यंदा गणेशोत्सव १४सप्टेंबरला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २७ वे वर्ष.
या गणेशोत्सवात मायबोलीला ३० वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली ३० वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२६ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
गणपती बाप्पा मोरया...
गणपती बाप्पा मोरया...
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मला भाग घ्यायला आवडेल.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
यावर्षीचा गणेशोत्सव खूप मस्त
गणपती बाप्पा मोरया| मंगलमूर्ति मोरया||
यावर्षीचा गणेशोत्सव खूप मस्त होणार. खूप सार्या शुभेच्छा.
मला स्वयंसेवक म्हणून काम
मला स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे.
गणपतीबाप्पा मोरया. शुभेच्छा.
गणपतीबाप्पा मोरया. शुभेच्छा.
गणपतीबाप्पा मोरया. खूप खूप
गणपतीबाप्पा मोरया. खूप खूप शुभेच्छा.
मला आवडेल पण अजिबात
मला आवडेल पण अजिबात पूर्वानुभव नाही.
>>>
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
लेखाची लिंक ओपन होत नाही आहे.
मनिम्याऊ-मृण्मयी
मनिम्याऊ-मृण्मयी
आपली मायबोली या ग्रुपच्या सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/2069
अॅडमिन, तो लेख सार्वजनिक करता येईल का?
--
मला यंदा संयोजनात सहभागी व्हायला आवडेल.
मलाही सहभागी आवडेल खरे तर पण
मलाही सहभागी आवडेल खरे तर पण गतकालात ३ वेळा सजावटीचे काम केलेले आहे आणि यंदाच्या वर्षी कृत्रिम बुध्दीमत्तेने तयार झालेल्या इमेजेसनी आमच्या सारख्या ग्राफिक डिझाईनर्स्ची मती कुंठित केलेली आहे. वेगळे असे तरी काय करावे हीच प्रॉम्प्ट दिवसरात्र छळते आहे. शिवाय ह्या ए आय इमेजेस तयार करण्यासाऱहे पुरेसे मनुष्यबळ मायबोलीवर निश्चितच आहे तेंव्हा वाचकांच्या भुमिकेतून यंदाचा गणेशोत्सव अनुभवावा असेच वाटत आहे.
खूप सार्या शुभेच्छा......
मला मधले काही दिवस कामा
मला मधले काही दिवस कामा निमित्त जमणार नाही पण बाकी वेळ संयोजनात सहभागी व्हायला आवडेल.
सगळ्यांना शुभेच्छा. यावेळी
सगळ्यांना शुभेच्छा. यावेळी जमलं तर प्रोफाईल स्पर्धा घ्या. मायबोलीवर अवलोकन टॅब असतो तो भरायला सांगा. मतदान ठेवा.
अभ्या, तुमची सगळी चित्रे
अभ्या, तुमची सगळी चित्रे आवड्ली होती. फक्त गणपतीची मूर्ती, सजावट इतकेच नाही तर दवंड्या, घोषणा, प्रशस्तिपत्रे यातही तुमचे कलाकौशल्य आले असेल ना? तेव्हा या तुम्ही.
मी नाव दिलं खरं. पण दहा दिवसांचा गणपती आणि आधीची तयारी एवढा वेळ देणं यंदा तरी शक्य नाही. त्यामुळे मी नाव मागे घेतो.
मला स्पर्धा , उपक्रम यांसाठी एक कल्पना सुचली आहे, ती अमितला कळवेन.
मस्त जबरी टीम जमेलसं दिसतंय.
मस्त जबरी टीम जमेलसं दिसतंय. बकप!
भरतसर आमचे गुरुस्थानी..
भरतसर आमचे गुरुस्थानी..
त्यांनीच आग्रह केलाय. स्पर्धा आयोजन वगैरे नाही जमत पण ग्राफिक्स जमेल तितके करेन. द्या तसले काही काम असेल तर...
क्या बोलती पब्लिक......?
परफेक्ट अभ्या...!
परफेक्ट अभ्या...!
भरत, तुम्हीपण जमेल ते दिवस जमेल तेवढं करा शक्य असेल तर. सुरुवातीला आयड्यांच्या कल्पनांत भाग घेतलात तरी पुढे करू आपण.
अमितव पण आहेतच...
अमितव पण आहेतच...
मग काय?
मोरया..........
बरं अमित. हे जमेल.
बरं अमित.
हे जमेल.
<<<< यावेळी जमलं तर प्रोफाईल
<<<< यावेळी जमलं तर प्रोफाईल स्पर्धा घ्या. मायबोलीवर अवलोकन टॅब असतो तो भरायला सांगा.
>>>>
हे इंटरेस्टिंग आहे बोकलत
अमित,
अमित,
तुझ्याकडे सगळ्यांचे WhatsApp नंबर आहेत का?
गृप बनवतोस का?
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
संयोजक मंडळाला शुभेच्छा.
ह्यावेळी आता काय काय अध्याहृत असणार / नसणार ते अध्याहृत धरायला हरकत नाही.
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
संयोजक मंडळाला शुभेच्छा.
काहीही मदत लागली तर हक्काने सांगा.
हर्पेन
अभ्या.. चा नंबर नाही. आणि
अभ्या.. चा नंबर नाही. आणि अरे अॅडमिनने हिरवा झेंडा दाखवू दे आधी.
आणि अरे अॅडमिनने हिरवा झेंडा
आणि अरे अॅडमिनने हिरवा झेंडा दाखवू दे आधी. >> तेच..
एवढी उत्साही टीम आहे म्हणजे दणक्यात साजरा होणार गणेशोत्सव...