असलेल्या जागी जाऊन माती खातात किंवा खारट असे खडक शोधुन ते चाटतात. मीठाचा एक गुणधर्म म्हणजे पदार्थ टिकवुन ठेवणे. या गुणधर्मामुळे आपल्याकडच्या पापडात, लोणच्यात जास्त मीठ घातलेले असते. पाश्चात्य जेवणात पण चीज, ऑलिव्ह मधे भरपुर मीठ असते. ईतक्या मीठाची आपल्याला गरज नसते. त्यामुळी शरिरातील अतिरिक्त मीठ बाहेर टाकायचे काम शरिराला सतत करावे लागते. तसेच मीठातील सोडियमचा, पाणी धरुन ठेवणे हा एक गुणधर्म असल्याने, पेशीतील पाणीसाठा वाढुन सुज येते. म्हणुन मीठ कमी असावे असे सांगतात. तरिहि मीठ आपल्या पेशींसाठी व खास करुन मेंदुमधल्या संदेशाच्या देवाणघेवाणीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे आवश्यक तेवडे मीठ हवेच पण जास्त नको. लोणची तयार घेण्यापेक्षा ताजी केली तर मीठ जास्त घातले जात नाही. ताटात मीठ वाढुन घेण्याची तशी काहि गरज नाही. वरणात आमटीत मीठ असतेच, त्यामुळे भातात नाही घातले तरी चालते. पण समुद्री मीठ आणि सैंधव यात चव सोडली तर डावे ऊजवे काहि नाही. सोडियम मुख्यतः पेशीद्रवात असते. स्नायुतला ताण राखण्यासाठी, पेशीना पोषक द्रव्ये शोशण्यासाठी, किडनी कार्यक्षम राखण्यासाठी, शरिरातील कॅल्शियम विद्राव्य ठेवण्यासाठी, पाचक द्रव्ये निर्माण होण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते. पण जास्त मिठाने ब्लड पेशर वाढणे, रकत्वाहिन्या ताठरणे, सुज येणे हायपर टेंशन असले विकार होवु शकतात. मिठाला पर्याय म्हणुन पोटॅशियम युक्त मीठ, किंवा सेलरि, बासिल, कराअवे, पार्सली अश्या वनस्पति किंवा त्यांच्या पावडरी वापराव्यात. मीठ जास्त असले तर पोटॅशियमचा र्हास होतो म्हणुन त्याची भरपाई करावी लागते. पोटॅशियम, लिंबु वर्गीय फ़ळे, हिरव्या पालेभाज्या, केळी, बटाटे, टोमॅटो, अननस आदि मधुन मिळते.
|
Suniti_in
| |
| Monday, January 16, 2006 - 11:40 pm: |
| 
|
दिनेश मुडी छान माहिती दिली आहे. मीठाला पर्यायी वनस्पती तर माहितीच नव्हत्या. पार्सली, सेरेली, बासिल माहिती आहे. पण कराअवे कशी असते माहिती नाही.
|
Bhagya
| |
| Monday, January 16, 2006 - 11:50 pm: |
| 
|
मूडी, दिनेश इथे किंवा युरोप मध्ये बरीच लोकं न्याहारी आणि दुपारचे जेवण भरपेट करतात आणि रात्री फ़क्त सूप सलाद खातात. आणि त्यामुले वजन कमी राहते असे मला माझी मैत्रिण म्हणाली. हे खरे आहे का? कारण माझे अगदी उलटे होते. सकाळी घाईत चहाबरोबर थोडेसे खाल्ले तर, दुपारी सॅन्डविच आणि रात्री भरपेट असे होते आहे....
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 17, 2006 - 1:58 am: |
| 
|
करावे असे लिहायला हवे होते. जिर्यासारखे असते. तिखट गोड चव असते. हो भाग्य सकाळी न्याहारी भरपेट हवी. ती दिवसभरात वापरली जाते. रात्रीचे जड जेवण वजन वाढवते. रात्री लवकर जेऊन, शतपावली केलीस, तर आणखी लिखाण करता येईल नं तुला.
