Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 08, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » मिक्सर / फूड प्रोसेसर » Archive through February 08, 2006 « Previous Next »

Lalu
Tuesday, February 07, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिताने सुचवल्याप्रमाणे हा बीबी सुरु करते आहे.

इथे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या नव्या जुन्या साधनांची आणि भांड्यांची माहिती लिहावी. ही माहिती म्हणजे -
१. कशासाठी वापरले जाते
२. साधारण किंमत
३. कुठे मिळेल
४. कोणता ब्रॅन्ड चान्गला
५. उपयुक्तता
६. वापरण्याबद्दल इतर काही टिप्स, निगा इ.

या उपकरणांचे काही इतरही उपयोग असतील ( उदा. लाटणे. ) पण पाककलेसाठी होणारे उपयोगच तेवढे लिहावेत.
आणि शेवटी थोडक्यात महत्वाचे म्हणजे -
इथे उगाच आदळ आपट करु नये आणि नव्या-जुन्याचे ( उदा. पाटा विरुद्ध मिक्सर ) वाद नकोत. :-)


Nandita
Tuesday, February 07, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

laalau tusaI gr8!!!! :-)
laalau tulaa p`Xnapi~ka banaivanyaacaa AnauBava idsatÜyaÊ iktI vyavaisqat mau_o AiNa saucanaa :-)




Psg
Tuesday, February 07, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुण्यात रहाते आणि इथे mixer and food processor मिळतो. त्याच report कसा आहे कोणी सांगू शकेल का? २ इन १ असल्यामुळे नीट चालत नाही असे ऐकले होते.. कोणी वापरत आहे का?

Shyamli
Tuesday, February 07, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम मी ईतके दिवस मुंबईतच होते,
तिथे मी insalsa चा मिक्सर्+फुड्प्रो. वापरत होते
एकदम मस्त चालतो, त्याचि भांडी पण दणकट आहेत


Psg
Tuesday, February 07, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आता बीबी च उद्घाटन करून टाक.. कशाकशाला वापरत होतिस हा mixer + FP ? खरच उपयोग होतो का FP चा? तू नोकरी करत होतिस क मुंबई ला असताना? तेव्हा काही विशेष उपयोग वाटला का FP चा?

Mukman2004
Tuesday, February 07, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर fp चा खुप उपयोग झाला आणि होतोय पण
नविन लग्न झाल तेंवा कणिक मळायला खुप सोप गेलं.
त्याच्या 3 attachments पण खुप useful आहेत
specially गाजराचा हलवा मोठ्या प्रमाणात करायचा आसेल तर 2,3 kg गाजर तर 5 मिनिटात किसले जातात.
get-togather ला salad करायचे आसेल तर छान चकत्या होतात
माझ्या कडे singer चे fp आहे आणि अजुन मला काहिच शिकायत नाहिये ६ वर्ष होउनही. :-)
२ वर्श मी uk ला होते तेंवा ईकडे ते जवळ पास बंद होते तरी सुद्धा आल्या नंतर चालु केले आणि काहीच problem नाही आला..


Shyamli
Tuesday, February 07, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधुरीनी लिहलच आहे....
अजुन,
कणिक छान मळली जाते, त्याच भांड्यात मग टॉमेटो, कांदा, अशा रोज लागणार्‍या वस्तु बारीक केल्या तर भाड़ं धुवायला त्रास होत नाहि,
पराठ्याची कणिक,मेथि,पालक,मुळा
ह्यासाठी एक्दम ऊपयुक्त.
अजुन महत्वाच म्हणजे ऊकडीच्या मोदकाची ऊकड खुप छान मळली जाते.
पचडीसाठी कोबी छान बारीक होतो.


Shyamli
Tuesday, February 07, 2006 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ह्याच्या किमतीविषयी.
रु.४०००पासुन सुरु होते नुकताच ईथे फिलिप्स, ब्राऊन,पण बघीतलेत.
मिक्सर्+फुड्प्रो असेल तर दोन्हि एकावेळेला चालावायचा प्रयत्न करु नये.
मोटार बिघडेल.
घेताना त्याची पॉवर बघावी
साधारण 800 vat चा ईंडीयन कामासाठी पुरेसा आहे.


Psg
Tuesday, February 07, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बजाज, crompton चे जोरात आहेत. पण मधे बजाज्चे faulty निघाले म्हणून त्यांनी बंद केले होते, आता पुन्हा आले आहेत. श्यामली, माधुरी, धन्यवाद..

Mukman2004
Tuesday, February 07, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bajaj, crompton चे काही माहित नाही पण singer चे छान च आहे.
f-p cum mixer आसेल तर
कणिक भिजवायला आणि भाज्या चिरयला अश्या दोन वेगळ्या आणि चकत्या करायला खिसायला ह्या साठि ३ अश्या टोटल ५ attachments आहेत
आणि normal mixer चे जे ३ जार असतात ते तर आहेच.
त्यामुळे खरच उपयोपी आहे म्हणुनच f-p cum mixer च घ्यावे


Milindaa
Tuesday, February 07, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुचवेन की वेगवेगळ्या उपकरणांसाठी शक्यतो वेगळे बीबी करा. नाहीतर हा बीबी अशक्य मोठा होईल आणि ( आळशी ) लोक नेहमीप्रमाणेच न शोधता पुन्हा पुन्हा तेच तेच विचारतील.

पटलं नाही तर दुर्लक्ष करा.


Deemdu
Tuesday, February 07, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान्य की कणिक पटकन मळून होते fp मध्ये पण ती भांडी परत धुवायचा आणि साफ़ करायचा मला तर खुप त्रास वाटतो, त्यापेक्षा मी कणिक हातानीच मळते.

