पेपर डोसा

Submitted by सीमा on 21 March, 2011 - 10:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या तांदुळ
१ वाटी उड्दाची डाळ
१ चमचा तुरीची डाळ
१ चमचा मेथी
तेल , मीठ

क्रमवार पाककृती: 

तांदुळ , उडदाची डाळ , तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
तांदुळ आणि उडदाची डाळ स्वतंत्र भीजत घालावी. भीजत घालताना दोन्हीपैकी कशातही तुरडाळ आणि मेथीचे दाणे घालावेत.
रात्रभर भीजवुन सकाळी मिक्समध्ये लागेल तसे पाणी घालुन ग्राइंड करावे.
एकत्र करुन फर्मेंट करायला ठेवावे.
भारतात ४/५ तासात पीठ चांगल फुगत. मीठ घालावे. लागल तर अजुन पाणी घालुन योग्य कन्सिस्टंन्सी करुन घ्यावी.
जाड बीडाचा तव्यावर , तवा तापला कि थोडे पाणी अगोदर शिंपडुन , नंतर तेल घालुन पातळ डोसे घालावेत.(घालताना वाटी आतुन बाहेर फिरवत आणावी.) बाजुला तेल/बटर सोडावे. खालुन लालसर झाला कि काढावा.
नॉन स्टिक वर केला तर डोसा थोडा जास्त वेळ गॅस वर ठेवावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

डोसा क्रिस्पी नको असेल तर जाड घालता येईल. मला वाटत याच खर स्किल डोसा घालण्यावर आहे.
मी आईचच प्रमाण वापरुनही तिच्यासारखा अल्टिमेट होत नाही.

dosa1.jpg

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात तुरीची डाळ घालतात का? असा दोसा कधी मी करून नाही बघीतला, पुढच्यावेळी करून बघता येईल.
हे मात्र खरं दोसा घालणे हे स्कील सरावानंतरच जमते. यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत वापरत असेल, मला गरम तव्यावर थंड पाणी मारले की मगच पातळ क्रिस्पी दोसे करता येतात.

मी तरी मारते,
याने तवा लवकर खराब होतो, खोलगट होतो असे ऐकले आहे तरीपण मी करते ३ वर्षाऐवजी तवा २ वर्षात टाकावा लागेल इतकच. दरवेळी दोसे तव्याला चिकटले, जाड झाले, तवा जास्त स्वच्छ करावा लागला या सगळ्या त्रासापेक्षा मला २ वर्षांनी तवा बदलणे जास्त सोपे वाटते.

हे पण खरंय. माझा तवा आता जवळजवळ साडेतीन वर्ष जुना आहे आणि तो मी पोळ्या, धिरडी, हाफ फ्राय असा सगळ्याला वापरते. अजून काहीच झालं नाही.
अजून एक अनोडाइज्ड, काळा तवा आहे तो जास्त योग्य होईल का डोश्यासाठी?

मी यावेळी भारतातून आणलाय फ्युचुराचा अनोडाइज्ड काळा तवा त्यावर चांगले होतात दोसे. माझ्यामते तवा कुठलाही असू दे त्यावर हात बसायला जरा वेळ लागतो आणि एकदा त्याचे तंत्र जमले की मग सगळे सोपे वाटायला लागते.
सॉरी सीमा तुझा धागा हायजॅक झाला.

डोसे, उत्तप्पे, आप्पे तयार करताना तवा / आप्पेपात्र 'तयार करणे' मह्त्वाचे असते. बीडाच्या तव्यावर केलेल्या डोश्याची चव अफलातून असते, जी नॉनस्टीक तव्यावर केलेल्या डोश्याला नसते. बीडाचा तवा असेल तर तवा तापवून आधी मीठाचं पाणी लावून घ्यायचं. पाणी evaporate झालं की तेल लावून चांगला धूर येईपर्यंत तापवायचा. मग गॅस कमी करून थोडया कमी तापमानाला आणून परत तेल लावायचं. मिडीयम गॅसवर डोसे घालायचे. ही तवा तयार करण्याची पध्दत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.

कोरडा की ओला?>> मी तरी कोरडा पेपर टॉवेल फिरवते. माझी तमीळ शेजारीण कांद्याने पुसून घेते तवा.
कालच रात्री डोश्याचं पीठ वाटून ठेवलयं. पुढच्या आठवड्यात नक्की करून बघणार, सीमा.

कांद्याचा टोकाचा भाग कापायचा. त्यात काटाचमचा रुतवायचा. सपाट भाग खाली ठेवायचा. तो मग मिठाच्या पाण्यात बुडवुन तव्यावर फिरवायचा. मस्त डोसे होतात.

यात चण्याच्या डाळीचे पिठ घालून पण चांगले होतात. अर्थात तूरीच्या डाळीने जास्त कुरकुरीत होतील.
मुंबईच्या हॉटेल्स मधे मिळणारा पेपर डोसा, तीन फूट व्यासाचा असतो.
डोश्याच्या पिठात नंतर पाणी घालायची गरज पडू नये. घट्टसर असले तरी वाटीने नीट पसरवता येते.
ओपन किचन असणार्‍या एखाद्या हॉटेलात, निरिक्षण केले तर त्यांचे कौशल्य कळते.

परवा डाळ-तांदूळ भिजवून काल रात्री दोसा केला. प्रमाण सीमाचेच, फक्त मूठभर पोहे घातले. छान झाला होता. धन्यवाद सीमा.

मस्त कुरकुरीत डोसे झाले. प्रमाण अगदी अचूक आहे. आणि इथे उन्हाळा दणक्यात चालू झाल्याने पीठही चार तासातच मस्त आंबलं. धन्यवाद सीमा Happy

तुरीची डाळ घालून कधी केले नाहीत. नक्की करणार. >> सिंडी बाय, तू तुरीची डाळ न घालताच कर पाहु, नाहीतर इथे पण जळका वास यायचा Wink

मी कधी तुरिची डाळ घालून दोसाकेला नव्हता.मी थोडे पोहे पण घालते. काल केला .पण खूपच छान झाला. तवा थंड करण्यासाठी तव्यावर पाणी शिंपडायचे. कारण तवा खूप गरम झाला की पीठ पसरत नाही.गोळा होते.

Pages

Back to top