२ मोठ्ठ्या भोपळी मिर्ची + १ मध्यमाकारी कांदा + ३ टोमॅटो + २ लहानसे कॅन ट्युना + १ ते दीड वाटी कोळंबी + आले-लसूण पेस्ट + गूळ + ऑयस्टर सॉस (ऐच्छिक) + तिखट + धणे-जीरे पूड + हळद + हिंग

(१) कढईत तेल घालून त्यात फोडणी देणे
(२) चिरलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट नीट परतणे
(३) बारीक चिरलेली भोपळी मिरची त्यावर घालून मीठ घालून झाकून शिजवत ठेवणे. होय मीठ घालायचे कारण आपल्याला ती भोपळी मिर्ची अगदी मऊ करायची आहे. मीठामुळे पाणी सुटुन ती छान शिजते.
(४) वीस ते पंचवीस मिनीटांनी झाकण काढुन, मिर्ची नीट शिजलेली आहे का बघुन, शिवाय उलथण्याने ठेचणे. मॅश करायची आहे पण अगदी पेस्ट नको.
(५) आता टोमॅटॉ + गूळ +धणे-जीरे पूड + तिखट + हळद + हिंग घालून परत सगळं शिजवत ठेवायचे.
(६) कोळंबी + ट्युना घालून परत झाकण ठेवणे. मी मोठी कोळंबी कापून घेते. जशीच्या तशी ढब्बी घालत नाही.
(६) ते सर्व मस्त एकजीव शिजले की ऑयस्टर सॉस घालून परत दणदणीत वाफ काढायची.
(७) आता लगेच वाढायला घ्यायचे नाही. दहा-पंधरा मिनीटे झाकण ठेउन वाट पहायची. सर्व चवी छान मिळून येतात.
एकंदर शिजवणे प्रकार खूप. सर्व एकजीव तर करायचय पण अगदी पेस्ट नको. आम्हाला ही डिश भयंकर आवडते. गरम भाता वरती हे सॉस(भाजी) मस्त लागते एकदम.
नवीन खाद्यप्रकार कळला..
नवीन खाद्यप्रकार कळला..
छान आहे कृती..सोपी आहे..
धन्स मृ केलीस तर इथे कळव
धन्स मृ
केलीस तर इथे कळव प्लीज. फार मस्त लागते.
बाकी सर्व ठीक आहे पण कोळंबी
बाकी सर्व ठीक आहे पण कोळंबी आणि गूळ ? वाचूनच कसेतरी झाले
छान आहे रेसिपी, तेवढा गुळ
छान आहे रेसिपी, तेवढा गुळ सोडून.
पण करणार नाही.
कोळंबी घरात आली की कोळंबी+ बटाटा रस्सा / खिचडी करण्यात संपून जाते.
गूळ हवाच. तुम्हाला चीन्यांचं
गूळ हवाच. तुम्हाला चीन्यांचं स्वीट & सावर चालतं ना? डक सॉस चालतं ना?
शर्मिला गूळ शक्यतो स्किप करु नकोस. आंबट गोड अशी सुरेख भाजी बनते. मी तर जी फोडणी घालते त्यात मेथ्याही आहे त्यामुळे आपोआप कडू चवही जाते पोटात.
बाकी तुझी मर्जी.
माझी आंबट तिखट असते.
माझी आंबट तिखट असते.
गूळ नको.... ते चिन्यांचे
गूळ नको.... ते चिन्यांचे स्वीट सोअर पण आवडत आही, कसे बसे खाते. हनी चिकन वगैरे..
मस्त वाटतेय पाकृ!
मस्त वाटतेय पाकृ!
आणि मीठ लिहिले की पुढे चवीनुसार हा अनावश्यक शब्द लिहिण्याचा ओसीडी नसल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
आशू मला ते ऑरेन्ज चिकन आणि
आशू मला ते ऑरेन्ज चिकन आणि सेसमी चिकन - फार आवडते.

------------
मानव धन्स
Tuna आणि कोळंबी च्या ऐवजी
Tuna आणि कोळंबी च्या ऐवजी आपलं ते हे घालुन veg version करता येईल

हाहाहा किल्ली
हाहाहा किल्ली
कोलंबी ऐवजी आलू आला तर ट्युना
कोलंबी ऐवजी आलू आला तर ट्युना ऐवजी काय घालावे?
भारी आहे रेसिपी. तू व्हेज ना?
भारी आहे रेसिपी.
तू व्हेज ना?
>>>>तू व्हेज ना?
>>>>तू व्हेज ना?
मला विचारलाय का हा प्रश्न? मी सगळं खाते.
ट्युना ऐवजी काय घालावे>>>
ट्युना ऐवजी काय घालावे>>> क्रश सोया चंक्स.
परदेसई सॉरी तुमचा प्रश्न
परदेसई सॉरी तुमचा प्रश्न पाहीला नाही. आशू म्हणतात तसे सोया चंक्स चालून जावेत.