डिसेंबरदरम्यान अंटार्क्टिकामध्ये गटग

Submitted by च्रप्स on 30 October, 2025 - 22:13

डिसेंबरदरम्यान अंटार्क्टिकामध्ये तिथल्या माबोकरांना भेटण्याची तीव्र (आणि थंडगार) इच्छा आहे.

७-८ डिसेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा सुरू केला आहे.

फक्त अंटार्क्टिकामधलेच माबोकर असं काही नाही …आसपास कुणी येऊ शकणार असतील, त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.

२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा, आणि गरम चहावर चर्चा — असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया कळवा — जॅकेट आणि थर्मस तयार ठेवा!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर, तुम्ही खरंच जाताय डिसेंबर ७- ८च्या माबो गटकला ! तो ट्रम्प उत्तर ध्रुव ताब्यात घेतोय म्हणून आपला ट्रम्प दक्षिण ध्रुव ताब्यात घ्यायला जातोय, अशी चर्चा सुरू आहे बाहेर !!20190103_072130_0 (1).jpg

मी तिथून जवळच राहतो. गटगला आलात तर सगळे माझ्याकडे चक्कर मारा. मला गटगला यायला जमणार नाही, क्षमस्व.

आधार कार्ड आहे फक्त
त्यावरचा आणि व्हॉट्सॲप चा फोटो मॅच होत नाही
येता येईल का?
खादाडी चा मेनू आगाऊ कळवणे त्यावरून ठरवले जाईल काय ते

*भारतीय पासपोर्ट असल्यास व्हिसा लागत नाही.* -
तिथे लोकवस्ती वाढवायची असल्याने, तिथे जायला व्हिसा लागत नसला तरी तिथून परत बाहेर यायला परवानगी मिळते का ? Wink

त्यावरचा आणि व्हॉट्सॲप चा फोटो मॅच होत नाही
येता येईल का?>>>>

आधारवरचा फोटो आणि त्याच इसमाचा इतर कुठलाही फोटो या दोघात जर साम्य आढळले तर आधार पाच वर्षांसाठी बॅन होते म्हणे.

किल्ली तु सेफ आहेस गं..

मी आले असते पण अंटार्क्टिकावर हल्ली गरम होते म्हणे. मला आता गरमी सोसत नाही.

मेट्रो स्टेशनच्या जवळचे ठिकाण ठरवा.. सोईचे पडेल.
तिथले पेंग्विन अंगावर भुंकत येत नाहीत ना?
खादाडी च्या मेनू बद्दल किल्लिशी सहमत..
हर पा, तुमची पेटी ऐकायचा योग येईल जर तुम्ही आलात तर...

एक बरंय.
आईस क्युब्ज आणायला नकोत..

खादाडी मेन्यू -
स्टार्टर्स मध्ये पेंग्विन लॉलीपॉप आणि सील कबाब सोबत पुढे मेन कोर्स ब्लू व्हेल डायनिंग असेल. शाकाहारी लोकांना क्रिल्स थालीपीठ मिळू शकते.

माझ्या मित्राचे काका भारताच्या संशोधन टीमबरोबर पूर्वी अंटार्क्टिकामध्ये गेले होते. त्यांचा तांबड्या रगाचा आवडता मफलर चुकून तिथे कॅम्पमध्ये उभारलेल्या एका खांबावरच फडकत राहिला आहे. डिसेंबरमध्ये तिथे जाणाऱ्यानी जरा लक्ष ठेवून तो परत आणावा अशी त्यानीं विनंती केली आहे !

माझ्या एका पटेल मित्राचे मोटेल आहे तिथे.. आणि खाण्याची चिंता नको.. एका गुज्जू ने ग्रोसरी स्टोर ओपन केले आहे...

दगडाला शेंदूर फासल्यावर कालांतराने तिकडे मंदिर बनते तसेच ह्या मफलरचे झालेले ऐकिवात आहे की लाल सलाम वाल्या टीमचे ते आता स्वयंभू स्थान बनलेय

अरे मस्तच, एन्जॉय करा. माझ्याकडून शुभेच्छा.

भाऊकाका हाहाहा, कार्टून भारीच.

सर्व प्रतिसाद एकसे बढकर एक.

मैत्रीण म्हणत होती फारच cliche झालंय तिकडे
लोकांनी reels करून करून कॉमन केलं आहे
काहीतरी नवीन ठिकाण शोधा
मंगळ ग्रह वगैरे
तिकडून येताना शेंदूर घेऊन येता येईल
पुण्यात मंगळवारच्या शेंदुराचे दुकान काढीन म्हणते मंडईत

Lol आर्क्टिक वर का नाही ठेवले गटग. माझ्या मावसभावाचे लग्न आहे तेव्हा, बाहेरच शामियाना टाकलाय. मस्त वांग्या- बटाट्याची पातळ भाजी, जिलबी, मसालेभात आणि पेनग्विनचे वडे आणि सीलकढी आहे प्रीतीभोजनाला. फुकट जेवलो असतो. "थ्री इडियट्स" मधल्या सारखे. बघा, अजूनही खंड बदलता येतो का ! Proud

images (2).jpeg

सर्व गटग उत्सुक माबोकरासाठी दोन्ही खण्ड जोडण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन समृद्धि हाइवे पूर्ण करून देणाऱ्या मंत्र्यांनी दिले आहे

त्यामुळे सर्वानी येणेचे नक्की करावे ऐसे आग्रहाचे निमंत्रण

सर्वांनी या विषयाचा मजाक बनवून ठेवला आहे,
पण मी मात्र खरेच येऊ शकतो टेक्निकली
कारण माझा एक आयडी तिथला आहे

पण मी येणार नाही प्रॅक्टीकली
कारण मी माणूसघाणा असल्याने कुठल्याच गटगला जात नाही.

