आपल्या इच्छांवर नियंत्रण कोणाचं?

Submitted by केअशु on 27 November, 2025 - 20:23
इच्छा

जास्त काही लिहिण्याच्या पद्धत पडत नाही कारण मुळातच माहिती हवी आहे म्हणून विचारतो आहे आता वरील कोड जो आहे तो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाचा आहे त्यामुळे त्याला तोतांड म्हणून वगैरे चुकीचे आहे आणि तसेच असेल तर मग खरंच आपल्या मनात तुझ्या इच्छा निर्माण होतात त्यांचा उगम कुठे असतो कुठे असतो म्हणून यापेक्षाही त्यांवर नियंत्रण कोणाचा असतो कोण ह्या इच्छा आपल्या मनात आणतो आणि आपल्या आकाश शरीर त्याप्रमाणे त्यामागे काम करण्यासाठी झटत राहत?

Group content visibility: 
Use group defaults

आपल्याला फ्रीविल म्हणजे 'फ्रीडम ऑफ विल' आहे की नाही, यावर शास्त्रज्ञ, दर्शनशास्त्री आणि तत्त्वज्ञ यांत मोठ्या चर्चा आणि वाद घडले आहेत.

आपला कर्म सिद्धांत नीट विचारात घेतला तर या फ्रीविल'चं काय करायचं हा प्रश्नच आहे. कारण या जन्मी तुम्ही जे करताय (आणि भोगताय) हे गेल्या जन्मीचं फळ आहे. गेल्या जन्मी केलेल्या कर्मानुसार तुम्हाला शिक्षा आता होणार म्हणल्यावर या जन्मात तुम्ही कसं वागणार हे फिक्स झालं. आता या जन्मात तुम्ही काय करताय यावर पुढचा जन्म ठरणार म्हणल्यावर पुढल्या जन्मी तुम्हाला काय फ्रीविल असणार हे स्पष्टच आहे.

आता हे फार ढोबळ आहे, आणि कर्मसिद्धांताचा अभ्यास असणारे यावर आक्षेप घेऊन अधिक स्पष्ट लिहू शकतील, त्यांनी ते इथं लिहावं. पण तेही ठीक.

क्वांटम फिजिक्स, स्पेस आणि टाईम ची कल्पना- यांचा विचार केला तरीही आपल्याला फ्रीविल आहे की नाही, अशी गंभीर शंका येते. अनेक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या मते 'काळ' ही संकल्पना बाहेर नसून तुमच्या आत आहे. आता काळ तुमच्या 'आत' असेल तर तुमचा भुतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ इथंच तुमच्यासोबत, तुमच्या आत आहे, आणि अर्थातच ठरलेलाही आहे (लिहून ठेवला आहे), तर मग कुठच्याही काळातल्या इच्छेच्या स्वातंत्र्याचं काय?

आणखी एक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, एआय वगैरेंच्या दृष्टीने बघायला हरकत नाही. तुमच्या हेल्थ, पायनांस, अकाऊंट्स, ऑफिस मॅनेजमेंट या आणि अशा सार्‍यांसाठी एआय ची टूल्स आली आहेत किंवा येऊ घातली आहेत, अंगावर काटा येईल इतक्या जिऑमेट्रिक स्पेडने हे तंत्रज्ञान पुढे जातंय. या टूल्सची इन्पुट्स काय असतात? तर तुमची माहिती, तुमची एकुण आणि प्रसंगोत्पात मानसिकता, तुमचा इतिहास आणि भुतकाळ, तुमच्या आवडी, तुमच्या व्यायामाच्या-खाण्याच्या-मैत्री करण्याच्या-बँकिंगच्या-शॉपिंगच्या-प्रवासाच्या सवयी आणि तुमच्याबद्दलचं सारं काही. अ‍ॅल्गॉरिदम्स पॅटर्न्स शोधण्यात माणसापेक्षा लाखो पटीने निष्णात आहेत. गेल्या अनेक वर्षांचे पॅटर्न्स बघून उद्या तुम्ही कुठचे शूज घालणार आहात, आणि किती वाजता कामातून सुटी घेणार आहात- हे ही टूल्स सहज सांगू शकतील. उद्याचं तुमचं वागणं यांना आजच कळलं असेल, तर कुठे आहे तुम्हाला उद्या वागायचं, इच्छेचं स्वातंत्र्य?

