Submitted by माबो वाचक on 24 March, 2026 - 13:18
मी गुगलच्या नोटबुकLM या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनाचा उपयोग करून एका इंग्रजी पुस्तकाच्या प्रकरणांचा मराठीमध्ये पॉडकास्ट रुपी सारांश तयार केला आहे. तो मी युट्युब वर टाकला आहे. हि त्याची लिंक - https://www.youtube.com/playlist?list=PLa60_X0L5fszO2LotGHWzdCv8vKCArMwN
पुस्तकाचे नाव - द सेल्फिश जीन
लेखक - रिचर्ड डॉकिन्स
हा असा सारांश कसा तयार करायचा याची माहिती पुढीलप्रमाणे -
- गुगलच्या नोटबुकLM (https://notebooklm.google.com) या वेबसाइट वर जावे व नवीन नोटबुक तयार करावी. त्यासाठी “+New Notebook” या बटनावर टिचकी मारा.
- ज्या पुस्तकाचा सारांश हवा आहे ते पुस्तक अपलोड करा. त्यासाठी डावीकडच्या पॅनेल मधील “+Add Source” बटनावर टिचकी मारा.
- आता सारांशाचा ऑडिओ तयार करायचा आहे. त्यासाठी उजवीकडच्या “स्टुडिओ” पॅनल मधील “Audio Overview” चौकटीच्या उजवीकडच्या बाणावर टिचकी मारा. (जर तुम्ही चौकटीवर टिचकी मारली तर संपूर्ण पुस्तकाचा सारांश तयार व्हायला सुरवात होईल.) बाणावर टिचकी मारल्यावर एक Pop-up विंडो उघडेल. त्यात पुढीलप्रमाणे माहिती भरा. आणि “Generate” बटनावर टिचकी मारा.
- Format : Deep Dive
- Language : Marathi
- Length : Default
- Prompt (What should the AI hosts focus on in this episode?) : Explain in detail the chapter "[chapter name]" from the source book "[book name]".
- साधारण ५-१० मिनिटात पॉडकास्ट चा ऑडिओ तयार होतो. तो तिथेच ऐकता येतो व शेअर हि करता येतो.
- युट्युब वर टाकायचे असल्यास हे ऑडिओ डाउनलोड करून त्यांचे विडिओ मध्ये रूपांतर करावे लागते. हि थोडीशी किचकट प्रक्रिया आहे. पण अवांतर असल्याने येथे देत नाही.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोचक !
रोचक !
आवडेल ऐकायला.
मेकिंग बद्दल बाळबोध प्रश्न विचारले तर चालेल ना ?
एव्हढे ए आय टूल्स येताहेत, तर हे कसं ठरवायचं कि कुठल्या कामाला कुठले टूल वापरायचे ?
चॅट जीपीटी आणि ग्रोक माहीत आहेत. ते वापरून का नाही होऊ शकत हे काम ? हे खूप गोंधळात टाकणारं आहे.
मेकिंग बद्दल बाळबोध प्रश्न
मेकिंग बद्दल बाळबोध प्रश्न विचारले तर चालेल ना ? >>> जरूर विचारा, संकोच नसावा.
मी अगदी असेच पॉडकास्ट रुपी सारांश इंग्रजीमध्ये युट्युब वर पाहिले आहेत. मग मराठीत करावे हा विचार आल्यावर चॅट जी पी टी ला विचारले की कसे करायचे. त्याने गुगल नोटबुकLM चा पर्याय सुचवला. हे टूल मी अगोदर पासून वापरत असल्याने मला हे सोपे वाटले. पण आपण म्हणता तसे अजून काही टूल्स वापरूनही हे करता येईल.
कोणतेही रूपांतर डिजिटलसुद्धा
कोणतेही रूपांतर डिजिटलसुद्धा करायचे तर कॉपीराइट परमिशन लागेल ना? साधने वापरून वैयक्तिक वापरासाठी रूपांतर हा भंग करत नाही. पण इतरांना ( फुकट सुद्धा) देणे चालणार नाही. बाकी रूपांतर करण्याची पद्धत लक्षात ठेवली आहे. धन्यवाद.
यूट्यूबवर अपलोड करताना no copywrite issues found" येते. म्हणजे तिथेही चेकिंग होते.
.............
मला वाटलं तुम्ही पुस्तक वाचून स्वतःच मराठीत समीक्षा करून ओडिओ स्वरूपात पॉडकास्टींग केली आहे. ती ऐकायला आवडली असती.
माबो वाचक, जबरदस्त आहे हे.
माबो वाचक, जबरदस्त आहे हे.
