सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
मुंबईतल्या मुलाना हिंदी येते
मला हिंदीचे वावडे नाही. आम्ही घरात रोज बरेचदा एकमेकांशी हिंदीत बोलतो. मजा येते बोलायला. पण हे असे अभ्यासक्रमात सर्वावर जबरदस्ती लादणे फार चुकीचे आहे.
मुंबईतल्या मुलाना हिंदी बोलता येते. इतर मोठ्या शहरातले माहीत नाही. पण छोटी शहरे आणि गाव खेडे इथे हिंदी कोणाला आणि किती येते? किती वापरली जाते? मुळात तिथे तिची किती गरज आहे? तिथल्या मराठी मुलाना देखील किती अवघड जाईल उगाचच ती शिकणे..
शहरात सुद्धा साऊथ इंडियन जे आहेत त्यांना नाही जमत हिंदी. महाराष्ट्रात राहायला त्यांना जुजबी मराठी शिकवा हे योग्यच आहे. पण हिंदीची जबरदस्ती का म्हणून? काय संबंध?
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणि सहावीपासून गुजराती शिकवलंच पाहिजे. भाषांचं प्रमाण जास्त वाटत असेल तर इंग्रजी ऐच्छिक करावी
स्टेट बोर्ड सोडुन बाकी
स्टेट बोर्ड सोडुन बाकी सिबिएस्सि, आयसिएस्सि वगैरेत हिंदी पहिलीपासुनच आहे. तिथे मराठीही आहे पण नावापुरते. आता गावोगावी सिबिएस्सि, आयसिएस्सि शाळा उघडताहेत कारण पालकांची मागणी. त्या शाळेत जाणारी मुले शिकताहेत की पहिलीपासुन हिंदी.
लेखाशी सहमत
लेखाशी सहमत
@ भरत,
@ भरत,
इंग्रजी ऐच्छिक समजू शकतो. ज्याला गरजच नाही असे वाटेल तो नाही शिकणार.
पण गुजराती कश्याला हवी आहे तुम्हाला? शेजारचे राज्य आहे आणि बरेच गुजराती इथे राहतात हा निकष लावला तर मग हिंदी सुद्धा त्याच निकषावर येईल. उद्या साऊथवाले सुद्धा आंदोलन करून आपल्या भाषा सक्तीच्या करा म्हणतील. मराठी मुलाना आता हेच काम राहिले आहे का भाषा शिकण्याचे?
शेजारच्या प्रगत राज्याची भाषा
शेजारच्या प्रगत राज्याची भाषा शिकणे हितावहच आहे. तिकडे नोकरी मिळण्यास/करण्यास/स्थायिक होण्यास त्रास होणार नाही.
हा धागा ललितलेखनात का?
हा धागा ललितलेखनात का?
राजकारण - भारतात हा गृप योग्य आहे. तिथे हलवा याला.
महाराष्ट्रात हिंदी भाषा
महाराष्ट्रात हिंदी भाषा अभ्यासक्रमात सक्तीची करणे चुकीचेच आहे.
तशीही सिनेमा आणि सिरियल तसेच आजुबाजूचे वातावरण यातून जवळजवळ सर्वच मुलांना आवश्यक तेवढी हिंदी समजते आणि बोलायला येते. मग त्यावर पेपर देऊन मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करण्याचा विषय म्हणून बोजा आणि सक्ती कशासाठी?
पाचवी ते आठवी हिंदी विषय आहेच आधीपासून. प्राथमिक शाळेतील मुलांना हिंदी सक्ती अनावश्यक आहे असंच वाटतं.
आता स्टेट बोर्डाच्या शाळाही
आता स्टेट बोर्डाच्या शाळाही सीबीएसई प्रमाणेच चालणार आहेत. त्यामुळे मराठी नावापुरते शिकलेले पुरेल.
हिंदी शिकवण्यासाठी मातृभाषा हिंदी असलेले शिक्षकच हवेत.
तरच हिंदी नीट शिकवली जाईल.
<तशीही सिनेमा आणि सिरियल तसेच
<तशीही सिनेमा आणि सिरियल तसेच आजुबाजूचे वातावरण यातून जवळजवळ सर्वच मुलांना आवश्यक तेवढी हिंदी समजते आणि बोलायला येते. मग त्यावर पेपर देऊन मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करण्याचा विषय म्हणून बोजा आणि सक्ती कशासाठी?>> अगदी बरोबर. ओळख (पेपर न घेता) म्हणुनही ठेवायची असेल तरी पाचवी पासुन पुढे ठीक.
मराठीतला पूर्तविराम ,
मराठीतला पूर्णविराम , हिंदीतला दंड, व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे वेगळे नियम , यामुळे मुलांचा गोंधळ होऊ नये म्हणून मराठी फक्त बोलण्यापुरती शिकवावी. आणि मराठीचं शुद्धलेखन आणि व्याकरण हिंदीप्रमाणे असावं|
पाचवीपासून मराठीऐवजी संस्कृत शिकवावी. आपल्या महान संस्कृतीची माहिती असणे आवश्यक आहे |
रुन्मेष,
रुन्मेष,
तुम्हाला उपरोध कळला नाही असे वाटत आहे
=====
माझी मते:
हिंदी सक्तीचे करण्याचे काही कारणच नाही
हिंदी सक्तीचे नसूनही महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता हिंदी किंवा हिंदीच्या प्रभावातील मराठी बोलत आहे
हिंदी सक्तीचे केल्याने बालकांवर अधिक ताण पडेल हे (मला) पटत नाही. त्या वयातील बालकेही काही वेळा हिंदी बोलतात.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही पण देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे व त्यामुळे हिंदी नीट शिकली तर काहीतरी फायदाच होईल
स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणाऱ्यांनी या विषयावर आक्षेप घेऊ नये असे मात्र काही नाही
हिंदी सक्तीचे केल्याने विद्यार्थ्यांना होऊ शकणारे फायदे ठळकपणे सांगणे हे काम शासनाने करायला हवे, त्यात ते अपयशी ठरले तर सक्ती रद्द करावी
मनसे या पक्षाने या विषयाला आयते कोलीत मानणे साहजिक आहे, पण त्यावरून वित्तहानी किंवा हिंसा करू नये
हिंदी शिकून करिअरच्या संधी तसेच इतर राज्यात मराठी भाषिकांबाबत स्वीकारार्हता निर्माण होण्याची शक्यता याबाबत अधिक कळावे
येथे हिंदी भाषिकांचे येणारे लोंढे थांबवणे कायद्याला मान्य नाही. ते परदेशी नागरिक नव्हेत. मोठ्या शहरातील मराठी माणसे ही हॉटेल, दुकाने, फळे व भाज्या विक्री केंद्रे वगैरे चालवण्यात विशेष स्वारस्य घेत नाहीत हे दुर्दैव हा निर्णय घेण्यास भाग पाडत आहे की कसे याचे परीक्षण झाले तर कदाचित नवीन बाजू समोर येईलही
शेवटी, देश एकच आहे व महाराष्ट्रापासून वर काश्मीरपर्यंत बोलली जाणारी भाषा नीट शिकवली जाणे यात काही value addition आहे किंवा कसे याचे सांगोपांग विवेचन व्हावे
आता माझे पहिले विधान व इतर काही विधाने परस्परविरोधी वाटणे शक्य आहे हे माहीत आहे, मात्र नीट स्पष्टीकरण देऊन हा निर्णय लागू केला तर भविष्यात तो विद्यार्थ्यांना लाभदायक ठरूही शकेल
(आमच्या येथील एक पाचवीतील मुलगी परवा बोलता बोलता म्हणाली, मी 'कोशिष' करते पण होमवर्क खूप हेवी देतात)
बहुतांश लोक पाचवीपासून हिंदी
बहुतांश लोक पाचवीपासून हिंदी शिकतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना कामचलाऊ हिंदी ऑलरेडी समजते, बरेच इव्हन बोलतातही. हिंदी पिक्चर्स पासून ते जनरल हिंदीच्या वापराला साउथसारखा महाराष्टात विरोध नाही, हिंदीबद्दल पब्लिकमधे दुस्वास ई ही नाही. मग आता अचानक याची काय गरज आहे?
