Submitted by Madan Hunkare on 30 October, 2026 - 02:24
ऑर्कुट मुळंच इंटरनेटची ओळख झाली. नातवानं ऑर्कुटवर खातं उघडून दिलं होतं, तेव्हां त्याचा तो निळा रंग. तो अकाउंट नंबर आणि पासवर्ड विचारणारा पन्ना. त्यावर सोपस्कार केले कि मग हळूच उघडणारं ऑर्कुटचं दालन. किती धडधड व्हायची ते उघडेपर्यंत. किती वेळा एरर आली तरी उघडल्याशिवाय चैन पडायची नाही.
ऑर्कुट हळवा कोपरा आहे मनाचा. ऑर्कुटमुळं लोकांना जुने मित्र सापडले. कुणाला नवीन मित्र सापडले.
आता हे ऑर्कुट परत सुरू होतंय असं ही ही बाई सांगतेय तर खरंच असेल. मी तर जाणारच. गेल्या गेल्या किंग व्हर्सेस रामायण हा ऑर्कुटवरचा पहिला धागा काढणार. या धाग्यामुळं लोक ऑर्कुटवर परततील.
तुम्हाला जावंसं वाटेल का परत ऑर्कुटवर?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा