स्वतःचे घर की भाड्याचे घर?

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 16 August, 2025 - 03:00

- पर्याय 1: घर खरेदी
घर किंमत: ₹1 कोटी
डाउन पेमेंट: ₹50 लाख
कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI
EMI: ~₹43,400/महिना
एकूण व्याज: ~₹54 लाख
एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज)
अतिरिक्त खर्च:
प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख
सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख
एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख
- म्हणजे 20 वर्षांत एकूण खर्च = ₹1.04 कोटी + ₹21.6 लाख ≈ ₹1.26 कोटी
20 वर्षांनी घराची किंमत (6% वाढ धरली तर) = ~₹3.21 कोटी

पर्याय 2: भाड्याने राहणे + गुंतवणूक
प्रारंभिक गुंतवणूक: ₹50 लाख
SIP: ₹40k/महिना + 10% वार्षिक टॉप-अप, 20 वर्षे
CAGR: 12%
परिणाम:
एकरकमी ₹50L → ~₹4.83 कोटी
SIP → ~₹5.2 कोटी
एकूण गुंतवणूक मूल्य: ~₹10.03 कोटी
भाडे खर्च:
सुरुवातीला ₹25k/महिना, दरवर्षी 10% वाढ
20 वर्षांत एकूण भाडे = ~₹1.9 कोटी
20 वर्षांनंतर निव्वळ संपत्ती = ₹10.03 – ₹1.9 = ~₹8.13 कोटी

-अंतिम तुलना
घटक घर खरेदी भाडे + MF
एकूण खर्च (20 वर्षांत) ₹1.26 कोटी ₹1.9 कोटी
20 वर्षांनी मालमत्ता ~₹3.21 कोटी ~₹8.13 कोटी
तरलता (Liquidity) कमी खूप जास्त
स्थैर्य जास्त (स्वतःचं घर) कमी (भाडे वाढतं, स्थिरता कमी)
जोखीम प्रॉपर्टी मार्केट इक्विटी मार्केट

निष्कर्ष
फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी).
पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.

Group content visibility: 
Use group defaults

Zeroda चा निखील कामत चावलाय की काय ?? बाय द वे शेवटी त्याने पण घर विकत घेतल शैवटी

का? त्याला काय झाले होते? आणी घर विकत घेऊच नये असे कोण म्हणतय? तेच घर ३.५ कोटीला कॅश मध्ये घेऊ शकता ना २० वर्षांनी?

"मुलाचा" स्वतःचा फ्लॅट आहे का?

हा प्रश्न ज्यांनी ज्यांनी ऐकला आहे त्यांना घर घेण्याची किम्मत कळेल. की का ज्या गावी सेटल व्हायची ग्यारंटी नाही, तिथे नोकरीनिमित्त गेल्या गेल्या भल्या मोठ्या हप्त्यावर कर्ज काढून, बापाचा पीएफ वापरून फ्लॅट घेतला जातो. Rofl

घर विकत घेताना जर ५० लाख down payment केले व ४३,४०० हफ्ता २० वर्ष भरला तर घर आपल्याला १.५४ Cr + तुम्ही धरलेले अतिरिक्त खर्च २१ लाख.
घराची आपल्याला पडलेली किंमत १.७५ Cr होईल ना?

अतरंगी>>> हो ते कॅलक्युलेशन चुकले आहे.
अलीबाबा>> लग्न झाले असेल तर? आणी मुलगा लग्नाच्या वयात यायला अजून २०-२५ वर्षे असतील तर?

घर स्वतःचे की मालकीचे याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे. कुठे रहाता, त्या भागातील भाडे- घराच्या किमती, नोकरी-व्यवसाय कशा प्रकारचा, मालकीच्या घराच्या हट्टापायी तुम्ही कॅश पुअर असाल का, अमुक प्रकारच्या घराच्या मोहापायी/हट्टापायी मार्केटमधे इनवेस्ट करण्याची संधी तुम्ही गमावत आहात का वगैरे बर्‍याच गोष्टी यात येणार.
आम्ही अमेरीकेत सुरवातीची १२ वर्षे सदनिकेत राहीलो. या काळात २०-४५ मिनिटांचा कम्यूट विचारात घेत ४ वेळा गावं बदलली. ज्या गावात घर घेतले तिथेही एकंदरीत आपल्याला गाव किती आवडतेय -गावाला आपण किती आवडतोय याचा २ वर्षांत अंदाज आल्यावरही पुढे अजून ४ वर्षे सदनिकेत राहून योग्य संधीची वाट बघितली. नवा संसार मांडल्यावर लगेच घर घ्यायचेच असा हट्ट ठेवला असता तर कदाचित सुरवातीच्या काळात सगळा फोकस डाऊन पेमेंटसाठी पैसे साठवणे यावर गेला असता आणि मार्केटमधे गुंतवणूकीच्या संधी गमावल्या असत्या. मार्केट मधे गुंतवणूक जितक्या लवकर कराल तितका जास्त टाईम ती गुंतवणूक वाढायला मिळतो, दर महिना गुंतवायला लागणारी रक्कमही कमी लागते. आम्ही जरा उशीराने अमेरीकेत घर घेतले मात्र मार्केटमधे आधीपासून गुंतवणूक करत असल्याने मुलाच्या शिक्षणासाठीची गुंतवणूक, आमची रिटायरमेंटसाठीची गुंतवणूक यात कपात न करता ७ वर्षात गृहकर्ज फेडणे शक्य झाले.

"मुलाचा" स्वतःचा फ्लॅट आहे का? >>> अगदी एमबीए वगैरे असलेली मंडळीही असा प्रश्न विचारतात. फ्लॅट बँकेच्या मालकीचा आहे म्हटले की गडबडतात. Lol नात्यातील उपवधू मुलांना आत्तापर्यंत फ्लॅट आणि गाडी मिळून इएमआय किती असा प्रश्न कुणीही विचारला नाहीये.

स्वाती+१

घर घेऊच नये असे नाही.

पण करिअर च्या सुरुवातीला भला मोठा EMI डोक्यावर घेण्यापेक्षा, ते पैसे गुंतवणे आणि मग ३४-४० वयानंतर सगळा विचार करून घर घेणे जास्त योग्य आहे.

पैशाचे मूल्य , बाजार किंमत ही फारच वेगाने कमी होत आहे आणि हे नोकरीच्या पगाराला फारच चावत/ लागू आहे.
घराचा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे, आणि घर शहरांतच हवे आहे.
वाढत्या वस्तीत आणि तिथेच रोजगार मिळणे शक्य असेल तरच घर खरेदी सोपी जाते.

मी मुंबई सोडून नवी मुंबईला शिफ्ट होताना घर विकत घेण्याआधी चार वर्षे भाड्याने राहिलो आहे.

त्या अनुभवावरून सांगतो, भाड्याच्या घरात राहण्याऐवजी आपल्या हक्काच्या मालकीच्या घरात राहणे हा एक वेगळाच आनंद असतो. आपल्याला हवे तसे बदल आपल्या मनाने करता येतात आणि कोणाला सांगावे लागत नाही. आणि भाड्याच्या घरात बदल केले तरी त्यात ती मजा अनुभवता येत नाही जी आपल्या हक्काच्या घरात बदल करताना येते.

त्यामुळे भाड्याचे घर कितीही पॉश असले तरी तो एक प्रकारे सोन्याचा पिंजराच वाटतो ज्यावर आपला मालकी हक्क नाही की त्यात बदल करायचे स्वातंत्र्य नाही. आणि मालकाने आता निघा म्हटले की घर सोडून जाण्यावाचून पर्याय नाही.

आता हे भावनिक किंवा इमोशनल फॅक्टर वाटेल एखाद्याला. पण आयुष्य म्हणजे आणखी काय वेगळे असते. जे फार भावनिक नसून व्यावहारिक असतील ते भाड्याच्या घरात राहायचा पर्याय चाचपू शकता. वर जे calculation दिले आहे तसले बरेच मेसेज आधीही पाहिले आहेत. त्यात आर्थिक गणित सुटते यात तथ्य असावे.

पण शेवटी पैश्याचा उपयोग आयुष्य मनासारखे जगण्यासाठी असेल तर ती मजा आपल्या मालकी हक्काच्या घरातच Happy

किंबहुना आपल्या आईवडिलांचे घर सुद्धा आपले मालकी हक्काचे नसते. ते त्यांचे असते. आपण आपले घ्यावे.

अकरा महिन्यांचा भाडेकरार असतो, त्यानंतर मालक भाडे वाढऊन मागू शकतात, नाहीतर घर सोडा म्हणतात. दर अकरा महिन्यांनी शिफ्टिंग करणे हे फार जिकिरीचे असते. मुलांच्या शाळा वगैरे असतील तर. जरा कुठे सेटल झालोय असे वाटते तोवर शिफ्टिंग करावे लागू शकते. जिथे घरे भरपूर उपलब्ध आहेत व भाडेकरू कमी आहेत तिथे चालून जाऊ शकते, पण महानगरात हे कठीण आहे.

मी ऋन्मेऽऽष बरोबर.
स्वतःच्या घरात राहायला मला आवडतं. एकेक वीट जोडत... वगैरे लिहित नाही आता... शेवटी आनंद महत्त्वाचा. तो तिसाव्या वर्षापासून मिळवला नाही तर पन्नाशीत मिळवला, किंवा भरपूर पैसे साठवून मिळवला.. तर .. ज्याचा त्याचा प्रश्न.
पैसे साठवून जग फिरायचा एकदम ७ स्टार अनुभव ४०/ ५० शीत घ्यायचा का तरुण असल्यापासून मिळेल परवडेल तशी उंच उंच झेप घेत राहायचं. इ. इ. थोडेफार तसंच आहे.

अकरा महिन्यांनी शिफ्टिंग करणे हे फार जिकिरीचे असते. मुलांच्या शाळा वगैरे असतील तर. जरा कुठे सेटल झालोय असे वाटते तोवर शिफ्टिंग करावे लागू शकते. >>>>
पण हे सर्व करायच्या बदल्यात तुम्ही २० वर्षात ५ कोटी रुपये कमावणार असाल तर?
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार

एकदा तुमचं स्थायिक व्हायचं गाव त्यातल्या त्यात जरी नक्की झालं तरी तिथे स्वतःच घर अवश्य घ्यावं. शेवटी सगळच पैशात मोजता येत नाही आणि मोजू ही नये. समाधान, आनंद स्थैर्य हे ही महत्त्वाचं .. अर्थात ज्याचा त्याचा विचार हे ही आहेच. असो.

वीस वर्षांनंतर मिळणाऱ्या ८ कोटींचे करणार काय हा प्रश्न आहे. ते परत २० वर्षे गुंतवून त्याचे ५० कोटी करणार असाल तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे.
मला भरपूर पैसे कमवायला थोडे साठवायला आणि उरलेले उडवायला आवडतात. कोणाला वाढवायला आवडत असतील.

सगळच पैशात मोजता येत नाही आणि मोजू ही नये. समाधान, आनंद स्थैर्य हे ही महत्त्वाच >>>>
पण कर्जाचा नी emi चा विळखा पडतो त्याचे काय? समाधान, आनंदात नक्की असतो का? २० वर्षे ४०-५० हजार महिन्याला द्यायचे!

वीस वर्षांनंतर मिळणाऱ्या ८ कोटींचे करणार काय हा प्रश्न आहे. >>>
त्यातल्या ४ कोटीत चांगला फ्लॅट बसेल उरलेले चार कोटी म्हतरपणासाठी ठेवता येतील व त्यातून येणाऱ्या swp ने मजेत उरलेले आयुष्य कंठता येईल.

२० वर्षे ४०-५० हजार महिन्याला द्यायचे! >> हे तसेही तुमच्या दुसऱ्या गणितात गुंतवायचे आहेतच. थोडक्यात ते पैसे हातात पडणार नाहीच आहेत. थोडक्यात प्रश्न: घरात ६% वाढ वि. गुंतवणुकीत १२% वाढ. काय जास्त वाढेल? उत्तर सांगायची गरज नाही.
बाकी यात गुंतणुकीवरच्या करांचे गणित दिसले नाही. १२ टक्के सतत चक्रवाढ २० वर्षा मागून वर्षे परतावा कितपत शक्य आहे मला खात्री नाही. करात १२ मधले ३ टक्के/ साडेतीन टक्के आणि गुंतवणुकीतील दोलायमानता यावर किमान २% ठेवावे का?

डाउन पेमेंट ५०% का धरली आहे?
२०-२५% असते ना ? तसं असेल तर लवकर = कमी वयात घर घेता येईल. परतफेडीची मुदत जास्त ठेवता येईल.

डाउन पेमेंट ५०% का धरली आहे? >>>>मग emi किती येईल? बँक लोन देईल? ७० emi.

करात १२ मधले ३ टक्के/ साडेतीन टक्के आणि गुंतवणुकीतील दोलायमानता यावर किमान २% ठेवावे का? >>>
कर का लागेल जो पर्यंत तुम्ही विकत नाही? आणी घर घ्यायला विकले तर कर नाही असे काहीतरी आहे. निवृत्तीनंतर विकले तर तुमचे उत्पन्न म्हणून धरले जाईल नी टैक्स वाचेलच. थोडक्यात टैक्स फार कमी किंवा नाही लागणारे.

भाड्याचे घर घेताना जोडीदाराची आवड सुद्धा जुळली पाहिजे. हे मत दोघांचे हवे. स्पेशली आपल्याकडे जशी समाजरचना आहे त्यात बायकांना घराबद्दल एक विशेष एक्स्ट्राचा जिव्हाळा असतो. त्यांना आपल्या पद्धतीने घर सजवायचे असते. किचन त्यात पहिले. तेवढ्यासाठी म्हणून त्यांना सासूची भागीदारी सुद्धा नको असते. त्यांच्या मनात आपले स्वतःचे घर हवे ही भावना जास्त प्रबळ असते.

आणि पोरांची आवड त्यांना कोणी विचारत नसले तरी आपण तो विचार केला पाहिजे. त्यांच्या बालपणाची बरीच बँड वाजते. एकदा कळू लागल्यावर शाळेतले आणि सोसायटीतील मित्र सारखे बदलणे फार अवघड जात असावे. ज्यांच्या पालकांची सारखी बदली होते त्यांच्याकडे पर्याय नसतो. पण जर पर्याय दिला तर मुले नकोच म्हणतील असे वाटते.

थोडक्यात, असे नको व्हायला की तुम्ही आजचा आनंद विकून पैसे कमावत आहात आणि त्या कमावलेल्या पैशातून पुढे जाऊन आनंद घेऊ अशी प्लॅनिंग करत आहात Happy

ऋणमेश सहमत! ह्या दोन गोष्टी आहेतच! पण विरुद्ध विचारही करून पहा, म्हणजे कसे जास्त मित्र होतील जास्त जागा बदलल्याने? मी स्वत: लहानपणापासून ५ घरे बदलली आहेत नी त्यामुळे विविध भागात राहायचा अनुभव, जास्त मित्र, नवेपण वगैरे भरपूर अनुभवले.
बाकी रेंटचे घरही सजवता येतेच की! सजवणे म्हणजे काय? एक रंग सोडला तर घरात हवे ते करता येते की!

