सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात.. !!

Submitted by पियू on 15 July, 2026 - 03:48

'सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात' तुम्ही बरोबर आहात का चूक हे ठरवताना तुमची जडणघडण तुम्हाला चकवू शकते.

अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे ज्या व्यक्तीवर अन्याय केला जातो आहे किंवा जिला manipulate केले जात आहे तिला simultaneously तूच चूक/ नालायक आहेस म्हणून तुझ्यासोबत असे घडते आहे किंवा तुझ्यासोबत नाईलाजाने असे वागावे लागत आहे पटवून देत राहिले जाते (हा प्रकार नवीन सुनांच्या बाबतीत / नावडत्या अपत्याच्या बाबतीत / नावडत्या एम्प्लॉयीच्या बाबतीत खुपदा केला जातो). जर त्या व्यक्तींवर पद्धतशीरपणे / वर्षानुवर्षे / झुंडीने / वेगवेगळ्या पद्धतीने याच विचारांचा मारा केला तर त्या व्यक्तीच्या deep sub concious मध्ये अर्थात सुप्त अंतर्मनात सुद्धा आपल्याच खोट/ कमतरता / सद्गुणांचा (किंवा अमुक एका नात्यासाठी/ पोझिशनसाठी गरजेच्या असलेल्या / किंवा गरज आहे असे भासवल्या जाणाऱ्या बेसिक स्किल्सचा) अभाव आहे म्हणून आपल्या बाबतीत सगळे वाईट घडते आहे हे पक्के बसू शकते. आणि याचेे पर्यवसन त्या व्यक्तीलाच नकारात्मकतेचा किंवा सायकोसोमॅटिकल आजरांचा सामना करायला लागून प्रत्यक्षात त्याचेच / तिचेच आयुष्य खडतर झालेले दिसते. याऊलट ज्यांनी हा छळ केला अशा व्यक्ती टुणटुणीत आणि मजेत आयुष्य जगताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपण जे वागलो त्यात काहीही चुकले नाही ही ठाम समजूत.

बरेचदा वाईट लोक वाईट वागूनही त्यांच्या बाबतीत नेहेमी चांगलेच का घडते असा प्रश्न सोशल मीडियावर किंवा अन्यत्र वाचायला मिळतो. याचे साधे उत्तर कारण वाईट वागणाऱ्या लोकांच्या मनात त्यांच्या वागण्याविषयी कोणतीही शंका कुशंका नसते. याउलट खरोखर चांगली आणि शक्य तितकी विवेकाच्या मार्गावर चालणारी, आपल्याकडून शक्यतो वाईट कर्म होऊ नये असा सतत प्रयत्न करणारी व्यक्ती मात्र आपल्याच वागण्याविषयी नेहेमी साशंक असते. आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीच्या वाईट काळात मदतीला गेलो नाही तर मनात रुखरुख / बोचणी लागेल अशी असते. त्यामुळे हा जो काही अंतर्मनाचा न्याय असतो तो सतत स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून केस लढवत राहतो. आणि दुसरीकडे अन्याय झालेली व्यक्तीच स्वतःच स्वतःचे वागणे स्वतःलाच जस्टिफाय करत राहते. या मानसिक गुंतागुंतीत पीडित व्यक्तीचीच फरफट होत राहते आणि तिच्या बाबतीत तिच्याच सद्सदविवेक बुद्धीचा न्याय निवडा नीट होत नाही. परिणामी शेवटी तिचेच नुकसान होते.

अपराधीपणाच्या भावनेतून पीडित व्यक्तीला बाहेर काढून तू चुकीची / चुकीचा नाहीस हे पटवण्यासाठी समुदेशक, मानसोपचार तज्ञ, खुद्द ती व्यक्ती, त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणारे आजूबाजूचे लोक (असल्यास) यांना प्रचंड वेळ, पैसा, ऊर्जा खर्च करावी लागते. तरीही वर्षानुवर्षे झालेल्या प्रोजेक्शनचे इफेक्ट १००% जातीलच याची खात्री देता येत नाही.

इति लेखनसीमा.

