Submitted by लवन्गीमिरची on 20 September, 2026 - 02:58
नमस्कार
माझी अकरावीतली मुलगी सध्या cognitive science/AI च्या संदर्भाने अभ्यास करत आहे. त्यासाठी तिने एक online experiment बनवला आहे. ह्यात सहभागी होण्याची मी ज्यांना शक्य असेल त्यांना विनंती करत आहे.
हा experiment मध्ये सहभागी होण्यासाठी laptop किंवा desktop विथ Internet connection अशी गरज आहे. स्मार्टफोन वरून करता येणार नाही. ह्यात कुठलीही वैयक्तिक माहिती विचारली जात नाही. फक्त वय आणि स्त्री/पुरुष/इतर एवढी माहिती विचारली आहे. experiment साधारण १५ मिनिटे आहे.
लिंक खालीलप्रमाणे
https://jatos.mindprobe.eu/publix/Yenohs0VdPu
ज्यांना शक्य आहे त्यांनी सहभाग घेतल्यास तिला data जमवायला खूप मदत होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अच्छा.
अच्छा.
बघते लिंक
बघते लिंक
धागा कुणाचा बघायचा राहून गेला
धागा कुणाचा बघायचा राहून गेला असेल तर म्हणून वर काढत आहे.
सहभागासाठी पुन्हा एकदा विनंती!
लिंक खालीलप्रमाणे
https://jatos.mindprobe.eu/publix/Yenohs0VdPu
त्या लिंकवर, वयापर्यंत
त्या लिंकवर, वयापर्यंत गेल्यावर एन्ट्रि करता येत नाही आणि ती अचानक बंद झाली....
नमस्कर रेव्यु
नमस्कार रेव्यु
वयापर्यन्त गेल्यावर तुम्ही वय टाइप कराल का? कारण वय टाइप करता येत नाहिये असे वाटते पण keyboard entry केली की वय accept होते.
तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करुन पाहू शकाल का please?
चाचणी करून पाहिली पाच मिनिटे.
चाचणी करून पाहिली पाच मिनिटे.
निष्कर्ष : दोन पर्याय असताना निवड झालेला पर्याय चूक दाखवला की आपण दुसऱ्या पऱ्यायाकडे वळतो. मग तिथेही चूक दाखवल्यास अगोदरच्या पर्यायाकडे जातो तेव्हा तोही चूक दाखवतो. हा खेळ समजला की पुढे चुकण्याचे प्रमामाण कमी करता येते. दोन वेळा चूक दाखवल्यास तोच तिसऱ्या वेळा निवडल्यास बरोबर येतो. तोच आणखी एक वेळा निवडायचा मग बदलायचा.
एआइ { आणि मनातले निर्णय} हे इतिहासावर अवलंबून असते. पूर्वीचे राजे असेच युद्ध करायचे. जिंकू लागल्यावर तीच पद्धत पुढे चालू ठेवत.
क्रिकेटचा बोलर हेच करतो आणि बॅट्समनला चकवतो.
दोन चार प्रकारचे सोडवून
दोन चार प्रकारचे सोडवून पाहिले पण अजून किती असा प्रश्न पडला म्हणून बंद केल. निदान किती प्रश्न संच आहेत याची पूर्वकल्पना असती तर बरे झाले असते. आता संपेल मग संपेल असे होऊन बोअर होत आहे
स्टडी कॅन बी डन ओन्ली वन्स
स्टडी कॅन बी डन ओन्ली वन्स येते आहे. मी पहील्या वेळेला लगेच म्हणजे काहीही एन्टर न करता अॅबॉर्ट केलेला.
मी कॅश क्लीअर केली.
मी कॅश क्लीअर केली.
काय टेस्ट अहे. कोणताही प्रश्न नाही फक्त २ ठिपके येतात. प्रश्न काय आहे?
अकरावीत आहे मुलगी त्यामुळे
अकरावीत आहे मुलगी त्यामुळे अनुभव कमी असणं आपण समजून घेऊयात. वरील सर्वांचा फीडबॅक कृपया तिच्यापर्यंत चांगल्या शब्दात पोहोचवू शकल्यास उत्तम. तिचा हिरमोड नको व्हायला. बिचारीने मेहनतीने बनवले असल्यास फक्त थोडी सुधारणा गरजेची आहे इतकंच.
हपा तुम्हाला प्रश्न दिसतायत
.
experiment मध्ये सहभागी
experiment मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणाऱ्यासर्वांचे मनापासून आभार
जे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न
srd - तुमचे निष्कर्ष बऱ्यापैकी अचूक आहेत. तुमहाला पूर्ण experiment करणे शक्य असल्यास खूप मदत होईल.
हरचंद पालव - मुलीच्या guide ने experiment चा कालावधी ठरवून दिला असल्याने तो १५/२० मिनिटांचा झाला आहे. त्यात बदल करणे तिला शक्य नाहीये.
तुमचे experiment design बद्दलचे निरीक्षण अगदी अचूक आहे. काही user experience च्या चुका झाल्या आहेत. The platform she was instructed to use is very rigid w.r.t. changes so it is becoming extremely hard to make changes after initial set up.