यावर खूप रिसर्च चालू आहे, आणि इथंही जाणकार लोक असतीलच . त्यांनी लिहावं. माझ्या तपशीलांत कदाचित चुका असतीलही.

साजिरा पूर्ण सहमत
मी थोड अधिक करतो.
साजिरा AI चे स्वरूप लिहिले आहे, त्याचा विस्तार करून मी लिहितो आहे कि सध्या आपण अल्गोरिदम च्या नियंत्रणा खाली आहोत,
Life is like a card game. The hand you receive is deterministic; how you play it is free will.
Jawaharlal Nehru
आपण ही इच्छाशक्ती सरेंडर केली आहे.
सध्या आपल्या इच्छांवर नियंत्रण कोणाचं?
इंटरनेट जागृत झाले आहे आणि त्याचे एजंट म्हणजे गुगल , झुकरबर्ग, twitter, whatsup इत्यादी आपल्या इच्छा नियंत्रित करत आहेत,
सध्या हा शब्द महत्वाचा आहे. नाहीतर...

आपल्या इच्छांवर नियंत्रण कोणाचं? यातील आपण व इच्छा यांवर थोडेसे.
इच्छा - मानस-शास्त्रामध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे, - Everything psychological is simultaneously biological. म्हणजेच, मानसिक असलेली प्रत्येक गोष्ट हि जैविकही असते. याचा अर्थ आपल्या इच्छा, विचार हे चेतापेशींच्या परस्पर क्रिया मधून जन्माला येतात. म्हणजे त्या भौतिक सुद्धा आहेत. प्रत्येक भौतिक गोष्टीला काहीतरी पूर्व कार्यकारणभाव असतो. त्या शून्यातून प्रकट होत नाहीत. म्हणजेच आपल्या इच्छा, विचार यांनासुद्धा कार्यकारणभाव असतो. आपली जनुके, आहार, आजार, संगोपन, भवताल, आपला भवताल बरोबरचा परस्परसंवाद, आपला व आपल्या पूर्वजांचा भूतकाळ हे ते कार्यकारणभाव. या सर्वांचा परिणाम विचारांवर व इच्छांवर होत असतो. अर्थात, या सर्व घटकांचा प्रभाव हा सारखा नसतो. बरेचदा हा प्रभाव सजग मनाला (conscious mind) जाणवत नाही. चतुर लोक याचा वापर करून इतरांच्या इच्छा, विचार यांवर, त्यांना लक्षात येणार नाही अश्या प्रकारे प्रभाव टाकतात. उदा. आपण एखादी वस्तू किंवा सेवा विकत घ्यावी असा विचार किंवा इच्छा मनात निर्माण करणे. यासाठी बऱ्याच क्लृप्त्या केल्या जातात. काही मेंटॅलिस्ट priming करून इतरांकडून त्यांना हवे ते करून घेतात. मग ती व्यक्ती अशी वागणार हे भाकीत आधीच केले होते असे म्हणून जादूचा आभास निर्माण करतात.

आपण - आपण कोण आहोत? माझ्यामते, असंख्य अणूंचा समुच्चय व त्यामधील विद्युत-रासायनिक प्रक्रिया. याव्यतिरिक्त काही असेल असे मला वाटत नाही. स्वत्वाची जाणीव हि सुद्धा इच्छा व विचारांसारखी चेतापेशींतून उगम पावते व तीसुद्धा भौतिक असते. मग जर असे असेल तर आपल्या इच्छा व विचारांवर अंतिम नियंत्रण आपले कसे असेल?

तर मग आपल्या इच्छांवर नियंत्रण कोणाचं? - थोडक्यात, आपण सोडून इतर सर्वांचं, मग यात इतर लोक, भवताल, संगोपन, परिस्थिती, आजार, जनुके, भूतकाळ या सर्वांचा समावेश आहे. प्रत्येक इच्छेला किंवा विचाराला काय जबाबदार आहे किंवा त्यांचा उगम कशात आहे हे शोधणे तात्त्विकदृष्टया शक्य असले तरी व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य नाही.

समजा, आपण ai ला एखाद्या विषयावर कविता तयार करायला सांगितली. तर त्या कवितेवर प्रभाव पाडणारे असंख्य घटक असतील. ते शोधणे अगदी त्या AI च्या निर्मात्यांनाही व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसावे.

