जाड पोहे: १ कप
दही: १ कप
साखर: १/२ चमचा
मीठ: चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर: २-३ चमचे
मक्याचे दाणे : १/२ कप
हिरवे ताजे वाटाणे : १/२ कप
तेल : १ चमचा
फोडणीसाठी: १ चमचा तेल , १/२ लहान चमचा मोहरी, १/२ लहान चमचा जिरे, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ६-७ कढीपत्त्याची पाने
१. पोहे एका चाळणीत घेऊन स्वच्छ पाण्याने वेळा धुवून घ्या. पोह्यांमधील सर्व पाणी निथळून घ्या आणि १ कप दह्यामध्ये भिजवलेले पोहे घाला.
आणि ते ५-८ मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून ते छान मऊ होतील
२. एका छोट्या कढईत १ चमचा तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हकढीपत्ता, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून छान फोडणी तयार करा.
३. यात हिरवे ताजे वाटाणे आणि मक्याचे दाणे घालून छान परतून मिक्स करा. त्यात भिजवलेले मऊ पोहे टाकून परतून घ्या आणि चवीनुसार मीठ आणि साखर घाला.
४. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे लिंबू पिळून गॅस बंद करा.
वरतून गार्निशिंगसाठी ओल्या खोबऱ्याचा कीस नक्कीच घालू शकता, यामुळे अप्रतिम आणि छान चव येते!
सुरेख
सुरेख
आवडेल असं वाटतंय, करून पहायला
आवडेल असं वाटतंय, करून पहायला पाहिजे
साधे दही पोहे करून पाहिलेले
साधे दही पोहे करून पाहिलेले आहेत. असे परतून खाल्ले नाही कधी. इंटरेस्टिंग आहे.
असे परतून खाल्ले नाही कधी.
असे परतून खाल्ले नाही कधी. इंटरेस्टिंग आहे....+१.
एवढं सगळं करून शिवाय फोडणीत
एवढं सगळं करून शिवाय फोडणीत परतायचे आहेत !! गिजगोळा नाही का होणार? फोटो असता तर कल्पना आली असती
anjali_kool सारखाच प्रश्न
anjali_kool सारखाच प्रश्न मलाही पडला आहे.
पोहे दह्यात भिजवलेले आहेत आणि
पोहे दह्यात भिजवलेले आहेत आणि परतायचे आहेत म्हणजे दह्याला पण पाणी सुटेल ना? आणि गिच्च होतील असं वाटतंय.
आम्ही अगदी साध्या पद्धतीने
आम्ही अगदी साध्या पद्धतीने दही पोहे करतो. जाडे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यात थोडं दही, मीठ, साखर व ताक घालायचं. आमच्याकडे कोकणात उसळी मिरची असते. अगदी पेराएवढ्या छोट्या मिरच्या असतात. तिखटही नसतात. त्या मिरच्या ह्यात घालायच्या. कोकणातल्याच बऱ्याच जणांना ह्या माहित नाहीयेत तेव्हा मिरचीचं लोणचं येतं तेही घातलं तरी चालतं. सगळं व्यवस्थित कालवायचं व गट्टम.
हे सगळं अगदी आयत्या वेळेसच करायचं नाहीतर पोहे घट्ट होत जातात.
उसळी मिरची मस्तपैकी लोण्यात कालवून गरम गरम थालिपीठाबरोबर खाल्ली की स्वर्गीय अनुभूती येते.
आऊटडोअर्सच्या पूर्ण पोस्टला
आऊटडोअर्सच्या पूर्ण पोस्टला +१
उसळी मिरची.... काय आठवण निघाली भारी! माझ्या मावशीआजीचं लहानसं शेत होतं तर ती ह्या गावठी मिरच्या लावायची. आम्हाला दरवर्षी द्यायची. मग आई एकदम चटकदार उसळी मिरची करून ठेवायची. आता मिरच्याच मिळायची खात्री नसते. आई जमलं तर घालते.
प्रज्ञा९, अगदी बरोबर. अगदी
प्रज्ञा९, अगदी बरोबर. अगदी टिपीकल कोकणातल्या कोणाकडे ह्या मिरच्या मिळाल्या तर मिळाल्या. आईकडे कायम असतातच. कोकणात अगदी गणपतीच्या दर्शनाला आलेल्यांनाही आमच्याकडे दहीपोहे देतात.
आडो!
आडो!
हे तू लिहिलेले दहीपोहे (साखर सोडून आणि घट्ट साय घालून) उसळीमिरचीसकट माझं कम्फर्ट फूड आहे.
मंजूडी, पटकन खायला काय करावं
मंजूडी, पटकन खायला काय करावं सुचत नसेल तेव्हा हे पोहे मदतीला धावून येतात आणि खाऊन जीव अगदी शांत होतो.