लिंक पाहिली. सगळे भाग नक्की ऐकेन आवडता विषय आणि लेखक.
पण असे कोणत्याही पुस्तकाचे डिजिटल रूपांतर /मराठीमध्ये पॉडकास्ट रुपी सारांश करायचे तर कॉपीराइट परमिशन लागेल ना?
Srd, ऋतुराज., प्रतिसादाबद्दल
Srd, ऋतुराज., प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कॉपीराइट बद्दल - मी युट्युब वर पुस्तकांचे सारांश पाहिले होते त्यामुळे कॉपीराइटची समस्या येईल असे वाटले नव्हते. आपल्या प्रतिसादानंतर मी AI ला विचारून पहिले. त्याने हा ग्रे एरिया आहे असे सांगितले.
पहिला भाग आवडला.
पहिला भाग आवडला.
>>ज्या पुस्तकाचा सारांश हवा
>>ज्या पुस्तकाचा सारांश हवा आहे ते पुस्तक अपलोड करा. >> इथेच भंग होतो.
काही लोकांनी पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहिला असेल तर वेगळी गोष्ट आहे.
यूट्यूबवर notebooklm चे काही विडिओ आहेत पण विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी शाळेच्या कसा उपयोग करू शकतात त्याबद्दल आहेत.
>>ज्या पुस्तकाचा सारांश हवा
>>ज्या पुस्तकाचा सारांश हवा आहे ते पुस्तक अपलोड करा. >> इथेच भंग होतो. >>> तर मग नोटबुकLM वापरताच येणार नाही, अगदी वैयक्तिक वारपरासाठी सुद्धा.
पुस्तक अपलोड करा - म्हणजे?
पुस्तक अपलोड करा - म्हणजे?
ते कसं करायचं? मजकूर कॉपी-पेस्ट करायचा?
कुठून कॉपी करायचा?
पायरेटेड मजकूर?
सारांश किंवा समीक्षा केल्यास
सारांश किंवा समीक्षा केल्यास कॉपीराईटचा भंग होत नाही. पण त्यासाठी किती मजकूर घेतला आहे? तो आवश्यक आहे का याबद्दल स्पष्ट असे गाईडलाईन्स दिसले नाहीत. असतीलही.
पूर्वी मी कॉपीराइटबद्दल
पूर्वी मी कॉपीराइटबद्दल थोडीफार सहानुभूती बाळगून होतो, पण नंतर Sci-hub, Alexandra Elbakyan, Aaron Swartz, Open Access आणि Open Knowledge याच्याबद्दल वाचून माझे मत बदलले आहे. मी आता सहर्षपणे Shadow Library चे स्वागत करतो.
मीसुद्धा एका पायरेटेड
मीसुद्धा एका पायरेटेड साइटमधून पुस्तकं डाउनलोड करतो आणि वाचतो. पण दुसऱ्यांना कॉपी पाठवत नाही. त्यांचं ते डाउनलोड करतील.
[ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात डोनेशन आठवडा असतो. पण मला ते करता येत नाही. डॉलर/पौंडमधली रक्कम असते ती आपल्या भारतातल्या युपिआइने कशी पाठवायची माहीत नाही.]
ते जाऊ दे. पण मी ती पुस्तकं (इंग्रजीत असतात) वाचायचा आनंद घेतो. त्यांचे मराठी भाषांतर होण्याची शक्यता नाही कारण ते छापायला प्रकाशक पुढे येणार नाहीत.
मुद्दा १. असा आहे की त्यातले एखादे पुस्तक notebookLM वर अपलोड करून सारांश मिळवता येईल. पण कशाला तो उद्योग? पुस्तक वाचले आहे तर आपणच तीस ओळीत सारांश सहज लिहू शकतोच की. मला पुस्तकांची माहिती थोडक्यात करून द्यायला आवडेल. मग ती वाचून वाचक ठरवतील की हे पुस्तक घ्यायचे का? ती पुस्तके काही अपवाद वगळता अमेझोनवर तीनशे रुपयांच्या आसपास मिळतात. काही ईबुक्स असतात काही खरी पुस्तकं. अनधिकृतरीत्या खरेदी करणारे बरेच असणार पण पुस्तकाची समीक्षा आणि गाभा कळला तर त्यांचे काम सोपे होते. अधिकृतपणे खरेदी करणारे अमेझोनवरच पुस्तकांचा रिव्ह्यू लिहू शकतात.
मुद्दा २ सारांश किंवा थोडक्यात ओळख ही पुस्तकं विकत घेण्यास मार्गदर्शक असते. मूळ पुस्तक त्या लेखकाच्या शैलीतून पुस्तक वाचण्यात आनंद हा असतो.