त्यात पुस्तकी हिंदी आणि फिल्मी हिंदीमधे खूप फरक आहे. पब्लिक सहसा फिल्मी हिंदी लक्षात ठेवते. "निम्नलिखित पंक्तीयोंका प्रयोग किजीये" सारखे हिंदी फक्त वाजपेयी, हिंदी मोडमधला अमिताभ, व अखंडानंद त्रिपाठी यांनाच बोलताना ऐकले आहे. बाकी खुद्द हिंदीभाषिक लोक सुद्धा दैनंदिन वापरातील शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द वापरणे कूल समजतात. आपल्या भाषेच्या आग्रहाबद्दल मराठी लोक एकदम तळाशी आहेत पण आपण अजूनतरी कपाट, काडी, कंदिल वगैरे म्हणतो. अलमारी, दियासलाई, लालटेन वगैरे गुलजारी शब्द म्हणताना मी माझ्या नॉर्थी मित्रांना फारसे ऐकले नाही. मग लोकांना लागेल इतपत हिंदी ऑलरेडी पिक्चर्स, सिरीज, गाणी, बहुभाषिक सर्कल्स यातून मिळत असेल तर ही नवी सक्ती कशाला?
ऐच्छिक ठेवा पाहिजे तर. एक काय दहा भाषा शिकू दे कोणाला इंटरेस्ट असेल तर. इथे इयत्ता पहिली आहे. म्हणजे "कोणाला" याचा अर्थ त्यांच्या पालकांना. "घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती" प्रमाणे "घरोघरी पी व्ही नरसिंहराव जन्मती" सारखी पुस्तके प्रसारित करा पाहिजे तर.
हिंदी शिकवण्यासाठी मातृभाषा
हिंदी शिकवण्यासाठी मातृभाषा हिंदी असलेले शिक्षकच हवेत.
तरच हिंदी नीट शिकवली जाईल.
>>>>>
एवढे काही त्यांना हिंदी पंडित बनवायचे नाहीये.
आमच्या घरात हिंदी मराठी ट्युशन घेतले जातात.
मी सुद्धा त्यांचे पुस्तक चाळून शिकवू शकतो.
आणि तसेही इंग्लिश टीचर कुठे मातृभाषा इंग्लिश असलेले असतात?
संस्कृतच्या बाई कुठे त्यांच्या घरात संस्कृत बोलतात?
पाचवीपासून असेही हिंदी विषय
पाचवीपासून असेही हिंदी विषय असतांना तो पहिलीपासून शिकवण्यात काय फायदा असेल हे संबंधित विभागाने स्पष्ट केले तर बरे होईल.
<<स्टेट बोर्ड सोडुन बाकी सिबिएस्सि, आयसिएस्सि वगैरेत हिंदी पहिलीपासुनच आहे.<<
प्रश्न राज्य शासनाने अधिकृत रीत्या हिंदी भाषेची सक्ती करणे योग्य आहे का हा आहे ना?
संघराज्याची प्रांतवार विभागणी भाषेनुसार झालेली आहे. एक देश एक भाषा सक्ती ही अंतर्गत बंडाळीस कारणीभूत ठरेल असे वाटते.
सध्या सगळेच राजकारणी ज्याने वाद उत्पन्न होईल अशाच गोष्टींमागे का लागले आहेत कोण जाणे!
ही लोकशाही आहे. बहुसंख्य
ही लोकशाही आहे. बहुसंख्य मराठी जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा हा निर्णय आहे, म्हणजेच लोकशाहीच्या तत्वानुसार बहुसंख्य मराठी भाषिकांची ही मागणी आहे. तवा चिडचिड कशापायी?
दियासलाई, लालटेन वगैरे
दियासलाई, लालटेन वगैरे गुलजारी शब्द >>> गुलजार तरी कुठे दियासलाई म्हणतो? त्याने तर स्वतःच माचिस नावाचा पिक्चर काढलाय
हाहाहा rmd .
हाहाहा rmd .
शासनाचा हा निर्णय हिंदीविरोधी
शासनाचा हा निर्णय हिंदीविरोधी आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला की त्या विषयाची वाट लागते हा इतिहास आहे. उद्या मराठी पोरं हे हिंदी शिकून निम्नलिखित पंक्ती वगैरे म्हणू लागली तर उत्तर भारतीय लोंढे महाराष्ट्राच्या सीमेवरूनच परत फिरतील असा काहीतरी डाव असावा.
तर उत्तर भारतीय लोंढे
तर उत्तर भारतीय लोंढे महाराष्ट्राच्या सीमेवरूनच परत फिरतील असा काहीतरी डाव असावा.
>>>>>>>>
मराठी मुलानी हिंदी शिकल्यावर रोजगार नक्कीच वाढेल.
बॉलीवूडमध्ये मराठी कलाकारांना फार मोठे रोल मिळत नाहीत याचे एक कारण म्हणजे हिंदीचे सदोष उच्चार. जर मराठी मुलांचे हिंदी सुधारले तर बॉलीवूडमध्ये मराठी टक्का नक्कीच वाढेल.
