फिंच म्हटल्यावर डार्विन आणि त्याच्या theory of evolution by natural selection मधल्या फिंच पक्ष्यांच्या चोचींच्या आकृत्या डोळ्यासमोर यायच्या. भारतात कधीही हा पक्षी मी पाहिला नव्हता. आणि इथे आल्यापासून रोज दर्शन होतेय! गंमत म्हणजे यांना पाहिल्यावर मला हमखास आपल्याकडच्या चिमणीची आठवण येते पण मी असलेल्या सध्याच्या या भागात मला प्रत्यक्ष चिमणी मात्र फारशी दिसल्याचं आठवत नाही. आपल्याकडील चिमणा नाही, पण चिमणीताई मात्र इथल्या सौ. हाऊसफिंचसारख्या पुष्कळच दिसतात. तसाच करडा रंग, आकार आणि हो तशीच चोच!
या घरात आल्यावर बाजूच्या झाडांवर चिमणीसारखे पक्षी दिसतायत असं लक्षात आलं होतं. काहींच्या डोक्यांवर, मान, छाती, पाठीचा काही भाग इ. ठिकाणी लालभडकपासून हलक्या लाल रंगाचा शिडकावा. तर काही मळखाऊ, तपकिरी रंगांच्या. काहींच्या चोची, कपाळा-डोक्यावर कोवळी, उभी पिसं. तसं असलं तर ती नुकतीच पंख फुटलेली पिल्लं. इंटरनेटवर वाचून, इकडेतिकडे विचारुन हे हाऊसफिंचच असल्याचं शिक्कामोर्तब करुन घेतलं.
बर्ड फिडर लावलं होतं तेव्हा त्याचा पहिला सुगावा याच पक्ष्यांना लागला होता. मागोमाग त्यांचे गोल्डफिंचसारखे भाईबंधूही यायला सुरुवात झाली होती. प्रचंड सांडलवंड करणारे पक्षी असल्याने वैतागून फिडर काढून टाकलं आणि फक्त पाण्याची व्यवस्था केली. आता जास्त प्रमाणात फिंच दिसू लागले. पिण्याबरोबरच डुंबायलाही पाणी मिळत होतंच.
हा आहे house finch (male). दिसायला हा पक्षी नि:संशय आकर्षक आहे. लाल आणि डार्क चॉकलेटी रंगाचा मस्त बॅलन्स आणि त्यातून साधलेली पिसांची रचना फार मोहक दिसते.
पाण्यात सचैल स्नान झालं की वर मी जी काठी लावली आहे त्यावर बसून अंग फुगवत, पंख/पिसं फुलावून बसतात काहीजण. आता याला काय म्हणाल? पावडर पफ? 
एक दिवस एक फिंच आला आणि ताबडतोब लक्षात आलं की हा लाल नाहीतर त्याचा रंग केशरीकडे झुकतोय. नव्हे केशरीच पिसं आहेत की ही! केशरी-पिवळसर फिंच दिसला नव्हता तोपर्यंत.
जेव्हा त्यांच्या आहारात बदल होतो, तेव्हा अशा प्रकारे पिसांचा (plumage) रंग बदलू शकतो.
नंतर अजून एकदा नेहमीच्या गोल्डफिंचसमवेत पिवळ्यातून केशरीपणाकडे झुकणारा अजून एक फिंच दिसला.
लाल झाले, केशरी झाले, आता आपल्या पिवळ्याधमक गोल्डफिंचकडे येऊ या. अगदी हळदीने न्हायलेले जणू. यांना camouflage अप्रतिम जमतं. झाडांच्या हिरव्या पिवळ्या पानांत इतके सफाईदारपणे एकरुप झालेले असतात, त्यातच कधीकधी पानांचा आकारही या पक्ष्याएवढाच असला की कितीही बघितलं तरी पटकन काही दिसायचे नाहीत. भुरकन उडून गेले की मग कळतं की अरे! इतका वेळ इतक्या समोर होता आपल्या हा?
बरेच फिंच पाण्यावर उतरण्याआधी या काठीवर किंवा माझ्याकडे एक प्लांट स्टँड आहे, त्यावर बसून, भरपूर वेळ घेऊन मग खाली उतरतात.
