अॅब्सोल्युट असं काही नाही. मानवी बुद्धीमत्ता अंतिम नाही असं वाटू लागणार्या काही घटना घडल्या कि आपण आपल्या मान्यतांबद्दल साशंक होऊ लागतो.
राजकीय मान्यता असलेले लोकही काही घटनांबाबत चिडीचूप राहतात. कारण आपल्याला सोयीच्या अशाच घटनांचा ते आपल्या मान्यतांसाठी स्विकार करून बसलेले असतात. सोयीच्या आकलनाला कवटाळून बसलेले असतात. त्यावर वादविवाद करत राहतात. पण निसरड्या रेषेवर पोहोचताच भांबावून जातात. इथे आपल्या मान्यतांबाबत अधिक सजग होऊन नव्या गोष्टी स्विकारण्याची मानसिक तयारी दिसत नाही.
आता राजकीय विषयाच्या पलिकडे जायचे आहे.
आस्तिक आणि नास्तिक हा वाद आजचा नाही. खूप प्राचीन आहे. असे म्हणतात कि चार्वक हा आजवरचा सर्वात रॅशनल नास्तिक होता. चार्वाकाचा नास्तिकवाद आजच्या जगाला झेपणारा नाही. इतिहासातून चार्वाकाचे अस्तित्वच मिटवण्यात आले. जर चार्वाकाचे तत्वज्ञान जपून ठेवले असते तर आस्तिक विरूद्ध नास्तिक वादाला वेगळीच किनार लाभली असती.
ईश्वरावर श्रद्धा म्हणजे आस्तिकवाद. यात माणूस जास्त विचार करत नाही. अनेक गूढ वाटणार्या गोष्टी तो ईश्वर किंवा अशा शक्तीवर सोडतो जी त्याच्या मते जगाचे नियंत्रण करते. काही लोकांचा पिंड मात्र गूढ गोष्टींचा वेध घेण्याचा असतो. असा वेध घेता घेता ते एका अशा स्टेजला येऊन पोहोचतात कि जेव्हढे ज्ञान मिळवले त्यावरून असे वाटते कि शास्त्राचे हे नियम कुणी ठरवले ? ज्ञान मिळवता मिळवता ते सूर्य तारे, ग्रह, आकाशगंगा पासून ते या सर्व ब्रह्मांडाच्या परस्पर संबंधा बद्दल विचार करताना एव्हढे नियम कसे बनले याबद्दल विचार करू लागतात. आणि एव्हढ्या अफाट ब्रह्मांडात जीवसृष्टी असलेल्या पृथ्वीबद्दल आश्चर्य व्यक्त करू लागतात.
इथे ते एका निसरड्या रेषेवर येऊन ठेपतात. जिथे ते नास्तिक असण्यापासून आस्तिकतेकडे प्रवास करतात. ही निसरडी लाईन आस्तिकाच्या आयुष्यात येते तेव्हां तो नास्तिक बनण्याकडे वाटचाल करू लागतो. किती तरी उदाहरणे आहेत. कट्टर आस्तिकाच्या आयुष्यात सुद्धा देवावरचा विश्वास डळमळीत होण्याचे अनेक प्रसंग येतात. तुमच्याही आले असतील.
निसरडी लाईन ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. इथे आपण या बाजूला किंवा त्या बाजूला घसरण्याची दाट शक्यता असते. आपल्या मान्यता अपुर्या वाटू लागतात.
रात्रभर रंगलेल्या एका वादात एका विद्वान संन्याशाने असेच विचारात पाडले. हा संन्यासी अभ्यासू होता. त्याला विज्ञानाची सुद्धा चांगलीच जाणकारी होती. संन्यास घेण्यापूर्वी तो फिजिक्स शिकवत होता. त्याला तत्वज्ञानाच्या विविध शाखांची इत्थंभूत माहिती होती. आचार्य रजनीश कोळून पिलेला व्यक्ती होता. पाश्चात्य तत्वज्ञान सुद्धा चांगले आत्मसात केलेले होते. बुद्ध तोंडपाठ होता. मात्र तो आस्तिक होता. इस्लाम बद्दल त्याला प्रचंड माहिती होती. बायबल मुखोद्गत होते.