|
Bee
| |
| Tuesday, January 17, 2006 - 3:25 pm: |
| 
|
दिनेश, मीठावर मी खूप काही वाचले आहे. मला एक सांगाल का? sea salt म्हणून मीठाचे खडे मिळतात. मी परवाच इथल्या organic section मधे Japanese Brand चे एक sea salt पाहिले आणि त्यावर गांधीजींचे दांडीयात्रचे चित्र होते आणि सुबक माहिती दिली होती. तर माहिती ही हवी आहे की साध्या मीठापेक्षा sea salt उत्तम असते का? मी असे वाचले आहे की घशात खरखरत असेल तर sea salt घालून गरम पाण्याने गुळवण्या केल्या की त्वरीत फ़रक पडतो.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:03 pm: |
| 
|
युरपमधे समुद्र लांब ना, म्हणुन ते तशी जाहिरात करतात. आपल्याकडे सगळेच मीठ समुद्रातुन येते. सगळेच सोडियम क्लोराईड कि. त्यामुळे तसा काहि फ़रक नाही. फ़क्त समुद्रातुन मिळवलेल्या मीठात काहि जास्तीचे क्षार असतात ते खरे आहे. पण भारतात आयोडाईज्ड मीठाची सक्ती करुन राजकिय गणितेच सोडवली आहेत.
|
Milindaa
| |
| Tuesday, January 17, 2006 - 7:30 pm: |
| 
|
भाग्यश्री, मला तुमच्या इथले माहिती नाही पण येथे मात्र दुपारी फक्त सॅंडविच वगैरेच खातात. फार कमी लोक ( माझ्यासारखे ) दुपारी नीट ( खूपच जास्त ) जेवतात.
|
Supermom
| |
| Tuesday, January 17, 2006 - 7:56 pm: |
| 
|
दिनेश आपण डाळ किंवा कडधान्य शिजवताना जो फ़ेस येतो तो का काढायचा मी असेही पाहिलेय की कधीकधी हा फ़ेस येतही नाही.मग डाळ अथवा कडधान्य चांगले वाईट असण्याशी याचा काही सम्बन्ध आहे का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 18, 2006 - 1:49 am: |
| 
|
डाळ वा कडधान्य बाहेर शिजवतानाच तो फ़ेस काढावा लागतो. कुकरमधे कुठे तो काढतो आपण ? बाहेर शिजवताना त्यामुळे सगळे ऊतु जाते म्हणुन तो काढायचा. याशिवाय काहि खास कारण नाही.
|
Bee
| |
| Wednesday, January 18, 2006 - 3:14 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेश! मी फ़ेस काढत नाही. खरे तर खूप कंटाळा येतो मला अशा लहान सहान गोष्टी करायला आणि जेंव्हा असे काही उतू जाते तेंव्हा हमखास मी किचन मधे नसतो तेंव्हा ते काम पातेलेच करून घेते. मी असा विचार करतो की इतके नीट निवडून घेतलेले धान्य, घरी येऊन आपण परत एकदा त्यातले काडी कचरा काढतो, दोन तिनदा पाण्यानी स्वच्छ धुतो, मग त्यात कसला आलाय मळ. म्हणून फ़ेसासहीत आमट्या वरण खायचे. मला उंच सखोल पातेले आवडतात. उतू जात नाही कारण पाण्याची पातळी इतकी उंच पोचत नाही आणि उभट पातेल्यात भाज्या छान मऊ शिजतात असा माझा अनुभव आहे. मऊ शिजलेल्या भाज्यांची चवही छान लागते. फ़क्त अशा पातेल्यांचे बुड जरा जाड हवे नाहीतर भाज्या बुडी लागतात.
|
Moodi
| |
| Saturday, February 04, 2006 - 5:30 pm: |
| 
|
हा पण एक माहितीपूर्ण लेख. http://www.esakal.com/20060204/sakalvis77.html .
|
Suniti_in
| |
| Wednesday, March 08, 2006 - 7:26 pm: |
| 
|
मला Dr. ने Calories कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तर आहारात काय बदल करावा लागेल? मी सध्या आहारात साधारण २ कप दूध, २ फळे, वरण भात, पालेभाजी, पोळी, सलाड/ गाजर/ काकडी, दही/ ताक हे पदार्थ खाते.
|
Sas
| |
| Wednesday, March 08, 2006 - 7:44 pm: |
| 
|
सोयाबिन ने दुष्टि हिन होते, अंधत्व येते ह्या बाबत आपलि माहिति Please Share करा.
|
Moodi
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:58 am: |
| 
|
हा लोकप्रभातील एक छान लेख. इथे वाचता येत नसेल तर लोकसत्ताचा Font Download करावा. http://www.loksatta.com/lokprabha/20060407/drushti.htm .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|