Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 13, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » आहार अन आरोग्य » Archive through January 13, 2006 « Previous Next »

Moodi
Sunday, January 01, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांसाठी जसे " अ " जीवनसत्वाची गरज असते तशी डोळ्यातील नसांकरता " ब " जीवनसत्वाची गरज असते. या जीवनसत्वा अभावी डोळ्यातील पडद्यात कोरडेपणा वाढुन रेटीना व लेन्सच्या पेशींचा र्‍हास होतो.

" क " आणी " ई " जीवनसत्व पण यासाठी उपयोगी पडते.

वयाच्या चाळिशीनंतर डोळ्याभोवती पडणार्‍या वळ्या या अ जीवन्क़्सत्वा अभावी पडतात.

ही जीवनसत्वे खालील प्रकारात मिळतात. जरी माहिती असली तरी देतेय, राग मानु नये.

जीवनसत्व अ : कलेजी, लिव्हर ऑईल, घरचे ताजे लोणी, दुध, संत्री, अंडी, गाजर, हिरव्या पालेभाज्या, लाल भोपळा, खरबुज, आंबा, जर्दाळू, टोंएटो, चीज, घाण्याचे तेल.


ब १ : तांदळाचा कोंडा, गहू, मटार, नाचाणी,बाजरी, पानकोबी, मोडाची व अंकुरीत कडधान्य.

ब२ : सोयाबीन, डाळी, तांदुळ, नाचणी, दुध.

ब १२ : दुध, चीज, अंड्याचे पिवळे, दही, ताक


क : आवळा, देशी गुलाब पाकळ्या, मनुका, लिंबु वर्गीय सर्व फळे.


ई : गव्हांकूर, रताळी, टॉमेटो, मका, बीन्स, हिरव्या पालेभाज्या, लोणी, अंडी, दाणे, घाणीचे तेल.

ज्या आहारात साखर, मैदा, वनस्पती तुप, खारे पदार्थ सामिल नसतात पण दही, ताक, दाणे, फळे, भाज्या तीळ, तुप, डाळी, दुध सामिल असते ते पदार्थ नजर तीक्ष्ण बनवतात.


Prajaktad
Monday, January 02, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी!नविन वर्षाचि सुरवात चांगल्या बीबी ने केलिस तर अजुन माहिति देच आता!

Sunilt
Monday, January 02, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, उत्तम माहिती. धन्यवाद !



Moodi
Monday, January 02, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

औषधी गुलकंद.

गावठी गुलाबी गुलाबाच्या पाकळ्यांचा अतिशय छान गुलकंद होतो. आमच्या जुन्या घरी मागच्या दारात बाग होती तेव्हा हा गुलाब भरपुर होता, नंतर सर्व गेले. माझी आई नेहेमी याचा गुलकंद करीत असे. याचे उपयोग खालीप्रमाणे.

गुलकंद शरीरास अतिशय थंडावा देतो त्यामुळे हिवाळ्यात खाऊ नये. मात्र दर उन्हाळ्यात आवर्जुन खावा. हा हृदयासाठी पोषक अन बलकारक आहे. पित्त, वात अन कफ या तिन्ही दोषांकरता गुणकारी आहे.

रेचक आहे त्यामुळे पोटही साफ होते, पचनास हलका अन रक्त शुद्ध करुन रक्तातील अतिरीक्त उष्णता ही हा कमी करतो. गुलकंदामुळे भुकही वाढते म्हणजे चांगली भुक लागते. लहान मुलांसाठी तर हा उपयुक्त टॉनिकचे काम करतो.

ब्लड प्रेशरवर म्हणजे रक्तदाबावर ही हा चांगला उपयोगी आहे. गुलकंदामुळे राक्त विकार, रक्त दोष कमी होतात तसेच कातडीचे विकार म्हणजे खरुज, खाज अन इतर चामडी रोग बरे होतात. गोवर कांजिण्या येऊन गेल्यानंतर पोटात जी उष्णता साठलेली असते ती याने बरी होते.