तळटीप १: इथे 'वरून बघणाऱ्या देवाचा न्यायनिवाडा' हा अजूनच वेगळा विषय आहे व त्याला कर्मभोग, मागील जन्म, पाप पुण्य असे फाटे फुटू शकतात आणि तो मतमतांतराचा विषय असल्याने तो भाग इथे टाळते आहे. पण मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि आपल्याच विचारांमध्ये, अंतर्मनामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यावर, आरोग्यावर परिणाम करण्याचे सामर्थ्य आहे हे आता बऱ्यापैकी सिद्ध झाले आहे आणि त्याविषयी इथल्या सभासदांचे दुमत नसावे हे गृहीत धरून तेवढ्याच भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

तळटीप २: ज्यांना काहीच संदर्भ लागणार नाही त्यांच्यासाठी प्रकाश घाटपांडे यांची सध्याच्या चेतन-सिया आणि त्या अनुषंगाने पुरावे, कोर्टाची निर्णयप्रक्रिया कशी चालते इत्यादी चर्चा इतर एका धाग्यावर चालू असताना दिलेली मूळ प्रतिक्रिया (ज्यावर मला हे लघु लेखन करावे वाटले) ती खाली प्रतिसादात देत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उच्च न्यायालयात दोषी ठरलेल्या व्यक्ति सर्वोच्च न्यायालयात निर्दोष सुटतात तेव्हा काय म्हणायचे हा ही एक प्रश्न आहेच. सर्वोच्च न्यायाधीशाने त्याच पुराव्यांचे व परिस्थितीजन्य विश्लेषणाचे इंटरप्रिटेशन बदलले व त्या आधारे व्यक्तिला निर्दोष ठरवले. या ऐहिक न्यायालयांव्यतिरिक्त अजून एक न्यायालय असते ते म्हणजे आपल्या सदसदविवेकबुद्धीचे न्यायालय. सश्रद्ध लोक याला परमेश्वराचे न्यायालय म्हणतात.

सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात तुम्हीच आरोपी असता, तुम्हीच फिर्यादी असता अन तुम्हीच न्यायाधीश असता. हे न्यायालय तुम्हाला कागदी साक्षी पुरावा मागत नाही. विवेकबुद्धीचा कौल मागत. इथे संशयाचा फायदा मिळून वा पुराव्याअभावी "निर्दोष" म्हणुन मुक्त होता येत नाही. तुम्हाला़च कौल घेण्यासाठी आत्मशोध घ्यावा लागतो. ऐहिक न्यायालयात मिळालेली क्लिन चिट ची प्रशस्ती पत्रके इथे चालत नाहीत. 'हिंमत असेल तर पुरावा दाखवा' ही भाषा इथे चालत नाही. कारण हे न्यायालय जाणत कि पुरावा निर्माण करणारे तुम्हीच व नष्ट करणारे पण तुम्हीच. ऐहिक न्यायालयात कधीतरी का होईना 'निकाल' मिळतो. पण तो न्याय असेलच असे नाही. असला तर तुम्ही नशीबवान. या न्यायालयातील "निर्दोष" निकालाने तुम्हाला कदाचित सुखाने जगता येईल पण सुखाने मरण्यासाठी मात्र तुम्हाला सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात जावेच लागेल. तुमची इच्छा असो वा नसो. तुम्ही कुठ्ल्याही धर्माचे असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही पंथाचे असा, कुठल्याही देशाचे असा, कुठल्याही भाषेचे असा. देव मानणारे वा न मानणारे असा, श्रद्धाळु वा अश्रद्ध असा, पुरुष वा स्त्री असा, गरीब वा श्रीमंत असा, सामान्य वा असामान्य असा या न्यायालयापासुन कुणाचीच सुटका नाही. इथे याचिका दाखल करुन घेण्याची भानगड नाही. इथे न्याय ही दानासारखी देण्याची भानगड नाही. ' justice delayed is justice denied' अस म्हणण्याचीही सोय वा गैरसोय नाही. बोर्डावर केस लवकर यावी म्हणुन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाच देण्याची सोय नाही. न्याय मागण्यासाठी झालेला अन्याय नम्रपणे सांगण्याची सक्ती नाही. इथल्या न्यायालयाचा अवमान होत नाही. इथले निकाल न्यायाधिशांच्या नेमणुकांवर अवलंबुन नाहीत.इथल्या न्यायालयात राजकीय वा सामाजिक हस्तक्षेप नाहीत. शब्दांचे खेळ वा कीस इथे पडत नाहीत.

- प्रकाश घाटपांडे

याचेे पर्यवसन त्या व्यक्तीलाच कॅन्सर किंवा तत्सम क्रॉनिक रोग होऊन प्रत्यक्षात त्याचेच / तिचेच आयुष्य खडतर झालेले दिसते. >>

हे जरा बदलाल का? आपल्या बाबतीत सगळे वाईट घडते आहे, असे वाटल्याने (किंवा अगदी खात्री असल्यानेही) कॅन्सर होत नाही.

पण सुखाने मरण्यासाठी मात्र तुम्हाला सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात जावेच लागेल. तुमची इच्छा असो वा नसो. तुम्ही कुठ्ल्याही धर्माचे असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही पंथाचे असा, कुठल्याही देशाचे असा, कुठल्याही भाषेचे असा. देव मानणारे वा न मानणारे असा, श्रद्धाळु वा अश्रद्ध असा, पुरुष वा स्त्री असा, गरीब वा श्रीमंत असा, सामान्य वा असामान्य असा या न्यायालयापासुन कुणाचीच सुटका नाही.

इथे मुदलातच खोट आहे.

काफिराला इस्लाम स्वीकारायला लावायचा अन्यथा मारून टाका असा आदेश जर कुराणात लिहिलेला आहे.

त्यामुळे इस्लामी दहशवादी यांनी दिवसाढवळ्या कोणत्याही काफिराला मारून टाकले तर त्याला सद्सदविवेकबुद्धीची टोचणी कशी लागेल?

तुही कितीही गुन्हे करा कलमा पढत असाल तर तुम्हाला स्वर्गात नक्की जागा मिळेल हि विचारसरणी शिकून मोठे झालात तर कसली आहे सद्सदविवेकबुद्धीची टोचणी.

आपली अम्मी इस्लामविरोधी वागत आहे म्हणून तिचा खून करणारा माणूस त्याला कसली आली आहे सद्सदविवेकबुद्धी.

तुम्ही ज्या विचारसरणीने मोठे झाला असाल त्यात मानवतावाद शिकवला गेला असेल (आई, बाप, नातेवाईक, शिक्षक या सर्वांकडून) तर हे सद्सदविवेकबुद्धी इ तुमच्या मनात येईल.

सर्व मानव एकच आणि समान आहेत हे शिकवणाऱ्या कम्युनिस्टांनी केवळ क्रांतीचे विरोधक आहे या संशयावरून मागच्या शतकात ११ कोटी लोक मारले आणि वर क्रांती हि रक्तरंजितच असते हे त्याचे समर्थन केले त्यांना सद्सदविवेकबुद्धी कुठून असणार?

याच तर्काने काळ्या लोकांना वाईट बावगवणरे युरोपीय लोक किंवा मागासवर्गीयाना अमानवी वागणूक देणारे उच्चवर्णीय वागत आलेले आहेत.

स्त्री पुरुष समान नाहीत हे पाहत लहानपणापासून मोठे झालेला मुलगा आपल्या बायकोला समान वागणूक देत नाही. त्याला कसली आली आहे सद्सदविवेकबुद्धी. बायकांना अशीच वागणूक देतात हेच ज्याचं डोक्यात बसलेले आहे त्यांना कसलीही टोचणी नसते.

Submitted by उपाशी बोका on 15 July, 2026 - 19:14

>> बदल केला. धन्यवाद.
तरीही मी जे लिहिले त्यामागे You Can Heal Your Life - Louise Hay यांच्या विचारांचा बेस आहे.
सायकोसोमॅटिकल डिसीझ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या संदर्भात 'gaslighting', 'internalized blame', 'learned helplessness', 'trauma response' अशा conceptsचा अभ्यास झाला आहे. लेखात मी मुद्दाम तांत्रिक शब्द टाळले होते, पण अनेक संशोधनांमध्ये अशा अनुभवांची नोंद आढळते.

प्र्त्येकाची सदसदविवेकबुद्धी निराळी असते. उदाहरण देत नाही. नाहीतर धागा भरकटेल.

>> धाग्याचे शिर्षकच "सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात" असे असताना 'सदसदविवेकबुद्धी' या शब्दाच्या व्याख्येवर चर्चा घडली तर धागा कसा भरकटेल? वैयक्तिक डिटेल्स / राजकीय पक्षांची किंवा कोणाही व्यक्तिंची नावे न घेता उदाहरणे देता आली तर नक्की लिहा अशी विनंती.