आइन्स्तानला सगलं कलत होतं.
त्याने सान्गितलेली रेसिपी वाचुन उन्दियो आनि पुरनपोलि बनवुन बगायचि आहे.

वेताळाने सुद्धा प्रश्न विचारण्या आधी एक गोष्ट सांगितली होती. प्रश्नकर्त्याने प्रश्नाची दिशा स्पष्ट करावी ही विनंती.

एका वाक्यात उत्तर द्यायचे तर इच्छेवर व्यक्तीचेच नियंत्रण असते. पण ते स्वतंत्र नसते, त्यावर बाह्य प्रभाव असतो.

माबोवाचक पोस्ट आवडली.

लहानपणा पासुन आपण एखाद्या साच्यातून काढलेल्या प्रॉडक्ट्स सारखे आपण साचेबद्ध घडत जातो. आपल्या आवडी निवडी, कोण व्हायचे आहे, आस्तिक/नास्तिकता, धार्मिक कल, राजकीय कल, अध्यात्मात शिरायचेय, विज्ञानात शिरायचेय, दोन्हीत, खेळ कुठले खेळावेत, छंद कुठले जोपासवेत सगळ्यावर याचा प्रचंड प्रभाव असावा.

पण आइन्स्टाइनला हेडर मधील शोपनहावरचे कोट का एवढे का आवडले होते आणि नक्की कुठल्या दृष्टिकोनातून तो त्याचा वारंवार उल्लेख करत होता (तो असे करत होता असे वाचले) याबद्दल माहिती आहे का? ते जाणुन घ्यायला आवडेल. कुणालाही ही माहीती असल्यास लिहा, ते जाणुन घ्यायला आवडेल.

हे माझ सगळ्यात आवडत वाक्य्/विचार आहे.

मूळ वाक्य जर्मन मध्ये आहे .

Ein Mann kann tun, was er will, aber er kann nicht wollen, was er will.

मी बर्याचदा यावर विचार करतो . मी कायम मला हव तेच करतो , पण मला काय हव हे कस ठरत ? आणि गोंधळ वाढतच जातो .

रच्याकने : माझी सर्वात आवड्ती जर्मन वेब सिरिज DARK ची बेस थीम हीच आहे Happy

मानव पृथ्वीकर, धन्यवाद.
Free Will या विषयात रस असणाऱ्यांसाठी Sam Harris यांचे अनेक व्हिडीओज यूट्यूब वर उपलब्ध आहेत.

यासंदर्भात माबोंशी सहमत... कुठल्याही प्रश्नाचा निकाल लावण्या आधी 'आपण' म्हणजे नक्की कोण आणि काय याची वासलात लावावी लागेल. आणि जर आपण म्हणजे केवळ असंख्य अणूंचा समुच्चय व त्यामधील विद्युत-रासायनिक प्रक्रिया (आधुनिक विज्ञानानुसार) असू तर आपली प्रत्येक क्रिया, निर्णय हे मुळात केवळ बाह्य जगातील अथवा शारीरिक स्टिम्यूलीज ना या सर्व यंत्रणेने मेदूत साठवलेल्या माहीतच्या अनुषंगाने दिलेली प्रतिक्रिया एवढाच त्यांचा अर्थ उरतो. थोडक्यात अशा प्रकारच्या सिस्टीम मधील रिस्पॉन्स(मुळातच कोणताही रिस्पॉन्स) हा कधीही independent अथवा in absence of external forces अथवा आधीच स्टोअर्ड असलेल्या माहितीच्या ( conscious or subconscious) कक्षेच्या बाहेरचा असू शकत नाही. पुर्ण फ्रीवील असंभव आहे असं‌ मला वाटतं. म्हणजे आपणाला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किती ऑप्शन्स माहीत असावे याची फ्रीवील आपल्याकडे नाही परंतु माहीत असलेल्या ऑप्शन्स मधून परीणामांची पर्वा न करता अगदी असंयुक्तीक असा एखादा टोकाचा ऑप्शन निवडण्याची लिमीटेड फ्रीवील आपल्याला असते.

माझी बेट लंगड्या घोड्यावर!!! Wink
528e5deee63e49ea86f0dbab1ef8b8a8.jpg

pedophilia म्हणजे लहान मुलांबद्दल वाटणारे लैंगिक आकर्षण.
अशा व्यक्तींनी लहान मुलांबरोबर (अगदी त्यांच्या सहमतीनेही) संबंध केले तर तो सर्व देशात गुन्हा मानला जातो.
आपल्याकडेही POSCO चा उद्देश तोच आहे.

