पाककृती स्पर्धा ३: फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ

Submitted by संयोजक on 18 August, 2025 - 03:49

नमस्कार मायबोलीकरहो!
सादर करत आहोत तिसरी पाककृती स्पर्धा - फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ
फळे म्हटलं की लगेच आठवतात गोड पदार्थ, ज्यूस, शेक्स किंवा फ्रुटसॅलड. पण, यंदाच्या गणेशोत्सवात फळांना द्यायचा आहे एक ट्विस्ट; गोड नाही, तर तिखट-मिठाचा! या स्पर्धेत तुम्हाला फळांचा वापर करून तिखट, खारट, मसालेदार, असा झणझणीत व चवदार पदार्थ तयार करायचा आहे. यात एक किंवा अनेक फळे मुख्य घटक असावीत आणि पदार्थाची चव तुमच्या कल्पकतेने यायला हवी. या स्पर्धेत तुम्हाला दाखवायची आहे तुमची पाककृती. मायबोलीकर मतदान करतील ते तुमच्या त्या पाककृतीला!
पदार्थ कोणताही चालेल पण तो गोड किंवा गोडसर नसावा, तिखट-मिठाचा असावा.

नियम:
१. फळे ही पदार्थाचा मुख्य घटक असावीत (किमान 50% प्रमाणात).
पदार्थ तिखट-मिठाचा किंवा मसालेदार असावा; गोड चव मुख्य नसावी.
२. फळे कच्ची किंवा शिजवून, उकडून वाफवून वगैरे कोणत्याही प्रकारे वापरू शकता.
३. मसाले, भाज्या, दुग्धोत्पादने कडधान्ये इ. पूरक घटक म्हणून वापरू शकता.
४. पाककृती पूर्ण लिहिणे आवश्यक आहे; साहित्य व कृती स्पष्ट नमूद करावी.
५. आपल्या पदार्थाचा फोटो काढून पाककृती धाग्यावर टाकावा.
६. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
पाककृती स्पर्धा ३: पदार्थाचे नाव- तुमचा आयडी
७. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
८.प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
९.'मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
१०.याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
११. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
१२. पदार्थ शाकाहारी असावा.

मायबोलीवरील बल्लवाचार्य आणि सुगरण लोक्स, चला तर मग, आंबट गोड फळांना तिखट रूप देऊया आणि या गणेशोत्सवात झणझणीत पाक-प्रयोग करूया!
- संयोजक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त स्पर्धा आहे.
खूप विचार करावा लागणार आहे....!
उगीच काहीही कशात मिसळून जमणार नाही!