हा लेख कोणाला निर्दोष किंवा दोषी ठरवण्यासाठी नाही. ज्यांची निर्णयक्षमता दीर्घकाळाच्या मानसिक दडपणामुळे ढासळली असेल, त्या प्रक्रियेवर विचार व्हावा हा उद्देश आहे.

तुम्ही ज्या विचारसरणीने मोठे झाला असाल त्यात मानवतावाद शिकवला गेला असेल (आई, बाप, नातेवाईक, शिक्षक या सर्वांकडून) तर हे सद्सदविवेकबुद्धी इ तुमच्या मनात येईल.

>> हेच मीही मूळ लेखात म्हटले आहे. त्यामुळे उलट अन्याय करणार्‍या व्यक्तिच्या मनात जास्त सुस्पष्टता असते आणि ते जास्त निरोगी आयुष्य जगतात.

एकाला जो अन्याय वाटतो तो दुसऱ्याला न्याय व्वाटतो.

>> बरोबर. दोन व्यक्तींना एकाच घटनेबद्दल वेगवेगळे न्याय वाटू शकतात. पण न्यायालयातही साक्षीदारांना जर खोटी माहिती सातत्याने दिली गेली, तर त्यांची साक्ष प्रभावित होऊ शकते. माझा लेख त्या 'साक्षीदारावर'..म्हणजे स्वतःच्या मनावर..दीर्घकाळ झालेल्या परिणामाबद्दल आहे.

सुबोध खरे यांच्याशी सहमत!

तुम्ही जिथे कनेक्टेड असतात त्यानुसार तुमची विचारसरणी तयार झाली असते.

म्हणून कुठलाही देवधर्म मानू नये, कुठलाही जातीधर्माचा टॅग आपल्यावर लावू नये, अन्यथा त्याची शिकवण योग्य की अयोग्य याचा विचार न करता योग्य समजूनच तुम्ही आचरणात आणता.

कुठल्या राजकीय पक्षासोबत किंवा ठराविक विचारसरणी असलेल्या संघटनेसोबत जोडले जाऊ नये. अन्यथा त्यांची विचारसरणी तुम्हाला एका चौकटीत बांधून टाकते.

स्वतःला स्त्री किंवा पुरुष हा टॅग सुद्धा लावू नये. जेणेकरून अमुकतमुक गोष्ट स्त्रियांनी केली तर चालते पण पुरुषांना शोभत नाही किंवा व्हायसे वर्सा असले विचार मनात येत नाहीत.

थोडक्यात आपले आचारविचार नेहमी मुक्त असावेत. जर तुम्ही तसे असाल तर आधीचा कुठलाही विचार तुम्ही पुढच्या पिढीत पास न करता त्यांनाही त्यांच्या विचारांनी जगू द्याल.

सोप्या भाषेत सांगायचे तर प्रत्येक व्यक्तिची त्याच्या परिप्रेक्षात योग्य काय अयोग्य काय याच तर तम भावाने विचार करण्याची बुद्धी म्हणजे सद सद विवेक बुद्धी. ही व्यक्ति सापेक्ष असणार आहे.
काफिराला इस्लाम स्वीकारायला लावायचा अन्यथा मारून टाका असा आदेश जर कुराणात लिहिलेला आहे.त्यामुळे इस्लामी दहशवादी यांनी दिवसाढवळ्या कोणत्याही काफिराला मारून टाकले तर त्याला सद्सदविवेकबुद्धीची टोचणी कशी लागेल?>>>>
लागेल किंवा नाही. पण असे एखादेच वाक्य उधृत करुन बाकी कुराण किंवा कोणताही धर्मग्रंथ यात अन्य गोष्टी ही लिहिल्या असतात त्याकडे दुर्लक्श नको.. बहुतांशी बाबी आज कालबाह्य असल्या तरी धार्मिक,धर्मांध,धर्मवेडा व धर्मभोळा असे वेगवगळे लोक असणारच. कयामत के दिन क्या सोचोगे? हा विचार देखील असतो. किंवा आपल्याकडे चित्रगुप्ताला काय हिशोब देशील? हा विचार आहेच. सर्वांचे आचार विचार सारखेच असणार नाही. दरोडेखोरांच्यात देखील दरोडा टाकणे योग्य पण स्त्रीच्या मंगळसूत्राला हात लावणे अयोग्य अशी धारणा बाळगणारे देखील असतात. चोरों के भी उसूल होते है असो.

सन्माननीय पियू,

तुम्हाला म्हणायचे काय आहे हे तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगता येईल का?