पण काही नव्या संशोधनात असे आढळून आले आहे की मेंदूच्या एका भागात काही बदल झालेले असतील तर अशा व्यक्ती pedophile बनतात. काही लोकांना मेंदूत हे जन्मजातच असते. एका माणसाला अपघातात मेंदूला इजा झाली व मग त्याच्या मनात pedophilia चे विचार येऊ लागले असेही वाचलेले होते.

एखाद्या आरोपीने माझ्या मेंदूत तो जन्मतःच विकार आहे असा बचाव केला तर ?
शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या मेंदूची तपासणी करावी अशी मागणी आली तर ?

scary !

साजिरा यांचा प्रतिसाद छान म्हणजे समजला तरी थोडाफार.
@फार्स तुम्ही फार कठीण लिहिता.मला काहीच समजलं नाही.मुळात मला धाग्यातला कोट सुद्धा कळला नाही.(इंग्लिश कच्चे) तुम्ही मराठीत सांगू शकता का त्या कोट चा अर्थ.

पोस्तचा विशय, रिपलाई कशाचा कसला सम्बन्ध नाहि. सगले आपले ग्यान पाजलतात.
अजुन जर्मनिचा एक आयदि राहिला. तो आला कि वर्तुल पुर्न.

सिमरन, माबोवाचक आणि फार्स यांच्या प्रतिसादातली माहिती (सध्या तरी) सगळ्यात जास्त लॉजिकल मानता येईल.

'आपण नक्की कोण आहोत' हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मी कोण आहे- हा जगातला सगळ्यात पहिला आणि अंतिम प्रश्न मानता येईल. वेस्टर्न फिलॉसॉफी, पौर्वात्त्य आणि भारतीय दर्शनशास्त्रे, क्वांटम फिजिक्स आणि एकुणच विज्ञान- या सार्‍यांनी याचा शोध घेतला आहे, आणि निरनिराळी उत्तरं काढली आहेत. आता विज्ञानाला जे शोध लागले आहेत, ते तत्त्वज्ञानाने आधीच म्हणून ठेवलं आहे, आणि तत्त्वज्ञानांच्या विविध शाखांना आपले सिद्धांत मांडण्यासाठी विज्ञानाची मदत घ्यावे लागली आहे- असं अनेकदा घडलं- हे बघून गंंमत वाटते, आणि तत्त्वज्ञान हा विषय आणखीच मनोरंजक होत जातो.

आपण (म्हणजे आपलं शरीर + आपल्या भावना, बुद्धी, मेंदू इ.) हे फक्त आणि फक्त 'मॅटर' आहे- असं गृहित धरणार्‍या शाखांचं उत्तर म्हणजे फार्स आणि माबोवाचक यांनी वर लिहिलेली पोस्ट. शरीर आणि मेंदू हे 'मॅटर' आहे, त्यातल्या विविध जैवरासायनिक प्रक्रियांमुळे तुमच्यात विविध भावना, प्रेरणा, इच्छा तयार होतात- हे गृहितक. थोडक्यात तुमच्या भावना, प्रेरणा, कामना इ.ही मॅटरच आहेत ('चेतना' नव्हेत), कारण ज्यातून त्या उगवतात (मेंदू), त्याचा नाश झाला, त्याने काम करणं थांबवलं, तर हे सारंही बंद होईल.

पण पौर्वात्त्य, विशेषतः भारतीय तत्त्वज्ञान वेगळंच सांगतं. म्हणजे अगदी विरुद्ध. आदि शंकराचार्य हे महत्वाचं नाव. याबद्दल अधिक माहिती अनेक ठिकाणी सापडेल, किंवा इथल्या गप्पांच्या ओघात त्याबद्दल नंतर बोलताही येईल. या शाखेने हे विश्वच 'चेतना'ने बनलं आहे, आणि अर्थातच आपलं शरीर, भोवतालचं जग, आणि एकुणच आपला जन्म. अहं ब्रह्मास्मि आणि मिथ्या वगैरे आपण नेहेमीच ऐकत असतो. सीन असा आहे, की आपण पात्रं आहोत, कठपुतळ्या आहोत, एखाद्या व्हिडिओ गेमची किंवा कुणाच्या तरी स्वप्नातली पात्रं आहोत; त्यामुळे इच्छास्वातंत्र्याचा प्रश्नच संपला. ज्या क्षणी 'त्या' कुणाचं तरी स्वप्न संपेल, जाग येईल, त्या क्षणी आपलं अस्तित्त्व शून्य.

