गंमतखेळः सवालजवाब

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:25

नमस्कार मायबोलीकरांनो,

मजेत आहात ना सगळे?

कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?

या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?

यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.

या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.

खेळ अगदी साधा आहे.

आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.

तर हे आहे तुमचे पहिले कोडे....

नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवा ??

हवा

मी पण हवा च
फक्त नाही मी पक्षी तरी उडते जमत नाहीये ...

हवा
बरोबर आहे
आता पुढचे कोडे द्या आणि खेळ सुरु ठेवा Happy

नारळ?

फणस?

egg

बोकलत पुढचे कोडे द्या.

तुम्हाला द्यायला जमत नसेल तर तसे सांगा, दुसरे कोणीतरी कोडे देईल

आद्याक्षररहीत मी,
निजद्वार रक्षी
मध्याक्षररहीत मी
पशु सर्व भक्षी
अंत्याक्षररहीत मी
अतिकृष्ण पक्षी
सर्वा मिळुनी मजला
जनसर्व भक्षी.

मी देते

भन्नाट वावे!
मी टोटल आंधळा आहे. 'अद्याक्षररहित मी' हे चक्क 'अद्याक्षरातही मी' असं वाचलं.

भारी होते हे..
सर्वांनी छान म्हटले नसते तर मी कोडे उकल दोन्ही टाळून पुढे गेलो असतो इतके माझ्या डोक्याच्या बाहेर होते.

अलीकुल वहनाचे वहन आणीत होती
शशीधर वहनाने लोटिली मार्गपंथी
नदीपति रिपू ज्याचा तात भंगूनी गेला
रवीसुत महिसंगे फार दुःखीत झाला

हे सोप्या मराठीत सांगा.

चंद्रप्रकाश फुलांच्या बागांना उजळवतो, पण त्याचं तेज समुद्राचा मार्ग अडवतं. त्यामुळे समुद्र व्याकुळ होतो. ही स्थिती पाहून शनीदेव शिवाजवळ जाऊन दुःख व्यक्त करतो.

मधमाश्या मधुरस आणित होत्या
शंकराच्या वाहनाने .. नंदी त्या मधमाशांच्या मार्गात आला
नदिपती... वरुणाने काही केलं ....
सूर्यपुत्र (म्हणजे शनि असं अनिंची पोस्ट बघुन वाटतंय) आणि पृथ्वी दु:खी झाले. का दु:खी झाले तेच कळलं नाही मला Lol
गाळलेल्या जागा भरा.

Pages