आजच्या इंडियन एक्स्प्रेस मधली बातमी,
https://indianexpress.com/article/sports/cricket/rishabh-pant-fucking-go...
ही बातमी इतरही पेपरांत आहे.
लख नौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने सामना संपल्यावर समालोचक इयन बिशपशी बोलताना एफ वर्ड वापरला. We are a fxxxxxx good team इयन बिशपने त्याबद्दल माफी मागितली. अंबटी रायुडुला त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असताना , त्याने त्या शब्दाबद्दल बोलणे टाळले आणि हो, ही चांगली टीम आहे, असे म्हटले.
रोहित शर्मा भारताचा कर्णधार होता. त्याच्यासारखा शिवराळ खेळाडू दुसरा नाही, असे तो स्वतःच सांगतो. हे स्टंप माइकने प्रेक्षकांपर्यंत पोचतं. एकदा क्षेत्ररक्षणातल्या ढिसाळपणावर तो आपल्याच खेळाडूंना काय म्हणाला त्याची क्लिप गाजली. पण आश्चर्य म्हणजे लोकांनी त्याचं समर्थन केलं.
यावरून मला हरभजन सिंग आणि अँड्र्यु सायमंड्स यांचं मंकीगेट प्रकरण आठवलं. हरभजन सिंगने अँड्यु सायमं ड्सला मंकी म्हटलं. हे रेसिस्ट होतं, असा आक्षेप ऑस्ट्रेलियन संघाने घेतला. हर भजन सिंगला दंड आणि तीन सामन्यां साठी बंदी अशी शिक्षा झाली. भारतीय संघाने त्याविरोधात अपील करून आणि बहिष्काराची धमकी देऊन ती कमी करून घेतली. भारताचं म्हणणं होतं Harbhajan had actually used the Hindi term "teri maa ki" (a common cultural phrase), which sounded like "monkey" to the Australian players. विशेष म्हणजे इथे सचिन तेंडुलकर हरभजन सिंगच्या बाजूने साक्षीदार होता.
म्हणजे रेशल स्लर वापरणं भयंकर वाईट पण आईवरून शिव्या देणं चालतं?
ICC code of conduct मधला एक नियम Article 2.3 covers the use of words commonly known and understood to be offensive, obscene and/or profane (in any language) and which can be heard by the spectators and/or
the viewing public whether by way of the stump-microphone or otherwise. This conduct may include, for example, swearing in frustration at one’s own play or fortune.
इतर देशांचे खेळाडूही असे शब्द वापरत असतील. माझ्या पाहण्यात आणि स्मरणात ही भारतीय खेळाडूंची उदाहरणे आहेत.
सामान्य भारतीयही हे शब्द सर्रास वापरतात ; विशेषतः वयात येणारी आणि तारुण्याच्या भरात असणारी मुलं (यात मुलीही आल्या).
तरीही क्रिकेटपटूंनी असे शब्द सगळ्यांना ऐकू येतील अशा जागी वापरणं आणि ते खपवून घेतलं जाणं खटकतं. क्रिकेटपटू हे अनेकांचे , विशेषतं मुलांचे आदर्श असतात
पब्लिकला ऐकू येणार नाहीत, अशा पद्धतीने वापरले तर तोही ढोंगीपणाच झाला.
याबाबत काही नियम असावेत का? नियम असले तर त्याची अंमलबजावणी होत नाही का?
इंडियन एक्स्प्रेसच्या छापील
इंडियन एक्स्प्रेसच्या छापील आवृत्तीत F word म्हटलंय.
बातमीच्या लिंकमध्ये मात्र तो शब्द स्पष्ट आलाय . कपाळावर हात!
शिव्या देणं न देणं हा ज्याचा
शिव्या देणं न देणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्या पब्लिक फोरमवर ब्रॉडकास्ट करताना प्रोफॅनिटी फिल्टर लावून म्युट करुन तिकडे १००० Hz टोन मात्र टाकलाच पाहिजे. हे पोस्ट प्रोसेसिंग मध्ये कुठल्याही व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये अगदीच सहज शक्य आहे, नीअर रिअल टाईमही आरामात करता येतं आणि केलंच पाहिजे.
हा कंटेंट लहान मुले कन्स्यूम करत आहेत याचं भान खेळाडूंनी ठेवलं तर उत्तमच पण माध्यमे त्याला १००% उत्तरदायी असावी.
मी लाईव्ह पाहिले ते
मी लाईव्ह पाहिले ते प्रेझेंटेशन
We आर fucking good team म्हणाला अचानक आणि मलाही पटकन हायला हे काय बोलला असे झाले.