हा विषय इतक्या थोडक्यात हसण्यावारी नेण्यासारखा किंवा रद्दबातल करण्यासारखा नाही. कारण २१व्या शतकातल्या क्वांटम फिजिक्समधल्या महत्वाच्या संशोधनाने यातल्या काही गोष्टींना पुष्टी दिली आहे. (आमच्या वैदिक काळात हे सारं काही होतं- असं ऐकलं आहे की नाही आजूबाजुला?). आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हीगल नावाच्या एका महान प्राश्चात्त्य तत्त्वज्ञाने आदि शंकराचार्यांच्या अस्तित्त्वाविषयीच्या या मांडणीला दुजोरा दिला आहे.

या दोन्ही (किंवा खरंतर त्यापेक्षा जास्त) बाजू बघितल्या, माहिती करून घेतल्या की सिच्युएशन जटिल होते. वरती लिहिलेलं Everything psychological is simultaneously biological- हे दोन्ही बाजूंनी महत्वाचं. विशेष म्हणजे- इच्छास्वातंत्र्य आपल्याला जवळजवळ नाहीच- हे दोन्ही शाखा सिद्धच करतात. आणि मग पुढे हे आपल्याला नीट समजेल का, या सार्‍याचा अभ्यास करायला जमेल का- याची इच्छा आपल्या मनात तयार होते. Happy

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हीगल नावाच्या एका महान प्राश्चात्त्य तत्त्वज्ञाने आदि शंकराचार्यांच्या अस्तित्त्वाविषयीच्या या मांडणीला दुजोरा दिला आहे. >> इंटरेस्टींग. साजिरा, तुमच्या प्रतिसादात नेहमी काही तरी नवीन गवसतं.

साजिरा, धन्यवाद
तुमच्या प्रतिसादात नेहमी काही तरी नवीन गवसतं. +1

एव्हढा दांडगा अभ्यास नाही. इथे लिहीत असलेल्या संशोधकांच्या माहितीच्या आधारे आपलं मत ठरवणं एव्हढंच जमतं.

एआय किंवा सोशल मीडियामुळे इच्छा नियंत्रित होतात असा सूर आहे. पण सोशल मीडीया नव्हता तेव्हांही पिक्चरच्या आधी आणि इंटर्वलला जाहीराती असायच्या. रेडीओ आणि टीव्हीवर जाहीराती असायच्या. म्हणून तर कोळसा, मीठ, मिश्रीने दात घासायचे सोडून कोलगेट आली. आणि आता ब्रशने दातावरचे आवरण निघून जाते म्हणून पुन्हा बोटाने दात घासायची पाळी आली.

जाहीरात इच्छा नियंत्रित करते का ? कि प्रेरणा देते ?

निसर्गात फळ किंवा फूल पाहिल्यावर माणसाने किंवा प्राण्याने ते तोडावं यासाठी त्याच्या मनात आकर्षण निर्माण व्हावं ही योजना असते. कारण त्यामुळे बिया निसर्गात इतस्ततः पसरतात किंवा फुलांमधले परागकण फैलावतात ज्यामुळे त्या त्या झाडापासून नवीन ठिकाणी झाड उगवतं. म्हणजे आपल्या फायद्यासाठी अन्य जीवांचा वापर हे नैसर्गिक आहे. त्या प्राण्यामधे असलेले इन्स्टिंक्ट हे आधीपासून आहेत, त्याची माहिती झाडाला (निसर्गाला) आहे. जाहीरात ही पासष्टावी कला असल्याने त्यांनी ती ओळखली आहे. ती सुद्धा प्राचीन आहे.

जाहीरातींनी फीड ताब्यात घेणं म्हणजे इच्छा नियंत्रित करणं आहे का ?

vijaykulkarni, गुन्ह्याच्या शिक्षेपासून बचावाचे हे अर्ग्युमेण्ट free will च्या चर्चेत सर्व कृत्यांसाठी वापरले जाते. पण माझ्या मते गुन्ह्यांसाठी शिक्षा हि दिलीच पाहिजे. एखाद्या गुन्ह्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. काही त्या गुन्ह्यासाठी प्रेरित करणारे तर काही परावृत्त करणारे. त्या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद असणे हा परावृत्त करणारा घटक आहे. या घटकामुळे गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात राहते.

