ज्वारीच्या पीठाचा उत्तपा

Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 9 November, 2025 - 03:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचे पीठ - २ वाट्या
रवा - एक वाटी
....
दही - मध्यम घट्ट, फार आंबट नसावे
पिण्यायोग्य पाणी
( हे मोजले नाही अंदाजे घातले,
बॅटर उत्तपा घालता येईल असे होईल इतपत पाणी,
अंतरात्म्याचा बास पुरे असा आवाज येईपर्यंत चे प्रमाण )
...
कांद्याची कोवळी पात, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून
(ह्यात creativity आणि स्वातंत्र्य भरपूर आहे, उधळा हवे तेवढे आणि हवे ते टॉपिंग, आपण कुणाला कशाचे बंधन घालत नसतो)
..
मीठ अंदाजे (कॉल अंतरात्मा)
खाण्याचा सोडा चिमूटभर
(चिमूटभर म्हणजे कुणाची चिमूट विचारू नका, पण म्हणून मुंगीची किंवा हत्तीची चिमूट नका वापरू, एक टी स्पून घाला काही नाही जमलं तर)
तेल ( इथे पण घ्या स्वातंत्र्य, वर्ल्ड कप आल्यामुळे फार आनंद झालाय, कशाला कोणत्या प्रमाणाच्या अंधश्रद्धा पाळायच्या, मनाला येईल तसे वागायचे)
..

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम इच्छाशक्ती आणि कंटाळा असे जबरदस्त कॉम्बिनेशन घेऊन रविवारी सकाळी काहीतरी छान खायचे आहे, पूर्वतयारी नाहीये, मेहनत कमी करायचीय, healthy पाकृ हवी असे नखरे करावेत.
कंटाळा येऊ नये म्हणून सकाळी ९ वाजता कांदेपोहे करून /करवून /मागवून खावेत म्हणजे जरा energy येते. रील्स बघायला घ्याव्यात. जरासं पहुडावं, २ तास सहज जातात.
मग ११ वाजता अचानक इच्छाशक्ती जागृत झाल्यासारखे उठावे, पाणी प्यावे आणि मिक्सर च्या जार मध्ये वर दिलेल्या प्रमाणानुरूप ज्वारीचे पीठ, रवा, दही, मीठ घालून घुर्रर्र करून घ्यावे.
झाकण उघडून बघावे, तर त्यात अपेक्षे प्रमाणे बॅटर दिसणार नाही कोरडे पीठ दिसेल, अरेच्चा पाणी राहीलच की!
असे म्हणून बेताने पाणी घालावे.
झाकण लावून अजून एकदा घुर्रर्र करावे.
हे घट्ट मिश्रण एका बोलमध्ये काढून, मिक्सर जार मध्ये पाणी घालून तो चांगला विसळून ते पीठाचे पाणी त्या बोल मध्ये ओतावे.
छान व्हिस्क करून घ्यावे.
आता ह्या स्टेप ला तुमचा किंवा ai चा intelligence वापरून consistency योग्य आहे की नाही हे ठरवावे.
साधारण पळीने बॅटर तव्यावर टाकल्याअंतर आपणहून जरासे पसरले पाहिजे, पण सैरावैरा पळून नाही गेले पाहिजे.
( नाही कळलं तर जीपट्या ला prompt द्या, u need to upgrade cooking techniques guys )
.... आता खाण्याचा सोडा घाला, गरज वाटत असेल तर मीठ घाला, हलक्या हाताने मिक्स करून ह्या मिश्रणाला १ तास आराम द्या. खरे तर १५ मिनिटे रेस्ट दिली तरी चालेल, पण रविवार आहे मिश्रणबरोबर तुम्ही सुद्धा एखादी वामकुक्षी घेऊन टाका.
..
Screenshot_20251109-140654~2.png
आता १२ वाजता उठा, सिंडारेला च्या थाटात आवडत्या भाज्या किंवा वरती दिलेल्या भाज्या घ्या त्यात किंचित मीठ किंवा चाट मसाला घालू शकता मिसळून ठेवा किंवा हवे तसे उचलून sprinkle करू शकता.
Screenshot_20251109-140658~2.png
..
नॉन स्टिक चा तवा तापायला ठेवा.
मिश्रण बघा कसे झालेय , त्यात एक पळी type चमचा बुडवा आणि अंदाजे दीड पळी मिश्रण घेऊन तव्यावर घाला. जास्त पसरवायचं नाही, किंचित जरासं पसरून गोलाकार द्यायचा.
गॅस मध्यम आचेवर हवा.
आता त्यावर टॉपिंग च्या भाज्या घाला किंचित तेल आजूबाजूने सोडा आणि थोडे हवे असेल तर वरती घालू शकता. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, उलथणे लाकडी वापरायचे आणि परतयच्या आधी भाज्या जरा प्रेस करायच्या म्हणजे त्या सुटणार नाहीत आणि दोन्ही बाजू नी व्यवस्थित भाजलं जाईल.
अल्टी पलटी करून छान भाजून घ्या.
Screenshot_20251109-140703~2.png
कुठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तप्पा कसा झाला हे एकदा तुझ्या घरी येऊन तो खाऊन मग लिहिते पण पाकृ एकदम खुसखुशीत, खमंग, तोंडाला पाणी आणि तोंडावर हसू आणणारी झालीय हे नक्की..
Happy Happy

छान दिसताहेत.

