मायबोली गणेशोत्सव २०२५ श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 26 August, 2025 - 13:44

b83fcf01-5c34-4fb7-a2a3-80c60fccecf1.jpeg

नमस्कार मायबोलीकरहो!!

जगातील सर्व मराठी बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतात तो दिवस आलाय. आज गणेश चतुर्थी आणि त्यानिमित्ताने आपल्या मायबोलीवर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे मायबोली गणेशोत्सवाचे २६वे वर्ष. सर्व मायबोलीकरांना या मंगलमय गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

गणेशाला वंदन म्हणून किल्ली (पल्लवी कुलकर्णी) यांनी म्हटलेले संकटनाशन गणपतीस्तोत्र.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगलमूर्ती मोरया ..
गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. दणक्यात होऊ दे साजरा.
मूर्ती सजावट छान आहे. किल्ली छान म्हटलं आहेस. शांत वाटलं ऐकताना.

गणपती बाप्पा मोरया!
गणेशोत्सोव दणक्यात साजरा होऊ दे.
छान सजावट आणी सुरेख गणपतीस्तोत्र.

सुंदर गणपती बाप्पा! _/\_
किल्ली, छान म्हटलं आहेस स्त्रोत्र.

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा सगळ्यांना.

खूप सुरेख चित्र आहे गणपतीबाप्पाचे.
सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया!

गणपती बाप्पा मोरया!!
किल्ली किती सुरेख म्हटलं आहेस स्त्रोत्र!!
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!

मंगलमूर्ती मोरया!
गिटारवर सुखकर्ता दोन ओळी.
(Audio player देता येत नाही म्हणून गूगल ड्राइव लिंक)
https://drive.google.com/file/d/1gn_2Pc1UVNG-OWORPS2mDDLSOQdRU2oe/view?u...
(Audio player देता येत नाही म्हणून गूगल ड्राइव लिंक)

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

खूप गोड आहे बाप्पा. किल्लीचे स्तोत्र पठण आवडले. माफ करा पण ‘नारद उवाच‘ अशी सुरुवात आहे मला वाटतं. चाल अ तिशय गोड लावली आहे. मधुर गायले आहे.

गणपती बाप्पा मोरया! 🙏
बाप्पा आणि सजावट दोन्ही सुरेख! किल्ली, स्तोत्र पठण आवडले.
इवाना, तुझे गिटार वादनही छान!

सुंदर बप्पा आणि सजावट! किल्ली स्तोत्र छान म्हटले आहे.
इवानाचे ऑफीस लॅपटॉपवर चालत नाहीये. नंतर ऐकेन पण.
कटावही मस्त!

माझ्याकडून हे गणेश पंचरत्न स्तोत्रातील नमन :

मुदा करात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरञ्जकम्।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्॥

जो नेहमी मोदक धारण करतो, मोदक (आनंद) देतो, आणि जो मोक्ष देतो. जो कलेचा आभूषण आहे, जे सर्व सुखी लोकांना संतुष्ट करते,
ज्याला कोणताही नायक नाही (एकमात्र नायक आहे). ज्याने हत्तीच्या राक्षसाचा वध केला, जो नम्र लोकांच्या सर्व अमंगल गोष्टींचा नाश करतो,
त्या विनायकाचे मी नमन करतो.

मंगलमूर्ती मोरया!! गणपती बप्पा मोरया!

गणपती बाप्पा मोरया!!
किल्ली किती सुरेख म्हटलं आहेस स्त्रोत्र!!
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!

गणपती बाप्पा मोरया !!!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

Pages