गरोदर स्त्रीयांसाठी तर हा सोन्याचे काम करतो कारण त्या अपचानामुळे इतर औषधे घेऊ शकत नाहीत त्या वेळी हा चांगला. तसेच पोटातील gas , आंबट, करपट ढेकर, छातीत जळजळ अन हातापायाच्या तळव्याची आग या सर्व विकारांवर अतिशय उपयुक्त आहे.

गावठी गुलाबाच्या पाकळ्या स्वछ करुन त्याच्या दुप्पट साखर घालुन ते बरणीत भरुन, ती बरणी तोंडावर पातळ फडके बांधुन उन्हात ठेवावी, असे महिनाभर उन्ह दाखवावे की झाला गुलकंद तयार.


Dineshvs
Monday, January 02, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलकंदासारखे सोपे आणि चविष्ठ औषध, म्हणावे तितके लोकप्रिय नाही. आपल्याकडे त्या गुलाबाचे तितके पिकहि निघत नाही.

आहार योग्य हवाच आणि पुरेशी झोप हवी, अनावश्यक जागरणेहि टाळावीत. हल्ली अगदी लहान वयातच हि डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे अनेक जणाना आलेली असतात.
आपल्या सगळ्यांची आवडती राणी मुखर्जी, ला मेकपशिवाय बघितले तर तिलाहि याचा किती त्रास आहे ते जाणवेल.
बाकि मुडि, पुरक माहिती हवी असेल तर मी आहेच.


Moodi
Monday, January 02, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. तुम्ही तर खजिनदारच आहात, प्रा. शरदिनी डहाणुकर यांच्या मुळे तुम्ही पण बरीच माहिती दिलीत कारण त्यांच्या सारखे तुम्ही पण निसर्ग प्रेमी.

Bee
Tuesday, January 03, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहार अन आरोग्य!!!!! मूडी तुझे नविन वर्षाचे resolution आमच्याही कामी पडणार आहे.

दिनेश, गुलकंद फ़क्त भारतातच तयार होतो का? इथे जो भारतातून येणारा गुलकंद येतो तो नंतर लगेच खराब होतो. म्हणजे preservative च्या दृष्टीने तो कमी पडतो.

हाडांना बळकटपणा येण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी काय खावे? उतारवयात हाडे ठिचूळ होतात, ह्यावर काही उपाय?

करडे केस, जे आहेत तितके पुरे :-)
परत त्यांची संख्या वाढू नये, तसेच केस काळेभोर, ओलसर राहण्यासाठी काय खावे?


Charu_ag
Tuesday, January 03, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मुडी, नविन वर्षाच्या संकल्पांना तुझ्या माहितीची जोड मिळाली. आता भरपुर माहिती येवुदे.


Arch
Wednesday, January 04, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लीच बर्‍याचदा ऐकल की अमुक एक पदार्थाबरोबर अमूक एक पदार्थ खाऊ नये. अशी कोणची combinations आहेत आणि त्यामुळे काय अपाय होण्याची शक्यता आहे?

मटणाबरोबर दुधाचा प्रकार खाऊ नये अस मला परवा कोणीतरी सांगितल. म्हणजे मटणाच जेवण आणि fruit salad अस combination ठेऊ नये. मला हे नवीनच होत. कोणी ह्यावर लिहू शकेल का?


Moodi
Wednesday, January 04, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च अग मासे अन दुध हा विरुद्ध प्रकार आहे, याने त्वचा रोग होतात असे आयुर्वेद सांगते, पण इकडे इंग्लिश लोक सरळ मासे दुध अन वाईन मिक्स करुन शिजवतात. पण मला वाटत यात तथ्य आहे म्हणुन कारण या लोकंची त्वचा फार डागाळलेली दिसते आपल्यासारखी नितळ वा निरोगी दिसत नाही.

