
काजू कतली
काजू कतली ही सर्वांची आवडती मिठाई आहे त्यामुळे कोणाकडे जाताना खाऊ म्हणून ही बहुतेक वेळ काजू कतलीच नेली जाते. पण जनरली घरी कोणी फार करत नाही, बाजारातूनच विकत घेतली जाते.
आमच्या घरात काजूचा खूप मोठा पॅक कोणीतरी खाऊ म्हणून आणला होता पण घरातले मेंबर फार खात नव्हते म्हणून मी ते काजू वापरून काजू कतली करून बघण्याच ठरवलं. यू ट्यूब वरील अनेक व्हिडिओ मधून थोडं ह्यातलं थोडं त्यातलं घेत रेसिपी फायनल केली. आणि विशेष म्हणजे जास्त काही त्रास न होता विनासायास मस्त झाली म्हणून इथे लिहून ठेवत आहे.
साहित्य
एक वाटी काजूची मोकळी पावडर (पल्स मोडवर केलेली आणि चाळून घेतलेली )
अर्धी वाटी साखर किंवा आवडीनुसार कमी जास्त
पाव वाटी पाणी.
एक चमचा तूप
सजावटीसाठी चांदीचा वर्ख वगैरे ऐच्छिक.
बटर पेपर किंवा थोडं तूप लावून ग्रीस केलेला जाड प्लास्टिक चा कागद
एका पॅन मध्ये साखर घेऊन त्यात पाणी घालून मंद गॅसवर एक तरी पाक करून घ्यावा. त्यात एक चमचा तूप घालावे. नंतर त्यात काजूची पावडर घालून मंद गॅसवर ढवळत राहावे. पाच सात मिनिटे झाली की थोडं मिश्रण चमच्यात घेऊन गार करावे आणि हातावर त्याची बोटाला न चिकटणारी गोळी होतेय का ते पहावे. ती झाली की गॅस बंद करावा.
थोडावेळ पॅन मध्येच ढवळत राहावे, मिश्रण साधारण घट्ट झाले की बटर पेपर वर काढून घेऊन वर दुसरा बटर पेपर ठेवून हाताने ते चांगले मळावे. मिश्रण गरम असल्याने जपून मळावे. चार पाच मिनटात काजू मधलं तेल रिलीज होऊन त्याचा मऊसर गोळा बनतो.
आता लाटण्याने ते गोळा लाटावा , चांदीचा वर्ख लावावा (मी लावला नाहीये ) आणि शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात. वड्या सारख्या कापता याव्यात म्हणून पट्टीचा उपयोग करू शकता.
अर्ध्या एक तासात वड्या तयार होतात. बटर पेपर मुळे अगदी नीट सहज निघतात.
विकत मिळते तशी काजू कतली तयार.
हा फोटो
१) तुकडा काजू ही घेऊ शकता पण मी अख्खेच घेतले होते. ओलसर टॉवेलने पुसून घेऊन मग पंख्याखाली ठेवले होते कोरडे होण्यासाठी.
२) काजूची पूड मोकळी करायची आहे, एका वेळी थोडे काजू मिक्सर च्या भांड्यात घालून पल्स मोड वर फिरवावे म्हणजे तेल बाहेर येणार नाही काजू मधलं आणि पुड मोकळी होईल. तसेच पूड एक सारखी होण्यासाठी ती चाळून घेणं ही आवश्यक आहे.
३) ही मिठाई फार गोड नसते त्यामुळे निम्मी साखर ठीक्क होते, तरी आवडीनुसार साखर घालावी.
४) तो गोळा गरम असताना मळणे ही स्टेप स्किप करू नका. त्याने काजू मधलं तेल रिलीज होतं आणि तिला वडीच texture न येता काजू कतलीचं texture येतं म्हणून.
५) चांदीच्या वर्खाशिवाय काजू कतली च्या सजावटीला पूर्णत्व नाही खरं म्हणजे. पण काहीना वर्ख आवडतो , काही ना नाही. घरी केल्यास लावायचा की नाही आपल्या हातात असतं. आवडत असल्यास लावावा. .
६) मी पहिल्यांदाच करत होते , कशी होईल शंका होती म्हणून वर्ख आणला नव्हता, म्हणून मग केशराच्या दुधाचे दोन थेंब उडवले सजावट म्हणून.