कारण क्रिकेट खेळताना मैदानावर असले शब्द वापरणे वेगळे पण त्या स्टेजवर नाही. यावर नक्कीच निर्बंध हवेत. तशी कारवाई झाली असेल अशी अपेक्षा. भले मग कडक warning देणे का असेना.. हे चालते असा संदेश नाही गेला पाहिजे असे एक क्रिकेटप्रेमी म्हणून वाटते.
अजून एक गोष्ट मला खटकते ती बाद झाल्यावर बॅट हेल्मेट वगैरे फेकून देणे. नुकतेच विराट कोहलीने असे केले. मी ते लाईव्ह नव्हते पाहिले. एका व्हिडिओत पाहिले. मला आधी फेक किंवा जुने वाटले. पण आताचेच आणि खरे होते. सचिन द्रविड लक्ष्मण कुंबळे अश्या खेळाडूंना खेळताना बघत मोठा झालो आहे त्यामुळे हे खटकतेच. लॉर्डस मध्ये शर्ट काढणाऱ्या आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी अरे म्हटले की कारे करणाऱ्या दादाचा सुद्धा गुरूर आहे. कारण त्यानेही खेळाचा अपमान कधी केल्याचे पाहिले नाही.
भरतजी किस लाईन मी आ गये आप.
भरतजी किस लाईन मी आ गये आप.

उधर देश संकट मे है. उधर चलो.
बोकलत
बोकलत
हे बोकलत सर आहेत का?
हे बोकलत सर आहेत का?
ऋन्मेष, वाईट शब्द स्पष्ट
ऋन्मेष, वाईट शब्द स्पष्ट लिहायची काही गरज नव्हती.
सुनिधी ओके
सुनिधी ओके
माझे मत चुकीचे असू शकेल -
मायबोलीवरील चर्चेत तो लिहिण्यात मला काही वावगे वाटले नाही म्हणून लिहिला. तसाच घाणेरडा संदर्भ असता, किंवा आई बहिणीची शिवी असती तर चर्चेत नसता लिहिला.
माझे इंग्लिश छान नाही. पण मला वाटते हा शब्द slang language मध्ये विशेषण म्हणून वापरला जातो. इथे तसंच वापरला गेला. कोणाला हिणवायला नाही.
१. इंग्रजीत swear like a
१. इंग्रजीत swear like a sailorही म्हणसुद्धा आहे. बोटीवरचे खलाशी फारच शिवराळ असतात.
२.याबद्दलच लिहिणार होतो मी वाचलेले पुस्तकमध्ये. @ . Andie Wear चे The Martian पुस्तक वाचले. त्यातला नायक Mark Watney च्या तोंडी F, D शब्द फार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी स्पेस ट्रावलवरचे चांगले पुस्तक परंतू भाषेने वाट लागली.
३. फुटबॉल पाहणाऱ्यांची गोष्ट सात आठ वर्षांपूर्वी घडलीआहे. एक कानांनी बधीर असणारी बाई / तरुणी घरून टीवीवर फुटबॉल सामना पाहात असताना खेळाडूंच्या तोंडी हालचालींवरून ते काय बोलतात हे ट्विटरवर लगेच टाकायची. सामन्यासाठी बाजूला बसलेले प्रशिक्षकही बोललेले तिने लिहिले होते. शेवटी खात्री केली तेव्हा कळले की हेच बोलणं झालं होतं. [ AI search for " the woman who could guess what the football players are saying" -
The woman often recognized for her ability to "guess" or accurately interpret what football players are saying is Jackie Gonzalez, a viral lip-reader who gained fame on TikTok and YouTube for her high-profile sports breakdowns.Who is Jackie Gonzalez?Jackie Gonzalez is a deaf creator who uses her lifelong skill of lip-reading to translate intense on-field conversations that microphones often miss. She first went viral after interpreting a heated sideline exchange between Travis Kelce and his coach, Andy Reid, during a Kansas City Chiefs game. Her videos often highlight.
Sideline drama: Heated arguments between teammates or coaches.Celebrity interactions: Conversations between players and famous guests (like Taylor Swift) in stadium suites.Emotional outbursts: Capturing raw, unscripted reactions from NFL stars in real-time. ]
( लोकांना ऐकू जाईल असं ते बोलत नव्हते कारण तिथे माइक्रोफोन नसतात तरीही या प्रकरणानंतर तंबी मिळाली होती सर्वांना.)
