Missing Man Formation

Submitted by अविनाश जोशी on 26 November, 2025 - 06:11

दुबई एअर शोमध्ये भारत निर्मित तेजस फायटर जेटचे अपघातामुळे दुर्दैवी निधन झाले. अनुभवी तेजस पायलट स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांनी दुहेरी लूप स्टंट करताना हा प्रसंग घडला.
पहिला लूप अत्यंत कौशल्याने पूर्ण केला, पण दुसऱ्या लूपदरम्यान विमान जमिनीच्या अगदी जवळ आले आणि कोसळले. या दुर्दैवी अपघातात पायलटचेही प्राण गेले. स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांनी तेजसवर शेकडो तास उड्डाण केले होते. दोन वर्षांपूर्वी सिंगापूर एअर शोमध्ये त्यांनी याच प्रकारचा स्टंट यशस्वीरीत्या सादर केला होता.
अमेरिकेचे अत्याधुनिक F-35 फायटर जेटदेखील आतापर्यंत किमान १२ वेळा कोसळले आहेत. बोईंगसारख्या अनुभवी कंपनीचे 737 MAX या नव्या डिझाईनचे विमान चढताच काही मिनिटांत अपघातग्रस्त झाले आणि अनेक लोकांचा जीव गेला. अलीकडेच Dreamliner उड्डाण देखील अहमदाबाद येथे उड्डाणानंतर काही मिनिटांत कोसळले.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) कामगिरीचे रेकॉर्ड तुलनेने चांगले आहे. Avro विमान निर्मितीपासून HAL ने स्वतः डिझाईन आणि बनवलेल्या विमानांमध्ये अगदी कमी अपघात झाले आहेत. तज्ज्ञच शोधून काढतील — तेजस का कोसळले? मानवी चुका की यंत्रातील बिघाड?
आता दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया—
१) रशियन टीमची भावनिक कृती – Missing Man Formation
अपघातानंतर रशियन टीमने शोमध्ये भाग घेणे थांबवले आणि पायलटला सन्मान देण्यासाठी Missing Man Formation मध्ये उड्डाण केले.
Missing Man Formation म्हणजे काय?
विमानविद्येत आणि लष्करी विमानसेवेमध्ये ही एक सन्मानात्मक हवाई सलामी असते. ती खालील व्यक्तींना श्रद्धांजली म्हणून दिली जाते:
• शहीद झालेले पायलट
• युद्धात मृत्यूमुखी पडलेले सैनिक
• राष्ट्रीय वीर, महत्त्वाचे मान्यवर
• अवकाश मोहिमेत प्राण गमावलेले अंतराळवीर
ही एक अशा पायलटच्या “अनुपस्थितीची” खूण असते—जो आता परत येणार नाही.
फॉर्मेशनचा प्रकार
सामान्यतः चार विमान “V” आकारात उडतात (बाणासारखा आकार):
दोन प्रमुख प्रकार:
1. एक जागा मुद्दाम रिकामी ठेवली जाते — उड्डाणापासूनच.
2. एक विमान अचानक वर चढत दूर जाते — बाकी तीन सरळ पुढे जातात. हे मृत पायलटच्या आत्म्याच्या आकाशाकडे आरोहणाचे प्रतीक आहे.
हा दुसरा प्रकार सर्वात भावनिक आणि ओळखण्यास सोपा आहे.
२) अमेरिकन F-15 टीमची प्रतिक्रिया
अमेरिकेच्या F-15 टीमने त्वरित जाहीर केले की, अशा अपघातानंतर त्यांना शोमध्ये भाग घेणे शक्य नाही.
“आम्ही एका सहकाऱ्याला गमावले आहे. अशा प्रसंगी शो सुरू ठेवणे योग्य नाही,” असे त्यांनी आयोजकांना सांगितले.

स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव हिमाचल प्रदेश येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे अंतिम संस्कार पूर्ण लष्करी सन्मानासह, बंदुकींची सलामी व ‘लास्ट रिट्रीट’ देत करण्यात आले.
त्यांची पत्नी अफसाना स्याल, या देखील भारतीय वायुदलातील फायटर जेट पायलट आहेत. त्यांनी पतीला शेवटचा सलाम दिला आणि सहा वर्षांच्या मुलीचे तसेच वृद्ध वडिलांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
याउलट स्वतःला “स्वतंत्र तज्ञ” म्हणवणाऱ्या काही डिजिटल माध्यमांनी अपघातानंतर तेजसबद्दल चुकीच्या माहितीचा पाऊसच पाडला. अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले की अशी पोस्ट्स भारतीय/हिंदू नावांनी जरी केल्या गेल्या, तरी त्या पाकिस्तान, बांगलादेश आणि काही मध्यपूर्व देशांमधून प्रसारित झाल्या.
मित्रांनो, कोणतीही भारतविरोधी बातमी शेअर करण्याआधी ती कुठून येते हे तपासणे आवश्यक आहे.
WhatsApp मध्ये पाठवणाऱ्याचे लोकेशन पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे—ती वापरा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात हे स्टंट करावेत कशाला? हा मूलभूत प्रश्न कुणीच का विचारत नाही?

