नीलांबरी

कृष्णविवर - १

Submitted by हायझेनबर्ग on 14 April, 2019 - 21:32

आज पुन्हा पावसाची रिपरिप चालू व्हायची चिन्ह दिसत होती. सिलाई मशीन चालवतांना माझी नजर राहून राहून खिडकीतून दिसणार्‍या चाळीच्या गेट कडे जात होती. चांगले सहा दिवस झाले मान्सून कासारगोडच्या किनार्‍याला धडकून, पण साधे तासभर सूर्यदर्शन होईल ईतपतही ऊसंत दिली नाही त्याने. सतत भरून असलेलं आभाळ, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, प्रलयकाळ अजून काय वेगळा असावा? सिजू आजही भिजूनच येतोय की काय? आज पुन्हा भिजला तर ऊद्या पुन्हा शाळेसाठीचे कपडे ह्या दमट हवेत वाळणार कसे? सकाळी शाळेच्या ओलसर पँटवरून फिरवण्यासाठी तवा गरम करून दिला तर म्हणे, 'ह्या तव्याला अंड्याचा वास येतो'.

Subscribe to RSS - नीलांबरी