पण मटणात आपण दही घालतोच की marinate करायला, त्यामुळे मला नाही वाटत की फ़्रुट salad चालत नाही म्हणुन.
अर्थात दिनेशनी यावर प्रकाश टाकलेला चांगला कारण या क्षेत्राविषयी त्याना माहिती चांगली आहे.


Ashwini
Wednesday, January 04, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही आणि मासे हे विरुद्ध अन्न आहे, त्याने त्वचा रोग होतात, हे बरोबर आहे. मी मागे विरुद्ध अन्नाचे प्रकार कोणते आहेत याची लिस्ट मला वाटते कुठेतरी दिली होती, पाहायला पाहीजे. या bb चे पण आहाराच्या bb प्रमाणे विभाग करायला हवेत म्हणजे गोष्टी चटकन सापडतील.

असो. दुध आणि पोहे, दुध भात मीठ, दही भात मीठ, फळे आणि दुध, मासे आणि दुध किंवा दही, कुठलाही गरम पदार्थ आणि गार पदार्थ एकत्र करणे ही आणखी काही उदाहरणे.

मटणाबरोबर दही, दुध चालतं. पण fruit salad हे स्वतच विरुद्ध अन्न आहे ग आर्च.. :-)

बाकी मूडी, मस्त माहिती देते आहेस. Keep it up ...


Moodi
Wednesday, January 04, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी धन्यवाद. तू तर स्वता डॉक्टर असल्याने याची माहिती देशील हे माहितीच होते पण तुला वेळ होईल तेव्हाच तू इकडे येऊ शकतेस त्यामुळे तुझी पण आम्ही उत्सुकतेने वाट पहात असतो. मला पण आठवतय तु खूप मोठी लिस्ट दिली होतीस या विषयी अन मसाल्यांच्या गुणधर्म अन उपयोगा विषयी. परत शोधावी लागेल ती लिंक.

आर्च केळ्याच्या शिकरणात मी व माझी आई आता दुध न घालता फक्त साखर अन साजुक तुपच घालतो, ते पण छान लागते.

फळांमध्ये आम्ल म्हणजे asid असल्याने संत्रे,सफरचंद वगैरेसारखी फळे दही, शेक, कस्टर्ड स्वरुपात खाऊ नयेत. संत्र्याचा रस दुधात टाकल्यावर लगेच ते नासते पण आपल्याला ते लक्षात येत नाही. कारण आपण फोडी अन पाकळ्या करुन टाकतो.

मात्र सन्त्रे अन दुध चेहेर्‍यावर उत्तम ब्लीच करते.

संत्रे रक्त साफ करणे अन रक्तदाबावर तसेच डोळ्यासमोर अंधारी येणे याकरता फार चांगले आहे.


Arch
Wednesday, January 04, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनीने दिली होती यादी. पण काय झाल आता भारतात गेले असताना एका ठिकाणी जेवायला मटण वडे आणि गोडाच म्हणून पुरणपोळी होती. काय combination न? पण काही ckp लोकात असा बेत असतो लग्नानंतरच्या जेवणावळीत. मला पुरणपोळी फ़क्त दूधाबरोबरच आवडते म्हणून मी दूध मागितल तर त्यांच्याकडच्या आजी म्हणाल्या मटण खाते आहेस न मग दूध नाही मिळणार. तूपाबरोबरच खा. नाहितर बाधेल. म्हणून विचारला वरचा प्रश्ण.

मूडी मी रोज संत्र खाते पण त्याचा हा फ़ायदा आहे माहित नव्हत. thanks! पण काय ग संत्र आणि मोसंब ह्याचे दोघांचेही गुणधर्म सारखेच असतात का?