फायटर जेटचे काम काय आहे? युद्धात भाग घेणे की स्टंट करणे?

मलाही हाच प्रश्न पडतो. युद्ध सराव ठीक आहे, हे उलट पुलट जाण्याचे स्टंट करण्यामागे काही तार्किक कारण आहे का? का छान दिसतात, पूर्वापार करतो, ते करतात तर आपण का नाही, लोकांना/ नेत्यांना बघायला आवडतात, शौर्याचं, कामगिरीचं प्रतिक वगैरे आहे इ. मधली काही कारणं आहेत? का हे एअर शो स्पॉन्सर्ड इव्हेंट असतात आणि ते उत्पन्नाचे साधन आहे? प्रामाणिकपणे विचारतोय, मला खरंच माहित नाही.

काल रशियन टीमने विंग कमांडर नमांश सयालयांना आदरांजली वाहण्यासाठी Missing Man Formation केल्याचे वाचले होते. ते का करतात हे माहिती नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

युद्ध सराव ठीक आहे, हे उलट पुलट जाण्याचे स्टंट करण्यामागे काही तार्किक कारण आहे का?
>>>>
समोरासमोरच्या लढाईमध्ये शत्रूला अनपेक्षित अश्या मूव्हमेंट करत क्षेपणास्त्र तुमच्यावर लॉक न होऊ देणे हाच वाचण्याचा एकमेव मार्ग असतो. त्यासाठी तुमच्या विमानाची लवचिकता किती आहे हे दर्शवणारे ग्रॅव्हिटी डिफाईन्ग मॅन्यूवर्स एअर शो मध्ये करत असावेत असा माझा अंदाज. नाहीतर मग तुम्ही एवरेस्ट का चढता या प्रश्नाला जे उत्तर आहे तेच इथेही लागू पडेल.

एवरेस्ट का चढता या प्रश्नाला जे उत्तर आहे तेच इथेही लागू पडेल. >>

मला वाटलंच होतं की अशी कमेंट येईल. एवरेस्ट चढणारी व्यक्ती तो निर्णय स्वतः:साठी घेत असते. स्पॉन्सर्ड इव्हेंट आहे म्हणून कुणी Russian Roulette खेळतं का? (मुळात अशी स्पॉन्सर्ड इव्हेंट होऊच शकणार नाही, कायद्याने ते शक्य नाही.) MotoGP Grand Prix Racing मध्ये रेसर असे स्टंट करतात का?

ते करता येतात, त्यातुन सुंदर सांघिक हालचाली, प्रात्यक्षिके करता येतात म्हणून... असं एव्हरेस्ट का चढता सारखं कारण असेल तरी उत्तमच आहे. मला बघायला आवडतातच. तेच कारण असावं.
क्षेपणास्त्र लॉक होऊ न देणे या उंदिर मांजरीच्या खेळात क्षेपणास्त्र शेवटी जिंकणार आहे असं अजुन झालेलं नाही का?

एवरेस्ट चढणारी व्यक्ती तो निर्णय स्वतः:साठी घेत असते. >>>>
जरी निवड बेस्ट ऑफ द पायलट्स मधून होत असेल तरी इथे निर्णय लादला जातोय असं कुठं आहे? एकदा तुम्ही फायटर पायलट झालात की नेक्स्ट अचिव्हमेंट किंवा थ्रील (इन पीस टाइम) काय असू शकते?

आणि उंदीर मांजराच्या खेळात दर वेळी क्षेपणास्त्र लॉक होतंच असंही नाही ना? कदाचित सेक्युअर पोझिशन घेऊन तुम्ही बाजी पलटवू शकत असाल.

अर्थात हे सारे माझे अंदाज आहेत. हे असंच असेल असं नाही. मलाही जाणून घ्यायला आवडेल की यामागे नक्की काय भूमिका असते.

एअर शो मध्ये आपली उत्पादन जगाला विक्रीसाठी दाखवण्याचा पण उद्देश असतो. आपण दाखवणारच नाही तर इतर देशांना समजणार कसं?

