
https://www.youtube.com/watch?v=Gk7PLm2I3To
नमस्कार,
मी दरवर्षी पालख्यांचं दर्शन घ्यायला एफ सी रोडवर जाते. माऊलींची पालखी, त्याच्या पुढे मागे चालणार्या दिंड्या, त्यातले भोळे भाबडे वारकरी, कोणी डोक्यावर तुळस घेतलेली असते तर विठ्ठल रखुमाई ची मुर्ती घेतलेली असते. हातात टाळ, मुखी विठुरायाचं नाव आणि एका लयीत पडणारी पावलं हे सगळं दृश्य पुढे अनेक दिवस डोळ्यांपुढे दिसत राहातं.
दरवर्षी पुण्यात येणारा पालखी सोहळा बघुन गेल्या वर्षी काही ओळी लिहिल्या
सावळा विठोबा, साजिरी रखुमाई
बाप आणि आई, आले घरा
देखणे ते रूप, पाहुनिया डोळा
प्रेमाचा उमाळा, दाटे मनी
सुंदर ते ध्यान, घेता डोईवर
उतरला भार, संसाराचा
तुझ्या दर्शनाने, गेला सर्व शीण
तुझ्या पायी लीन, वृत्ती माझी
मिटता लोचने, दिसे गोड रूप
तुझेच कौतुक, कानी माझ्या
आणि यावर्षी त्या रचनेचं गाणं झालं 
आषाढी वारीच्या निमित्ताने आम्ही काही मित्रमंडळींनी मिळुन "सावळा विठोबा" नावाचा एक अभंग रेकॉर्ड केला आणि ९ जुलै रोजी पुण्यात दाखल झालेल्या पालखीच्या स्वागताच्या निमित्ताने आम्ही हा अभंग रीलीज केला.
मायबोली परिवारासाठी अभंगाची लिंक खाली देते आहे.
नक्की बघा आणि प्रतिक्रीया कळवा.
https://www.youtube.com/watch?v=Gk7PLm2I3To
गीत: स्मिता श्रीपाद
संगीत: ओंकार साठे
गायक: सायली जोशी, ओंकार साठे
कोरस: प्रांजल अक्कलकोटकर, प्रज्ञा प्रभुदेसाई, सुचेता परांजपे, स्मिता श्रीपाद
संगीत संयोजन: ओंकार साठे, प्रांजल अक्कलकोटकर
वाद्यवृंद:
तबला आणि संवादिनी: ओंकार साठे
कि-बोर्ड: प्रांजल अक्कलकोटकर
पखवाज: दिग्विजय देशमुख
टाळ: सुचेता परांजपे
रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग: अवधूत रहाळकर
(Euphony Recording Studio, पुणे)
व्हिडीओ संकलन: शैक्षणिक साधन केंद्र, ज्ञान प्रबोधिनी
राम कृष्ण हरी
कविता, संगीत आवडले.
कविता, संगीत आवडले.
आवडलं. अभिनंदन!
आवडलं. अभिनंदन!
कविता आणि तिचे झालेले गाणे
कविता आणि तिचे झालेले गाणे दोन्ही आवडली.
संगीतकार ओंकार साठे, यांनी ते गायलंय आणि तबला आणि संवादिनी दोन्हीचे वादकही तेच आहेत? म्हणजे वेगवेगळे ट्रॅक रेकोर्ड केले का?
गाण्यासोबतचे वारकर्यांचे चित्रीकरणही सुरेख. त्यांच्या चेहर्यावर घरबसल्या विठोबाचे दर्शन झाले.
धागा ग्रुपपुरता मर्यादित राहिला आहे.
खूप छान आहे कविता/ गाणं.
खूप छान आहे कविता/ गाणं. अभिनंदन!
व्हिडिओ आवडला.
>>>>गाण्यासोबतचे वारकर्यांचे
>>>>गाण्यासोबतचे वारकर्यांचे चित्रीकरणही सुरेख.
+१
छान आहे Video.
छान आहे Video.
सर्वांना मनापासुन धन्यवाद,
सर्वांना मनापासुन धन्यवाद,
संगीतकार ओंकार साठे, यांनी ते गायलंय आणि तबला आणि संवादिनी दोन्हीचे वादकही तेच आहेत? म्हणजे वेगवेगळे ट्रॅक रेकोर्ड केले का? >>
बरोबर. संगीताचा ट्रॅक आधी बनवुन घेतला आणि मग त्यात व्होकल्स भरले आहेत. संगीताचा ट्रॅक करतानाही वेगवेगळ्या वाद्यांचे लेयर्स रेकॉर्ड केले जातात. त्यामुळे ओंकार दादांनी तबला, संवादिनी आणि गायन आणि संगीत अशा बर्याच भुमिका बजावल्या आहेत.
गाण्यासोबतचे वारकर्यांचे चित्रीकरणही सुरेख >> धन्यवाद. व्हिडिओ साठी शैक्षणिक साधन केंद्र, ज्ञान प्रबोधिनी यांची मदत घेतली.
धागा ग्रुपपुरता मर्यादित राहिला आहे. >> आता पब्लिक केला आहे. धन्यवाद
एक सुंदर भक्तीगीत...
एक सुंदर भक्तीगीत...
सहज, सोपी, लयबद्ध ,आशयघन. शब्दरचना
संगीत,गायन
सगळं अप्रतिम
तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे कौतुक करण्यासाठी तो सावळाही अधीर होईल असे गुणगान...
धन्यवाद
तुमचे आणि तुमच्या संपूर्ण
तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे कौतुक करण्यासाठी तो सावळाही अधीर होईल असे गुणगान... >> धन्यवाद. तुमचे कौतुक टीम पर्यंत पोचवले
छान झालं आहे गाणं/अभंग.
छान झालं आहे गाणं/अभंग.
व्हिडिओ ही आवडला.
धन्यवाद मनीमोहोर
धन्यवाद मनीमोहोर