घरी भरपूर काजू आले की करून
घरी भरपूर काजू आले की करून बघेन नक्की.
शर्मिला पहिल्या वहिल्या
शर्मिला पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... बघ करून ,सोपी आहे.
रमाचा दिवा आहे, त्यामुळे
रमाचा दिवा आहे, त्यामुळे नैवेद्यासाठी घरीच बनवली जाते काजूपतली
मस्त दिसत आहेत..
किंमती मध्ये सुद्धा घरी बनवलेली परवडते फार
आणि पॅन खरवडून खाता येतो
सुरेख दिसतेय !
सुरेख दिसतेय !
सुंदर झाली आहे काजू कतली!
सुंदर झाली आहे काजू कतली!
अप्रतिम दिसते आहे काजूकतली!
अप्रतिम दिसते आहे काजूकतली! काजूकातील असं नाव द्यावं!
वा मस्त.. घरी करता येत असेल
वा मस्त.. घरी करता येत असेल तर बघायला हवे.
काजूकतली आमच्याकडे राष्ट्रीय मिठाई आहे. मुले लहानपणापासून सर्वाधिक तीच खात आलीत.
आता मुलाला सुद्धा त्या काजू कतलीची चटक लागली आहे.
मुंबईला आमच्या बिल्डिंगखाली Camey wafers ची एक शाखा आहे. मुलगी लहानपणी रोज फिरायला जाताना तिथे काजूकतली खायची. तिचे खाते चालायचे तिथे. दहापंधरा दिवसांनी एकत्र पैसे द्यायचो
फार मस्त.
फार मस्त.
मस्तच!
मस्तच!
आमच्याकडे पण बीन खारवलेल्या काजूचे मोठे पाकिट संपवायचे आहे. तुम्ही आता हमखास पाकृ दिली आहे तर प्रयोग करुन बघेन.
स्वाती पण खारावलेले म्हणजे
स्वाती पण खारावलेले म्हणजे मीठ असेल ना?
बीन खारवलेल्या असे लिहिले आहे
बीन खारवलेल्या असे लिहिले आहे त्यांनी
धनश्री, खारवलेले काजू काय गं
धनश्री, खारवलेले काजू काय गं आणले की फन्ना, उलट 'हे मुख्य जेवण नाही' म्हणायची वेळ येते.
हे चुकून बीन खारवलेले आलेत.
अच्छा 'बिन
अच्छा 'बिन
मला बीन म्हणजे बीन्सच डोक्यात येते.
मला वाटलेले बीन्स स्वल्पविराम खारावलेले काजू.
स्वल्पविराम राहीला असे काहीसे.
सगळा गोंधळ झाला. सॉरी माबुदो.
कातिल दिसतेय काजूकतली !
कातिल दिसतेय काजूकतली !
छान रेसिपी मनीमोहोर. फोटो तर
छान रेसिपी मनीमोहोर. फोटो तर झकासच.
वाचून सोपी वाटते आहे कृती पण ‘एकतारी पाक’ वाचून ही वाट निसरडी आहे हे लक्षात आले
काजू स्वत:च गोडसर असतात चवीला म्हणून तुमचे साखरेचे प्रमाण परफेक्ट वाटते आहे.
विकतची काजू कतली आता फारशी खात नाही, reason being insane amount of sugar in it. घरी अहो आई पाकाऐवजी पिठीसाखर घालून करतात.
(No subject)
मनीमोहोर ताई, तुमची काजूकतली
मनीमोहोर ताई, तुमची काजूकतली फारच सुबक झाली आहे . मी याच पद्धतीने अनेक वर्षांपासून करते आहे.
कातील कतली. सहीच झालीय
कातील कतली. सहीच झालीय हेमाताई.
मी वैदेही मस्तच झालीय.
मनी मोहोर आणि वैदेही
मनी मोहोर आणि वैदेही दोघींच्याही छान दिसतायत
काजू कतली आमच्याकडेही आवडता पदार्थ आहे.
गेल्या चारेक वर्षांपासून घरी बनवायला लागले.
साधारण अशीच रेसिपी .. निशा madhulika ची आहे.
