स्कूल ठीक करो - जेन झी आंदोलन!

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 August, 2026 - 14:07

स्कूल ठीक करो!
ये अब बडा होने वाला है!
मेरा देश बदल रहा है..
स्कूल के अच्छे दिन आने वाले है..
कोकरोच पार्टी झिंदाबाद!
नवीन आंदोलन नवीन धागा..

देशाच्या गावाखेड्यात जाऊन तेथील सरकारी शाळांची दुरावस्था दाखवून सरकारला जाब विचारायची मोहीम हाती घेतली गेली आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हे बघताच संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. आज चक्क मारहाण सुद्धा झाली.
पण आता हे जेन झी थांबणार नाहीत.
जोपर्यंत देशात चांगले काही घडायची आशा दाखवत आहेत... फुल सपोर्ट !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन उद्दिष्ट उत्तम आहे. ग्रामीणच काय, शहरी सरकारी शाळांचीही अवस्था वाईट आहे.

दुनिया आणि सोशल मीडिया जंतर मंतर आंदोलनावर थुंकत आहे. येथे त्यांचे स्तुतीपाठक वेगळीच भूमिका मांडत आहेत. एकमेकांचीच पाठ थोपटत आहेत.

मोदींचे चित्र रस्त्यावर काढून त्यासोबत संभोग केल्याचे व्हिडीओ, मोदीके पिरियड्स आते है म्हणणे, मोदींना आई बहिणीवरून गलिच्छ शिव्या देणे, मोदींच्या आईंना शिव्या देणे, लडाखला we are gen z म्हणत गरळ ओकणे -- ही जेन झी नाहीच आहे

जेन झी फार प्रगल्भ आहे. ती परत परीक्षा देऊन पास किंवा नापास झाली आहे. ती सुसंस्कृत आहे. त्या खऱ्या जेन झी ला व्हिडीओ बघून पालक चपलेने मारहाण करत नाहीत. घरमालक असल्या पोरापोरींच्या आईबापांना एका रात्रीत घर सोडायला लावत नाहीत. असले जेन झी पंचतारांकित हॉटेलात पार्ट्या करत नाहीत.

अक्षरशः देश थुंकतोय ह्या आंदोलकांवर (आंतरजालावर).

खरे आणि सुसंस्कृत, चांगले जेन झी जंतर मंतर वर नव्हतेच.

ते फक्त राजकीय आंदोलन होते.

ह्या सगळ्या शाळा २०१४ ला सुरू झालेल्या असतील बहुधा!

त्या आधी सुरू झालेल्या व अस्तित्वात असलेल्या शाळा आजही सुस्थितीत असतीलच, नाही का?

शाळा नामक प्रकार भारतात कधी सुरू झाला असेल?

गेले काही दिवस सोशल मिडिया माध्यमातून या "स्कूल ठीक करो" चळवळीचे अपडेट घेत होतोच.
कुठे मुलांना प्यायला पाणी शुद्ध नाही, तर कुठे वॉश रूम स्वच्छ नाही, तर कुठे शाळेत शिक्षकच नाहीत, तर कुठे शिक्षक शिकवायचे सोडून शाळेतच दारूच्या पार्ट्या करत आहेत असे एक ना हजार व्हिडिओ बघून झाले.

बरेच ठिकाणी यांना स्थानिकांचा सपोर्ट मिळत होता, तर शाळा प्रशासन सुद्धा व्हिडिओ वायरल व्हायच्या भीतीने म्हणा हवे तर पण यांच्या तक्रारीची दखल घेत होते. पण हे थांबायचे नावच घेत नसल्याने हळूहळू सगळ्यांचेच धाबे दणाणात होते. माझ्या फीडमध्ये सातत्याने याचेच व्हिडिओ येत होते.

आज मात्र जयपूर, राजस्थानमधील एका गावात यांना मारहाण झाली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पत्रकार सुद्धा तिथे उपस्थित होते.