सामो - ह्या experiment मध्ये दोन प्रकारच्या images दाखवलेल्या असतात. त्यातील एक निवडून मग reward प्रमाणे पुढची निवड user ने करणे अपेक्षित आहे. मी आणखीन जास्त माहिती दिली तर त्यातून जे निष्कर्ष काढायचे आहेत ते चुकू शकतील. तुम्हाला दोन images स्क्रीनवर दिसणे अपेक्षित आहे. तुम्ही एकदा शक्य असल्यास incongnito window किंवा chrome guest profile वापरून करू शकाल का?
उपयुक्त सूचनांसाठी सर्वांचे पुन्हा आभार!
>>>>>सामो - ह्या experiment
>>>>>सामो - ह्या experiment मध्ये दोन प्रकारच्या images दाखवलेल्या असतात. त्यातील एक निवडून मग reward प्रमाणे पुढची निवड user ने करणे अपेक्षित आहे.
होय होय. हपांचा प्रतिसाद वाचल्यावरती मग लक्षात आले माझ्या.
मी काही इमेजेसला जास्त पॉईंट
मी काही इमेजेसला जास्त पॉईंट कसे मिळतील ते बघितले. मग काही ठिकाणी जास्त चुका करुन मुद्दाम कमी पॉईंट मिळवू ठरवले.
दोन्ही वेळेला ३०-३५ इमेज झाल्या की माझा मेंदू जस्ट गेट इट डन मोड मध्य जाऊन चुक का बरोबर पर्वा न करता क्लिक क्लिकाट करुन पुढे जायला बघतो. एकुन ४ टेस्ट केल्या. चांगले मार्क मिळवायचे करुन ४० च्या पुढे गेलो नाही. वाईट हवे करुन २७ च्या खाली आलो नाही. थोडक्यात ५०% कॉईन फ्लिप प्रोबॅबिलीटीच्या पेक्षा जास्त माझा मेंदू प्रगत नाही.
मग सगळे लेफ्ट क्लिक करुन कॉईन फ्लिप ५०% प्रोबॅबिलिटी होते का बघू लागलो. पण डोळे मिटू लागले, दुसर्या स्क्रीनवर एआयला कोड मधला बग सापडला तर त्याच्याशी २ मिनिटे गप्पा मारतोय तोवर १५ मिनिटं झाली का काय कोण जाणे पण माझा स्टडी खळखट्ट्याक बंदच झाला.
तर स्टडी संपल्यावर हे काय होतं, त्यातुन ते काय अनुमान काढू इच्छितात, काही लिंका असतील तर, काही अझंम्पशन असतील तर, त्यात पिट फॉल होते का? काही नाही तर किमान कॉलेज/ प्रोफेसरच्या पेजची लिंक काहीतरी हवं होतं. हे फारच ट्रॅक्झॅक्शनल आणि स्पष्ट सांगायचं तर रुड वाटलं.
किती स्लाईड आहेत, किती प्रश्न आहेत हे सगळं गुलदस्त्यात ठेवल्याने हे बेपर्वाईने केलेले आहे हे जाणवू लागले आणि माझा मेंदू हे सिरियसली करण्याऐवजी टाकणं टाकल्या सारखं करू मोड मध्ये गेला.
तिला हा रिव्यू अवश्य दाखवा की लोक कसा विचार करतात ते ही समजेल म्हणजे पुढच्यावेळी सुधारणा करता येईल.
एका गेम मध्ये सरळ सरळ +१ मिळत
एका गेम मध्ये सरळ सरळ +१ मिळत जात होते. मोनोटोनस होता तेव्हा लगेच कंटाळले व बंद केला
जिथे मिस्टिरिअस होते, कळत नव्हते की तो ठिपक्यातल्या नक्षीवरुन बरोबर की चूक ठरवतो की ....... डावे उजवे यावरुन बरोबर की चूक ठरवतो, तिथे मजा आली. की नंबर ऑफ क्लिक्स चे अल्गो आहे, हे कळत नव्हते तिथे जास्त रेंगाळले.
मिस्टरी वि. प्रेडिक्टेबिलिटी - असा काहीसा गेम झाला.
(एक अवांतर निरीक्षण)....
(एक अवांतर निरीक्षण)....
भटकंती करताना ( अर्थातच एकट्याने) आणि त्या मार्गावर दुपारी कुणी नसते तेव्हा समोर दोन वाटा दिसल्या की कोणता पर्याय हा प्रश्न पडलेला आहे. तिथे चुकीची वाट धरल्यावर बऱ्याच वेळाने समजते की फसलो आहोत. वेळ जातो, दमून जातो आणि पाणीही संपते. व्यवहारातले प्रश्न वेगळे आणि आणि केवळ काल्पनिक किंवा शैक्षणिय प्रश्न वेगळे असतात.
केवळ शिक्षकांनी सांगितले आहे किंवा शिक्षणक्रमात आहे म्हणून रेटायचे ही पद्धत आहे.....