Moodi
Wednesday, January 04, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असावेत ग आर्च कारण दोन्ही लिंबुवर्गीय फळे आहेत, मला याविषयी मात्र कमी माहिती आहे कारण मी संत्र्यावर खूप लेख वाचलेत अन संत्र्याचा ताजा ज्युस अन फळे दोन्ही तरतरी आणतात.
मात्र आजारी माणसाला आपण एकदम अन्न न देता मोसंबीचा रस देतो त्यामुळे मला वाटत की दोन्हीचे गुणधर्म एकच आहेत.
संत्रे अन टॉमेटो दोन्ही आतडी स्वछ करतात, अन लोहाकरता उत्तम. शरीरातील अंतर्गत किड कमी होते या दोघांमुळे.

अजुन दुसरी माहिती देईनच.


Megha16
Wednesday, January 04, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मुडी
नवीन वर्षाची सुरवात खुप छान केलीस तु, खुप छान माहीती देलीस सगळ्यांना.
देत रहा अशीच माहीती.
मी पण अस एकलय की मटण मासे खाले की दुध,दही खावु नये याच नक्कि कारण मलाही माहीत नाही.
मेघा.


Seema_
Thursday, January 05, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी तु वरती गुलकंदाबद्दल लिहिलयस. दिड वर्शाच्या बाळाला चालतो का ग गुलकंद दीला तर ?. माझ्या मुली ला फ़ार आवडला होता तीन taste करुन पाहिल्यावर . चालत असेल तर कधीतरी गम्मत म्हणुन देईन.

Moodi
Thursday, January 05, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा दिला तर चालेल ग गुलकंद पण जास्त नको देऊस, गोड असल्याने ती मागेल अन खाईल आवडीने पण दातांसाठी जरा जपुन, चिकट गोड असतो ना तो म्हणुन. पाहिजे तर पोळीला लावुन किंवा दुध प्यायच्या आधी छोटा चमचाभर दिला तरी चालेल.

Charu_ag
Thursday, January 05, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, कोणत्या वेळी काय खाव आणि सगळ्यात महत्वाच ' काय खाऊ नये', त्याबद्दल ही सांगतेस का?

डाळीचे पदार्थ संध्यकाळी खाऊ नयेत, नाहीतर पित्ताचा त्रास होतो.
सकाळी भात किंवा तांदळापासुन बनलेला कुठलही पदार्थ खाल्ला तर दिवसभर मरगळ येते. अर्थात हे माझे अनुभव. अस सगळ्यांच्याच बाब्तीत होत का?

कितीही ठरवल तरी सकाळच्या नाष्टाच्या वेळी गडबड व्हायची ती होतेच. अश्यावेळी पौष्टीक पण जड नसलेले असे काही करता येईल का?


Moodi
Thursday, January 05, 2006 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु लिहिते त्यावर थोडा वेळ दे.

Bee
Thursday, January 05, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे ऐकले मी तूप आणि कोथिंबीर ह्याचे मिश्रण कधी होऊ देऊ नये. तसेच चहा घेतल्या नंतर मध खाऊ नये. हे प्रकार इतके विरळ आहेत की कुणी असे combination करून खात असेल असे वाटत नाही. पण आपल्याला ज्ञान म्हणून माहिती हवे. अजून यादी येऊ द्या...

अर्च, तुमच्याकडे मोसंबी मिळते का? मला तर वाटले होते, मोसंबी ही फ़क्त भारतातच मिळते की काय. इथे कधीच बघायला मिळाली नाही.

शतायुषी मधे असे सांगितले आहे की दहा संत्री = एक मोसंबी! आजारपणात आपल्याला सर्वाधिक मोसंबी खायला सांगतात कारण मोसंबीमधे उर्जा भरून निघण्याची ताकद असते.


Zelam
Thursday, January 05, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी साखरेऐवजी मध घालून चहा पिणारी माणसे माझ्या ओळखीत आहेत.
North America मध्ये संत्री मोसंबी दोन्ही मिळतात. इथे मोसंब्यांना oranges म्हणतात आणि संत्र्यांना tangerines

चारू मी असे ऐकले आहे की सकाळच्या वेळी फळे खाल्ली तर अत्त्युत्तम. मी स्वतः फळे कधीही खाते. तुला cereals आवडत असतील तर का नाही खात नाश्त्याला? मला दूध आवडत नाही त्यामुळे मी नुसतेच oat cereal खाते.