हो.

माझा मुख्य मुद्दा एवढाच आहे की 'दीर्घकाळच्या मानसिक छळामुळे पीडित व्यक्ती स्वतःलाच दोषी समजू लागते आणि तिची सदसदविवेकबुद्धीही त्या खोट्या समजुतीला बळी पडू शकते.'

उरलेला लेख हा त्याच मुद्द्याचे स्पष्टीकरण आहे.

दरोडेखोरांच्यात देखील दरोडा टाकणे योग्य पण स्त्रीच्या मंगळसूत्राला हात लावणे अयोग्य अशी धारणा बाळगणारे देखील असतात. >>>>> आजकालचे chain snatchers मात्र मंगळसूत्रालाच हात घालतात. त्यांना असले काही उसूल उरले नाहीत.

चांगला विषय & धागा. हा धागा भरकटू नये यासाठी सदिच्छा.
जसं धाग्यात मांडलय, सहसा तसंच आजुबाजूला घडताना पाहिलय. पण क्वचित आजकाल कुठे कुठे समाजात, ऑफिसात, नातेवाइकांत शोषण होणारे लोक स्वतःसाठी स्टँड घेताना दिसत आहेत हे ही नसे थोडके Happy पण ही कुवत सर्वांत नसते.

दीर्घकाळच्या मानसिक छळामुळे पीडित व्यक्ती स्वतःलाच दोषी समजू लागते आणि तिची सदसदविवेकबुद्धीही त्या खोट्या समजुतीला बळी पडू शकते.

माझ्यासोबत झाले होते हे, ह्याने फरक पडायचा तेव्हा खूप छोटा होतो, वयाने नाही समजुतीने.

माझ्या पित्याचे असंख्य उपकार की मी 18 चा झाल्याबरोबर मला बुडावर लाथ घालून त्यांनी जगाच्या बाजारात उघडे सोडले, पडशील धडपडशील खरचटलं तर रक्त येईल इत्यादी प्रश्न त्यांना पडले असतील पण त्यांनी ते मला टोलवले नाही किंवा बागुलबुवा करून दिले नाहीत.

हळूहळू मी सावरलो, आपल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये हा कटाक्ष पाळून सुद्धा उगाच तोंडसुख घेणाऱ्या जनतेला तिथल्या तिथे बोलायला शिकलो, मन हलके राहायला लागले, सावरलो, पुढे जे मी फेस केले ते इतर कोणी करू नये म्हणून प्रयत्न करू लागलो, फिल्मी वाटेल पण मार्केटिंग सारख्या डिमांडिंग क्षेत्रात कार्यालयातील ब्लॅक शीप म्हणवले जाणाऱ्या कोणालाही आपल्या प्रोजेक्ट अन् टीम वर नको असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले, टीम बिल्ड केली. रात्री बेरात्री एक एक वाजेपर्यंत काम केले पहिले माणसांवर काम केले मग प्रक्रियांवर काम केले, एच आर सोबत भांडून ह्या आमच्या पोरांना कौन्सेलर मिळवून दिला, त्यांना त्यांच्या अपराधबोधातून मुक्त केले, पूर्ण रिजन तुमचे, जा नागडे नाचला तरी साहेब आहे सांभाळायला ही हमी दिली. अक्षम्य चुकांची लिस्ट काढून दिली ह्यापैकी काही केल्यास करियर आणि जिंदगी बरबाद होईल ही वॉर्निंग आगाऊ दिली.

एका वर्षात आमची पोरे अन् पोरी टॉप बिझनेस आणणारी टीम झाली, क्लायंट फोन करून सीईओला सांगू लागले

"वांड ऑफर जबरी टाकतो"

"जेम्सच्या टीम मधली पूनम आली होती, पोरगी आहे का सामुराई कताना (actual words), होमवर्क अपडेट, फॅक्ट फिगर्स प्रोजेक्शन टू द मार्क" (ह्या पोरीला तिच्या बहिणीसोबत compare करून गाळात घातले होते समाजाने)

मी स्वतः लीड करेपर्यंत एका पोरा पोरीने resign टाकले नाही, too good team too good memories of underdogs jumping to hold the lines and man the LMGs firing all around

तात्पर्य - ह्यातून बाहेर निघताना जर आपल्यासारखा कोणी दिसला तर हात धरून बाहेर आणावा. दुवा लागते अन् अलिजन्सेस असे तयार होतात की ज्याचे नाव ते !.

छान लेख. चांगला विचार मांडलाय. मानसोपचारांची गरज आज सगळ्यात जास्त आहे, आज माणसे एकाकी होत चाललीत.

'सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात' तुम्ही बरोबर आहात का चूक हे ठरवताना तुमची जडणघडण तुम्हाला चकवू शकते.>>>>

बरोबर. त्यामुळेच काफिराला मारल्यावर मारणार्‍याला कसलीही टोचणी लागणार नाही. न मारता सोडले तर टोचणी लागेल की आपण कुराणातले आज्ञापालन केले नाही.

पण असे एखादेच वाक्य उधृत करुन बाकी कुराण किंवा कोणताही धर्मग्रंथ यात अन्य गोष्टी ही लिहिल्या असतात त्याकडे दुर्लक्श नको>>>>

हाहा…. हे वाचल्यावर कालच फेबु ने दाखवलेली एक क्लिप आठवली. अमेरिकन प्रेसिडेंटला एक स्त्री बायबल मधले एक वाक्य उधृत करुन होमोसेक्षुआलिटीबद्दल निगेटिव बोलते. तेव्हा प्रेसिडेंट बायबलमधील अजुन दहा वाक्ये उधृत करुन त्या प्रमाणे आज मी चालणे योग्य आहे का विचारतो Happy

अवांतराबद्दल क्षमस्व.

>>> दीर्घकाळच्या मानसिक छळामुळे पीडित व्यक्ती स्वतःलाच दोषी समजू लागते आणि तिची सदसदविवेकबुद्धीही त्या खोट्या समजुतीला बळी पडू शकते.'

धन्यवाद पियू

आशू२९

धन्यवाद. धागा भरकटू नये ही मलाही मनापासून इच्छा आहे.

हो, हल्ली काही जण स्वतःसाठी ठामपणे उभे राहताना दिसतात, हे निश्चितच आशादायक आहे. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती क्षमता प्रत्येकामध्ये सारखी विकसित झालेली नसते. अनेकदा त्यामागे लहानपणापासूनची जडणघडण, आत्मविश्वास, आधार देणारी माणसं आणि परिस्थिती हे सगळे घटक असतात. म्हणूनच अशा विषयांवर संवेदनशीलपणे बोलणं महत्त्वाचं वाटतं.

वांड..

खूप छान अनुभव शेअर केलात.

एक गोष्ट विशेष आवडली.. तुम्ही स्वतः त्या प्रक्रियेतून बाहेर आल्यानंतर तिथेच न थांबता इतरांसाठीही आधार बनलात. अनेकदा एखाद्या व्यक्तीला स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्यासाठी मनापासून "तू चुकीचा नाहीस" असं म्हणणारा फक्त एक जण पुरतो.

लेखाचा हेतूही हाच होता की अशा मानसिक गुंतागुंतीची दखल घेतली जावी. त्यातून बाहेर पडणं महत्त्वाचं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे शक्य असेल तिथे दुसऱ्याचा हात धरून त्यालाही बाहेर काढणं. तुमच्या अनुभवाने त्याचं एक छान प्रत्यक्ष उदाहरण मिळालं. धन्यवाद.

थँक यू पियू जी,

गंमत म्हणजे हा प्रतिसाद मी इतका उस्फुर्त लिहिला होता की ती तुमच्या ताजमहालास नकळत एक वीट लागली आहे हे पण कळले नाही ! . तुमच्या लेखनाची आणि विषयाची खोली म्हणावी लागेल ती.

ती टीमच जबर होती, एक से एक नमुने होते, इतका meticulous अभ्यास करायचे क्लायंटचा की बस ! एकदा एक राजस्थानी मारवाडी क्लायंट होता, त्याला चोखी ढानी टाईप जागी जेवायला नेले होते जेवल्यावर मी विषयाला हात घालणार तो गडी लागला की चुळबुळ करायला, तितक्यात आमचा सोन्या (मूळ नाव काहीतरी वेगळे, हा गडी ग्रामीण भागातला ओरिजनल) लगेच मागे रेलुन बसला अन् सरळ एक विमल का रजनीगंधा पान मसाल्याची पुडी काढून बिनदिक्कत म्हणाला

लो जी सर जी मुखवास कर लो!