लोकांना ऐकू जाईल असं ते बोलत
लोकांना ऐकू जाईल असं ते बोलत नव्हते कारण तिथे माइक्रोफोन नसतात तरीही या प्रकरणानंतर तंबी मिळाली होती सर्वांना. >>
माझ्या मते हे चूक आहे त्या बाईचे. लोकांचे खाजगी बोलणे ऐकून ते ट्विटरवर टाकायची काही गरज नाही. पापराझी प्रकाराचा हा अजून एक नमुना झाला.
हो +७८६, खेळाडू मैदानावर
हो +७८६, खेळाडू मैदानावर खेळताना त्याचे लिप सिंक करून किंवा क्रिकेटमध्येही स्टम्प माईक जो खरे तर अचूक निर्णयासाठी बसवला आहे त्यात रेकॉर्ड झालेले आवाज वापरून खेळाडूंची बदनामी करणे हे चुकीचे आणि unethical प्रकार आहे. पण सर्वच लोकांना याची समज नसते.
सर
सर
नाही पटल. आम्ही पैसे देऊन खेळ बघायला येतो. तेव्हा नाचो म्हटले कि नाचायला पाहिजे. पूर्वीच्या ग्लडीएटर सारखे . शिव्या गाळी करायची असेल तर घरी जाऊन खेळा. ICC ने ह्याबद्दल नियम करायला पाहिजेत.
मैदानावर खेळताना तोंडांत
मैदानावर खेळताना तोंडांत शिव्या येत असतील तर ती ज्याची त्याची सवय आणि स्वभाव असतो.
तुम्हाला नाचो म्हटले की नाचणे हवे असेल तर तुम्ही नाटक बघायला जा.
बाकी प्रेस कॉन्फरन्स किंवा ऑफ द फील्ड कुठल्याही मुलाखतीत अपशब्द वापरणे हे चुकीचे म्हणून झाले आहेच.
नाच नाटक तमाशा आणि क्रिकेट
नाच नाटक तमाशा आणि क्रिकेट आता एक सारखे झाले आहेत. ज्यानी चौथरयावर उभे राहून स्वतःची निलामी करून घेतली त्याना कसली प्रायव्हसी. पूर्वी गुलाम असेच विकले जात असत. माणूस धटटा कट्टा हे बघून लोक बोली लावत होते, आता रेकोर्ड बघतात.
मग हुक्का प्याला तर राग का येतो?
<<लोकांचे खाजगी बोलणे ऐकून ते
<<लोकांचे खाजगी बोलणे ऐकून ते ट्विटरवर टाकायची काही गरज नाही.>> सहमत.
----
स्टंप माईकवर ऐकु जात असेल तर शिवराळ भाषा टाळली पाहिजे. ती मग खाजगी रहात नाही.
'शिवराळ भाषा कित्येक जण सर्रास वापरतात, आपापसात चालत असते, त्यात नक्की कुठला शब्द वापरला त्याचा शब्दशः अर्थ कुणी घेत नाही, त्यावरून कुणाला जज करू नये' वगैरे सगळे मान्य आहे. आमच्याही मित्रांच्या ग्रुपमध्येही शिव्या चालतात, कौतुकाने घालतात.
पण सरसकट कुठेही शिव्या वापरण्याचा नॉर्म असु नये.
पुस्तक, शो, नाटक, चित्रपटांमध्ये शिवराळ भाषा वापरली आहे असे नमूद करतात/करता येते त्यानुसार कुणी ते बघायचे की नाही हे ठरवू शकते, मुलांना न्यायचे की नाही ठरवता येते, रेटिंग प्रमाणे त्यांना प्रवेशही नसेल.
खेळा बाबत तसे नाही. या खेळात शिवराळ भाषा ऐकू येऊ शकते बघायचा की नाही तुमचं तुम्ही पहा बुवा करता येत नाही.
या उपर अधिकृतपणे वापरलेल्या माईकवर, इतरांना , ज्या तिसऱ्याला शिव्या देतोय त्याला चालत नसेल तर त्याला ऐकु जाणार नाहीत, कळणार नाही अशा रीतीने कुणी शिव्या देत असेल, आपापसात देत असतील तर तिथे गुप्तहेरगिरी करून ते पब्लिक करणे, तक्रार करणे चुकीचे आहे.
(आणि मूळात शिव्या आई, बहीण, बापावरून वगैरे नसाव्यात असे माझे मत आहे, तो वेगळा विषय होईल, इथे शिव्यांबद्दल लिहिल्याने हे फक्त नमूद करून ठेवतो.)
<<< नाच नाटक तमाशा आणि
<<< नाच नाटक तमाशा आणि क्रिकेट आता एक सारखे झाले आहेत.>>>
तुम्हाला मुद्दा नाही समजला माझा.