Aviation Safety magazine मधील लेख.
Certainly the best way to prevent this type of accident is to resist the temptation to show off.

उत्पादन जगाला दाखवण्याचा पण उद्देश >>
Motorcycle Grand Prix रेसमध्ये पण उत्पादन जगाला दाखवण्याचा उद्देश असतो, ते स्टंट करतात का? Grand Prix motorcycles are purpose-built racing machines that are unavailable for purchase by the general public
जे रस्त्यावर स्टंट करतात, लोक त्यांना शिव्याच घालतात की स्टंट करू नका.

फायटर विमानांची क्षमता दाखवण्यासाठी एअर शोमध्ये स्टंट सादर करणे गरजेचं असणार. इतर देशांना त्या विमानाची चपळता, नियंत्रणक्षमता तरी कशी समजणार. नाहीतर, त्यांना खऱ्या खुऱ्या युद्धाची वाट बघवी लागेल.

ग्रँड प्रिक्समध्ये तसें स्टंट नसले तरी एवढ्या वेगात गाड्या पळवणे पण एक प्रकारचा स्टंटच आहे. आणि ती एक रेसिंग स्पर्धा आहे. फायटर विमानांच्या बाबतीत अशा प्रकारचे रेसिंग करणे शक्यही नाही आणि सुरक्षितही नाही. त्यामुळे या विमानांच्या परफॉर्मन्सचा अभ्यास करण्यासाठी एअर शोमधील स्टंट हेच सर्वात व्यावहारिक आणि विश्वसनीय माध्यम असेल.

कडक उपाय करून किंवा अनावश्यक स्टंट वागळून फार फार तर अपघात कमी करता येतील, पण शून्य करता येत नाही. तरीही, स्टंटद्वारे विमानाची क्षमता युद्धसज्जता दाखवून संभाव्य ग्राहकांना आकर्षित करणे हा फायटर विमान उद्योगाचा महत्त्वाचा घटक असेल.

हवाई कसरती करताना अपघात होतात, पण अशा प्रसंगी वापरात येणारी सुरक्षा प्रणाली म्हणजेच इजेक्शन सिस्टीम का वापरली गेली नाही हा खरा प्रश्न आहे. लो अल्टीट्यूडमुळे ती कितपत उपयोगी पडली असती हा वेगळा विषय, पण इजेक्शन यशस्वीरीत्या व्हायलाच हवे होते... निगेटिव्ह G च्या प्रभावाचा त्यात हातभार असल्याचे पुर्णपणे नाकारु शकत नाही पण पायलटला देखिल ८२०० उड्डाण तासांचा अनुभव गाठीशी होता.

व्यावसायिक गणित हेच कारण असणार. आपल्या प्रॉडक्टची जाहिरात हे कारण पटते.

आज प्रात्यक्षिक दाखवताना कोणी गेले म्हणून आपल्याला हळहळ वाटत आहे.
पण मनात विचार येतोय युद्धात किती जण जात असतील. किंवा प्रत्यक्ष युद्ध न होताही जगभरात कित्येक सैनिक छोट्या मोठ्या चकमकीत जात असतील.
फक्त आपल्याला ते नाहक गेले असे न वाटता युद्ध करताना शहीद झाले असे वाटते.
पण तिथेही कोण आवडीने शहीद व्हायला जात असते. तिथल्या कोणी स्वतःहून युद्ध किंवा भांडण उकरून काढले असते. आदेशाचे पालन करणे हेच त्यांचे काम.

बाकी Missing Man Formation चे व्हिडिओ पाहिले आहेत. ते gesture बघून चांगले वाटले.

हे उलट पुलट जाण्याचे स्टंट करण्यामागे काही तार्किक कारण आहे का?

>>>>>
काल एका पॉडकास्टमध्ये नेमका हाच प्रश्न विचारला त्यावर एअर मार्शल संजीव कपूर यांनी हे उत्तर दिलं होतं.

"तुम्ही जेव्हा एखाद्या एअरशो मध्ये निमंत्रित म्हणून जाता आणि जेव्हा तुम्ही तुमचे उत्पादन जगाला दाखवू इच्छिता तेव्हा तुम्ही तुमचे बेस्ट पायलट्स ,बेस्ट इक्विपमेंट्स अँड बेस्ट मनूव्हर्स दाखवता. It is an exhibit of the aircraft's performance and the skill of the crew."

झाला तो अपघात होता. अपघात होईल म्हणून भाग घायचाच नाही किंवा स्टंट करायचेच नाहीत हे आजारा पेक्षा उपाय भयंकर होईल.