Prajaktad
Thursday, January 05, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरिल पोस्ट्मधे म्हटले आहे कि मटन आणि दुधाचे पदार्थ्(किवा दुध्)एका वेळेस खावु नये मग,चिकनला पण हाच नियम लागु होतो का?

Moodi
Thursday, January 05, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळी फळे खाल्ली की सोन्यासारखी, दुपारी खाल्ली की चांदीसारखी अन रात्री खाल्ली की तांब्यासारखा परीणाम करतात असे वाचलय.
रात्री शक्यतो सफरचंद खाऊ नये, त्याने पोट साफ होण्याला जरा त्रास होतो पण रात्री पेअर्स, चिकू, द्राक्षे अशी फळे चालतात.
मात्र द्राक्षाचा अतीरेक करु नये.
रात्री शक्यतो दही खाऊ नये कारण त्याने कफ वाढतो, अगदीच वेळ आली तशी तर चिमुटभर मीठ घालायला विसरु नये अन साखरही कमी घालावी, कारण साखर अन दही हे मिश्रण कफ वाढवते.

ओटाची खीर, सिरीयल्स फार उत्तम. ते पौष्टीक असतेच अन पोट पण साफ रहाते.
भाताने सुस्ती येते हे खरे आहे. सकाळी नाश्ता घ्यावाच. त्यात दुध किंवा ज्युस अन त्याबरोबर कमी तेल तुपातील पराठा किंवा अगदी ताजी पोळी पण चालेल. पराठा, पोहे किंवा इडली हे पदार्थ पित्तकारक प्रकृतीच्या लोकाना जरा त्रासदायक ठरतात कारण त्याने आम्ल तयार होऊन घशाशी येते. मात्र वात अन कफ कारक प्रकृतीच्या लोकाना इडली, पोहे चालु शकतात. सकाळी हलका उपमा पण उडीद डाळ फोडणीत न घातलेला असा करावा.

तुरीचे वरण सुद्धा रात्री कमी खावे त्या ऐवजी तुर अन मुग डाळ मिक्स करुन शिजवावी.


Moodi
Thursday, January 12, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vitamins ची माहिती थोडी वेगळ्या स्वरुपात. कशातुन काय मिळते हे वर दिले आहेच,म्हणुन खाली थोडक्यात देतेय.

Vhi. A : दृष्टी यंत्रणा,सांधे जोडणारे स्नायू अन त्वचा. दुध, अंडे,गाजर यात मिळतेच. याच्या अभावी रातंधळेपणा, फुफ्फुसाचे विकार, विकास खुंटणे अन त्वचा खरबरीत होणे हे विकार होतात.

Vit B 2 रीबोफ्लावीन : दृष्टी,त्वचा, चयापचय प्रक्रिया यासाठी. दुध, कढान्ये,मांसान्न यातुन मिळते. या अभावी ओठ फाटणे, मळमळ, पचनशक्ती मंदावणे हे विकार होतात.

Vit B 6 फायरीडॉक्सीन : लाल रक्त पेशी निर्माण करणे, मज्जा अन स्नायू तंतुंना उत्तेजन देणे, प्रोटिन्स निर्माण करणे इत्यादी. मांसाहार, मासे अन, हिरव्या भाज्या, डाळी अन कडधान्ये यात असते.

Vit B 12 : वरील B 6 चेच काम करते पण दुध अन मांसान्नात असते, भाज्यात नसते. या अभावी नैराश्य, स्मृती र्‍हास,, माज्जा स्नायुत बिघाड इत्यादी होते.

Vit B 12 : पचनाकरता. दाणे, धान्य, मांसान्न,मासे यातुन मिळते. या अभावी पचन शक्तीचा र्‍हास, डोकेदुखी, थकवा, स्मृती कमकुवत होणे, त्वचेवर परीणाम करते.

