धुरंधर चा धुरळा ! जाळ अन धूर संगटच

Submitted by एक लेखक on 10 December, 2025 - 02:37

हा पिक्चर आल्यापासून इंटरनेटवर अक्षय खन्ना आणि त्याचा रेहमान डकैत छा गया है.
अक्षय खन्नाबद्दलचे एव्हढे लेख होतकरूंनी लिहीले आहेत कि लेखक समुदायाचा विस्तार झाल्याचा सुखद अभिमान वाटू लागला आहे. अनुभवावरून सांगतो कि लेखक हा वाचक असेलच असं नाही. वाचक होण्यासाठी लेखकाला कष्ट घ्यावे लागतात. त्याच्याकडे एक शक्ती असते ज्यामुळे वाचन करून लिहीणे अशा फुटकळ आणि सामान्य पद्धतींना फाट्यावर मारून तो लेखक बनू शकतो.

अक्षय खन्ना एव्हढा गुणी होता हे माहीत असणारे लोक आता भारतात एव्हढे आहेत कि त्यांनी तिकीटं काढली तरी कुठलाही सिनेमा हिट होईल. पण या मंडळींनी गरज होती तेव्हां अक्षयला उचलून धरले नाही. केस गळाले म्हणून अभिनयाला नाकारतात का कुणी ? कन्नड अभिनेता राजकुमार किंवा मग रजनीकांतचे फॅन्स बरे.

अक्षय खन्ना ही पब्लिसिटी डिजर्व करतो. त्याला असे रोल्स सूट करतात. तो मूडी, वैचारिक वाटत आला आहे. त्याचे जे जे सिनेमे गाजले त्यात त्याचे रोल्स वाईट लिहीले गेले होते. त्यामुळं महफिल कोई और लूट गया. जसे ताल मधे ऐश्वर्या राय हीच केंद्रस्थानी होती, पण अनिल कपूरचा रोल गोविंदाला डोळ्यापुढं ठेवून लिहीलेला असल्याने दामिनीच्या सनी प्रमाणे त्याने भाव खाल्ला. अक्षयच्या हाती भोपळा आला. दिल चाहता है मधलं त्याचं पात्र हे काळाच्या पुढचं असल्याने लोकांना अपील झालं नाही. शिवाय त्यात तो व्हुईमजिकल वाटला. ऐतबार मधे तो खलनायकी शेड मधे होता. पण एक आहे त्याच्या अभिनयाबद्दल कधीच शंका घेता आली नाही.

आताच्या रणवीर सिंगला अ‍ॅक्टर म्हणणं हे जीव देण्यासारखं आहे. एका धनाढ्य बिल्डरचा नायकेच्छु असलेला मुलगा ज्याने मीडीयाला हाताशी धरून आपली इमेज दिल्लीतला स्ट्रगलर मुलगा अशी बनवली. त्याने कुठल्यातरी निर्मात्याला फायनान्स करून स्वतःला लाँच केले असे बोलले जाते. त्याचा एकूणच वावर छिछोरा आहे. आवाज बंदर छाप. पद्मावत मधे त्याने खलभूमिका स्विकारली. गेट अप कपूर बनला. त्याचा अभिनय ग्रेट अजिबात नाही. उलट फारच ड्रामेबाज वाटला. मग त्याने कॉमेडी केली. पण कुठेच तो सहज वाटत नाही. एनर्जी म्हणाल तर त्यासाठी कुणी सुपरस्टार बनत नाही. ती तर सिद्धार्थ जाधवकडे पण आहे.

म्हणूनच खर्‍या अभिनयाशी टक्कर झाली तेव्हां रिझल्ट समोर आहे. अक्षय खन्नाचं कॅरेक्टर अप्रिय आहे, भीतीदायक आहे. पण या गड्याचा अभिनय असा कि तो पडद्यावर नसतानाही त्याची दहशत जाणवते. गेल्या काही वर्षात अभिनयाला नसलेले महत्व अक्षय खन्नाने पुन्हा स्थापित केले त्याबद्दल तर धुरंदर पाहिलाच पाहीजे.