जेव्हा तुम्ही तुमचे उत्पादन जगाला दाखवू इच्छिता तेव्हा..... >> म्हणजे जे देश उत्पादन करत नाहीत, ते असे स्टंट करतच नाहीत. असे म्हणायचे आहे का?

स्टंट करायला ना नाही, पण त्यासाठी ऍक्टिव ड्युटी करणाऱ्या एअरफोर्सच्या वैमानिकाला आणि युद्धात वापरणाऱ्या फायटर जेट विमानास कामाला लावू नये. पैसे देऊन रिटायर्ड एअरफोर्स किंवा कमर्शियल वैमानिकांना, कमर्शिअल विमानात असे स्टंट करायला सांगण्यास काहीच हरकत नाही. अमेरिकेत असे बरेच एअर शो होतात, ज्यात लोक तिकीट काढून असे स्टंट बघायला जातात.

युद्धात भाग घेणाऱ्या वैमानिकाने युद्ध सराव करणे वेगळे आणि उगीचच जीव अजून धोक्यात घालून स्टंट करणे वेगळे. त्याचा जीव आधीच पुरेसा धोक्यात असतो. हे फक्त भारतासाठी म्हणत नाही तर सर्वच देशांनी ठरवले पाहिजे. कृपया List of air show accidents and incidents in the 21st century बघावी.

जेव्हा तुम्ही तुमचे उत्पादन जगाला दाखवू इच्छिता तेव्हा..... >>
'आणि'च्या आधीही एक वाक्य लिहिले आहे.

मग आता काय दिसलं जगाला?
>>>> अपघात झालेला दिसला. ट्रेण्ड पायलट आणि फायटर जेटचा दुर्दैवी लॉस झालेला दिसला. पण हा अशा प्रकारचा पहिलाच अपघात नाही हे ही जगाला ठाऊक आहे. आणि आणि अपघातांचे प्रमाण जास्त असले तरी प्रत्येक वेळी हे स्टंट करताना अपघात होत नाही हे ही जगाला ठाऊक आहे.
ही सहभागी देशांनी घेतलेली घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क होती. दुर्दैवाने ती भारतासाठी मटेरिअलाईझ झाली.

सर्वच देशांनी स्किल दाखवण्यासाठी एअरशो बंद केले तर उत्तमच आहे. पण जोपर्यंत एअरशो आहेत तोपर्यंत काही एंटिटीजना आणि व्यक्तींना त्यात पार्टीसिपेट करायची इच्छा असू शकते.

प्रत्येक देश वेगवेगळ्या प्रकारचे धोके स्वीकारून शक्यतांचा परीघ वाढवत असतो. उदा. स्पेस प्रोग्रॅम्स.
अपघात होईल म्हणून टाळायचे की धोका आहे हे स्वीकारून पुढे जायचे यावर कितीही चर्चा होऊ शकते. त्यामुळे मी इथे थांबते.

माझेमन प्रतिसाद पटला.
कोणाला बळजबरी करुन हे केलेलं नाही. अधिक बोलण्यासारखे काही नाही.

या जगात युद्धे सुद्धा यासाठी घडवली जातात कारण शस्त्रांना मार्केट मिळावे. त्यासाठी जगभरातली अशांतता कायम कशी राहील हे बघितले जाते. असे मागे कुठेतरी वाचलेले.

येथील बरेचसे प्रतिसाद हे एक तर्हेचा पूर्वग्रह (bias) दाखवतात. काही अज्ञानातून आलेले आहेत. काही वैमानिक गेल्याच्या दुःखातून तर काही सद्य सरकारविषयीच्या आकसातून आलेले दिसतात.

मुळात विमानांची प्रात्यक्षिके करणे याला स्टण्ट म्हणणे हेच दुर्दैवाचे आहे. तो काही सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेला तमाशा नाही.

लष्करी संचलन (उदा. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी सारखी) करताना त्यातील आंतरखंडीय क्षेपणास्त्रे किंवा मोठी मोठी शस्त्रास्त्रे, विमाने, रणगाडे यांचे प्रदर्शन का केले जाते? तर शत्रूला आपली लष्करी / सामर्थ्य तयारी किती आहे हे दाखवण्यासाठी. आंतर खंडीय क्षेपणास्त्रे काही कुणाला विकायची नसतात. पण ती तुमच्या देशाची युद्ध तयारी किती आहे हे शत्रूला दाखवण्या साठी असतात.

शांतता टिकवण्याचा उत्तम मार्ग कोणता तर पुढच्या युद्धाची कसून तयारी.