अभिजीत दिपकेने या घटनेचा निषेध केला. आणि अर्थातच तेवढ्यावर न थांबता 48 तासांच्या आत त्या गुंडांना अटक झाली नाही आणि शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झाली नाही तर जयपूर गाठू असा इशारा दिला.

बेफिकीर छान सुरुवात Happy
मला माझी वरची पोस्ट तात्कालिक कारण म्हणून पहिल्या प्रतिसादात हवी होती. पण त्या आधी तुमची पोस्ट आली आणि माझी दुसरी झाली. पण काही हरकत नाही. तुमची सुद्धा छान आहे.

चांगले जेन झी >>> 'चांगले' जेन झी म्हणजे?

प्रामाणिक प्रश्न आहे. वेळ मिळेल तेव्हा उत्तर द्या. समाधान होवो ना होवो, मी उत्तर देईनच असे नाही. तुम्हीही फार कष्ट घेऊ नका नेहेमीप्रमाणे.

विचार करत राहणे हे एक असतं (हे नैसर्गिक आहे); आणि सतत विखारी आणि विकारयुक्त एकांगी विचार करत राहणे हेही असतं (हेही नैसर्गिक आहे). मेंदूची क्षमता अफाट असते. वापर न केला, किंवा गैरवाजवी वापर केला तर दंड होतो. तो कुठच्या स्वरूपात- ते आपल्याला माहिती नाही- याची तरी भिती बाळगा Proud

फार्स विथ...

अशा काही शाळा बरीच वर्षे पाहत आहे

मायबोलीवर माझी काही स्फुटेही आहेत

समस्या तर आहेच आहे

ती मोदी आल्यापासून आहे की आधीही होती हाही विषय नाही

सध्याची चळवळ फक्त राजकीय आहे एवढेच म्हणत आहे

मला येथे नेमक्या कोणत्या कारणास्तव धमक्या दिल्या जात आहेत हेच मला माहित नाही व कळत नाही

हे संकेतस्थळ धमक्या देण्यासाठी का वापरले जात आहे हेही मला कळलेले नाही

साजिरा,

तुम्ही गेली कित्येक वर्षे वैयक्तिक आकस ठेवून लिहिल्यासारखे का लिहिता हे खरेच माहीत नाही.

चांगले जेन झी - माझ्या नात्यात, ओळखीत, सोसायटीत त्या वयाची जी मुले आहेत ती खुप नम्र, बरेच अधिक जनरल नॉलेज असणारी आणि संस्कार पाळणारी आहेत.

अशी मुले जंतरमंतरवर दिसली नाहीत.

तुम्ही मागेही काहीतरी तुम्हाला अटक का होऊ नये वगैरे म्हंटला होतात. माझा नंबर तुमच्याकडे आहे. काही म्हणायचे असेल तर थेट फोन करा कृपया. हे लिहिण्याचे कारण इतकेच की तुम्ही दुसऱ्यांदा मला 'भीती बाळगा' म्हणत आहात.

काही वैयक्तिक विवाद असेल तर हे संकेतस्थळ वापरण्यापेक्षा थेट फोन करा कृपया. Happy

>>> फारच सुसंस्कृत

सुसंकृत शैलीत लिहिले.

तेथील लिंक्स दिल्या नाहीत.

Happy

ह्याही धाग्यावर आता लिहिणार नाही.

दोन कारणे आहेत.

म्हणायचे ते म्हणून झाले आहे.

तसेच,

बाकी येथे काय होणार आहे हे माहीत आहे.

अरे लोकहो धाग्याला तोडफोड वळण देऊ नका
स्कूल ठीक करो अपडेट घेऊया

बेफिकीर आंदोलन राजकीय आहे की नाही त्याने काही फरक पडत नाही.
जे सरकार असते ते देखील आपणच निवडून दिलेला राजकीय पक्ष असतो. आणि जो विरोधी पक्ष असतो ती सुद्धा एक राजकीय पार्टी असते.
त्यामुळे आंदोलनाचा राजकीय फायदा कुठल्या पक्षाला का मिळेना देशात बदल घडणार आहे की नाही हे महत्वाचे. त्यावर मिळून लक्ष ठेवूया. जनतेचे कर्तव्य पार पाडूया.