मी अक्षरशः सुन्न पडलो ! मला वाटले संपले सगळे, पण गडी इतका खुश झाला की उठून डायरेक्ट सोन्याला मिठी घातली, आमच्यासाठी त्या एका पान मसाला पुडीने क्वार्टरली टार्गेट पूर्ण केले होते. किंमत फक्त ३० कोटी !

सोन्या बिलंदराने दोन आठवडे घासून काम केले अन् बॅकग्राऊंड मधे माहिती घेता घेता काढले की ह्या बाबाला बिना पान मसाला जमत नाही जेवल्यावर. तो मसाला त्याचा असिस्टंट कॅरी करत असे, अन् आमच्या मीटिंगच्या वेळी पूनमने बरोबर त्याला वेगळ्या सेक्शन मध्ये जेवायला बसवले ! स्ट्रॅटेजी अशी वर्क आऊट होते.

सोन्याला घरूनच गिल्ट दिले जाई, सोन्याचा भाऊ एन आयटी passout, सोन्याची बहीण PhD, सोन्याचे वडील मेकॅनिकल इंजिनियर अन् शासकीय अभियंता, आई MSc बायोलॉजी अन् सोन्या बीकॉम + कुठल्याश्या जिल्हा मुख्यालयीन कॉलेज मधून MBA तीन वर्षे एका कंपनीचा ज्युनिअर सेल्स मॅनेजर म्हणून स्थानिक ठेकेदार अन् बिल्डरांना सिमेंटच्या गोण्या विकून माझ्या नजरेत भरलेला पोरगा.

आज सोन्या साऊथ ईस्ट एशिया हेड आहे मार्केटिंगचा एका मोठ्या कंपनी मध्ये. अधून मधून फोन करतो, कसे आहात दादा म्हणून विचारपूस करतो, कधीतरी लंचला भेटतो. बरे वाटते.

Happy उत्तम !!

खूप कमी लोक स्वतःवर अन्याय झाल्यावर "माझ्याबाबतीत जे झाले ते इतर कोणाच्या बाबतीत होऊ देणार नाही" असं ठरवतात. इतर बरेचसे लोक "त्यात काय एवढं.. आम्ही नाही का सहन केलं आमच्यावेळी?" असाच पवित्रा घेऊन स्वतःकडे शक्ती येते तेव्हा पीडित व्यक्तीचा शर्ट काढून सहजपणे अन्याय करणाऱ्याच्या भूमिकेत प्रवेश करतात. असा विचार करणाऱ्या लोकांना "ही सिस्टिम अशीच काम करते" हे इतकं क्लिअर असतं की त्यांच्या 'सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात' संपूर्ण सुस्पष्टता असते.

त. टी. :

प्रत्येक अन्याय करणाऱ्याने कधी न कधी त्या भूमिकेत असताना अन्याय सहन केलेला असतोच असा कृपया या प्रतिसादाचा अर्थ घेऊ नये. स्वतःचे मानसिक आयुष्य प्रचंड सुखाचे गेलेले असतानाही अन्याय करणारे असंख्य लोक पाहिले आहेत.

त्यामुळेच "आमच्यावर आमच्यावेळी (म्हणजे दुर्बल असताना) अन्याय झाला" हे आता तुम्ही इतरांवर करत असलेल्या अन्यायाचे समर्थन होऊ शकत नाही कारण..

१. तुम्ही जर कधी हा अन्याय सहनच केला नसेल तरी इतरांवर करत असाल तर याला सरळ सरळ क्रौर्य म्हटले पाहिजे.

२.तुम्ही अन्याय सहन केला असला तरी (त्यावेळेच्या तुमच्या सहन करण्याविषयी पूर्ण सहानुभूती बाळगून) तुमच्या विवेकाला स्मरून ती चेन तुमच्यापर्यंतच ब्रेक करण्याचा पर्याय तुमच्याकडे असतोच. (जसे वांड यांनी केले असावे).

इति अवांतरसीमा Happy

खूप कमी लोक स्वतःवर अन्याय झाल्यावर "माझ्याबाबतीत जे झाले ते इतर कोणाच्या बाबतीत होऊ देणार नाही" असं ठरवतात. >> शेफाली शहा चा मान्सून wedding आठवला.

शेफाली शहा चा मान्सून wedding आठवला.>>>> जबरी. काय काम केलेय तिने त्यात.

मिर्च मसाला मधल्या स्मिता पाटील & दिप्ती नवल.