त्याने आम्हा लोकांचा एकंदर अदमास घेत आमच्या अनेक गोष्टींना मान्यता दिली आणि शेवटी त्याच्याकडचं एक अस्त्र काढलं.
त्याने विचारलं कि स्त्री आणि पुरूष एकमेकांकडे आकर्षित का होतात ?
याला हार्मोन्स असे उत्तर दिले. त्याने ते मान्य केले.
पुढचा प्रश्न तुम्ही पुरूष आहात. शूर आहात. तुमच्या पुढ्यात एखादी पुरूषी स्त्री आली तर तुम्हाला आकर्षण वाटते का ? अशी स्त्री जी शारीरीक ताकदीने तुम्हाला हरवू शकते. जिच्यात स्त्रैण लक्षणे कमी आहेत. जिचा चेहरा पुरूषी आहे. तर तिच्याबद्दल तुम्हाला आकर्षण वाटेल का ?
या प्रश्नाला कुणीच उत्तर दिले नाही.
( आपल्या मान्यता कवटाळून बसलेल्या पुरूषी मेंदूला असा वेगळा विचार करण्याची सवयच नाही. पुरूषी अहंकार हा जास्त रिजिड असतो).
आता स्त्रियांना त्याने प्रश्न विचारला कि तुम्ही एका टापूवर आहात जिथे कोणताही पुरूष नजरेला पडत नाही. तिथे असा एक पुरूष तुम्हाला भेटला ज्याच्यात पुरूषी लक्षणे कमी आहेत. स्त्रैण लक्षणे जास्त आहेत. जो दिसायला बायकी आहे. त्याच्या बाबत तुमच्या मनात आकर्षण उत्पन्न होईल का ?
स्त्रियांनी याला नाही असे थेट उत्तर दिले. ( स्त्रिया पुरुषांप्रमाणे गप्प बसल्या नाहीत. त्या अशा सिचुएशनला सहज सामोर्या जाऊ शकतात).
नुकतेच आमीर खानबद्दल कुठल्या तरी एका अभिनेत्रीने अशाच पद्धतीचे वक्तव्य केले होते.
आता संन्याशाने विचारले कि एखादी क्रिया घडवून आणायला तुम्हाला संगणकाला कमांड द्यावी लागते. त्यासाठी कीबोर्ड, माऊस, टचस्क्रीन किंवा आवाज यांचा वापर केला जातो तेव्हां एखादी क्रिया घडते. त्याचा आउटपुट स्क्रीनवर किंवा प्रिंटरद्वारे मिळतो. किंवा वेगळे काही कार्य घडून येते.
पण सुंदर स्त्रीला मर्दानी पुरूष दिसल्यावर तिच्यात आकर्षणाची भावना उत्पन्न होणे किंवा राकट पुरूषाला नाजूक, सुंदर स्त्री दिसल्यावर आकर्षण वाटणे हे कसे होते ? नुसतेच एव्हढे नाही तर स्त्री किंवा पुरूष जर स्त्रैण किंवा पुरूषी असल्याने ती भावना उत्पन्न न होणे हे कसे होते ? यासाठी कोणतीही कमांड दिली जाता नाही. फक्त बघण्याने एव्हढ्या क्रिया घडतात. हे कसे होते ?
हार्मोन्स मुळे ?
पण हार्मोन्सला विरूद्ध लिंगी आकर्षण समजते, तर कोणत्याही स्त्री ला कोणत्याही पुरूषाला बद्दल आकर्षण वाटायला हवे. किंवा कोणत्याही पुरूषाला कोणत्याही स्त्री बद्दल आकर्षण वाटायला हवे. तसे होत नाही.
संगणकाला सुद्धा कुणीतरी प्रोग्राम लिहीतो. मग एव्हढा क्लिष्ट प्रोग्राम कुणी तरी लिहीलाच असेल ना ?