किस करणं किंवा चक्त्या कापणं हे मात्र खरच खुप पटकन होत. पण तेही जेंव्हा मोथ्या प्रमाणात करायच असेल तेंव्हाच उपयोगी आहे
एखाद दुसरा कांदा चिरण किंवा २ गाजरांची कोशिंबीर करण ह्यात ती गाजर किसणीवर किसण्यापेक्षा fp ची भांडी धुण हे मोठ आणि वेळ खाऊ काम आहे

अर्थात हे माझं मत आहे :-)


Psg
Tuesday, February 07, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा ची सूचना चांगली आहे. आपण रेसिपी साठी जसा नवीन thread करतो तसा नविन उपकरणासाठी नवा thread करूया.. जसा की हाच thread mixer cum food processor होऊ शकतो.. पण कोण करेल हे? mods का users ना पण परवानगी आहे?
डीमडू: बरोबर आहे. एरवी आपण हातानी करतो तसच continue करायच, पण लोक येतात तेव्हा, किंवा घरासाठीच आपण जास्तिच काही करतो तेव्हा उपयोग होइल..
आम्हाला आमचा mixer बदलायचा आहे, तर नवा mixer च घेण्याऐवजी हा २ इन १ घेता येइल..


Milindaa
Tuesday, February 07, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे करणार असाल तर सध्या नव - नवीन थ्रेड चालू करा. मॉड्स नंतर हलवतील ते योग्य जागेवर.

psg , तुला मेल पाठवून खूप दिवस झाले पण उत्तर आलं नाही


Deemdu
Tuesday, February 07, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly maI maaJaa ima@sar Aa<aaca badlalaa AaiNa to jao exhibition laagat %yaatuna %yaajaunyaa ima@sar cyaa badlyaat 1000 É Aa^f imaLvauna fp Gaotlaa 3000 rat :-)

Kup mhNajao Kupca svast Jaalao Aahot
%yaatunahI jar single unit ima@sar kma fp Gaotlaa tr AMjalaIvaalao tr 2300 to 2400 É maQyao dotat.

Aata ima@sarlaaca dusarI attachment Asato jaoMvha ima@sar laavaayacaa toMvha tI attachment laavau naka
fp saarKa vaaprayacaa Asaola tr tÜ base laavauna %yaavar fp ca BaaMD laavaa Asao fp pNa imaLtat %yaamauLo electrical cunsumption pNa kmaI hÜt naahI tr jarI ima@sar ikMvaa fp nausata vaaprayacaa Asaola trI dusar yaunaIT sauÉ raht


Moodi
Tuesday, February 07, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम एवढे छान नाव असुनही हे पीयसजी असे नाव का घेतलेस, मॉडना सांगुन बदल पाहू.
FP चांगला असतो ग. माझ्या सासरी आहे पुण्यात. पण आता नवीन जर घेतीयस तर नारळ कातायची नवीन attachments असलेला आलाय बाजारात तो घे, अन त्याला ज्युसरचे पण वेगळे भांडे मिळते. आम्ही इकडे येताना फिलीप्सचा घेऊन आलो. FP नाही मिक्सर ग. फिलीप्स, रीको, सुमीत अन अंजली छान. FP च्या बाबतीतल्या श्यामलीच्या सुचना छान आहेत.
दिमडु सही ग.


Savani
Tuesday, February 07, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहेरी FP होता आणि छान उपयोग पण व्हायचा. मला यु.एस. मध्ये असा कोणता FP चान्गला आहे ते सान्गाल का? कणिक मळता येइल असा आहे का? with grinder attachment too . मागे मी इथे बघितला होता एक त्यावर लिहिले होते dough maker पण नाव नाही आठवत.

Seema_
Tuesday, February 07, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

braun चा food processor cum mixer मस्तच आहे. आईकडे inalsa चा आहे. तो ही छानच आहे. पण एकदा braun चा processor वापरला कि मग तोच आवडायला लागतो असा माझा अनुभव आहे.

Prajaktad
Tuesday, February 07, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्राउनचा माझ्या वहिनीकडे आहे छान work करतो.
usa मधे कुठला fp चांगला आहे?
indian brand चा आणि us मधे work करणारा mixer कम fp indiat कुठे मिळेल?पुण्यात मिळत असेल तर दुकानाचे नाव सांगा?


Milindaa
Tuesday, February 07, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम एवढे छान नाव असुनही हे पीयसजी असे नाव का घेतलेस,
<<<

अगं मूडी, तू नाही का एवढे चांगले आणि वेगळे नाव असूनही असले मूडी नाव घेतलेस, तसंच :-)

Psg
Wednesday, February 08, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मैत्रिणींना धन्यवाद! आता दुकानत, बुधवर पेठेत, सगळीइकडे चौकशी करून सांगते तुम्हाला. डीम्डू, तू suggest कर चांगली दुकान.. next, plugin मधे गेली आहेस का?कशी वाटली?

Moodi
Wednesday, February 08, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना मिलिंदा, असा आयडी मी का घेतला याचाच पश्चाताप होतोय. देतोस का बदलुन माझ्या मूळ नावाने? मी तय्यार आहे एका पायावर.
आणी पूनमच्या नावाचा शॉर्टकट करता येत नाही माझ्या नावाचा मात्र नक्कीच होईल अन ते मला आवडत नाही ना.


Renushahane
Thursday, February 09, 2006 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मधे कोणता चांगला ब्लेंडर्/फ़ूड प्रोसेसेर आहे?मला घरात एक एक करत सगळच नवीन घ्यायला झालय,प्लीज गाईड करा

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators