पाककृती स्पर्धा २: चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ

Submitted by संयोजक on 18 August, 2025 - 03:46

नमस्कार मायबोलीकरहो!
सादर करत आहोत दुसरी पाककृती स्पर्धा - चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ.
आपल्याला रोजच गॅस पेटवून स्वयंपाक करण्याची सवय असते. पण, काही कारणाने गॅस पेटविण्याची सोय नसेल तर काय करायचं? अशा वेळी देखील चविष्ट, पोटभरीचा पदार्थ तयार करता आला, तर ती कल्पकताच म्हणावी लागेल! या स्पर्धेत तुम्हाला दाखवायचे आहे तुमचे पाककौशल्य. मायबोलीकर मतदान करतील ते तुमच्या त्या कौशल्याला!
तर ही पाककृती स्पर्धा आहे पोटभरीचा पदार्थ करायचा आणि तोही कोणतीही उष्णता न वापरता, म्हणजेच चूल, गॅस, इंडक्शन, ओव्हन, मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर इ. न वापरता! म्हणजेच शिजवणे, उकडणे, परतणे, तळणे, वाफविणे, भाजणे, उकळणे इ. काहीही करायचे नाही नाही; पण तरीही पदार्थ चवदार आणि पोटभरीचा पदार्थ तयार करायचा. यासाठी तुम्ही कोणतेही साहित्य वापरू शकता.

नियम:
१. पदार्थ तयार करताना गॅस वगैरे पेटवायचा नाही.
२. पदार्थ पोटभरीचा असावा म्हणजे जेवण म्हणून पुरेल असा असावा.
३. भाज्या, फळे, किराणा, दुग्धपदार्थ इ. (vegetables, fruits, grocery, dairy etc) जे हवे ते वापरू शकता.
४. दुकानातून मिळणारे पनीर वगैरे पदार्थ घटक म्हणून वापरू शकता.# पण तुमचा पदार्थ करताना चूल वगैरे पेटवायची नाही.
५.पाककृती पूर्ण लिहिणे आवश्यक आहे; साहित्य व कृती स्पष्ट नमूद करावी.
६. आपल्या पदार्थाचा फोटो काढून पाककृती धाग्यावर टाकावा.
७.प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे –
८. पाककृती स्पर्धा २: पदार्थाचे नाव - तुमचा आयडी
९. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
१०. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
११. ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
१२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
१३. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.
१४. पदार्थ शाकाहारी असावा.

चला तर तर बल्लवाचार्य आणि सुगरण मायबोलीकरहो, यंदा गणपती बाप्पाला अर्पण करा एक सोपा, गॅस-फ्री, पोटभरीचा पदार्थ आणि दाखवा तुमची कल्पकता!
- संयोजक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हपा ते लिहिले आहे वर.. मी आधी तेच चेक केले.. भले आजवर आयुष्यात कधीही एकाही पाककृती स्पर्धेत भाग घेतला नाही पण नियम सारे वाचतो Happy

>>>> कोणतीही उष्णता न वापरता, म्हणजेच चूल, गॅस, इंडक्शन, ओव्हन, मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर इ. न वापरता! म्हणजेच शिजवणे, उकडणे, परतणे, तळणे, वाफविणे, भाजणे, उकळणे इ. काहीही करायचे नाही नाही;>>>>

लेकीला जेव्हा एकट्याने गॅस वापरायची परवानगी नव्हती तेव्हा रात्रीचे आम्ही झोपलेले असताना आणि ती जागी असताना पोट भरायला काय उपद्व्याप करायची ते तिला विचारायला हवे. त्यात एखादा पदार्थ सापडला तर मलाही भाग घेता येईल Happy

आधीच मायबिलीवर असलेली कृती चालणार नाहि तेही लिहा.
नाहितर टोपाएवजी पातेलं आणि कापणं एवजी चिरून केलं म्हणत माझी रेसीपी कशी वेगळी म्हणून अशी रेसीप टाकतील. Wink

तुनळीवरच्या उचललेल्या रेसीपी चालतील का?

अशा टाईपची एक स्पर्धा आधी झालेली आहे त्यामुळे त्यातले पदार्थ रिपिट होत नाहीत ना हे ही बघा लोकं हो

बरोबर रिया. मलाही तेच आठवत होते.

चांगली स्पर्धा. आमच्यासारख्या आळशांना गॅस न पेटवताच पोटभरीचे काहीतरी मिळेल Happy

१३. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी. >> हे लिहिलेले आहे त्यामुळे माबोवर आधीच प्रकाशित असलेली पाककृती चालणार नाही.

तुनळीवरच्या उचललेल्या रेसीपी >> चालतील पण त्यात जर तुमची काही व्हॅल्यु अ‍ॅडिशन असेल तरच. तुम्ही काही बदल केले ज्याने पाककृती अजून उठावदार झाली तर ते चालेल. जसेच्या तसे कॉपी पेस्ट पाककृती नाही चालणार.

>>>>>>>>>रेडीमेड पदार्थ आणून वापरले तर चालतील का? जसे शेव, पाणीपुरीच्या पुऱ्या, ब्रेड इ इ?
होय दिलय ना - >>>>>दुकानातून मिळणारे पनीर वगैरे पदार्थ घटक म्हणून वापरू शकता.# पण तुमचा पदार्थ करताना चूल वगैरे पेटवायची नाही.

रेडीमेड पदार्थ आणून वापरले तर चालतील का? जसे शेव, पाणीपुरीच्या पुऱ्या >> हो चालतील. पण ब्रेड, पोळ्या, पराठे, भात असे पूर्ण तयार पदार्थ रेडिमेड वापरलेले चालणार नाहीत.

बाहेरचे सुद्धा पदार्थ चालणार नाही असे असेल तर मज्जा येइल.
पाणीपुरी चालेले म्हटल्यावर ढिगभर आहेत की तुनळी वर पदार्थ. काहीच कठिण नाही.

नाही..मला तर हा संयोजकांनी ठरविलेला नियम ठीक वाटतो.
बाहेरचेही नाही चालणार असे म्हटले तर मग रॉ सॅलड्स किंवा फ्रुट डिश आणि स्मूदीज शिवाय काही पर्यायच उरणार नाही!

बाहेरचे आधीच शिजवलेले -उदारहारणार्थ पाणीपुरी, नान वगैरे.
पोहे वगैरे ठिक आहेत जे साठवणीचे पदार्थ आहेत.

संयोजकः स्पर्धा आधीच ठरवलेली आहेच पण विस्मरणात गेलेले पदार्थ असा आम्ही आमच्या इकडे गणेशोत्सवात ठेवलेली स्पर्धा होती गेल्या वर्षी.
फक्त महाराष्ट्रीयनच आणि सणाच्या वेळी केले जाणारे.
आता बदलत्या काळात आपण खातोच सरमिसळ पदार्थ पण सणासुदीला महाराष्ट्रीयन पदार्थांना व आठवणींना उजाळा मिळण्यासाठी आम्ही ठेवली होती. खुपच छान प्रतिसाद होता.
भिरडी ( गोड) वगैरे कोणालाच आठवात नसतील हे पदार्थ आणि केलेही जात नाहीत.

जसे शेव, पाणीपुरीच्या पुऱ्या >> हो चालतील. पण ब्रेड, पोळ्या, पराठे, भात असे पूर्ण तयार पदार्थ रेडिमेड वापरलेले चालणार नाहीत. >>>>

पाणीपुरीच्या पुर्‍या चालतील तर ब्रेड का नाही ? पुर्‍या पीठ मळुन लाटुन तळुन केलेल्या असतात तसं ब्रेड पण बेक केलेला असतो
पोळ्या पराठे भात बद्दल नियम मान्य Happy
पण ब्रेड अलाउड केला तर पर्याय वाढतील माय लॉर्ड Wink

वा! वा ! मायबोली गणेशोत्सवाचा माहोल छान जमतोय.
जिथे चूल पेटवायची नाही तिथे जिन्नसांवरून गरमागरम चर्चा!