एव्हढ्या अफाट ब्रह्मांडात एका पृथ्वी नावाच्या ठिपक्यावर लाखो प्राणी, पक्षी यांच्या जोडीने मानवामधेही असा प्रोग्राम असणे हे कशाचे निदर्शक आहे ?
संन्याशाने आम्हाला आग्रह केला नाही. पण या निसरड्या लाईनवर आपल्या मान्यतांना सोडणे जिवावर आले कारण इथे घसरलो तर आस्तिकवादाकडे घरंगळले जाऊ असे वाटले. माहितीचा अभाव आहे कि रिजिड मान्यता ?
काय वाटते ?
सोपे आहे.
सोपे आहे.
ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे कि नाही माहीत नाही. पण चर्चांचा नियंत्रक हातातून निसटला तर तुमच्या मान्यतांप्रमाणे असेल तर विद्वान नाही तर ड्युआयडी.
बाजूचा असेल तर विद्वान व्यक्ती. बाजूचा नसेल तर यूनोव्हू किंवा धूमकेतू.
कदाचित इथे आपण वेगवेगळ्या
कदाचित इथे आपण वेगवेगळ्या मान्यता एकाच वेळी वापरतोय असं वाटतं.
हार्मोन्स शरीराच्या कार्यात आपापली भूमिका बजावतात, पण माणसाचं अनुभवविश्व, अर्थ लावण्याची पद्धत आणि श्रद्धा यांचा पसारा तिथेच संपतो असं नाही.
त्यामुळे हा विषय एकाच उत्तरात बांधून ठेवण्यापेक्षा, वेगवेगळ्या दृष्टीकोनातून शांतपणे समजून घेता येईल का, एवढाच विचार मनात येतो. शेवटी आपण नास्तिक असलो तरी आस्तिक सुद्धा आपल्या जागी योग्यच आहेत आणि आस्तिक असलो तरी नास्तिकही आपल्या जागी योग्यच आहेत. दोन्हीही बैलगाडीची दोन चाकं आहेत ज्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत.
माझाच प्रतिसाद मला आवडला.
माझाच प्रतिसाद मला आवडला. पुन्हा पुन्हा वाचला.
कृपया गंभीर चर्चा व्हावी.
कृपया गंभीर चर्चा व्हावी. माझे म्हणणे चूक आहे हे ऐकायला आवडेल, पण गांभीर्य घालवू नये ही विनंती.
लल्लनटॉप ने जावेद अख्तर आणि एक मौलाना यांच्या मधे सुंदर चर्चा घडवून आणली. पहिल्यांदाच एखादा आस्तिक मुद्देसूद बोलला.
नास्तिकांचे जे ठरलेले युक्तीवाद असतात त्याला त्याने सायन्स आणि तत्त्वज्ञान दोन्हीही पातळ्यांवर काउण्टर केले.
पण एकंदरीतच सायन्सचा आधार घेऊन देव आहे हे सिद्ध करणे चालले होते, तर हे सायन्स आस्तिकांना का नाही आधी सिद्ध करता आले हा प्रश्न जावेद विचारताना दिसले नाहीत. नक्की बघा. मेंदूला खाद्य आहे.
छान उहापोह!
छान उहापोह!
लल्लनटॉपची मुलाखत ऐकली नाही पण हे खरंच घडते,हे मान्य
जिथे ते नास्तिक असण्यापासून आस्तिकतेकडे प्रवास करतात. ही निसरडी लाईन आस्तिकाच्या आयुष्यात येते तेव्हां तो नास्तिक बनण्याकडे वाटचाल करू लागतो. किती तरी उदाहरणे आहेत.
आतापुढचा टप्पा नीटसा माहिती नाही.खरोखर विचार करण्यासारखे आहे.पण प्रॅक्टिकली जगायचे ठरवल्यास आपल्या सोसलं तेवढंच याबाबत विचार करावा या निष्कर्षाप्रत पोहचले आहे
धन्यवाद भक्तीजी.
धन्यवाद भक्तीजी.