थोडक्यात, असे नको व्हायला की तुम्ही आजचा आनंद विकून पैसे कमावत आहात आणि त्या कमावलेल्या पैशातून पुढे जाऊन आनंद घेऊ अशी प्लॅनिंग करत आहात Happy >> ऋ, सहमत... अगदी हेच लिहायला आले होते. आणि वीस वर्ष मन मारून राहिल्यावर वेळ येईल तेव्हा तरी ते घर घ्यावंस वाटेल का ? एवढे पैसे खर्च करायचा धीर होईल का ? की आहे ते बरे आहे आणि हे पैसे ही वाचवू या, भाड्याच्या घरात राहून असं वाटेल ?

बाकी रेंटचे घरही सजवता येतेच की! सजवणे म्हणजे काय? एक रंग सोडला तर घरात हवे ते करता येते की! असा मालक कुठे मिळालाय तुम्हाला ? एक खिळा ठोकणे ही मुश्किल असतं भाड्याच्या घरात

पी एन बी होम लोन calculator कर्ज ८० लाख व्याज ८.५% मुदत ३० वर्षे EMI 61,513

इक्विटी म्युच्युअल फंडावर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५% कर आहे. 1.25 lakh exemption. No indexation.

कर्जाच्या परतफेडी वर कर सवलतीबद्दल खोलात जाऊन वाचलेले नाही. जुन्या कर पद्धतीत मुद्दल आणि व्याज दोन्हीवर करसवलत होती. नव्या करपद्धतीत बहुधा नाही.

कर नाही असेल तर काय सोन्याहून पिवळं. तसं आहे ना खात्री मात्र करा.

ममो, अगदी हेच लिहिलेलं.
मी मध्यमवर्गीय अंथरून पाहून काटकसर वगैरे मध्ये वाढलेला जेव्हा पैसे कमवायला लागलो तेव्हा मामाने सांगितलेली एक गोष्ट कायम लक्षात आहे. पैसे कमावतो आहेस चांगलं आहे, गुंतवतो आहेस, वाचवतो आहेस ते ही चांगलेच आहे पण पैसे खर्च करायला ही शिक. उपभोग घेता आला पाहिजे.

< घर घ्यायला विकले तर कर नाही असे काहीतरी आहे. > जुने घर विकून नवे घ्यायला. वित्तीय गुंतवणुकीत असं काही नाही.

हो ना बरोबर आहे, नाही तर पायात फाटक्या चपला, अंगात बिन इस्त्रीचा शर्ट, हातात कळकी पिशवी आणि निघाले कोटी ची एफ डी रिन्यू करायला बँकेत असं व्हायचं. उपभोग घेण्यासाठी ही पैसे मिळवायचे असतात आणि ते खर्च ही करायचे असतात. पैसा आपल्यावर स्वार नाही होऊ द्यायचा कधी.

According to a report by CRISIL, the average house price in India has increased by approximately 6% per year over the past 20 years. However, this overall trend masks a great deal of variation at the regional level. Some cities and regions have seen much higher real estate growth rates in India, while others have experienced relatively little change in house prices over the same period.

According to a report by Colliers India, Hyderabad's peripheral areas are expected to see property prices increase by 10-20% over the next 3-5 years, primarily due to the expansion of the Metro Phase 2 network, which will connect key areas like Nagole to Rajiv Gandhi International Airport and LB Nagar to Hayath Nagar.
This growth is further supported by industrial corridors, the proposed Regional Ring Road, and government policies such as ICT 2.0 and MSME initiatives.

https://www.hindustantimes.com/real-estate/hyderabad-real-estate-periphe...

३० वर्षांपूर्वी पार्ल्यात २५ लाखात २ बेडरूम चांगल्या सोसायटीत, चांगल्या शाळेजवळ, भरपूर पार्किंग इ. इ. घर मिळत होतं. त्याची ६ टक्के ३० वर्षात वाढून १.५ कोटी किंमत होते.
तो फ्लॅट आज ४ कोटीच्या खाली मिळणे अशक्य आहे. चार कोटी ही बार्गेनच असेल.
ठाणे, पुणे वेगळी परिस्थिती नाही.

Pages