या नात्याने विविध देश आपले शस्त्रसामर्थ्य दाखवण्यासाठी अशी संचालन नियमितपणे करत असतात. यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याच्या अगोदर शत्रू चार वेळेस विचार करेल.

याशिवाय देशाच्या सामान्य जनतेला मनोधैर्य देणे आणि दिलासा देणे हे एक महत्त्वाचे काम अशा संचलनात केले जाते.
आपली सेनादल सक्षम आहे आणि शत्रूशी चार हात सहज करू शकतील हा विचार जनतेचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उपयुक्त असतो.

१९९९ मध्ये कारगिल युद्धात आपल्याकडे असलेली नजरेच्या टप्प्याबाहेर मारा करणारी क्षेपणास्त्रे (BVR- beyond visual range) पाहून पाकिस्तानने आपले वायुदल आणि फ १६ विमाने युद्धात उतरवलीच नाहीत.

विमानाची प्रात्यक्षिके दाखवणे आणि त्यांची उड्डाणक्षमता शत्रूला दाखवणे हा याच डावपेचाचा भाग असतो.

तेजस विमान यातील इंजिन आणि काही उपकरणे सोडली तर ते फार मोठ्या प्रमाणावर भारतात बनलेले विमान आहे आणि त्यांचा मूळ आराखडा (DESIGN) संपूर्ण स्वदेशी आहे. सध्या आपण अमेरिकेकडून त्याचे इंजिन आयात करतो आहोत पण भविश्यात आपले स्वतः;चे इंजिन तयार करण्याची प्रक्रिया चालू आहेच. सध्या भारत वर्षाला २४ विमाने निर्माण करू शकतो. काही वर्षात आपले स्वदेशी इंजिन येईल तोवर हि क्षमता पण वाढलेली असेल.
आजच भारत इतकी उत्तम विमाने तयार करू शकतो आणि भविष्यात ती अजूनच सक्षम असतील हा विचारच शत्रूला छातीत धडकी भरविण्यास सक्षम आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची स्थिती आज अशीच आहे. आजच ते ताशी ३७०० किमी वेगाने प्रवास करते ब्राह्मोस २ हे ताशी १०,००० किमी वेगाने प्रवास करेल. म्हणजेच सेकंदाला ३ किमी.

किंवा मुंबई पुणे प्रवास केवळ ५० सेकंदात

पण स्वदेशी बनावटीचे हे विमान किती उत्तम काम करूशकते हे आपल्या शत्रुंना दाखवणे हे याच कारणा साठी आवश्यक आहे. आपल्या शास्त्रज्ञांची क्षमता दाखवणे हाही एक याचा डावपेचाचा भाग आहे .

पाकिस्तानचे JF १७ विमान हि F १६ ची स्वस्त नक्कल आहे यामुळे आतापर्यंत बऱ्याचशा अशा एअर शो मधून शेवटच्या क्षणी ते बाहेर पडले. झाकली मूठ सव्वा लाखाची

बऱ्याचशा लोकांचे गैरसमज आहेत कि क्षेपणास्त्राने एकदा लॉक मिळवला कि त्याला चुकवणे अशक्य आहे. ECM ECCM Electronic countermeasure, Electronic counter counter measures वापरून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना चुकवणे शक्य असते.

अभिनंदन वर्तमान च्या वेळेस पाकिस्तानने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे आपल्या सुखोई विमानांनी ECM वापरून भरकटवली होती.
During the India-Pakistan aerial skirmish in February 2019, two Indian Su-30MKI fighters successfully dodged incoming AIM-120 AMRAAM missiles by performing evasive maneuvers and using electronic countermeasures. The missiles were launched by Pakistan's F-16s when the Su-30MKIs were within their range, but the Indian pilots' actions caused the missiles to miss their targets.
Evasive action: The Su-30MKI pilots executed high-G, evasive maneuvers.
Electronic countermeasures: The aircraft's electronic warfare systems were used to jam the radar locks of the incoming missiles, rendering them unguided.
Chaff and flares: The pilots also deployed chaff and flares to further confuse the missiles' guidance systems.
Outcome: These defensive actions allowed the valuable Su-30MKI airframes to survive.

पण तरीही शेवटच्या क्षणी विमानाच्या चपळतेवर क्षेपणास्त्रांना चुकवणे अवलंबून असते यामुळे विमान किती चपळतेने चालवता येते हे परिमाण विमानाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असते. विमान जमिनीच्या किती जवळून उडू शकते यावर ते रडार किंवा क्षेपणस्त्राची नजर चुकवून किती जवळ येऊ शकते हे अवलम्बुन आहे. याशिवाय क्षेपणास्त्र मागे लागले असताना विमान जर जमिनीच्या अगदी जवळून उडत असेल तर क्षेपणास्त्राच्या रडार वरून ते ग्राऊंड clutter मुले गायब होऊ शकते.