पाठमोरा/पाठमोरी गोल्डफिंच. (Lesser Goldfinch किंवा Breeding female goldfinch). पिसांची रचना बघा.
पक्षीजगतातल्या नियमानुसार सौ. गोल्डफिंचचा पिवळा रंग बराच निस्तेज दिसतो. श्रीयुतांसारखी सोनसळी झळाळी नसते.
बर्ड बाथमध्ये छोटे कारंजे लावल्यावर सगळ्यात धमाल करणारे पक्षी म्हणजे हे गोल्डफिंच. एकटे-दुकटे कमी येतात, बर्याचदा सहकुटुंब किंवा मित्रमंडळींसह आमच्या वॉटर पार्कात यांची व्हिजीट असते. 
फिंच पक्षी, रोजच्या रोज कितीही आले तरी मन भरत नाही. त्यांच्या येण्याजाण्याने एरवी शांत असणारी बाल्कनी एकदम जिवंत होते. आणि हो, गोल्डफिंचचा चिवचिवाट खूपच मंजूळ असतो. त्यासाठीपण त्याला फुल मार्क्स!
(इथे ऐकू शकाल)
पुढील पक्षी पुढील भागात.
क्रमशः
(पक्षीनिरीक्षणावरील मागील लेखः छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!)
सुंदर.
सुंदर.
क्रमशः आवडले. लेख आवडला.
क्रमशः आवडले.
लेख आवडला. फिंचलाच ग्रॉसबीक म्हणतात का? गुगल करते पण मला वाटतं ग्रॉसबीक हा चोचीचा शेप आहे. त्यावरुन अनेक पक्षी या नावाखाली येत असतील.
-------------
होय तसेच दिसते.
------------
पक्षीनिरीक्षण करताना, आपण पक्षी शोधू लागलो की झुडुपात एकदम गप्प होउन जातात ते. आणि गंमत म्हणजे, जर आपली नजर त्यांच्या, नजरेला भिडली की त्यांच्या लक्षात येते की आपल्याला ते दिसलेले आहेत व उडून जातात. मला आश्चर्य याचे वाटते की हे ज्ञान/ इन्स्टिन्क्ट कशी की आपण डोळ्यात पाहीले की आपण त्यांना पाहू शकतो हे कळते. किंवा मग आपले सूक्ष्म हावभाव बदलत असावेत.
मस्त!
मस्त!
मस्त! फोटो पण छान आले आहेत.
मस्त! फोटो पण छान आले आहेत. अगदी खुश दिसतायत.
आमच्याकडे हे लाल / केशरी दिसतात. पिवळा नाही दिसला कधी.
केशरी सारखाच निळा असतो तो दिसतो बऱ्याचदा.
इथे कावळे पण कमी आढळतात.
मैना/ साळुंकी असते.
मस्त आलेत फोटो
मस्त आलेत फोटो
धन्यवाद
धन्यवाद
ग्रॉसबिक वेगळे पण हीच फॅमिली असणार, चोचीचा आकार सेम आहे.
हो पक्ष्यांना आपण पाहण्याआधी त्यांनीच आपल्याला पाहिलेलं असतं.
>>केशरी सारखाच निळा असतो तो दिसतो बऱ्याचदा.
अगं तुझ्याकडे ब्ल्यू ग्रॉसबिक दिसतो की काय ? ही लिंक बघ बरं आणि हाच आहे का सांग? किंवा तिथेच खाली बंटींगचेही चित्र आहे, तोही असू शकतो.
https://www.allaboutbirds.org/guide/Blue_Grosbeak/id
मला कधीपासून पहायचा आहे हा...इथे नाही दिसत कधी.
मैना/साळुंकीही दिसते? :आश्चर्यः
मला औषधालाही कधी दिसली नाहीये. मला वाटायचे की तो भारतीय खंडातला पक्षी आहे
नाही त्या लिंक वरचे खूपच
नाही त्या लिंक वरचे खूपच ब्राईट आणि सुंदर आहेत.