हा विषय इतक्या थोडक्यात हसण्यावारी नेण्यासारखा किंवा रद्दबातल करण्यासारखा नाही. कारण २१व्या शतकातल्या क्वांटम फिजिक्समधल्या महत्वाच्या संशोधनाने यातल्या काही गोष्टींना पुष्टी दिली आहे >>> lf you must pursue this line of thought, l must warn you to be wary of quacks like Deepak Chopra. Physicalism (https://en.wikipedia.org/wiki/Physicalism) is probably the most widely accepted view of the contemporary western philosophy.

(आमच्या वैदिक काळात हे सारं काही होतं- असं ऐकलं आहे की नाही आजूबाजुला?). >>> See, you have slipped already.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हीगल नावाच्या एका महान प्राश्चात्त्य तत्त्वज्ञाने आदि शंकराचार्यांच्या अस्तित्त्वाविषयीच्या या मांडणीला दुजोरा दिला आहे. >>> Any similarities between Hegel's absolute and Advaita's Brahman are purely superficial. Even with a bit of an understanding of Hegel and Advaita you will realize that these two are fundamentally opposite. Hegel's spirit in essence is dynamic ( "becoming" ) in total contradiction to the static notion of the Brahman. Hegel is a lot closer to Buddha's impermanence and dependent origin, although he himself may not have realised this due to unavailability of authentic Buddhist philosophy texts at that time.

Oh my bad if that's satire... मला वाटले ते सिरियस आहेत because he led with "हा विषय इतक्या थोडक्यात हसण्यावारी नेण्यासारखा किंवा रद्दबातल करण्यासारखा नाही".. anyway..

आपला कर्म सिद्धांत नीट विचारात घेतला तर या फ्रीविल'चं काय करायचं हा प्रश्नच आहे. कारण या जन्मी तुम्ही जे करताय (आणि भोगताय) हे गेल्या जन्मीचं फळ आहे. गेल्या जन्मी केलेल्या कर्मानुसार तुम्हाला शिक्षा आता होणार म्हणल्यावर या जन्मात तुम्ही कसं वागणार हे फिक्स झालं. आता या जन्मात तुम्ही काय करताय यावर पुढचा जन्म ठरणार म्हणल्यावर पुढल्या जन्मी तुम्हाला काय फ्रीविल असणार हे स्पष्टच आहे.
>>

Not true.
Will type when I have some spare time.

चेराज, मी किंवा तुम्ही किंवा कुणीही, एका वाक्यात लिहिण्यासारखा हा विषय नाहीच. मी लिहिलं ते समराईझ करण्यासाठी. जरा सिंप्लिफिकेशन केलं, तर इतरही लिहितील, चर्चा होईल आणि माहितीही मिळेल या हेतुने. तुम्हाला ते 'ओव्हरसिंप्लिफिकेशन' वाटलं असेल कदाचित.

हीगल आणि आदि शंकराचार्य / ब्राह्मण / अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये मुलभूत फरक आहेतच. विषय 'फ्रीविल'चा चाललेला आहे. या विषयावर ते काय म्हणतात इतकंच लिहिलं आहे. मुळात दोन्ही विचारधारा ज्या गोष्टींवर अवलंबून आहेत, आणि त्यांची जी मूळ गृहितकं आहेत, ती वेगळी आहेतच. याहीपुढची गोष्ट म्हणजे- भारतीय दर्शन आणि वेस्टर्न फिलॉसॉफीच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीच भिन्न आहेत. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान हे 'विचार करण्यावर' अवलंबून आहे, आणि आपलं तत्त्वज्ञान 'बघणे, दर्शन होणे, साक्षात्कार होणे, अनुभवणे' यावर. हा वेगळा धाग्याचा आणि क्लिष्ट विषय आहे. क्लिष्ट असला तरी गोष्टी कळत जातात तसा तो मनोरंजकही होत जातो हेही आहेच. मायबोलीवर असा धागा आधीच असल्याचं कुणाला माहिती असेल तर लिंक द्यावी.

'फ्रीविल'- हा विषय आहे. यावर काही लिहिलं आणि नवीन काही कळलं तर फायदा माझाच असेल, तेव्हा त्यावर लिहा ही विनंती.

