विविध विषयांवरील विशेष परिसंवाद/ टॉक शोज

Submitted by Ashwini Kshirsagar on 5 August, 2026 - 05:18

विचारांना चालना देणारे प्रेरणादायी संवाद -. बीएमएम २०२६ मध्ये! ✨
मन, बुद्धी, नाती, समाज, इतिहास, क्रीडा, कला, आरोग्य, अध्यात्म आणि प्रेरणादायी जीवनप्रवास... अशा विविध विषयांवर नामवंत वक्त्यांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी!

विकसित भारत २०४७ – अविनाश धर्माधिकारी – Keynote Speaker
घर करा रे प्रसन्न – डॉ. संजय उपाध्ये
क्रिकेटने मला काय शिकवले? – क्रीडा समीक्षक सुनंदन लेले
फक्त भारतालाच इतिहास का आहे? – श्री. निलेश ओक
सुखाचा शोध, बोध आणि वेध – श्री. मंगेश फडके
कर्करोग: समज–गैरसमज – डॉ. सुलोचना गवांदे
गीतेचा सर्वार्थाने उपदेश नक्की कोणता? - श्री. सुदर्शन साठे
साधू संत येती घरा – समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींसोबत विशेष परिसंवाद:
श्री. अशोक देशमाने - स्नेहवन संस्था, श्री. यजुर्वेंद्र महाजन - दीपस्तंभ संस्था, डॉ. विनोद शहा - जनसेवा फाउंडेशन, डॉ. गिरीश कुलकर्णी - स्नेहालय संस्था, अनुराधा भोसले - अवनी - संस्था
साधनेपासून सिद्धीपर्यंत & जिजाऊंचे स्वराज्य - आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व पुरस्कारप्राप्त चित्रकार प्रमोद कुलकर्णी आणि सुचित्रा भोसले

ज्ञान, प्रेरणा, चिंतन आणि सकारात्मक ऊर्जा यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी ह्या कार्यक्रमांना नक्की उपस्थित रहा..
https://bmmseattle2026.org/schedule

Group content visibility: 
Public - accessible to all site users