काय छोट्या मित्रांनो कसे आहात?
हसताय, खेळताय, बागडताय ना?
मागच्या वर्षी तुम्ही सगळ्या उपक्रमातून भाग घेतला होता. सगळ्यांच्या अंगी असलेल्या कला बघून आम्हाला फार छान वाटले. तुमच्या अंगी असलेल्या कला अशाच जोपासत रहा हं. अभ्यासाच्या रगाड्यात त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष नका करू.
या वर्षी आपण जरा नेहमीच्या रंगरंगोटीच्या थोडे बाहेर जाऊन जरा वेगळे काही तरी करू या. तुम्ही आत्तापर्यंत कधीतरी शाळेत, मित्रांसोबत, भावंडांसोबत ओरिगामी करून काही ना काही तरी नक्कीच बनवले असणार. अगदीच काही नाही तर कागदाच्या होड्या व विमाने तर नक्कीच बनवल्या असतील. ओरिगामीच्या अशाच छान छान कलाकृती बनवा आणि आम्हाला पण त्या दाखवा पाहू.
तुमच्या बाकीच्या मित्रांसाठी त्यांचे स्टेप बाय स्टेप फोटो किंवा व्हिडीओ पण पाठवलेत तर आम्हाला आवडेल.
चला तर मग येऊ द्या पटापट तुमच्या आवडत्या ओरिगामी कलाकृती.
धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे. हस्तकला उपक्रम- ओरिगामी - मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) वयोगट - १५ वर्षे पर्यंत.
४) कालकृती मुलांनी बनवलेली असावी
५) प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २७ ॲागस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२५" अशी शब्दखूण द्यावी