मायबोली गणेशोत्सव २०२५ मतदान धागे व निकाल

Submitted by संयोजक on 9 September, 2025 - 08:28

मायबोली गणेशोत्सव २०२५ स्पर्धा मतदानाचे धागे

पाककृती स्पर्धा १ पदार्थ आमचा सजावट तुमची - अ - वरण भात
https://www.maayboli.com/node/87237

प्रथम क्रमांकः-
वरणभात सजावट - मनीमोहोर https://www.maayboli.com/node/87076

द्वितीय क्रमांक:-
वरण भात- निल्स_23 https://www.maayboli.com/node/87105

तृतीय क्रमांक:-
वरणभात सजावट - हर्पेन https://www.maayboli.com/node/87176

पाककृती स्पर्धा १ पदार्थ आमचा सजावट तुमची - ब - शिरा
https://www.maayboli.com/node/87235

प्रथम क्रमांकः-
शिरा- निल्स_23 https://www.maayboli.com/node/87133

द्वितीय क्रमांक:-
शिरा सजावट - स्वाती_आंबोळे https://www.maayboli.com/node/87134

तृतीय क्रमांक:-
शिरा सजावट- अल्पना https://www.maayboli.com/node/87195

पाककृती स्पर्धा २ चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ
https://www.maayboli.com/node/87236

प्रथम क्रमांकः-
आईस ब्लू बनाना स्मुदी - निल्स_23 https://www.maayboli.com/node/87191

द्वितीय क्रमांक:-
करीब- करीब लाडू - अस्मिता. https://www.maayboli.com/node/87074

तृतीय क्रमांक:-
मँगो डिलाईट - मनीमोहोर https://www.maayboli.com/node/87188

पाककृती स्पर्धा ३ फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ
https://www.maayboli.com/node/87238

प्रथम क्रमांकः-
अवाकाडो पापडी चाट- निल्स_23 https://www.maayboli.com/node/87154

द्वितीय क्रमांक:-
अननसाचा गोज्जू - कविन https://www.maayboli.com/node/87217

तृतीय क्रमांक:-
पहाडी पेरू चाट - जाई. https://www.maayboli.com/node/87126

शशक स्पर्धा १
https://www.maayboli.com/node/87242

प्रथम क्रमांकः-
'ती' आणी 'तो'- निल्स_23 https://www.maayboli.com/node/87150

द्वितीय क्रमांक:-
बोल - जाई. https://www.maayboli.com/node/87110

तृतीय क्रमांक:-
विश्वास - अni https://www.maayboli.com/node/87108
दोन पायांचा गणपती – ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/87184

शशक स्पर्धा २
https://www.maayboli.com/node/87241

प्रथम क्रमांकः-
फॅमिली व्लॉग - मॅगी https://www.maayboli.com/node/87123

द्वितीय क्रमांक:-
पत्र - अni https://www.maayboli.com/node/87148

तृतीय क्रमांक:-
सवत तिची मायबोली (ऑल ईन वन शशक) – ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/87163

शशक स्पर्धा ३
https://www.maayboli.com/node/87240

प्रथम क्रमांकः-
हे पान पाहायची परवानगी नाही - अni https://www.maayboli.com/node/87120

द्वितीय क्रमांक:-
माबोचा सैराट - अस्मिता. https://www.maayboli.com/node/87205

तृतीय क्रमांक:-
डेलिगेशन - आशिका https://www.maayboli.com/node/87168
संयोजक रॉक्स! गणेशभक्त शॉक्स!! – ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/87204

शशक स्पर्धा :- वेगळा प्रयत्न
https://www.maayboli.com/node/87239

प्रथम क्रमांकः-
दुटप्पी - अतुल. https://www.maayboli.com/node/87151

द्वितीय क्रमांक:-
होम मिनिस्टर! - छंदीफंदी https://www.maayboli.com/node/87144
एक क्षण अभिमानाचा - रीया https://www.maayboli.com/node/87140

तृतीय क्रमांक:-
मायलेक भाग २ - छंदीफंदी https://www.maayboli.com/node/87166

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशक स्पर्धा :- वेगळा प्रयत्न
>>>>
हे काही समजले नाही.
आधी स्पर्धेत अशी काही कॅटेगरी नसताना काही शशक वेगळ्या काढून का यात घेतल्या?
आणि कुठल्या निकषावर?

माझा आक्षेप काही नाही. पण असे का करावे वाटले आणि ते करताना वापरलेले निकष जाणून घेण्यास उत्सुक. ते समजले तर त्यानुसार पुढच्या वर्षी प्लान करता येईल Happy

हो आणि ही कॅटेगरी काय आहे ते माहित नसल्याने कुठल्या निकषावर मत द्यावे कळलं नाही.

शिवाय त्या त्या शशक धाग्यांच्या लिंक्स दिल्यास बरं होईल. कित्येक शशक वाचून आवडलेल्या पण आता नुसते शीर्षक किंवा लेखक वाचून आठवत नाही.

मला वाटते शशक १ ,२, ३ स्पर्धांमधील एकापेक्षा जास्त वाक्ये जर एकाच कथेत असतील तर ती कथा वेगळा प्रयत्न या कॅटेगरी मध्ये टाकली आहे. बरोबरच आहे संयोजकांचे. अश्या कथा मग तीनपैकी कुठल्या गटात टाकणार ?

बाकी मतदानाच्या धाग्यावर शशकच्या नावाबरोबर लिंकपण दिली असती तर बरे झाले असते, म्हणजे पटकन वाचून मग मतदान करता आले असते. आता शोधून वाचल्या.
अगोदर वाचल्या होत्या, पण नावे लक्षात नव्हती. त्यामुळे कोणत्या नावाची कोणती कथा हे आठवत नव्हते. बऱ्याच कथा आहेत ना या वेळी.

मला वाटते शशक १ ,२, ३ स्पर्धांमधील एकापेक्षा जास्त वाक्ये जर एकाच कथेत असतील तर ती कथा वेगळा प्रयत्न या कॅटेगरी मध्ये टाकली आहे. बरोबरच आहे संयोजकांचे. अश्या कथा मग तीनपैकी कुठल्या गटात टाकणार ?
>>>>>

ओके, रिया ची कथा तशी होती हे माहीत होते. बाकीच्यांची कल्पना नव्हती.

माझी पण एक कथा अशी होती. जिच्यात मी तिन्ही वाक्ये आणि येथील स्पर्धा-उपक्रम संदर्भ वापरले होते. पण ती कुठल्या गटात टाकावी हे शीर्षकात क्लिअर केले होते.

हे असे,

शशक २ – सवत तिची मायबोली (ऑल ईन वन शशक) – ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/87163

पण आधी कल्पना असती असा गट तयार केला जाईल तर तसेच राहू दिले असते Happy

ते मी दिलेच Happy

माझ्यासाठी हार जीत महत्वाची नाही.. त्याची चर्चा महत्वाची Proud

https://www.maayboli.com/ganeshotsav/2025

इथे लोकांनी काढलेले कोणतेच धागे दिसत नाहीयेत. सहसा ह्या पानावर सर्व धागे एकत्रित दिसतील अशी रचना केलेली असते ना.

उदा.
https://www.maayboli.com/ganeshotsav/2021
https://www.maayboli.com/ganeshotsav/2020

हे सांगताना लक्षात येतंय की
https://www.maayboli.com/node/5247
इथे २०२१ नंतरच्या वर्षी साजरे केले गेलेले गणेशोत्सव दिसत नाहीयेत.

बरोबर हर्पेन, असं लँडिंग पेज दिसायला हवं. दरवर्षी केलं जातं. तिथे सगळ्या उपक्रम आणि स्पर्धांमधील एंट्र्रीज एकत्र बघता आल्या पाहिजेत.

मला वाटते वेळखाऊ काम असावे ते. लिंक जमा करून शीर्षकासह एकत्र देणे वगैरे.
संयोजकांनी आपले कामधंदे सांभाळून वेळ देण्याला लिमिट असणारच. स्वाभाविक आहे ते.
उलट यंदा मतदान धागे लगेच आले हे कौतुकास्पद आहे.

तरी तसे करायचे झाल्यास शशक स्पर्धा म्हणून घ्यायला नको, ते उपक्रम म्हणून घ्यावे. आणि लेखन विषय स्पर्धा म्हणून घ्याव्यात. जेणेकरून स्पर्धा एन्ट्री तुलनेत कमी राहतील आणि लेख देखील तुलनेत वाढतील. पण तरीही ते शशक पेक्षा कमी असल्याने संयोजकांचे काम कमी राहील. शशक मात्र उपक्रमात सुद्धा तेव्हढ्याच येतील जेवढे स्पर्धा असल्यास येतात. सगळी विन विन सिच्युएशन राहील. किंवा कोणाला शशक सुद्धा स्पर्धा म्हणून हवी असल्यास तीन ऐवजी एक शशक स्पर्धा म्हणून ठेवावी. आणि दोन विषय लेखनाचे ठेवावे. त्यातही एक गंभीर तर एक कोतबो, जाहिरात, पत्र वगैरे गमतीशीर विषय असायचे तसे असावे. तीन शशकात व्हरायटी देखील जाते असे वैयक्तिक मत. किंवा फीडबॅक समजा Happy

मतदान संपले कि चालू आहे ?
आता प्रतिक्षा निकालाची आणि अर्थातच विजेत्यांच्या नावांची.
संयोजक मंडळाने घेतलेली मेहनत दिसतेय. या वेळी भरघोस प्रतिसाद दिसतोय.

या वर्षी दुखर्‍या हाताने चांगलाच दगा दिला. बर्‍याच स्पर्धकांच्या प्रवेशिकांवर प्रतिसाद नाही देता आला. Sad

संपली आहे मुदत
मी दुसऱ्या आयडीने चेक केले.
मत द्यायचा पर्याय दिसत नाहीये Happy

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन. मतदानात आणि उत्सवात भाग घेणाऱ्यांचे आभार. संयोजकांना धन्यवाद! Happy

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन. मतदानात आणि उत्सवात भाग घेणाऱ्यांचे आभार. माझ्या रेसिपी करुन बघणाऱ्यांचेही आभार. रेसीपीवर प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार आणि अशा सोप्या पाकृ स्पर्धा ठेवून माझ्यासारखीलाही भाग घेणे सोपे केल्याबद्दल संयोजकांचेही आभार!

मीमचा धागा आणि बाकीही सगळे धागे यांनी धमाल आली. संयोजक गणेशोत्सवात तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी तुमचे परत एकदा आभार.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धकांचे , संयोजकांचे आणि गणेशत्सवात भाग घेऊन मांडव जागता ठेवणाऱ्या सर्वांचे आभार.
छान झाला गणेशोत्सव, मजा आली . दोन आठवडे कसे गेले समजलं नाही.

सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
सर्व स्पर्धकांचे आभार - छान छान कल्पक पाककृती आणि सजावटी पाहायला मिळाल्या.
ममो म्हणाल्या तसा मांडव जागता राहिला दहा दिवस, मजा आली.

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
विजेत्यांमधे निल्सचे विशेष अभिनंदन
आणि मीमर अni यांचा मायबोलीतर्फे नारळ व शाल देऊन लकडी पुलावर सत्कार !

Pages