रवा+ ओट्स करतो. >> +१. रवा+ओट्स+नाचणी/तांदूळ पीठ पण करतो. आता रवा+ ज्वारी करून बघणार. जमले नाही तर रवा+ओट्स+ज्वारी करून बघणार.

पाकृ एकदम खुसखुशीत.

मी ज्वारीच्या पिठात थोडं बेसन पीठ घालून करते नेहमीच.

धन्यवाद मंडळी Happy
चटकन होणारा healthy पदार्थ आहे
आयडिया आवडली मला म्हणून लिहिला इकडे

फारच छान, नक्की करून बघेन. एकदा नुसत्या ज्वारीच्या पिठाचे घावन करायचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

नुसत्या ज्वारीचा डोसा माझा पण फसला होता गोळा प्रकरण झालं होतं.नुसत्या दही- रव्याचा नेहमी करते आता या रेसिपीने करून पाहीन .उत्ताप्याचा फोटो पाहून भूक खवळली.उद्याच नाश्त्याला करते.

मस्त दिसतोय एकदम. लिहीलंय पण खुसखुशीत.

(शीर्षक वाचून एकदम केळीचे सुकले बाग ऐकू आलं. चालीत म्हणून पाहीलं.) Happy

छान ज्वारीचे धिरडे कायम व्हायची पुर्वी.
आई 'करीच्या' दिवशी ज्वारीचे धिरडे कायम करायची. गुळवणी आणि धिरडे,

हा प्रयत्न करून पहायला हरकत नाही!

ज्वारीपीठ, तांदूळ पीठ, रवा, बेसन, नाचणी पीठ, कणिक हे सगळ थोडं थोडं घेऊन पातळ धिरडी नेहमी करते पण हा उत्तप्पा कमाल दिसतोय त्यामुळे नक्की करून बघणार .

सोडा avoid केला तर जास्त वेळ rest द्यावी लागेल असे वाटते.
.
नक्की करून बघा मंडळी Happy
धन्यवाद

सोडा घातला नाही तर रेस्ट देऊन ही एवढी जाळी पडणार नाही असं मला वाटत.
पाणी घालून पातळ घावन करता येतात पण उत्तप्पा वेगळा घावन वेगळे.
सोडा नको असेल तर घावन घालून बघ ह्या पीठाचे, पातळ आणि जाळीदार.

आज सकाळी केले.
दिसायला चांगले दिसतात. खायला चटणी/ लोणी/ केचप काय घेऊ त्याचीच चव. बाकी मी केले त्याला तरी काही चव म्हणावी अशी लागली नाही. पण हेल्दी असतील तर सकाळी १५-२० मिनिटांत दोघांपुरते करुन खाऊन होतात. वाईट लागत नाहीत इतपत प्रशंसनीय नक्की आहेत. तसंही कनेडिअन माणूस हौआर्यू ला 'नॉट टू बॅड!' हेच उत्तर देतो.

अरे वा केले पण!
सात्विक चव असते ना..
लोणचं लावून खायचं चटकदार चवीची अपेक्षा असेल तर
किंवा टॉपिंग्स ला चाट मसाला, गरम मसाला लावून लाड करता येईल

हो हो! सात्विक म्हणू. Lol
गरम मसाला आणि चाट मसाला नको. मला बेचव जेवणं आवडतं. आता त्याला सात्विक म्हणत जाईन. Wink
मी सॉल्टेड बटर आणि चहा बरोबर खाल्ले. वाईट लागले नाही. Happy

सोडा नको असेल तर घावन घालून बघ ह्या पीठाचे, पातळ आणि जाळीदार >>>> हम्म चांगली कल्पना.

बाकी चवीपेक्षा १५-२० मिनीटांत दोघांपुरते होतात हे फार महत्वाचे. नक्कीच करून पाहीन.

काल केला होता ,मस्त झाला होता हेल्दी उत्तापा, मी गाजर घालून अजून हेल्दी केला.IMG_20251111_073423.jpg
आधी चिकटतोय का काय असं वाटलं पण मस्त सुटून आला. रवा इज गेम चेंजर.फक्त किल्ली सारखी खालून जाळी पडली नाही . पण खमंग भाजला होता.
IMG_20251111_073534.jpg
फक्त पाण्याचं प्रमाण अंदाजे तरी लिही किल्ली. पाणी जास्त झालं तर डेलिकेट होईल .मी एक वाटी ज्वारी ,अर्धी वाटी रवा ,पाच टीस्पून दही आणि एक वाटी पाणी घातलं होत. चिमुटभरच सोडा Happy
IMG_20251111_074033.jpg
चव नेहमीच्या उत्तप्पा पेक्षा ऊंनीस बीस लागते पण हेल्दी ऑप्शन म्हणून चांगला आहे . पोटभरीचा आहे.

आज केला होता मी. पण मला विशेष चव आवडली नाही.
भाकरी सारखाच लागत होता !
त्याच्या शक्यता अशा:
दही पुरेसे आंबट नव्हते
इनो न घालता खायचा सोडा घातला होता.
माहित नाही....
Happy

Pages