
अमुल व्हिपींग क्रीम - २५० मिली
अमुल मिठाई मेट - २०० मिली पॅक
मारी बिस्कीट पुडा - लहान
वितळलेलं बटर - २-३ चमचे
वॅनिला इसेंन्स - ३-४ थेंब

नवीन वर्षाच्या स्वागताला काहीतरी नवीन करायचं होतं.. ही रेसिपी बरेच दिवस करायची होती म्हणुन काल मुहुर्त साधला.
इथे पुण्यात एका अस्सल गोवन फिश थाळी देणार्या हॉटेलात पहिल्यांदा खाल्ली आणि फार आवडली होती. मस्त चटकदार फिश करी खाल्ली की ही रेशमी पोताची सेरादुरा खायलाच हवी..
कृती खरंच...एकदम सोप्पी.....
१. मारी बिस्किटाचा चुरा करुन त्यात पातळ केलेलं बटर मिसळून घ्या.. ज्या भांड्यात सेट करायचे त्याच्या तळाशी या चुर्याचा एक थर द्या आणि चमच्याने दाबुन घ्या. शक्य असेल तर थोडावेळ फ्रीज मधे सेट करायला ठेवा.
२. व्हिपींग क्रीम एका उभंट पातेल्यात इलेक्ट्रीक बीटर ने फेटुन घ्या.. सॉफ्ट पीक्स आले पाहिजेत...
३. नंतर त्यात मिल्कमेड्/मिठाई मेट, वॅनिला इसेंन्स घालुन घ्या आणी अलगद मिक्स करा.. काही रेसिपी मधे या स्टेप नंतर फेटु नका असे सांगितले होते पण आम्हाला जरा पातळ झाल्यासारखे वाटले सो परत फेटले आम्ही....मस्त रेशमी पोत आला असेल.. गोडवा बघा, कमी वाटला तर एखादा चमचा पिठीसाखर घालु शकता. पण हे जरा अगोड च असतं..
४. आता काचेचा बाउल, किंवा थेट सर्विंग बाउल मधे अर्ध्यापर्यंत फेटलेलं मिश्रण भरा.. मग परत मारी चा चुरा टाका.. वरती परत क्रीम चा लेयर. एकाच मोठ्या काचेच्या बाउल मधे हे सेट केलं तरी चालेल. मी लहान सर्विंग बाउल वापरले.
५. आता ३-४ तास फ्रीज मधे ( फ्रीजर नाही ) सेट करायला ठेवुन द्या.
कोणत्याही तिखटाच्या जेवणावर हे जन्नत लागतं.. रेशमी पोत अक्षरशः तोंडात विरघळतो...
खुप घट्ट सेट झालं नाही आणि थोडं पातळ राहिलं तरी छानच लागतं त्यामुळे रेसिपी चुकली असं म्हणु शकत नाही 
मस्तच दिसतंय आणि लागत ही छानच
मस्तच दिसतंय आणि लागत ही छानच असेल.
हे करून बघेन. सोप्पं वाटतंय.
हे करून बघेन. सोप्पं वाटतंय.
मस्त!
मस्त!
मस्तच आणि सोपी आहे की रेसिपी!
मस्तच आणि सोपी आहे की रेसिपी!
फोटो कातिल!
मस्त.
मस्त.
फोटो खूप सुंदर आहे सेरदुराचा आणि बाउलही, क्रॉकरी वर जाऊद्या.
फोटो फारच सुंदर आहे. छान
पुण्यात अस्सल गोवन फिश थाळी
पुण्यात अस्सल गोवन फिश थाळी देणार्या हॉटेलाचे नाव पण सांगा ना please
पुण्यात अस्सल गोवन फिश थाळी
पुण्यात अस्सल गोवन फिश थाळी देणार्या हॉटेलाचे नाव पण सांगा ना please
मस्त सुटसुटीत आहे रेसिपी.
मस्त सुटसुटीत आहे रेसिपी.
बोल, मांडणी आवडली.
छान! सोपी आणि सुटसुटीत रेसिपी
छान! सोपी आणि सुटसुटीत रेसिपी...
फोटो पण मस्तच 👍
छान दिसत आहे. लहान मुलांना
छान दिसत आहे. लहान मुलांना आवडेल आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहे.
फक्त सारभात आणि मासे खाल्ल्यावर कुठलेही आणि किंचितही गोडसर चवीचे डेझर्ट मी खाऊ शकत नसल्याने त्या कॉम्बिनेशनला तेवढे पास
छान दिसतेयं पाककृती. अगदी
छान दिसतेयं पाककृती. अगदी सोपी आणि अगदी देखणी!!
सर्वांना मनापासुन धन्यवाद.
सर्वांना मनापासुन धन्यवाद. बरेच दिवसांनी काहीतरी लिहिलं माबोवर.. छान वाटतंय...
पुण्यात अस्सल गोवन फिश थाळी देणार्या हॉटेलाचे नाव पण सांगा ना >> वेर्णेकर म्हणुन आहे कर्वेनगरात.. माझं फार आवडतं आहे..
फक्त सारभात आणि मासे खाल्ल्यावर कुठलेही आणि किंचितही गोडसर चवीचे डेझर्ट मी खाऊ शकत नसल्याने त्या कॉम्बिनेशनला तेवढे पास >> काहीही तिखट खाल्लं की शेवटी एक गोडाचा घास खाल्ल्याशिवाय चैन न पडणार्या माझ्यासारख्या लोकांसाठी हे मस्त काँबिनेशन आहे म्हणून तसा उल्लेख केला ... आणि पहिल्यांदा हे वेर्णेकरांकडे फिश थाळी नंतर खाल्लं होतं.. सो आता फिश थाळी खाल्ली की याची आठवण येतेच.. किंवा हे खाल्लं की मासे खायची
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
मारी बिस्कीट ह्या फॉर्म मध्येच चांगले लागत असेल
एरवी आवडत नाही.