गोंदवलेकर महाराज म्हणतात - माणूस उर्ध्वगतीस प्रवास करणार की अधोगतीस हे त्याच्या हातात असते आणि नेहमी उर्ध्वच प्रवास केला पाहीजे अन्यथा अधोगती होते.
मला वाक्य नक्की स्मरत नाही. सापडल्यास देते.

मी लिहिलं ते समराईझ करण्यासाठी. जरा सिंप्लिफिकेशन केलं, तर इतरही लिहितील, चर्चा होईल आणि माहितीही मिळेल या हेतुने. तुम्हाला ते 'ओव्हरसिंप्लिफिकेशन' वाटलं असेल कदाचित. >> साजिराजी, मला oversimplified नाही तर appalling वाटलं. आई-बाबा हिंचगिरी संप्रदायातील असल्यामुळे लहान पणापासूनच अद्वैत तत्वज्ञाना शी मी exposed आहे. तसेच गेल्या काही वर्षांत dialectical materialism समजून घेण्यासाठी हेगल चा थोडाबहुत पाठपुरावा केला आहे. म्हणूनच तुम्ही दिलेले सिंपलिफिकेशन मला खटकले. तुम्ही याबाबतीत अधिक लिहिले तर तुमचे मत कोणत्या दृष्टिकोनातून आले हे कळेल. ह्या धाग्याचा विषय नाही, पण ontology आणि हेगल मध्ये मला नेहमीच विशेष रस आहे, त्यामुळे तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. Ontology वर एक लेखमालिका करायचा विचार आहे, पण अभ्यास करून मांडणी करायला वर्षे लागू शकतात. असो.

'फ्रीविल'- हा विषय आहे. यावर काही लिहिलं आणि नवीन काही कळलं तर फायदा माझाच असेल, तेव्हा त्यावर लिहा ही विनंती. >>> "फ्री विल" चा मी context शिवाय absolute मध्ये विचार करू शकत नाही. आपल्या काही मूलभूत नैसर्गिक प्रेरणा असतात, काही अंतर्गत ज्या काही (बऱ्याच) प्रमाणात genetics ने ठरलेल्या असतात. ह्या सगळ्यांचा बाहेरच्या जगाशी --- माणसांशी, प्राण्यांशी, वस्तूंशी , समाजाशी इत्यादी --- संवाद आणि संघर्ष सतत घडत असतो आणि त्यांतून ह्या नैसर्गिक/अंतर्गत प्रेरणा सतत आकार घेत असतात: वाढत असतात, कमी होत असतात, पूर्णपणे बदलत असतात इत्यादी. त्यांच्या अशा interactions मधून आपल्या इच्छा कोणत्याही दिलेल्या एका क्षणाला define होत असतात (असाव्या) आणि त्यांवर काही (बऱ्याच) प्रमाणात आपण अंमल करू शकत असतो (असावो). हे सगळे आधी आखून दिलेल्या भौतिक, सामाजिक, नैतिक इत्यादी कायद्याच्या चौकटीत उलगडत असते. सामाजिक आणि नैतिक चौकट प्रत्येक व्यक्ती स्वतःवर स्वतःची लादून घेऊ शकतो आणि आपल्या इच्छांवर किती प्रमाणात अंमल करू शकतो ते काही (बऱ्याच) प्रमाणात ठरवू शकतो अशी माझी समजूत आहे कारण गेल्या कित्येक वर्षांपासून existentialism मला जवळचा आहे: "man is condemned to be free".
मूळ धागा लेखकाच्या आधीच्या काही पोस्ट वाचून त्यांना ज्योतिष वगैरे विषयाच्या अनुषंगाने फ्रीविल संबंधी चर्चा करायची असावी असा अनुमान केला (जो चुकीचा असू शकतो) आणि म्हणून त्यासंबंधी काही लिहिले नाही. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हेगलचे नाव घेतले म्हणून लिहिले. असो

रॉबर्ट सापोल्स्की चा हा व्हिडीओ अगदी free will विषयी नसला तरी माणसाच्या cognitive ability विषयी चांगले मुद्दे मांडणारा आहे. जरूर बघा असं सुचवेन.
The biology of humans at our best and worst. लिंक : https://youtu.be/GRYcSuyLiJk?si=1n6rVbVn6XGybl6r

Pages