
साहित्य (चार जणांसाठी) :-
दोन वाट्या बासमती तांदुळ
अर्धी वाटी अख्खा मसुर
एक मोठ्या आकाराचा कांदा
एक मोठ्या आकाराचा बटाटा
एक मध्यम आकाराचा टोमॅटो
अर्धी वाटी फ्लॅावर
अर्धी वाटी गाजर
चार हिरव्या मिरच्या
दोन टेबलस्पुन साजुक तुप
दोन तमालपत्राची पाने
तीन दालचीनीचे तुकडे
एक मोठी (मसाल्याची) वेलची
एक चक्रीफुल
आठ-दहा लवंगा
एक टिस्पुन गरम मसाला
एक टिस्पुन धने व बडीशोप पुड
एक टिस्पुन आले लसुण पेस्ट
एक टिस्पुन हिरव्या मिरचीचा ठेचा
आठ-दहा कडीपत्त्याची पाने
दहा-बारा काजु
चवीपुरते मीठ
'मसुर पुलाव' साठी लागणार्या भाज्यांची कापाकापी करुन बाकीचे मसाले आणि जिन्नस पटकन हाताला उपलब्ध होतील अशी तयारी करुन घ्यावी.
नॅानस्टीक कुकर अथवा पॅन मधे मध्यम आचेवर साजुक तुप तापवून त्यात अर्ध्या रिंग्जच्या आकारात कापलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतल्यावर त्यात लवंगा, वेलची, तमालपत्र, दालचीनी, कडीपत्ता आणि काजु घालुन चार-पाच मिनीटे परतावे.
कांद्याचा रंग गोल्डन ब्राउन झाल्यावर त्यात आधी रिंग्जच्या आकारात कापून पुन्हा चार भागात कापलेला टोमॅटो, आले लसुण पेस्ट, उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या, गाजराचे तुकडे आणि फ्लॅावर घालुन दोनेक मिनीटे सतत ढवळावे.
त्यानंतर थोड्या मोठ्या फोडी कापलेला बटाटा, गरम मसाला, तीन ते चार तास भिजवून ठेवल्यावर अर्ध्या वाटीचा फुगुन एक वाटी झालेला अख्खा मसुर आणि धने-बडीशोप पुड घालुन दोन-तीन मिनीटे परतल्यावर त्यात चार वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे.
मिश्रणाला चांगली उकळी फुटल्यावर त्यात धुतलेला बासमती तांदुळ घालुन गॅसची आच मोठी करून मिनीटभर ढवळावे.
पाच मिनीटे मोठ्या आचेवर (न ढवळतां) शिजवल्यावर पुन्हा गॅसची आच मध्यम करावी. दम लावण्यासाठी चांगल्या जाड ताटाच्या सपाट बाजुला वर्तमान पत्राचा कागद पाणी लाऊन व्यवस्थीत चीकटवुन झाकण म्हणुन कुकर/पॅनवर ठेउन त्यावर लोखंडी खलबत्ता, वरवंटा पैकी काही नसल्यास सरळ दोन-तीन दगड वजन म्हणुन ठेवावे. (आमच्याकडे बिना शिट्टीचा नॅानस्टीक कुकर असल्याने कागद आणि वजन वापरावे लागले नाही)
बारा ते पंधरा मिनीटांनी गॅस बंद करून पुढे पाच-सात मिनीटे वाफ मुरू द्यावी. शेजारी भोचक असतील तर पुलाव तयार होत असताना दरवळणार्या त्याच्या सुगंधामुळे तुमच्या घरात काय शिजतय याची विचारणा करायला नक्की येणार ह्याची खात्री बाळगा.
तयार झालेला स्वादिष्ट मसुर पुलाव भाजलेले उडदाचे पापड आणि स्लाईस्ड कांदा टोमॅटो बरोबर (आवडत असल्यास थोडीशी कोथिंबीर भुरभुरुन) सर्व्ह करावा. पापडांच्या जोडीला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीची दह्यातली कोशिंबीर असल्यास सोने पे सुहागा!
- मसुर तिन तास भिजवुन ठेवला तरी चालेल, पण चार तासांपेक्षा जास्त वेळ भिजवु नये.
