Submitted by राज अज्ञानी on 27 May, 2026 - 04:01
वेधक वेचक बातम्यांची लिंक वर असलेल्या धाग्यावर दिली जाते. पण बऱ्याचदा ती लेखाशी सुसंगत असत नाही. तसेच तो धागा मागे पडला कि संबंधित बातमी पण विस्मरणात जाते.
लक्षवेधी बातम्या एका ठिकाणी असणारा धागा सर्च मधे सापडत नाही. असेल तर हा धागा बंद करण्यात आला तरी चालेल.
नसेल तर कृपया इथे बातम्या डकवायची सोय आहे. चित्र, लिंक, मजकूर कोणत्याही प्रकारची माहिती चालेल. देणाऱ्या ने बातमी प्रतिष्ठित संस्थेच्या हवाल्याने दिलेली असावी किंवा व्हेरिफाय केलेली असावी. फर्स्ट हॅंड असेल तर सत्यता पटवण्याची जबाबदारी घेतलेली असावी एव्हढीच माफक अपेक्षा.
विषयाचे बंधन नाही.
एखाद्या बातमीवर जास्त काळ चर्चा होईल असे वाटल्यास स्वतंत्र धागा काढावा ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
जपानने भारताचा हापूस आणि केसर
जपानने भारताचा हापूस आणि केसर या आंब्यांवर बंदी घातली आहे. एक खेप परत पाठवून दिली आहे.
याचे कारण म्हणजे जपानचे अधिकारी जेव्हां भारतात हापूस आंब्यांची लागवड आणि प्रक्रिया यांची पाहणी करण्यासाठी आले होते, तेव्हां फ्युमिगेशन प्रोसेस दरम्यान आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांना आढळले. फ्युमिगेशन म्हणजे कीटकनाशकांचा वापर. यात जे विषारी पदार्थ वापरतात ते घातक आहेत.
भारताचा माल अनेकदा परत येतो. त्यानंतर भारतातली माध्यमे त्या देशांना दोष देतात. पण कीटकनाशकं म्हणून घातक रसायनांचा सर्रास वापर होतो. ही कीटकनाशकं जमिनीत अनेक वर्षे राहतात. पाण्यात मिसळली जातात. त्याने कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात. हा एक मोठा तिढा आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर करायचा तर खर्च मोठा होईल, ज्यामुळे फळांच्या किंमती जास्त वाढतात. आणि जर सध्याची कीटकनाशकं वापरणं थांबवलं तर कीड येऊन पीक नष्ट होतं. ज्यामुळे नुकसान सोसावं लागतं.
माफ करा पण अशा बातम्याही
माफ करा पण अशा बातम्याही चालतील का? नसतील चालत तर उडवेन.
https://www.yahoo.com/lifestyle/articles/abandoned-donkey-gave-her-rescu...
एक रस्त्यावर सोडुन दिलेली गाढविण होतं. एका दांपत्याने दया येउन, तिला घरी नेले. तिथे तिला हवी ती सुरक्षा मिळाल्यावर ती गाढविण व्याली. गाढवं म्हणे त्यांची डिलिव्हरी सुरक्षित वाटेपर्यंत, थांबवुन ठेउ शकतात.
ते पिल्लू तर इतकं गोड आहे ना. जगात सगळीच पिल्ले गोड दिसतत पण गाढवाचे सर्वाधिक.
Yes, a donkey (jenny) can consciously delay her delivery by several days to a couple of months. If she senses an unfavorable environment, extreme weather, or predators, she will instinctively hold off on foaling until she feels completely safe and secure.
कंसात जेनी दिलय म्हणुन पहायला गेले तर -
A female donkey is specifically called a jenny (or sometimes jennet). In comparison, an intact male donkey is called a jack, and a baby donkey is a foal.
चालेल कि.
चालेल कि.
सामो यांनी दिलेली बातमी आवडली
सामो यांनी दिलेली बातमी आवडली. थोडा अधिक शोध घेतला असता काही प्राणी तात्पुरत्या थोड्या काळासाठी असे करू शकतात हे कळले. स्ट्रेस मुळे लेबर कमी होऊन प्रसूती थोडी पुढे ढकलली जाते. स्ट्रेस गेला कि मग पुन्हा कळा येऊन प्रसूती. मस्तच.
>>>>सामो यांनी दिलेली बातमी
>>>>सामो यांनी दिलेली बातमी आवडली.
धन्यवाद.
घरात सगळेजण माझ्यावरती याहु वरच्या बातम्या वाचते म्हणुन टिका करतात. पण आपण सकारात्मक / क्युट बातम्या पाहू लागलो की याहू तश्या बातम्या पुरवत रहाते. आणि मला आता निगेटिव्ह बातम्यांकरता अजिबात मेंटल बॅडविड्थ राहीलेली नसल्याने आय थ्राइव्ह ऑन याहु न्युज.
https://www.aljazeera.com
https://www.aljazeera.com/features/longform/2026/6/14/making-history-the...
कोलंबिया पहीला लॅटिन अमेरिकन देश आहे ज्याने FGM म्हणजे female genital mutilation वरती बंदी आणलेली आहे. पहील्यांदा FGM वरती, बंदी आणण्याचा कायदा पास झालेला आहे. कायदा ४४० - "Ninas sin ablacion" or "Girls without mutilation". वैद्यकिय कारणांशशिवाय मुलींचे लैंगिक अवयव पूर्ण अथवा अंशिक काढून टाकण्याची ही प्रथा, मोडीत निघत आहे ही सकारात्मक बातमी आहे. World Health Organisation ने या प्रथेस मानवी अधिकारांचे उल्लंघन म्हटलेले आहे. जगात जवळ जवळ २३० मिलिअन मुली/ स्त्रिया या प्रथेच्या बळी आहेत.
भारताचा माल अनेकदा परत येतो.
भारताचा माल अनेकदा परत येतो. त्यानंतर भारतातली माध्यमे त्या देशांना दोष देतात.
असे खरेच होते ?
पण आपण सकारात्मक / क्युट
पण आपण सकारात्मक / क्युट बातम्या पाहू लागलो की याहू तश्या बातम्या पुरवत रहाते.
आजकाल algorithms च्या जमान्यात सगळे पोर्टल ते करतातच. हल्लीच जिम मेंबरशिप renew केली तसे तो डेटा मोबाईल नावाच्या चावट यंत्राने बोंबलून जगाला सांगितला तसे मला जिम मधे घालावयाचे लंगोट विकणाऱ्या जाहिराती ते "सिग्मा मेन" यूट्यूब शॉर्ट्स सगळे शिस्तीत फीड होऊ लागले, निवांत हिस्ट्री क्लिअर केली, ब्राउजर मधून. तसे परत ओके झाले.