पण साखर अजून कमी म्हणजे २ कप पूड तर पाऊण कप साखर..
आजकाल दिवाळीला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी / कोणाकडे द्यायला म्हणून २-४ वेळ करते.. कारण केली की लगेचच फास्ट होते.
त्याच एक व्हेरिएशन - रोज कतली... थोडी काजूकंद सारखी लागते.. ती हिट झाली होती मागे.
छान रेसिपी ममो ताई...
छान रेसिपी ममो ताई... daffodil यांची काजू कतली रेसिपी आहे मायबोलीवर ..मी गेले अनेक वर्ष त्या रेसिपी ने करते..अजिबात चुकत नाही..अगदी perfect होते..
ममो तोंडाला पाणी सुटले बघून.
ममो तोंडाला पाणी सुटले बघून. आणि काजुकतली घरी करायला इतकी सोपी पाककृती आहे ही माहिती होतं पण मला वाटायचं की ती फक्त शॉर्ट्स मध्ये बघायची गोष्ट आहे.
फार सुंदर. मला भयंकर आवडला फोटो.
काजूकतली घरी बनवता येते ?
काजूकतली घरी बनवता येते ?
फार भारी फोटो
तुम्ही जरी सोप्प असं लिहिलं असेल तरी इतके सोप्पे नक्कीच नसेल असे वाटतंय
जबरदस्त दिसते आहे. प्लेट पण
जबरदस्त दिसते आहे. प्लेट पण मस्त आहे.
मस्त ! मुलांची फेवरेट! पुपो
मस्त ! मुलांची फेवरेट! पुपो चं टेम्प्टिंग झालं आता हे करून बघावं लागेल.. इतकी खटपट नाहीये सो कधीतरी विकेंडला ट्राय करेन
वॉव काय भारी दिसतेय काजूकतली.
वॉव काय भारी दिसतेय काजूकतली. रेसिपी सोपी वाटतेय (तरी).
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
बघ करून.
पॅन खरवडून खाता येतो Happy >> मी पॅन मध्ये थोडसं दूध घालून ते उकळवते. पॅन विनासायास अगदी स्वच्छ होतं आणि ते दूध ही अप्रतिम लागत. मुलांना फार आवडत असे ती लहान असताना. तू ही करून बघ असं एकदा किल्ली.
मुले लहानपणापासून सर्वाधिक तीच खात आलीत. >बरोबर आहे. मुलांना जनरली फक्त काजू कतली च आवडते.
काजू कातिल>> प्रद्न्या भारी आहे हे..
अनिंद्य, >> पिठी साखर घालून ही होत असेल चांगली तर छानच आहे. पाकाची रिस्क नाही.
मी वैदेही, मस्तच दिसतेय काजू कतली.
मी स्वच्छंदी, रोझ कतली करून बघीन. छान आहे आयडिया.
daffodil यांची काजू कतली रेसिपी आहे मायबोलीवर ..>> केया बघितली आहे मी ही. छान आहे रेसिपी.
पुपो चं टेम्प्टिंग झालं आता हे करून बघावं लागेल. >> अंजली _१२
प्लेट आवडली धन्यवाद ऋतुराज.
काजू कतली त्या मानाने खूप जण घरी करतात हे वाचून छान वाटलं. रेसिपी खूप सोपी आहे. आणि छान होते त्यामुळे थोडी करून बघा असं सांगते जे घरी करत नाहीत त्यांना.
काक मस्तच दिसतायेत , ममो.
काक मस्तच दिसतायेत , ममो.
मला ही मिठाई अजिबातच आवडत नाही. पण सासरी माहेरी सगळ्यांना प्रचंड आवडते.
एकदा प्रयत्न करून बनवेन म्हणते.
किती सुबक!
किती सुबक!
वाचून करून बघायचा मोह झाला, पण किचनमध्ये कमीत कमी वेळ घालवायचा मनोनिग्रह मोडायचा नाहीये मला
छान दिसते आहे काजू कतली.
छान दिसते आहे काजू कतली.
मी माझी बदाम कतली लिहिली आहे तशाच पद्धतीने करते.
ललिता
मस्त दिसतेय काजू कतली..
मस्त दिसतेय काजू कतली..
Pages