हा छान दिसतो...पण त्या सारखा नाही, मी arat दिसला तर फोटो काढेन ( जमलं तर)
आमच्या परिसरात अतिशय मोठी /
आमच्या परिसरात अतिशय मोठी / बारा महिने हिरवी असणारी झाडे आहेत.
एकदा बारकाईने बघितले होते.. एका एका झाडावर अनेक घरटी होती. खारी , पक्षी पूर्ण इकोसिस्टम च वसते असं वाटलं.
मागे वादळात झाडं/ फांद्या पडून PGNe चे बहुदा (?) नुकसान झाले तेव्हापासून बऱ्याच फांद्या chhatu टाकतात .. त्याचा विस्तारही ( canopy) छोटी झालिये.
फारच छान. फोटो खूप सुंदर.
फारच छान. फोटो खूप सुंदर.
धन्यवाद सुनिधी!
धन्यवाद सुनिधी!
>>हा छान दिसतो...पण त्या
>>हा छान दिसतो...पण त्या सारखा नाही, मी arat दिसला तर फोटो काढेन ( जमलं तर)
जरुर. कदाचित वेस्टर्न ब्ल्यूबर्ड असेल मग. ते बर्यापैकी कॉमन आहेत. इथेही पुष्कळदा दिसतात.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
Indian Silverbill, Red Avadavat पाहिले आहेत .
फिंच म्हटल्यावर डार्विन आणि त्याच्या theory of evolution by natural selection मधल्या फिंच पक्ष्यांच्या चोचींच्या आकृत्या डोळ्यासमोर यायच्या.>>>>>> अगदी अगदी
फोटो आणि माहिती छान आहे
फोटो आणि माहिती छान आहे
धन्यवाद ऋतुराज, जाई.
धन्यवाद ऋतुराज, जाई.
वर्षा तुम्ही कॉर्नेल लॅबचे
वर्षा तुम्ही कॉर्नेल लॅबचे मर्लिन आणि इ-बर्ड ही दोन अॅप वापरता का? नसाल वापरत तर नक्की वापरून बघा. तुम्हाला पक्षी निरिक्षणाची नॅक अंगभूत आहे. या दोन अॅपचा खूप उपयोग होईल
मर्लिन केले होते डाऊनलोड पण
मर्लिन केले होते डाऊनलोड पण काहीतरी आवडले नाही म्हणा किंवा जमले नाही म्हणून डीलीट केले होते. पण त्यालाही आता बराच काळ गेलाय. पुन्हा ट्राय करीन. इ-बर्ड माहित नव्हते, बघते तेही. धन्यावाद.
फोटो आणि माहिती छान !
फोटो आणि माहिती छान !
धन्यवाद डॉक्टर!
धन्यवाद डॉक्टर!
नुसतंच पक्षीनिरीक्षण करत
नुसतंच पक्षीनिरीक्षण करत बसणंही किती आनंददायी आहे नां? वर्षा, खूप लकी आहेस तू.
तुमच्या भागात जर हमिंगबर्ड्स दिसत असतील तर शुगर नेक्टर पण टांगून बघ नां. अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी ॲना‘ज हमिंगबर्ड दिसतो.
इ-बर्डवर तुला दिसलेल्या पक्षांची नोंद करत जा. तुझ्या भागात कोणते पक्षी दिसतात ते ही कळेल त्यावर.
>> नुसतंच पक्षीनिरीक्षण करत
>> नुसतंच पक्षीनिरीक्षण करत बसणंही किती आनंददायी आहे नां?
हो तर!
माझ्याकडे दररोज अॅनाज हमिंगबर्ड्ज येतात पाणी प्यायला, पाण्याच्या स्रोताच्या उगमावरच जाऊन बसतात अगदी. त्यामुळे शुगर नेक्टर फीडरचा सध्यातरी प्लॅन नाही. शिवाय शेजारी पाजारी ते टांगलेले आहेतच.
>>इ-बर्डवर तुला दिसलेल्या पक्षांची नोंद करत जा. तुझ्या भागात कोणते पक्षी दिसतात ते ही कळेल त्यावर.
होय हे करणार आहे