शशक स्पर्धा- आशिका -राजांची कापडं- (रस- वीर, अलंकार - उपमा, अपन्हुती)

Submitted by आशिका on 17 September, 2026 - 04:58

"आक्षी राजावानी दिसायलास रं" हे ऐकतांच त्याचे बाहु अभिमानाने स्फुरण पावले.

'राजांची कापडं' अंगावर लेणं हे केव्हढं भाग्य !
त्यासाठी एकदाच काय दहादा मृत्यूला सामोरं जायची तयारी होती त्याची.... राजांसाठी....स्वराज्यासाठी !!

बेत पक्का झाला. 'राजांची कापडं' ल्यालेला 'तो' पालखीत बसला. आज तो शिवा काशिद नाही तर शिवाजी राजाच भासत होता. पन्हाळगडावरुन पालखी उचलली गेली. मशाली पेटवल्या गेल्या, ... अर्धी वाट सरली असेल, .....पालखी पकडली गेली आणि शिवाला अटक करण्यात आली.

दगाफटका उघड होताच शिवाचं शिर धडावेगळं करण्याची आज्ञा झाली. शिवाला पर्वा नव्हतीच. राजं बाजीप्रभूंच्या सुरक्षेत विशाळगडावर सुखरुप पोचणारच !

'राजांची कापडं' अंगावर लेणं हे केव्हढं भाग्य !.... राजं.... अखेरचा मुजरा .....

शब्द संख्या - १००
रस - वीर
अलंकार -उपमा, अपन्हुती

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान .

जबरदस्त
जय शिवराय
आणि धन्य महाराष्ट्र तो ज्याने असे वीर निर्माण केले

छान! Happy

छान!
वाचतानाही अंगावर काटा उभा राहिला.

एकदम मस्त!
वाचतानाही अंगावर काटा उभा राहिला. >> +१

वाचतानाही अंगावर काटा उभा राहिला. >> +१ >> +786
फार सुंदर लिहिले आहे. वीर रसाची खरोखर प्रचिती झाली.

छान!
वाचतानाही अंगावर काटा उभा राहिला.>>+१११११११ खूप छान.
मला ही शशक स्पर्धा खूप आवडते. केवढ्या वेगवेगळ्या गोष्टी वाचायला मिळतात.

वाह!

>> केवढ्या वेगवेगळ्या गोष्टी वाचायला मिळतात.
+१