प्रकाशचित्रांचा झब्बू १- बॅग्स, पिशव्या, पर्स

Submitted by संयोजक on 11 August, 2025 - 04:21

मायबोली गणेशोत्सव २०२५ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे बॅग्स, पिशव्या, पर्स.

आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या किंवा प्रासंगिक वापरात अनेक प्रकारच्या बॅग्स व पिशव्या असतातच. पर्स हा तर समस्त स्त्रीवर्गाच्या आवडीच्या अनेक विषयांपैकी एक.
या धाग्याच्या निमित्ताने आपल्याकडे असलेल्या, रोजच्या वापरातल्या बॅग्स, प्रवासात वापरायच्या बॅग्स, हर तर्‍हेच्या पिशव्या, रोजच्या वापरायच्या, खास प्रसंगांसाठी राखून ठेवलेल्या पर्सचे फोटो येऊ द्या

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी करते सुरवात. अजून शिवणकामाची हौस कमी होत नाही फार येत नसलं तरी... घरच्या घरी उरलेल्या तुकड्यातून क्विल्टिंग च डिझाईन करून शिवलेली बॅग.. हल्ली रोज हीच घेऊन काय भाजीला.. तेढा है लेकिन मेरा है म्हणून फार प्रोफेशनल नसली तरी मला आवडते.
20250507_185227.jpg

जर मुलाना इतकी मोठी स्कूल बॅग उचलावी लागली तर ते शाळेत जायला का नाही रडणार Happy

हो, ही ऍक्च्युली सिनियर केजी मुलांची स्कूल बॅग होती Happy

FB_IMG_1756284020861.jpg

WhatsApp Image 2025-08-25 at 23.04.19.jpeg

ह्यातलं तुकड्यांचं जोडकाम मी केलेलं आहे. पिशवी बाहेरून शिवून घेतली. ह्याला कवांदी क्विल्टिंग असं म्हणतात. भारतातील सिद्दी समाजाचं हे परंपरागत क्विल्टिंग आहे. आपल्या गोधडी सारखंच. पिशवीचं कापड नवीन आहे. पण क्विल्टिंग मधले तुकडे टेलरकडच्या चिंध्यांमधील आहे. कापड फेकल्यावर त्याचं विघटन होत नाही. त्यामुळे कापडाचा पुनर्वापर करायचा प्रयत्न.

मायबोली.
जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती.

सही र्म्ड!
हे मरचंडाईज कुठे मिळेल?

सगळ्या बॅगा छान आहेत. हँडमेड बॅगा अल्पना अनया स्नेहा जास्त आवडल्या.

ही पिशवी माझ्यासाठी एकदम खास आहे. ती आमच्या आईने अंदाजे साठ एक वर्षापूर्वी स्वतः भरलेली आहे. शिवून शिंप्याकडून घेतली. हे क्रॉस स्टीच च काम तरटावर केले आहे. आतून अस्तर लावलेले आहे आणि हॅण्डल धुताना काढता येते. आत ल्या बाजूने त्यासाठी काजं बटण केलेली आहेत. अजून कुठे उसवली किंवा फाटली नाहीये. मी पण जपूनच वापरते. ती असणं हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी.

20220604_121154.jpg