Folic acid : पेशींच्या अतीरीक्त वाढीवर नियंत्रण, लाल रक्त पेशी निर्मिती अन नियंत्रण. हिरव्या भाज्या अन लिव्हरमध्ये मिळते. या अभावी निद्रानाश, पचन्शक्तीत बिघाड, वाढ खुंटणे, हानीकारक anemia .

Vit. C : सांध्याचे स्नायु, लोह पचन क्रिया,जखम भरणे, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव / पसार थोपवणे. या अभावी anaemia , हिरड्यातुन रक्तस्त्राव होतो. हे सर्व प्रकारच्या भाज्या अन सर्व लिंबूवर्गीय फळे यातुन मिळते. उदा. लिंबु, संत्रे, मोसंबे, बटाटा.

Vit. D : calcium , हाडे, दात, हिरड्या बळकटी अन वाढ. या अभावी हाडे ठिसुळ होणे रीकेट्स होणे हे होते. दुध, दुधाचे सर्व पदार्थ अन सर्वात उत्तम कोवळे सूर्यस्नान अंगावर घेणे.

पंजाबी लोक सकाळी ७ वाजता बाळाना अन छोट्या मुलाना मोहरीच्या तेलाने मालीश करुन कोवळ्या सूर्य किरणात निजवतात थोडा वेळ. म्हणुन ते लोक जास्त हट्टेकट्टे असतात. उन्हात Vit. D असते.

Vit. E टोकोफेरल्स : स्त्रीत्वाची हार्मोन्स निर्मिती, Vit. A, C, D चे संरक्षण करते. या अभावी नुकत्याचे जन्मलेल्या मुलाना anaemia असतो. हे दुध, तेल, लिव्हर, तीळ, सूर्यफुल, हिरव्या भाज्या, टरफलासहीत धान्यात असते.


Nalini
Thursday, January 12, 2006 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, खुपच छान माहिती देते आहेस.
मुडी म्हणते त्याप्रमाणे सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणात D जीवनसत्व असते. त्याचा अभाव झाल्यास लहान मुलांना मुडदुस होऊ शकतो.
मी पण आणखी माहीती टाकते थोड्यावेळात.




Nalini
Friday, January 13, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैद्य खडीवाले यांचा थंडीसाठी सल्ला

जमलं तर रोज व्यायाम करा (तोही कुवतीप्रमाणे) नाहीतर किमान 24 सूर्यनमस्कार घाला. फक्त पाच मिनिटं शवासन करा. इतर व्यायाम करत असला, तरीही व्यायामानंतर शवासन मस्ट आहे. एवढं करण्याने आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. रोज फळं खाणं आणि रोजच्या जेवणात आंबट, कडू, गोड, तिखट, तुरट, खारट असा षड्रसात्मक आणि चौरस आहार घ्या. तोही वेळेवर! कडधान्य, उसळी, डाळींचा समावेश करा. जेवणानंतर शतपावली आवश्य करा. शक्य तितकं चहा-कॉफी टाळा. फक्त दुधात आणि ताज्या ताकात व्हिटॅमिन क्च12 असल्याने ते रोज प्यायला हवं. रात्री दही आणि दह्याचे पदार्थ टाळावेत. त्याने सदीर्-खोकला होऊ शकतो. गरम दुधात साखर घालून रात्री घेतल्याने स्ट्रेस कमी होतो. रिलॅक्स्ड वाटतं. लठ्ठ व्यक्तींनी गायीचं दूध घेतल्यास वजन वाढणार नाही. गरम लिंबूपाणी वजन कमी करण्यासाठी योग्य आहे. वरण-भात आणि तूप हे जगातलं सगळ्यात उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्याने स्टॅमिना टिकण्यास मदत होते.

सत्त्वयुक्त सुकामेवा

सुकं खोबरं, जरदाळू, बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू, बेदाणे, मनुका, खारीक, सुकेअंजीर याचे एकेक भाग घेऊन त्याचे अगदी बारीक तुकडे करून एक चमचा रोज सकाळी घेतल्यास स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होईल.