या सर्व क्षमता उत्तम असतील तर विविध देश ती विकत घेण्यासाठी जास्त रस दाखवतील. तसेच शत्रूला आपल्या क्षमतेचे प्रदर्शन होऊ शकते.

आपण एकदा आपल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले कि त्या विरुद्ध शत्रूला अधिक क्षमतेची शस्त्रास्त्रे तयार करणे किंवा विकत घेणे आवश्यक ठरते यामुळे त्या देशाच्या आर्थिक क्षमतेवर ताण पडतो म्हणजेच युद्धात जास्त वेळ टिकाव धरण्याची त्याची क्षमता कमी होत जाते.

ऑपरेशन सिंदुर नंतर परवडत नसताना पाकिस्तानने अजून शस्त्रे विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. पण हि शस्रास्त्रे देखभाल करण्याची त्यांची क्षमता नसेल तर पुढच्या युद्धात ते अजूनच वाईट मार खातील हे नक्की

आपल्याला शस्त्रास्त्रे निर्यात करायची असतील तर त्याची क्षमता खरेदीदार देशांच्या समोर आणणे आवश्यक आहे. भारतीय शस्त्रास्त्रे यांचे उत्पादन पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूप कमी किमतीत होते शिवाय त्यांची देखभाल करण्यासाठी भारतीय मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे आणि ते सुद्धा बरेच कमी किमतीत. यामुळे भारत हा शस्त्रास्त्रांचा उत्तम निर्यातदार बनू शकतो.

यामुळेच भारत अशा एअर शो मध्ये तेजसला आवर्जून उतरवू इच्छितो.

याला स्टंट म्हणणे चुकीचे ठरेल.

इजेक्शन सिस्टीम च्या विफलते संदर्भात ईथे कुणीच का चकार बोलत नाही आहे?....जे एअर शो मधे झाले, ते सरावाच्या वेळीही होऊ शकले असते, युद्धाभ्यासाच्या वेळी ही, अथवा प्रत्यक्ष युद्धात ही. जसं कोणतंही वाहन म्हटलं की अपघाताची शक्यता संभवतेच, आणि त्यामुळेच प्रभावी सुरक्षेचे उपाय असणं क्रमप्राप्त ठरतं, जसे सामान्य गाडीत असणारे एअर बॅग्ज, ॲंटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), नवीन‌ आलेले ADAS, AEB...आणि लढाऊ विमानांच्या बाबतींत तर या प्रकारची सुरक्षा प्रणाली ईतर कोणत्याही ठिकाणी असणार नाही ईतकी महत्त्वाची ठरते. जर इजेक्शन सिस्टीम योग्य प्रकारे कार्यान्वित झाली असती तर अपघात घडूनही आता होतेयं ईतकी नाचक्की झाली नसती.

बातमी २०२५ फेब्रुवारी मधील आहे. जर एअर चीफ मार्शलचंच HAL बद्दल असं मत असेल, तर सामान्यांची मतं आणखी स्क्युड झाली तर त्यात दोष तो काय?
https://www.newindianexpress.com/nation/2025/Feb/11/im-just-not-confident-of-hal-iaf-chief-irked-by-delay-in-delivery-of-tejas-fighters

https://www.wionews.com/photos/why-hal-tejas-pilot-couldn-t-eject-before...

तेजस मध्ये मार्टिन बेकर मार्क १६ हि इंजेक्शन सीट बसवलेली आहे जी अनेक वेळेस उत्तम म्हणून सिद्ध झालेली आहे.

चौकशी आयोगाचा अहवाल येईपर्यंत थांबू या

मी या घटनेकडे फक्त एक दु:खद घटना म्हणून पाहत होतो. इतर पैलूंचा विचार केला नव्हता. इथे काही जण अधिकारवाणीने लिहिताना दिसले.
त्यांनी लिहिलेले वाचून काही प्रश्न पडले, त्यातलाच एक लिहिला. कोणाचा मुद्दा खोडायचा वा प्रतिप्रश्न करायचा उद्देश नव्हता.

आताही जे लिहितोय, ते बातम्या वर वर वाचून पड लेले प्रश्न आहेत. मत किंवा निरीक्षण नाही.

https://www.reuters.com/world/asia-pacific/tejas-crash-dampens-export-ho...

