योग बापडा कधीच जमून आला नाही

Submitted by तुष्कीनागपुरी on 21 August, 2026 - 06:50

योग बापडा कधीच जमून आला नाही
भेट म्हणाला होता अजून आला नाही
.
जगास विसरून त्याच्या मध्ये गुंतत गेले
त्याला कळले होते कळून आला नाही
.
मनापासुनी किती काळजी माझी त्याला
कठीण घेणे निरोप म्हणून आला नाही
.
यश कीर्तीचे त्याला होते सदा वावडे
किर्ती सोबत माझ्या बघून आला नाही
.
वाट पाहणे सोड एकदा हारवल्यावर
काळ कधीही तुष्की वळून आला नाही
.
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, १९ फेब्रुवारी २०२६

Group content visibility: 
Use group defaults