- वरील (शाकाहारी) रेसिपित 'बटाट्या ऐवजी मटण किंवा चिकनचे तुकडे' एवढाच बदल करुन 'मसुर-मटण-पुलाव' आणि 'मसुर-चिकन-पुलाव' असे रुचकर (मांसाहारी) पदार्थ तयार करण्याचे यशस्वी प्रयोग एका मित्राच्या बायकोने करुन झाले आहेत. असे प्रयोग माबोकरांनी केल्यास आपला अनुभव कसा होता ते अवश्य कळवावे!
मस्त आहे पाकृ
मस्त आहे पाकृ

आयती खायला मिळाली ही डिश तर आणखी चांगली!
छानच पाकृ. आधीही पाहिली/वाचली
छानच पाकृ. आधीही पाहिली/वाचली होती. लगे रहो.
रच्याकने: मुख्य चित्राबद्दल हा प्रतिसाद पहा.
किल्ली आणि सुनील मनःपूर्वक
किल्ली आणि सुनील मनःपूर्वक धन्यवाद!
>>"ते ७५०x७५० पिक्सेल करुन अपडेट करा. धाग्याच्या नावासमोर ते दिसू लागेल.">>
अच्छा असं आहे होय... तरीच माझ्या काही धाग्यांमध्ये ते तसे दिसत नाहिये! हा बदल लगेच करतो...
ह्या उपयुक्त टिप साठी विशेष धन्यवाद 🙏
पाकृ व सादरीकरण एक नंबर!
पाकृ व सादरीकरण एक नंबर!
अख्खा मसूर पुलाव कधी करून पाहिला नव्हता. आता एकदा करीन. "मसुर तिन तास भिजवुन ठेवला तरी चालेल, पण चार तासांपेक्षा जास्त वेळ भिजवु नये." ही टीप महत्त्वाची वाटते आहे.
तिकडून इकडे आणली हे बरे केलेत
तिकडून इकडे आणली हे बरे केलेत...
आता मसूर भिजवणे आलेच.
❝हा बदल लगेच करतो...❞
❝हा बदल लगेच करतो...❞
बदल करूनही धाग्याच्या नावासमोर अजुनही फोटो दिसत नाहीये.
इथे Trial and Error करुन पहावं. फोटो साइझ थोडा अजून कमी म्हणजे 595x595 केला.
कर के देखो ।
छान पाकृ आणि सादरीकरण.
छान पाकृ आणि सादरीकरण.
ते झाकणावर वजन ठेवले वगैरे तर वाफेच्या दाबेने उडुन पडणार नाही का?
वाह मस्तच वर्णन
वाह मस्तच वर्णन
मस्तच. पहिला फोटो अगदी
मस्तच. पहिला फोटो अगदी तोंपासू आहे.
छान लिहिली आहे रेसिपी.
नक्की करून बघणार...
ती एक मोठी कहाणी आहे :)>>>>>>> हे वेगळा धागा काढून लिहिणार आहात का
भारी रेसीपी आहे. मसूर पुलाव
भारी रेसीपी आहे. मसूर पुलाव ची चांगली रेसीपी शोधतच होतो. भाज्या न घालता करून बघेन.
इंटरेस्टिंग. एकदा करून बघणार.
इंटरेस्टिंग.
एकदा करून बघणार.
छान दिसतोय फोटो.. सुगंध दरवळत
छान दिसतोय फोटो.. सुगंध दरवळत बाहेर येतोय ..
रेसिपी आणि फोटो दोन्ही भारी.
रेसिपी आणि फोटो दोन्ही भारी.
रेसिपी मस्तच.फोटो अगदी प्रो
रेसिपी मस्तच.फोटो अगदी प्रो आलेत.
(फक्त दम द्यायला वर्तमानपत्र वापरु नका..त्यातली शाई चान्गली नसते..त्यापेक्षा फॉइल पेपर किवा भिजवलेली कणीक वापरा सिल करायला.)
तोंपासू... आहा....
तोंपासू... आहा....
ती एक मोठी कहाणी आहे
==-> येऊ द्या कीं....
१.खाकी कागद वापरावा.
१.खाकी कागद वापरावा.
२. मसुर +फ्लॉवर पुलाव म्हणता येईल. किंवा फ्लॉवर मसाला भात?
३.फोटो आवडले.
४. गोडसर लागेल बहुतेक.
मला आवडेल.
Looks like Lebanese Mujadara,
Looks like Lebanese Mujadara, nice ! इजिप्त वारीत शिकलात का ?
मला मसूराचे texture आवडत नाही, कधी खात नाही. मात्र तेच मसूराचे falafal फार छान होतात, far superior to original chickpea one.