Lol अनि.

ऋ, तेथे मी मावशीला तुझ्यासाठी इग्लू बांधून वर शाखाचे पोश्टर लावून ठेवायला सांगितले होते. पण जाऊ दे आता.

गाईज!! डिसेंबर मध्ये अंटार्टिका मध्ये समर असतो. हापपँटीत जा.
विंटर हवा असेल तर इकडे या.

बाहेरच शामियाना टाकलाय >> हा शब्द ऐकला की लगेच डोक्यात "आओ सिवाजी आओ, हमारे गले लग जाओ" वगैरे टेप अफजुलखानाच्या आवाजात वाजायला लागते.

गाईज!! डिसेंबर मध्ये अंटार्टिका मध्ये समर असतो. हापपँटीत जा.
>> म्हणूनच प्लॅन तेंव्हा केलाय...

गाईज!! डिसेंबर मध्ये अंटार्टिका मध्ये समर असतो. हापपँटीत जा.
>> म्हणूनच प्लॅन तेंव्हा केलाय...

हो. खास सिवेट्सच्या विष्ठेतुन गोळा करुन, धुवुन, वाळवुन दळलेली आणि सिल्सच्या दाट दुधात केलेली. हवी तितकी घ्या. उन्हाळा नसेल तर कोल्ड कॉफी पण मिळेल, डोळ्यांसमोर बर्फात ठेऊन कोल्ड केलेली.

नसेल तर बनवतील. प्लेन चार्टर करा आणि ते हेलीपॅड वर उतरवा. तिकडे गुरुत्वाकर्षण कमी असणार. प्लेन उतरेल आरामात.

बेअर ग्रिल्सचा शो माहिती आहे ना? तसे कुठेही हिमनगावर सोडून देणार आहेत, परत गटगस्थानी चालत चालत, पोहत पोहत, चढत चढत, रांगत रांगत यायचं आहे. च्रप्स सगळ्यांना दोरीला बांधून नेणार आहेत. तयार राहा आणि निदान हाफपॅंट तरी घाला. Wink वाटेत सीलच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नका, "तुम्हारी आंखो में जादू है" म्हणत प्रेमात पडतात म्हणे ते. उगा मला निस्तरायला लावू नका.

शाखा येणार आहे ऋ, त्याच्या इग्लूवर तुझं पोश्टर लावलंय. दोन खंड जोडले की श्रीखंड करतो म्हणाला. चक्का टांगून ठेवलाय मन्नत मधे. फक्त तुझ्यासाठी येतो म्हणाला म्हणजे तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. मला म्हणाला "तू माझ्या सारखीच चुरचुरीत बोलण्याची प्रंप्रा सांभाळ माबोवर." Proud

हर्पा Proud

शाखा ला यायला जमणार नाही म्हणाला.. वर्तमान पत्राची रद्दी घालायला तोच दिवस त्याने राखून ठेवलाय.. आणि संध्याकाळी त्याला जुन्या फाटक्या नोटा बदलून घ्यायला जायचे आहे...

गटग दोन दिवस आधीच जाहीर करा आणि प्रत्यक्षात दोन दिवसांनी भेटा, म्हणजे "अर्र आज समजले, नाहीतर नक्की आलो/आले असते" वाले ते खरोखरच येतात का बघता येईल - असे लिहीणार होतो पण डिसेंबर मधे तेथील दिवस महिन्यापेक्षा मोठा असतो. मी तेथील हॉटेल मधे टू नाइट्स बुकिंग विचारले, तर ते म्हंटले "नाईस ट्राय" Happy

*...तेथील दिवस महिन्यापेक्षा मोठा असतो. मी तेथील हॉटेल मधे टू नाइट्स बुकिंग विचारले.....* Wink
( फारएंडजी, क्रिकेटचे एकदिवसीय सामने ठेवायला छान व्हेन्यू व मोसम आहे, असं नाही वाटत ? )

परफेक्ट, भाऊ Lol

दोन खंड जोडले की श्रीखंड करतो म्हणाला >>> Lol

त्याच्या इग्लूवर तुझं पोश्टर लावलंय >>> मी यामी किंवा करीनाचे लावणार होतो. पण इग्लू वितळले असते.

“टू नाइट्स बुकिंग विचारले.....” Lol

“क्रिकेटचे एकदिवसीय सामने ठेवायला छान व्हेन्यू व मोसम आहे” - दोन एक “दिवसीय” सामन्यात आक्खी टेस्ट बसेल Happy

Lol

मजा सुरुय
फा Lol

Btw

ते गडकरी साहेबांनी आणलेली वर्षांचा टोल रिचार्ज 2 हजारात फक्त अशी स्कीम मारू काय मग फास्ट टॅग ला?
कार पुलिंग करून मी अधिक 3 माबोकर येउ शकतो.
CNG pump आहे ना तिथे?
गर्दी असते का?
Jio चा टॉवर आहे ना?

शामियाना>>> Lol
वाटेत सीलच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नका, "तुम्हारी आंखो में जादू है" म्हणत प्रेमात पडतात म्हणे ते. उगा मला निस्तरायला लावू नका.>>> Lol
धमाल प्रतिसाद आहेत सगळेच Lol

Pages