Nirnay
Friday, January 13, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी

प्रेग्नन्सि मधे रोजच्या आहारात कोणत्या गोष्टिन्चा समावेश असावा याबद्दल सान्गशील का?

सहज सोप अस कहितरि जे तयार करायल जास्त अवघड नसेल अस.


Moodi
Friday, January 13, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगते ग थोड्या वेळाने.
नलिनी सुरेख माहिती.


Prajaktad
Friday, January 13, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्णय! तुला मूडी आणी इतर उत्तम माहिती पुरवतिलच पण मी जो माझ्यावेळी आहार घेतला ते सांगते.
पहिल्या ३ महिन्यात उलट्यांचा त्रास होत असेल तरी जेवण वेळेवर करावे(ही वेळ अगदि बाळाच्या जन्मापर्यत आनि नंतरहि चुकवु नये)
दिवसातुन चार कप दुध अवश्य घ्यावे,दुध आवडत नसेल तर २ कप घ्यावे मग चिझ दहि अशि जोड द्यावि अंडी,पालेभाज्या,सर्वा फ़ळ्भाज्या अवश्या खावे.लाल भोपळा खावा.
मांसाहार म्हणजे चिकन वैगेरे चालत असेल तर निट शिजवुन्)आठवड्यातुन दोनदा खायला हरकत नाही.
७वा महिना ते बाळाला nursing चालु असे पर्यंत " शतावरी कल्प " दुधातुन घ्यावा.
" वंशवेल " हे चांगले पुस्तक आहे त्यात चौरस आहार कसा असावा यावर खुप छान माहिती दिली आहे.





Nirnay
Friday, January 13, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks prajkta
दुधाचा चहा घेतला तर चालतो का कि दुधच घ्यावे

निर्णय


Moodi
Friday, January 13, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्णय काही माहिती नंतर देईन. पण दुध २ दा घे दिवसातुन. चहा नेहेमीसारखा एकदा सकाळी अन एकदा संध्याकाळी चालेल. पण अतीरेक नको. वेलदोडा चालेल चहात.
हिरव्या फळभाज्या अन पालेभाज्या, सर्व प्रकारची फळे खात जा. मनुका भारतातील सर्वश्रेष्ठ, पण U S मध्ये नाही मिळाल्या तर तिथले सुलताना, करंटस अन ताजी दोन्ही रंगाची द्राक्षे खा.
मनुका रात्री पाण्यात भिजवुन सकाळी त्या त्याच पाण्यात कुस्करुन खा अन ते पाणी पी म्हणजे पोट साफ राहील. जर्दाळु, सुके अन ताजे अंजीर यात लोह तत्व असल्याने ते पण खात जा. कारण डिलीव्हरीनंतर लोहाची गरज असते अन बाळाच्या पोषणाकरता उत्तम.

रात्री दही खाऊ नकोस. दुध नुसते प्यायला आवडत नसेल तर त्यात डॉक्टरने सुचवलेले पदार्थ घालुन पी जसे आपल्याकडे बोर्नव्हीटा, ओव्हलटाईन, बुस्ट असते असे. राजगीरा अन शिंगाड्याच्या पीठाची खीर घे कारण याने पण calcium मिळते.

कोशिंबीरीत गाजर, बीट हे वाफवुन घे अन टॉमेटो, कांदा कच्चा चालेल, यात शेंगदाणे कुटा ऐवजी धणे जीरे पुड वापर. कधीतरी कुट चालेल.
उपवासाच्या फंदात पडु नकोस.
मासे खात असशील तर करीत / कालवणात चिंचे ऐवजी आमसुल वापर.
चिकन अन मटण चांगले शिजवुन घे.

कुठल्याही पदार्थाचा किंवा चवीचा अतीरेक होऊ देऊ नकोस.
म्हणजे फक्त गोड किंवा फक्त तिखटच जास्त खाऊ नकोस, सगळे थोडे थोडे प्रमाणात खा.