तेजसच्या प्रॉडक्शनच्या मंदगती मुळे मिग विमाने काढून टाकायला उशीर होत होता, असे वाचले होते.
ताजी बातमी https://www.zeebiz.com/companies/news-hal-may-miss-2026-tejas-delivery-t...
असं असताना हे एक्स्पोर्ट कधी करणार होते?

त्या एअर शो मध्ये पाकिस्तानही होता असे दिसते.
https://www.khaleejtimes.com/uae/dubai-airshow-2025-pakistan-deal-jf-17-...
Pakistan signed a memorandum of understanding (MoU) with a friendly country to sell its fighter aircraft JF-17 Thunder, which drew significant attention from defence analysts, aviation specialists and visitors in the ongoing Dubai Airshow 2025.

गेल्या शतकापासून किंवा कदाचित त्याही खूप आधीपासून युद्ध फक्त शस्त्रास्त्रांचेच नाही , तर माहितीचेही असते. आता या अपघाताचा वापर एक माहिती शस्त्र म्हणून होईल.

ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली काही विमाने पडली. ती माहिती खूप उशिरा जाहीर केली गेली. तिकडे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या चीनबद्दलच्या रिपोर्टमध्ये याचाही उहापोह आहे. चीनने माहितीचे युद्ध छेडले आणि काही देशांना राफेल विमाने घेण्यापासून परावृत्त करायचा आणि आपली विमाने त्यांना विकण्याचा प्रयत्न केला.

-
वरचा सुबोध खरे यांचा प्रतिसाद आवडला. सगळाच पटला असे नाही.

HAL मधील विलंब हा एक वेगळा मुद्दा आहे.

वायुसेना प्रमुख यांनी इजेक्शन सीट किंवा विमानाच्या दर्जाबद्दल काही म्हटलेले नाही.

आपल्याकडे स्वयंपूर्णते कडे वाटचाल करन्यासाच्या वाटेत अनेक झारीतील शुक्राचार्य बसलेले आहेत

त्यात खान मार्केट लॉबी पासून शस्त्रास्त्रांचे इतकी दशके पोसलेले दलाल पर्यंत अनेक लोक येतात. या शिवाय पाश्चात्य देश ज्यांना आपली शस्त्रास्त्रे भारताला विकायची आहेत त्यांचे हितसंबंध पण आड येतात

स्वदेशी वस्तू बनल्या तर त्यांची दुकाने बंद होतील. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी त्यात खीळ घालणे हा स्थायीभाव झाला आहे.

यात दलाल, सरकारी बाबू पासून राजकारणी असे अनेक लोक येतात

पण तो सध्या चर्चेचा विषय नाही

General Electric (GE) did not deliver engines for the Tejas on time due to supply chain issues exacerbated by the COVID-19 pandemic, which caused production bottlenecks and export licensing delays for the GE F404 engine. A failure from a South Korean component supplier also contributed to the delays. The situation is being managed with GE committed to accelerating deliveries, with plans to supply two engines per month until March 2026.

HAL inks $1-billion deal with GE Aerospace for 113 jet engines to power Tejas fighters
The delivery of engines will begin from 2027, and the supplies will have to be completed by 2032, officials said; the deal comes despite the downturn in the India-U.S. ties over tariffs
Updated - November 08, 2025 12:24 am IST - New Delhi
https://www.thehindu.com/news/national/hal-inks-1-billion-deal-with-ge-a...

वरच्या झी बिझिनेसच्या बातमीतून
The delay comes amid technical challenges, slipping production schedules, and growing concerns within the Indian Air Force (IAF) about the aircraft’s combat readiness and mission capability.

According to the sources, the indigenous content in the Mk-1A variant has declined, primarily due to the inability to integrate the Uttam Active Electronically Scanned Array (AESA) radar developed by DRDO’s LRDE. In its place, HAL has installed the Israeli Elta EL/M-2052 radar, resulting in a reduced level of indigenization in what was envisioned as a flagship ‘Make in India’ platform.

Copy link
Exclusive: HAL may miss 2026 Tejas delivery target; indigenous radar dropped
Written By Anuvesh Rath
Published: 3:15 PM, Oct 29, 2025 | Updated: 3:36 PM, Oct 29, 2025
The delay comes amid technical challenges, slipping production schedules, and growing concerns within the Indian Air Force (IAF) about the aircraft’s combat readiness and mission capability.
Exclusive: HAL may miss 2026 Tejas delivery target; indigenous radar dropped
The Tejas project is regarded as a symbol of India’s Atmanirbhar Bharat and Make in India missions. | File photo | Image: hal-india.co.in
Hindustan Aeronautics Limited (HAL) is likely to miss its 2026 delivery target for the Tejas Mk-1A fighter jet programme, highly placed sources told Zee Business. The delay comes amid technical challenges, slipping production schedules, and growing concerns within the Indian Air Force (IAF) about the aircraft’s combat readiness and mission capability.