माधुरी दीक्षित जन्माला यावी पण शेजारच्या घरात, असे म्हणून आपण आजवर जगत होतो. पण आता घराघरात माधुरी दीक्षित जन्माला येईल.
आणि तिची जोडी एखाद्या खान कपूर कुमार सोबत नाही तर जोशी कुलकर्णी पवार सोबत जुळताना दिसेल.
काही संबंध वाटत नाही. साऊथचे
काही संबंध वाटत नाही. साऊथचे ॲक्टरस पण सदोष उच्चार करतात. हेच काय, पंजाबी लोक पण सदोष उच्चार करतात, पण उलट आता तोच नॉर्म झालाय.
महाराष्ट्रात येणार्या इतर
महाराष्ट्रात येणार्या इतर राज्यातील लोकांना मराठी समजत नाही.
त्यामुळे इथल्या लोकांनी हिंदी आणि दक्षिणेच्या भाषा शिकणे गरजेचे आहे.
“ पंजाबी लोक पण सदोष उच्चार
“ पंजाबी लोक पण सदोष उच्चार करतात, पण उलट आता तोच नॉर्म झालाय.” - हे अगदी खरंय हपा. बी. आर. चोप्राच्या ‘महाभारतात’ भीम-हनुमान भेटीचा (शेपूट उचलायचा) प्रसंग (यू-ट्युब वर आहे) बघा. दोघंही अस्सल पंजाबी अॅक्सेंटमधलं हिंदी बोलतायत.
हो आणि कपिल शोमध्ये गुफी
हो आणि कपिल शोमध्ये गुफी पेंटल यांनी तो किस्सा पण सांगितला होता.
हो, पण पंजाबी एक्सेंट हिंदी
हो, पण पंजाबी एक्सेंट हिंदी सोबतच तर आपल्याला जुळवून घ्यायचे आहे. मराठी एक्सेंटचे हिंदी डाऊन मार्केट आहे हे आधी प्रामाणिकपणे स्वीकारायला हवे.
हा निर्णय भाजपाच्या एक देश एक
हा निर्णय भाजपाच्या एक देश एक -- नुसार झालंय. ह्यात महाराष्ट्राच्या हिताचं काहीही नाही. मोदी शहांच्या good book मध्ये येण्यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला असेल. मला तर वाटतंय मराठीला अभिजात अभिजात भाषेचा दर्जा पण ह्याच कारणासाठी दिला असेल. बघा आम्ही हेही केलं आणि तेही केलं सांगायला मोकळे.
दोघंही अस्सल पंजाबी अ
दोघंही अस्सल पंजाबी अॅक्सेंटमधलं हिंदी बोलतायत. Happy>>> काय प्रॉब्लेम आहे? आमच्या गावी दशावतारी नाटकात त्ते म्हणजे देव कोकणीतून बोलतात. तामिळनाडूत तमिळ मध्ये बोलतात. इंग्लंड मध्ये इंग्रजीत. ते पूर्वी संस्कृत मध्ये बोलायचे. मग आपल्या संत मंडळींनी त्यांना मराठी शिकवली.
१ ली पासून हिंदीसक्ती कशासाठी
१ ली पासून हिंदीसक्ती कशासाठी?>>> अशासाठी की मग असे विनोद होऊ नयेत म्हणून.
"वेटर आज भातमे खडा क्यूँ?"
" साब, भातमे कहाँ, मै तो जमीनपे खडा हू."
हिंदी शिकणे फायद्याचे आहे.
हिंदी शिकणे फायद्याचे आहे. त्याबाबत दुमत नाही.
मुद्दा आहे तो सक्ती असावी की नसावी.
अभ्यासक्रमात हिंदी असावी पण ऑप्शनल सब्जेक्ट असावा.
महाराष्ट्रातील कोणत्याही
महाराष्ट्रातील कोणत्याही सक्तीचा विरोध पुण्यनगरीमध्ये हिरीरीने होतो, तसेच सक्तीचा प्रतीकात्मक विरोधही अतिशय छान / अभिनव पद्धतीने पुण्यात होतो, जसे हेल्मेट सक्तीविरोधात डोक्यावर पोखरून कलिंगड बांधणे किंवा पातेले बांधणे इत्यादी इत्यादी.
पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात खास पुणेरी विरोध कसा होईल याची जाम उत्सुकता आहे.
पुणेकर कृपया हलके घ्या.
Pages