चर्चेत भाग घेणाऱ्यांचे आभार.
चर्चेत भाग घेणाऱ्यांचे आभार.
पुस्तक अपलोड करा - म्हणजे? >>> तुमच्याकडे असलेल्या पुस्तकाची डिजिटल प्रत अपलोड करायची.
हे सारांश पुस्तक वाचनासाठी पर्याय नसले तरी त्यातल्या महत्वाच्या संकल्पना समजण्यासाठी उपयुक्त ठरतील. माझ्यासारख्या काहींना वैज्ञानिक पुस्तके इंग्रजीतून वाचणे जड जाते. त्यांना हे उपयुक्त ठरू शकेल. तसेच व्हर्टिकल रिडींगसाठी सुद्धा उपयोगी ठरेल. काहींना यातून उत्सुकता निर्माण होऊन ते अधिक माहितीसाठी पुस्तक वाचतील. पुस्तक काही काळापूर्वी वाचले असल्यास त्याच्या रिविजन साठी सुद्धा उपयुक्त ठरेल.
ज्ञान मिळविण्याच्या अनेक मार्गांपैकी हा एक. ज्याचा त्याचा मार्ग वेगळा.
>>माझ्यासारख्या काहींना
>>माझ्यासारख्या काहींना वैज्ञानिक पुस्तके इंग्रजीतून वाचणे जड जाते. >>माबोवाचक.
यासाठी दोन पर्याय आहेत. मी तपासले आहेत आणि वापरतोसुद्धा.
१. तुमच्याकडे पुस्तकांची कॉपी आहेच.[ epub or pdf] ती ईबुक रीडर ॲपमध्ये उघडायची.
-हवा तेवढा मजकूर कॉपी करायचा आणि कोणत्याही translate English to Marathi app मध्ये पेस्ट करायचा. भाषांतर होईल.
-(Google translate च वापरतात ही apps पण Google translateचे वेब वर्जन मोठ्या मजकुरांवर काम करत नाही.
-ही भाषांतर करणारी apps सुरुवातीला 20000 words चेही भाषांतर करतात. नंतर गूगलवाले त्याला जामर लावतात.
-एक हजार शब्दांचेच भाषांतर होते.
-वैज्ञानिक पुस्तकाचं भाषांतर करून पाहिलं नाही अजून.
२. epub or pdf books चे mobi करणारी online services आहेत त्याने mobi file करा.
- ती फाईल android kindle app मध्ये library मध्ये उघडता येईल. यात dictionary असते.
- Pdf file किंडलमध्ये उघडतेच पण डिक्शनरी नसते.
-आता वाचताना एखादा शब्द अडल्यास डिक्शनरी वापरा.
Srd, सुचविल्याबद्दल खूप खूप
Srd, सुचविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दुसरा शब्दकोशाचा पर्याय मी वापरतो किंडल ऍप वर. आणि आतातर फाईल मोबी फॉरमॅट मध्ये रूपांतरित करावी लागत नाही. .epub फाईल सुद्धा किंडलला चालते.
पहिला भाषांतराचा पर्याय कधी वापरला नाही पण प्रयत्न करून पाहीन. पूर्वीचा गुगल भाषांतराचा अनुभव चांगला नाही. आणि हजार हजार शब्द करत बसावे लागेल.
धन्यवाद.
१. epub file kindle घेत असली
१. epub file kindle घेत असली तरी त्यातली dictionary फक्त mobi फाइललाच चालते हा माझा अनुभव.
२. भाषांतर app मधलं भाषांतर चांगलं असतं. मी rich dad poor dad पूर्ण पुस्तक भाषांतर करून पाहिलं.
३. eBoox reader चांगलं आहे.
४. Wordweb dictionary चांगली आहे.
>>> मार्चच्या शेवटच्या
>>> मार्चच्या शेवटच्या आठवड्यात डोनेशन आठवडा असतो. पण मला ते करता येत नाही. डॉलर/पौंडमधली रक्कम असते ती आपल्या भारतातल्या युपिआइने कशी पाठवायची माहीत नाही.]>> क्रेडिट कार्ड किंवा एचडी एफ सी च्या सेव्हिंग्ज मधून फोरेन रेमिटन्स द्वारे पाठवता येते
Srd, टिप्स बद्दल आभार. करून
Srd, टिप्स बद्दल आभार. करून पाहीन.
माहितीबद्दल धन्यवाद रेव्यु.
माहितीबद्दल धन्यवाद रेव्यु.