According to the sources, the indigenous content in the Mk-1A variant has declined, primarily due to the inability to integrate the Uttam Active Electronically Scanned Array (AESA) radar developed by DRDO’s LRDE. In its place, HAL has installed the Israeli Elta EL/M-2052 radar, resulting in a reduced level of indigenization in what was envisioned as a flagship ‘Make in India’ platform.

“We want an aircraft that is war-worthy, not just fly-worthy.

रॉयटर्सच्या बातमीतून

India is a lot more careful with the Tejas, which was not actively used in the four-day conflict in May, Indian officials have said, without giving any reasons.
Nor did it participate in the annual January 26 Republic Day aerial display in New Delhi this year due to what officials said were safety reasons associated with single-engine aircraft.

Myanmar purchased the JF-17s as part of a deal with Pakistan, with deliveries taking place between 2019 and 2021. Soon after, the Myanmar Air Force grounded most of the fleet due to technical malfunctions and structural cracks, which caused tensions between the two countries.
Engine problems and maintenance
Mechanical issues: Multiple engines have reportedly developed cracks in critical parts such as guide vanes, exhaust nozzles, and flame stabilizers.
Maintenance and spare parts: A major problem is the lack of timely maintenance and a consistent supply of spare parts for the RD-93 engine.
Grounding of aircraft: The issues with parts and maintenance have resulted in a large number of JF-17 aircraft being grounded and considered un-airworthy.
Supply chain and geopolitical factors
Reliance on China: Pakistan originally sourced engines and spare parts for the JF-17 from Russia through China, but this has become a bottleneck.
Direct Russian engagement: Pakistan has reached out directly to Russia for engines, spares, and support, but its ability to secure these has been hampered by U.S. sanctions against Russian entities like Rosoboronexport.
Disruptions: The Russia-Ukraine conflict has further disrupted the supply chain and maintenance of Russian engines.
Consequences and potential solutions
Operational impact: The engine problems have become a significant operational headache for the Pakistan Air Force, causing a substantial number of jets to be grounded and impacting its defence capabilities.
Long-term solution: Pakistan and China are reportedly looking to replace the RD-93 engine with a Chinese-made alternative, but this is a complex process.

मुळात JF १७ मध्ये पाकिस्तानी संशोधन काहीच नाही ते केवळ चिनी उपकरणे आणून पाकिस्तानात जोडणी करतात.

त्यातून त्याची इंजिने रशियन आहेत आणि ती कालबाह्य झालेली आहेत.

The main issue with the JF-17 engine is a combination of mechanical problems and a problematic supply chain for spare parts, primarily related to the Russian-made RD-93 engine. Cracks have been found in components like guide vanes and exhaust nozzles, and the aircraft has faced grounding due to a lack of available spares and maintenance capabilities, with supply chain issues exacerbated by U.S. sanctions against Russia. This has led to a significant number of aircraft being non-operational, despite attempts to resolve the situation through direct communication with Moscow.

बाकी मुळात चिनी त्यातून पाकिस्तान मध्ये उत्पादन हे म्हणजे अगोदरच कारलं त्यातून ते कडुलिंबाच्या तेलात तळलं.

अझरबैजान हा देश चीनच्या कच्छपी लागलेला आहे आणि त्यांच्या BRI Belt and Road Initiative मधील एक सक्रिय भागीदार आहे

त्यातून त्यांचे तुर्कीये बरोबर साटेलोटे आहेत त्यामुळे पाकिस्तान कडून त्यांनी JF १६ घेण्यात रस दाखवला यात काही विशेष नाही.

पण JF १७ चि स्थिती एकंदर गंभीर आहे.

वायुसेना प्रमुख यांनी इजेक्शन सीट किंवा विमानाच्या दर्जाबद्दल काही म्हटलेले नाही.>>> नक्कीच, पण आर्टिकल प्रमाणे एअर चिफ मार्शल प्रायव्हेट प्लेअर्स च्या अंतर्भावाबद्दल आणि या सेक्टर मधील देशांतर्गत स्पर्धेला प्रोत्साहन या बाबींबद्दल आग्रही/खात्रीशीर दिसले...ही गोष्ट नक्कीच HAL वरील दबाव(pressure to deliver) कमी करणारी नाही आहे.

Pages