चारोळया

Submitted by देवनिनाद on 30 July, 2009 - 02:23

देणार्‍याचे
हात हजार
पण देताना
करावा विचार

हात मिळवून
भेटतो आपण
हात करुन
भिडतो आपण

हात जोडून देवाला
नमस्कार करतो
शांत होतं मन
दिवस छान सरतो

हात हलवून
टाटा करतात
जाणारा जातो
फक्त आठवणी उरतात

सांगती भविष्य
हाताच्या रेषा
देती जगण्याची
आशा अन् दिशा

गोड गोड
करुन बात
फसवतात
हातोहात

होता
लोच्या
म्हणतो
`हात'तिच्या

हातात काय आहे ?
ही निराशा
हातात स्वप्नं आहेत !
ही आशा

- देवनिनाद

टिप : (`हात'तिच्या हा बोली शब्द - मूळ `हात्तिच्या')

गुलमोहर: 

देवनिनाद,

प्रचंड आवडल्या चारोळ्या... साध्या सोप्या आणि चपखल.. Happy

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

देवनिनाद, ज्या हातांनी या चारोळ्या लिहिल्या त्या हातांना हात जोडून नमस्कार 'कर'तो.:डोमा:
आवडल्या, अति!!:स्मित:

हातात काय आहे ?
ही निराशा
हातात स्वप्नं आहेत !
ही आशा

ही खूपच आवडली. बाकीच्याही छान आहेत.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" छानोळ्या! "

सुरेख.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

हातोहात इतक्या सुन्दर चारोळ्या!!!!

दुसर्‍या कडव्यात तुम्हाला हात दाखवून अस म्हणायच आहे का ? सगळ्या चारोळ्या आवडल्या .

काय हातोहात कविता केली आहेस.

-हरीश

दक्षिणा, श्रीकांत, क्रांती, वींड, कौतुक, छाया, हरीश

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !!!

मला विसरलातः(

फारच छान पण मी चारोळ्या नसत म्हट्ल.... इट्स अ कॅलीडोस्कोप ओफ सो मेनी सिरीअस थॉटस मेट....!!!!
गिरीश...

सॉरी रवी, चुकून उल्लेख करायचा राहिला. पण प्रतिसादाबद्द्ल मी आपले सूद्धा आभार मानतो.

गिरीश, प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

सस्नेह
देवनिनाद

हातात काय आहे ?
ही निराशा
हातात स्वप्नं आहेत !
ही आशा

खुप छान !!!

छान Happy