धागा उघडतानाच खात्री होती नेहमीचे यशस्वी कलाकार असणार आणि निराशा केली नाहीच
पहिल्याच पोस्ट मध्ये इतका विखार आणि मळमळ ओकून झाल्यावर हलकं वाटत असावे बहुदा
Happy

शाळा ठीक करा म्हणलं तर कोणाला प्रॉब्लेम कसा वाटू शकते हे कळण्यापलीकडे आहे असो

ते दुसरे कधी येणार, भारी कॉमेडी लिहितात ते Happy

अंधभक्त हे आधी पाखंडी आणि विखारी होते. आता त्यांची नेटवर्क मार्केटिंग स्किम फसत चालली आहे. त्यामुळे ते दिवसेंदिवस जोकर बनत चाललेत. लोक ऑलरेडी त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करत आहेत. ज्याना अंदाज येईल ते येत्या काही दिवसात पलटी मारताना दिसतील.

देश आंदोलकांवर थुंकतोय काय, जंतरमंतर वरचे सगळे विद्यार्थीच न्हवते काय, ते सुसंकृत न्हवते काय. ते काय वाचतात आणि त्यांना काय दिसतं त्यांनाच ठाऊक.
जेन अल्फा फार उत्तम काम करते आहे. शिक्षणात इतका गोंधळ माजलेला आपल्याला ही दिसत होता पण आपण काहीच करू शकतो नाही. ती मुलं आवाज उठवत आहेत आणि लाजेकाजेस्तव काही पावलं उचलली जात आहेत तरी या अशा वरच्या सारख्या काही लोकांना त्यातही खोडा घालावासा वाटतो? हे सगळं राजकीय आहे वगैरे म्हणायला जगापासून किती तुटलेलं नक्की असावं लागतं!

समस्या तर आहेच आहे....

सध्याची चळवळ फक्त राजकीय आहे एवढेच म्हणत आहे... >>> तुमची ही दोन विधाने परस्पर विरोधी आहेत असं नाही वाटत का तुम्हाला? देशभर होणारी चळवळ 'फक्त राजकीय' आहे याला खात्रीशीर पुराव काय?समस्या आहे हे उमजूनही त्याच्या विरोधात बोलणारा प्रत्येकजण हा राजकीय एजेंडा मनात ठेवूनच बोलतो हे कसे काय? २०१४ च्या आधी निर्भयाकांड झालेले, प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, म्हणून यांना निवडून दिले, तुमच्या मते या सरकारने त्या आघाडीवर समाधानकारक कामगिरी केली आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? की आर्थिक आघाडीवर नेत्रदिपक जनतेला उपयुक्त अशी कामगिरी केली या १२ वर्षांत? नसेल केली तर या सरकारने त्यावेळचे ते आंदोलन राजकीय हेतूनेच केले होते हा पुरावाच मिळतो ना? २०१४ ला यांना निवडून कशाला दिलेले? देशासमोरची आव्हाने निस्तरायलाच ना? की लबाड/अप्पलपोट्या 'लाभार्थी अभिजनांच्या'' तैनाती फौजा बनवून, त्यांचा सामाजिक प्रभाव वापरुन त्यांच्याकडून सोशल मिडीया, प्रिंट/टेलिव्हिजन मिडीया, चित्रपट, पुस्तके, अशी उपलब्ध सर्व माध्यमे वापरुन खऱ्या समस्यांवर रंगसफेदी करायला?

तुम्हाला अटक का होऊ नये वगैरे म्हंटला होतात
>>>
शब्द तोडून अर्थ फिरवण्याची बदमाशी करू नका.
मी अजूनही म्हणतो- शब्दांची अफरातफर करून वाटेल तसे तारे तोडल्याबद्दल तुम्हाला अटक झाली पाहिजे.