नाटक तमाशा पिक्चर हे स्क्रिप्टेड असते. त्यात काय कंटेंट आहे याची आपल्याला आधीच कल्पना असते. त्यानुसार बघायला जायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवू शकता.
पण तेच लाईव्ह खेळाबाबत लागू नाही हा मुद्दा होता.
बाकी नाटक तमाशा करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही विकत घेतले नसते जे तुम्ही सांगणार ते त्यांनी करावे. क्रिकेटर सुद्धा आपल्या आयपीएल संघमालकाचे गुलाम नसतात तर जसे आपण एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबला असतो तसे त्यांचा तो जॉब झाला. आणि मी तरी माझ्या कंपनीचा गुलाम नाहीये.
असो. विषयावर येऊया. क्रिकेट फुटबॉल बाबत खेळाडू प्रेक्षकापासून फार अंतरावर असतात. त्यांचे आपापसात बोलणे तिथे उपस्थित प्रेक्षकांना ऐकू जाणारे नसतेच. त्यामुळे त्यांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य देण्यात काही हरकत नाही.
याउपर कोणी अश्लील हावभाव केले जे लांबून दिसू शकतात तर ते चुकीचे ठरेल आणि अश्यावेळी कारवाई सुद्धा होते. कोणी दुसऱ्यावर चिडून धावून गेला तरी होते. या खेळाला gentleman's game म्हटले जाते त्याची तितकी काळजी घेतली जाते.
Travis Head: Fined 15% of his
Travis Head: Fined 15% of his match fee during an Ashes Test for swearing at himself after missing a delivery, which was caught by stump microphones.
Jason Roy: Fined 15% of his match fee for loudly swearing after dropping a catch in the outfield during a World Cup match.
Jos Buttler & Vernon Philander: Both were fined 15% of their match fees and handed demerit points for heated, profanity-laced exchanges during the 2020 South Africa vs. England Test series.
Dinesh Karthik was reprimanded for breaching the IPL Code of Conduct during a 2022 match against the Lucknow Super Giants. The stump microphone audibly caught him shouting profanities out of frustration after failing to hit a wide delivery, resulting in a Level 1 audible obscenity sanction
Sunrisers Hyderabad all-rounder Abhishek Sharma was fined 25% of his match fee and handed one demerit point by the IPL for using offensive or profane language during a match against Kolkata Knight Riders at Eden Gardens, Kolkata. He admitted to the Level 1 offense under Article 2.3 of the IPL Code of Conduct.
Mumbai Indians batting coach Kieron Pollard has been penalised by the Indian Premier League (IPL) Governing Council over a Level 1 breach of the tournament's Code of Conduct during a recent high-stakes encounter against the Punjab Kings
Andy Flower: The Royal Challengers Bengaluru (RCB) head coach was fined 15% of his match fee during the 2026 IPL for using an audible obscenity following a controversial boundary decision in a match against the Mumbai Indians.
Nitish Rana: The Delhi Capitals batter faced a 25% match fee deduction and received a demerit point for using offensive language during an argument with the fourth umpire
Harbhajan was fined \(\$15,000\) by the IPL match referee during an MI vs. Deccan Chargers match after he pleaded guilty to using "excessively audible or repetitious swearing" against batsman Tirumalsetti Suman.
स्वतःलाच शिव्या दिल्याबद्दल सुद्धा दंड लागला आहे. म्हणजे नियम स्पष्ट आहेत.
अरे वाह.. आहेत की नियम सुद्धा
अरे वाह.. आहेत की नियम सुद्धा.
पण मग लेखात असे का लिहिले की याबाबत काही नियम असावेत का?
आणि आता म्हणत आहात नियम स्पष्ट आहेत
<<<<<
<<<<<
Harbhajan had actually used the Hindi term "teri maa ki" (a common cultural phrase), which sounded like "monkey" to the Australian players. विशेष म्हणजे इथे सचिन तेंडुलकर हरभजन सिंगच्या बाजूने साक्षीदार होता.
म्हणजे रेशल स्लर वापरणं भयंकर वाईट पण आईवरून शिव्या देणं चालतं?
>>>>>
याचा अर्थ तेरे माँ की शिव्या देणे चालते असा नसून रेसिस्ट कॉमेंट असल्यास जी कडक शिक्षा असते ती होऊ नये हा सचिनच्या साक्ष देण्यामागचा हेतू होता.
बाकी सचिनला मी तरी कधी शिव्या देताना पाहिले नाही.
प्लीज त्याला तरी टारगेट करू नका कोणी इथे.
सचिन दादा द्रविड लक्ष्मण कुंबळे हे याबाबतीत माझे आदर्श खेळाडू आहेत.