अन्न दिवसातुन ४ वेळा खा. एकदम भरपेट नाश्ता / न्याहरी किंवा जेवण्यापेक्षा सकाळी ८ ते १० च्या दरम्यान नाश्ता, दुपारी १२ ते १.३० च्या दरम्यान जेवण, संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान एखादे फळ किंवा पोहे, सांजा / उपमा अन रात्री ८ पर्यंत जेवण अन अर्ध्या तासाने दुध वगैरे. रात्री फळ दुधाबरोबर खाऊ नकोस.

पाणी भरपुर पी निदान ६ ग्लास तरी. सध्या थंडीचे कोमट ते गार असे पाणी पी. एकदम थंड पाण्याने पोट दुखुन gases होतील.

अजुन माहिती देईनच. तीळ अती खाऊ नकोस गरम पडतील, जपुन खा.


Renushahane
Friday, January 13, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nalini kinva moodi...2-3 prashna ahet..mi 2 vela chaha pite..purna dudhacha( 1% milk)..shivay duparchya ani ratrichya jevna nantar 1 glass soy milk pite.tar,purna dudhacha chaha,he milk serving mhanun dharla tar chalel ka?
koshimbirit mi 1 tbsp danyacha kut vaparte..sadhran athavdyatun 2-3 vela..he yogya ahe ka?
ati soy products khallyane iron deficiency hou shakte asa vachla ahe..karan soy iron absorption chya aad yeta.kiti pramanat soy yogya ahe?mi polyanchya kanket dekhil soy flour ghalun thevte.

renu

Nirnay
Friday, January 13, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks मूडी

मनात आलेल्या प्रश्नाच तुझ्या कडे हमखास उत्तर असणार याचि मला खात्रि होति आणि खुप छान वाटल तुझि पोस्ट वचुन फ़र मोलाचा सल्ला दिला आहेस

पुन्हा एकदा मनापासुन आभार

निर्णय


Moodi
Friday, January 13, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्णय सर्वात महत्वाची गोष्ट विसरु नकोस, ती म्हणजे आता दातांची काळजी घे, कारण सारख्या उलट्या झाल्याने दातांवर आम्ल चढते त्यामुळे त्यांची किंचीत झीज होते तेव्हा दातांची नीट काळजी घे.

आठवड्यातुन एकदा लिंबु सरबत घे किंवा नाहीच जमले तर वरण भातावर किंवा कोशिंबीरीत थोडे लिंबू पिळुन ती खा, म्हणजे Vitamin C मिळेल. अन शक्य असेल तर आठवड्यातुन ३ ते ४ वेळा संत्र्याचा ज्युस घेत जा.

बाळाचे दात पण निरोगी रहाण्यासाठी तुलाच आता ही काळजी घ्यावी लागेल. मैद्याचे जड पदार्थ टाळ.


रेणू मला सोया विषयी एवढी माहिती नाही ग, आश्विनीला माहित असेल.
नाहीतर मग कुणाला तरी विचारुन सांगेन.


Suniti_in
Friday, January 13, 2006 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्णय सोया मिल्क तर चांगले आहे. त्यात प्रथिने जास्त असतात. शिवाय lactose (साखर) नसते. vitamin-D / whole milk देखील चालेल. याचे घरी ताजे दही चांगले लागते. उलट्या जास्त होत असतील तर सकाळी पंचाम्रुत घ्यावे. मळमळत असेल तर आल्याचा तुकडा मिठ लावून चघळावा. मला याचा बराच फरक पडला होता. मात्र acidity जास्त असेल तर doctor च्या सल्ल्याने गोळ्या घे. खाली लिंक देत आहे तेथेही काही माहिती मिळते का बघ.


http://www.aarogya.com/marathi/conditions/specialties/gyanocology/pregnutri.asp

http://www.indiaparenting.com/expectingparents/index.shtml


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators