केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण.
कितीतरी विविधतेने नटलेली आपली वसुंधरा, निसर्गातील प्रत्येक गोष्टीत प्रचंड वैविध्य व सौंदर्य वसलेले आहे. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी वेगवेगळी निसर्गरम्य स्थळे आहेत. त्याशिवाय माणसाने त्याच्या पृथ्वीवरील वास्तव्यात सुद्धा कितीतरी सुंदर कलाकृती, रचना, सौंदर्यस्थळे, वास्तू, उद्याने निर्माण आहेत. या सगळ्या आवर्जून पाहणे, अनुभवणे हा एक फारच रोमहर्षक अनुभव आहे.
आपल्यातले अनेक जण जातिवंत भटके आहेत, तर काहींना फक्त आवड म्हणून किंवा एखादा नवीन अनुभव घेण्यासाठी, कोणाला कुठे जायचे यापेक्षा सोबत चांगली आहे म्हणून, तर कोणाला दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्यात बदल म्हणून फिरायला आवडत असेल.
आपल्या सगळ्यांचा अनेक कारणांसाठी किंवा कामानिमित्त, अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांसोबत प्रवास घडत असतो, सहली होत असतात, काही नियोजित तर काही अचानक ठरलेल्या, कधी जिवलग मित्रांसोबत तर कधी अनोळखी लोकांसोबत, कधी नातेवाईकांसोबत तर कधी सहकर्मचाऱ्यांसोबत, तर कधी एकट्याने….
यातील कधी तरी केलेली एखादी सहल, भटकंती, प्रवास कायमचा मनात कोरला जातो, सुखद, दुःखद, विस्मयकारक, चांगले वाईट अनुभव कायमचे लक्षात राहतात.
अशाच गोष्टी सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी हा उपक्रम व धागा आहे.
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
नियमावली :
१) लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे.
२) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"माझी संस्मरणीय भटकंती- {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
४) प्रत्येक धाग्याला "मायबोली गणेशोत्सव २०२५" अशी शब्दखूण द्यावी
५)प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
६) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
छान विषय
छान विषय
तीन तीन लेखन उपक्रम झाले.
पाकृ स्पर्धा असतातच
परंपरेला अनुसरून शशक स्पर्धा होतीलच
झब्बू झब्बू खेळालच
पब्लिक डीमांडवर मीम सुद्धा पुन्हा येणारच
अजून काही चारोळ्या, कविता, नैवेद्य, घरचे बाप्पा, बाप्पांचे नैवेद्य, कथा पूर्ण करा, ज्यांना मुले असतील त्यांच्यासाठी मुलांचे उपक्रम वगैरे....
कोणाला सगळ्यातले सगळे करायचे झाल्यास गणपतीची सुट्टीच टाकावी लागेल दहा दिवस
छान विषय आणि उपक्रमास
छान विषय आणि उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
ह्या उपक्रमात सहभागी होणार...
यावेळी शशक पेक्षा वेगळी
यावेळी शशक पेक्षा वेगळी स्पर्धा असेल तर नाविन्य असेल
अर्थात संयोजक काय करतील ते .
भटकंती धागे अधुनमधून माबोवर
भटकंती धागे अधुनमधून माबोवर येतातच पण गड किल्ले, पावसाळी सह्याद्री पर्यटन मात्र २०१० पासून गायबच झाले. वाटसपवर संपर्क करून फिरून येतात पण इकडे काही लिहीत नाहीत. यात काय लिहायचे म्हणून.
संयोजक, इथेच या धाग्यावर
संयोजक, इथेच या धाग्यावर लिहीले तर चालेल ना ? ( क्रमांकासाठी नको)