लेखकांनंतर आला या सिनेमाच्या कथेबद्दल बोलणार्‍या युट्यूबर्सचा डाव. आतापर्यंत कराचीतल्या लियारा भागाबद्दल सर्वांनाच माहिती झालं असेल. पाकिस्तानी पत्रकारांनीही "हो मी राहिलोय लियारा सिटीत. मी पाहिलाय रेहमान डकैत आणि अन्य गुंडांचे गँगवॉर". रेहमान डकैतचे तातश्री सुद्धा गुंडच होते. राजकीय आश्रयाने त्यांनी जनतेला धाकात ठेवले होते. जेव्हां अती झालं तेव्हां आरडाओरडा सुरू झाला. मग याच सत्ताधार्‍यांनी त्यांचा एन्काउंटर केला आणि त्यांच्या आदरणिय पुत्राला गादीवर बसवले.

हळू हळू हा स्पाय मूव्ही आहे आणि यश चोप्राच्या स्पाय युनिवर्सने आणि मेडॉकफिल्म्स वाल्यांनी यांच्याकडून शिकण्याची गरज आहे असे सल्ले देणार्‍यांचीही भर पडली. पिक्चर तर अक्षय खन्नाने खाल्ला आहे यावर सर्वांचे एकमत झालेले आहे.

प्रकरण पद्धतीने मांडणी असल्याने गुरूनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकर यांच्या डिटेक्टिव्ह कथांप्रमाणे स्टोरी अनफोल्ड होत असावी. उलगडत म्हटले असते पण मग काही तरी भारी लिहीलेय असा फील आला नसता. पाकिस्तानातल्या या गँग्जना असणारे राजकीय पक्षांचे पाठबळ आणि त्यांचे निवडणुका जिंकणे हे कुठेतरी भारतावरच्या हल्ल्यांशी कनेक्टेड आहे एव्हढी तर स्टोरी आतापर्यंत समजलीच आहे. संजय दत्त भ्रष्ट पोलीस आहे.
तर इंडीयन जेम्स बॉण्डच्या भूमिकेत आर माधवन आहे. तोच असली नायक आहे असेही लोक सांगत आहेत.

आता धुरंधरला उजवे विरूद्ध डावे असे युद्धाचे स्वरूप आले आहे. जालावर प्रचंड धुरळा उडाला आहे. पाकिस्तानची जळाली पासूनच लिबर्ल्सची जळाली असेही वाचायला मिळते आहे. अर्थात जेव्हढे सभ्य आहे तेव्हढेच इथे लिहीले आहे. बाकी वाचक सूज्ञ आहे.

धुरंधर पाहिलेला नाही म्हणजे तो पाकिस्तानप्रेमी असेही म्हटले जात आहे. मी अद्याप पाहिलेला नाही. हा कलंक धुवून टाकण्यासाठी मला ताबडतोब हा पिक्चर पाहिला पाहीजे पण कॉर्पोरेटसनी घाऊक तिकीटे बुक केल्याने सामान्यांना तिकीटे मिळत नाही अशी खोचक प्रतिक्रियाही वाचायला मिळाली आहे. तर याचा पार्ट टू दलिंदर नावाने येत आहे असेही वाचनात आले आहे.

धुरंधर पहायचा कि नाही, तो चांगला आहे कि नाही यावरून शाब्दीक रणकंदन करण्यापेक्षा लोकांनी मैदानात जमावे आणि हातातल्या हॉकीस्टिक्स, कोयते, तलवारी, गावठी कट्टे या चर्चेच्या अयुधांनी काय तो सोक्षमोक्ष लावावा असे लोकांस्नी नम्र आवाहन आहे.

काही राहिले असेल तर FA9LA गाणे. आज हे गाणं सर्वत्र वाजतेय. यातलं नऊ हे अक्षर हिब्रू मधे स च्या उच्चाराच्या ठिकाणी वापरले आहे. फासला हे ते गाणं आहे. याची तुलना जमाल कुडूशी केली जात आहे. योगायोगाने हे गाणं गेल्या पाच डिसेंबरला आलेलं तर या वर्षीही पाच डिसेंबरलाच फासला आलं.

या गाण्यातली कोरिओग्राफी स्वतः अक्षय खन्नाची आहे. इंट्रोवर्ट असलेला, अंडरप्ले करत असलेला खलनायक अचानक उठून नाचू लागतो, याने त्या ़कॅरेक्टरची अनप्रेडिक्टिबिलिटी वाढले हा विचार अक्षय खन्ना करून आदित्य धरला याबद्दल विचारले. त्यानेही पूर्ण परवानगी दिली. आज या गाण्याचा फायदा निर्मात्याला झाला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षय खन्ना बेस्टच ! पाहिला तर त्याच्या साठीच.
मनोज वाजपेयी आणि अक्षय खन्ना अशक्त दिसू लागलेत. दीक्षित डाएट करतात का ?