ओ संयोजक! तुमच्या चित्रात तर ब्रेड दिसतोय!
अरे नाही! तो पनीरची लादी आहे ! Lol ब्रेड तरी चालवून घ्या हो.
ही पण स्पर्धा आवडली. तीनही स्पर्धा एकदम हटके आहेत.

पापु पुऱ्या चालतील मग शेव पुरीच्या पुऱ्या पण चालतील. आणि मग टॉर्टिया चिप्स पण चालतील ना? मग आपल्या बटाट्याच्या व्हेफर्स नी काय घोडं मारलंय! Wink

>>पण ब्रेड, पोळ्या, पराठे, भात असे पूर्ण तयार पदार्थ रेडिमेड वापरलेले चालणार नाहीत.>>
>>तुमच्या चित्रात तर ब्रेड दिसतोय!
अरे नाही! तो पनीरची लादी आहे>>

परदेशांत नाश्ता म्हणून फळे, चीजचा तुकडा आणि संत्री रस घेतात. पण एवढाले मोठे पनीरचे तुकडे घेत नसतील.
...................
मी कधीकधी भटकंतीमध्ये लाह्या पीठ, खजूर आणि दुधाची पावडर नेत असे. योग्य प्रमाणात ते घेऊन पाणी घालून मिसळले की चांगला पोटभर भूक भागवणारा पदार्थ तयार होई. आता मी काही यांचा शोध लावला नाही. फार पूर्वीपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर भागात लाह्या पीठ , तूप {भरपूर हां}आणि गूळ घालून खात असत. यावर एक गाणंही आहे. सासूपासून लपवून लहान सुना लाह्याचे पीठ खायला माळ्यावर, गोठ्यात आणि परसात लपून बसतात आणि सासूलाही गुपचूप पीठ खायचे असते. सगळेच एकमेकाला पकडतात ही गोष्ट ज्ञानकोशात आहे गाण्यासह.
उत्तर प्रदेशात सत्तूचे पीठ बांधून प्रवासात नेतात आणि खातात. बंगाली लोक भाजके पोहे नेतात. हेच जरा अमेरिकन म्हणजे सिरिअल फ्लेक्स आणि दूध. दडपे पोहे आहेतच आपले. गोपाळकाल्याचे दही पोहे.
हे सर्व वगळून काय पदार्थ येतात पाहू.

प्रतिसाद आणि शंका लिहिणाऱ्या सर्वांना धन्यवाद. इतका प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे भरपूर पाककृती येतील!

संयोजकांना असे वाटते आहे की पोळ्या, भात यांसारखेच ब्रेड सुद्धा वापरता येतो. त्यामुळे ब्रेड चालणार नाही. त्याचबरोबर नेहमीच्या तळणीच्या पुऱ्या, नान, रोटी, पिटा ब्रेड वगैरे चालणार नाहीत.

पोहे किंवा बाकी पीठे न शिजवता चालू शकतील.

शेव, फरसाण (शेव - पापडी असते ते, गुजराती थाळीत असते तसे नाही), शेवपुरी, पाणीपुरी च्या पुऱ्या. असे सगळे चालेल.

अजून शंका असतील तर नक्की विचार. आणि भरभरून पाककृती लिहा.

>>> अध्यारुतच आहे पण तरी "पदार्थ शाकाहारी असावा" हे पण अ‍ॅड करा
का अध्याहृत आहे? चूल पेटवायची नाही म्हणून असेल तर ठीक, नाहीतर ‘सणाला शाकाहारच’ हा विचार गतानुगतिकपणे बिंबवत राहायची आवश्यकता वाटत नाही.

उष्णता न देता मांसाहार थोडे अवघडच आहे तसे.

मला वाटते गेल्या कुठल्या तरी वर्षीच शाकाहारच असावा अशी अट काढण्यात आलेली.. कदाचित चुकत सुद्धा असेल.

पदार्थ शाकाहारी असावा >> गणेशोत्सव स्पर्धा आहे त्यामुळे हे अध्याहृत होतेच पण वरती टाकलेले आहे.

Pages