आताही धमकी वगैरे बरळलाच आहात तुम्ही.

सद्य परिस्थितीत, या सरकारला निवडणूका जिंकण्यापलिकडे काहीही पडले नाही. नितीमत्ता वगैरे तर यांच्या शब्दकोशातच नाही. हा आवाज वाढतच जाणार आहे

महाराष्ट्रातील अन्गणवाडी सेविकेचे प्रकरण पाहिले का? पोषण आहारासाठी जे वाटाणे पुरवले जातात ते १ दिवस भिजवून देखील कुकरच्या ९-१० शिट्ट्या लावून सुद्धा शिजत नाहीत असा तिने व्हिडिओ टाकला तर तिचे निलंबन केले गेले. निळंबनाची बातमी पसरल्यावर ते मागे घेतले गेले.

आता तर कुठल्याही युट्युबर किंवा मोबाईल घेऊन शाळेच्या आवारात येण्यास मनाई करण्यात आली आहे
विद्यार्थ्यांचे जीवित धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे कळते

म्हणजे तुटक्या फुटक्या शाळेत, छत कधीही पडेल आशा परिस्थितीत, जिथं जेवणाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काहीतरी दिले जाते तिकडे परिस्थिती काय आहे हे जगासमोर आणलं तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

जबरा लॉजिक आहे हे

चांगला प्रकल्प सुरु केला आहे CJP ने. पण सरकारी शाळांची प्रचंड संख्या आणि CJP चे मर्यादित कार्यकर्ते पाहता - ते हे कसे करणार आहेत हा प्रश्न पडतो. यामध्ये शाळांतील चांगले शिक्षक, गावातील बिगर-राजकीय सामाजिक कार्यकर्ते, तसेच पालक यांचा सहभाग घेतला तर करता येईल. मग शाळांवर देखरेख ठेवणारी अ-सरकारी, स्थानिक, कायमस्वरूपी व्यवस्था तयार होईल. यामध्ये RTI ची हि मदत घेता येईल. प्रकल्पाला शुभेच्छा.

प्रत्येक गोष्ट झुरळ पार्टीने करण्याची गरज नाहीये
गावातले लोकं, शाळेतील मुले, सजग नागरिक सगळेच करू शकतात
तुम्ही आम्ही सगळेच विषय मांडू शकतो सरकारला जाब विचारू शकतो
कुणाला घाबरण्याची गरज नाही हे झुरळ पार्टीने शिकवले

मुळात प्रत्येक ठिकाणी कोकरोच, जेन झी किंवा जनतेने स्वयंसेवक बनून आपले श्रम वेळ पैसा खर्च करायची आणि एकाच ठिकाणी अडकून राहायची गरज नाही. सरकारवर दबाव बनवून ही कामे त्यांच्याकडून करून घ्यायची आणि पुढे वळायचे. मुळात हे सरकारचेच काम आहे जे त्यांना करायला लावायचे आहे. जो भ्रष्टाचार देशभरात होतो तो थोडा कमी केला तरी हे शक्य होईल. आता कोणाला याचा राजकीय फायदा उचलायचा असेल तर उचलू दे. निदान आपला टॅक्सचा पैसा तरी याच्या त्याच्या घश्यात न जाता सत्कारणी लागेल.

आता मी सांगतो काय होईल ते
या भाजप्याची मोडस oprendi

आता असे काहीतरी करतील की झुरळ पार्टीला बदनाम करण्याची जोरदार संधी मिळेल
मग पार्टीतल्या कोणालातरी फिरवणे
किंवा पार्टीच्या नावाखाली काहीतरी करणे

लक्ष ठेवा या धाग्याकडे लवकरच भाजपे असे काहीतरी करतील की जेणेकरून झुरळ पार्टी चा जनाधार कमी होईल

लडाखमधल्या त्या मुलीच्या व्हिडिओने त्यांना आनंद झाला आहे. त्या एका व्हिडिओ वरून जेन झी वर चिखलाफेक करायची संधी सोडलेली नाहीये.

Pages