धुराळा कि धुरळा ?

मला रणवीर प्रचंड आवडला, स्वॅग !
त्याचे डोळे कातिल.. भेदक, नजर त्याच्याच वर खिळून राहिल इतका !
अक्शयही आवडलाच पण रणवीरपेक्षा नाही Happy
अक्षयची अंगकाठी किरकोळ आहे, स्वतः मारामारी करायचे सीन्स त्याला शोभले नाहीयेत .
देसी पब्लिकचे बाकी बॉलिवुडप्रेम इमोशनल फुल कॅटॅगरीतले आहे.. रहमान डकैतला हिरो बनवून टाकलय Proud
संजय दत्त डोळ्यात खुपत होता , त्याच्या ऐवजी लॉर्ड बॉबी देओल असता तर २-२ व्हायरल व्हिलन्स एकत्रं आले असते !

मला रणवीर प्रचंड आवडला, स्वॅग !
त्याचे डोळे कातिल.. भेदक, नजर त्याच्याच वर खिळून राहिल इतका !>>+1
रणवीर चा सुरुवातीचा पार्टीतला गोळी मारण्याचा सीन, त्यामध्ये जे त्याचे केस उडतात 😍 एकदम धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आठवतो .एकदम भारी. अक्षय जरी भाव खाऊन गेला असला तरी रणवीर चा हा बेस्ट रोल आणि परफॉर्मन्स आहे लुटेरा नंतर .आधी मलाही वाटलं उगाच लेन्स लावलेत पण स्टोरी आणि रोल साठी परफेक्ट आहे .ती भेदक नजर ,शेवटच्या सीन मध्ये लक्षात राहतात ते फक्त डोळे.

बाकी देसी पब्लिक सेम इथेही...रहमान डकैतला हिरो बनवून टाकलय Proud

पाहिला धुरंदर!

माधवनचे पहिले सीन बघताना जाणवते की आज कुछ अलग देखणे जा रहे है..
पण पुढे म्हटले तर स्टोरी लाईन नेहमीची आहे.
पण सादरीकरण भन्नाट आहे.
आणि बॅकग्राऊंड स्कोअर त्याहून भारी!
बरेचदा नाईनटीज किड नॉस्टॅल्जिया जागवणारे म्युझिक आहे ते सुद्धा फार आवडले.

रणवीर सिंग जबरदस्त!
बोडी लँग्वेज नेहमी भारी असते या माणसाची. ८३ मध्ये कपिल वाटला होता. इथेही अगदी वाटतो त्यांच्यातलाच एक बलोच..

अक्षय खन्ना खरेच डोक्यात अडकून राहतो. तो आणि रणवीर दोघे एकाच सीनमध्ये असतात तेव्हा आपली नजर अक्षय खन्नावर जास्त अडकून राहते.

संजय दत्तसाठी हा रोल म्हणजे भाई अपना ये रोज का काम है होते. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचा प्रश्नच नाही.

राकेश बेदी खरेच सरप्राइज पॅकेज म्हणून येतो.

हिरोईन दिसायला छान होती. एवढ्या रावडी अल्फा मेल मध्ये एखादा फ्रेश चेहरा बघणे बरे वाटते.

शिव्यांना का एखाद शब्द गाळून दाखवत होते आमच्या थिएटरमध्ये हे समजले नाही. अलाऊड नाहीये का?

अरे हो.. खून खराब हिंसाचार रक्तपात वगैरे ओके आहे. अती नाही वाटले. दहशतवादी मानसिकता दाखवायला इतके तरी दाखवणे गरजेचे होते.

रहमान डकैतला हिरो बनवून टाकलय
>>>>>>

चित्रपटात त्याला विल्हन म्हणूनच बघतात.
ऑफ स्क्रीन हिरो बनवला आहे त्याच्या अदाकारीचे कौतुक करून. उलट हे तर प्रगल्भ प्रेक्षकाचे लक्षण आहे.

Are you sure Shah Rukh Khan is not in this?
शाखा आणि रणवीरचा पी आर कॉमन आहे का ? एस आर के नसताना एव्हढं भरभरून ते पण दोन दोन ठिकाणी कसं काय लिहवलं ?
या आयडीनेच दे उत्तर ऋन्म्या.