शशक स्पर्धा - हरचंद पालव - अर्जुनविषादयोग

Submitted by हरचंद पालव on 20 September, 2026 - 02:09

रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगून वैतागल्यामुळे वेताळाने सरळ गीतेचा पहिला अध्याय सांगायला सुरुवात केली. “पांडव आणि कौरवांचं सैन्य समोरासमोर उभं ठाकलं. अर्जुन, भीम, युधिष्ठिर, दुर्योधन, भीष्म वगैरे सर्वांनी आपापले शंख फुंकले. त्यामागोमाग नगारे, पणव, आनक, गोमुख इत्यादी वाद्यांचा आवाज कौरवांची हृदये विदारून गेला. कृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेताच अर्जुन धनुष्य टाकून मटकन खालीच बसला. .. आता तो तसा का बसला ते मला सांग नाहीतर तुझ्या डोक्याची शकलं होतील”

“मुळात युद्ध करणे हे दोन्ही सैन्यांचं स्खलनस्वातंत्र्य म्हणून मान्य केलं तरी त्यानिमित्त ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीस अडथळा करणं हे तार्किकदृष्ट्या पटणारं नाही” राजा उत्तरला.

त्याच्या चेहऱ्याकडे निरखत वेताळ म्हणाला - “हायला! बापट?”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्विस्ट मस्तय Lol

बापटांनी माबो गणेशोत्सवात बराच आवाज केला की यंदा Lol (तरी कानठळ्या नाही बसल्या हे महत्वाचे Wink )

झकास !

युद्ध = स्खलनस्वातंत्र्य 😁

(BTW, हा स्खलनस्वातंत्र्य शब्द खूप आवडला आहे. )

पणव, आनक, गोमुख वाद्ये … आता याबद्दल वाचणं आलं

Lol
कथेत वाद्यांची नावे वाचून - अरे किती तो आवाज - बापट - हेच विचार डोक्यात आलेले, आणि पुढे तेच झालं. त्यामुळे आणखी आवडली.

हपा Rofl

Lol

Best Lol

महाभारतातील युद्ध हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, द्वारका, कांपिल्य असल्या कुठल्या मोठ्या शहरात न करता ते कुरुक्षेत्र नामक दूरच्या मैदानात ठेवले होते जेणेकरून वाहतुकीस अडथळा होऊ नये. निदान ह्या बाबतीत तरी बापट नाराज नसतील.
(त्यांच्या सूचनेनुसार गणपती उत्सव अशा मैदानात करावेत जेणेकरून त्यात सहभागी होणारे लोकच तिथे उपस्थित असतील. असो.)

LOL..

Pages