Robotic Vacuum Cleaner and Mop

Submitted by दिव्या१७ on 13 May, 2024 - 07:32

कामवाली ने वैताग आणलाय कधीही न सांगता सुट्टी, टाइम न पाळणे, खूप उशिरा येणे. पण घरातली सगळी काम नाही होत ऑफिस असते, घरी आले कि घरातली काम, मुलांचा अभ्यास सगळी काम स्वतः करायला वेळ आणी शक्ती अपुरी पडते.

ऍमेझॉन वर आज रोबोट Vaccum अँड Mop बघितला पण खूप Model आणी companies आहेत. कुणाकडे रोबोट vaccum अँड mop आहे का? असेल तर कुठल्या कंपनी चा आहे किंवा घ्यावा. माहिती मिळाली तर खूप मदत होईल.

Review बघून Ilife किंवा Dreame चांगले वाटत आहेत.
ILIFE A20 Robotic Vacuum Cleaner
dreame D9 Max Robotic Vacuum Cleaner and Mop

Group content visibility: 
Use group defaults

यावर इथे एक चर्चेचा धागा आहे.शोधते.
आमच्याकडे इकोव्हॅक डीबॉट आहे.अनुभवातून आलेले काही मुद्दे:
1. रोजचे हात फिरते झाडलेले घर असेल तर रोबो जास्त चकाचक सफाई करतो.जिथे हात जात नाहीत अश्या जागी, सोफ्याखाली चांगली सफाई करतो.
2. गोल असल्याने अगदी कोपऱ्यातले 1 इंच राहू शकते. ते राहू नये म्हणून त्याला मांजरीच्या मिश्यांसारखे झाडू असतात.पण तरीही किंचित एरिया राहू शकतो.
3. चेंबर लहान असल्याने पटकन भरते.त्यामुळे बरेच महिने बंद, धुळीने भरलेले घर साफ करायचे असेल तर रोबो आधी हाताने स्वच्छ झाडून घेतलेले बरे.आणि चेंबर स्वच्छ करत राहावे लागते पूर्ण भरले का बघून.
4. बाथरूममध्ये जातो,1 इंच पर्यंत असलेला उंबरा चढून.त्यामुळे बाथरूम आणि घराचे बाहेर जाणारे दार बंद करावे लागते.
5. फायदा हा की आपण काहीतरी वेगळे काम करत असताना लावून देता येतो.चार्जर लावून ऑन करून ठेवल्यास स्वतः चार्जर वर चढून चार्जिंग चालू करतो.
6. घरात लहान मुलं, इकडे तिकडे वस्तू असल्यास क्लिनिंग नीट होत नाही.पडणाऱ्या उभ्या वस्तू असल्यास सरकवून ठेवाव्या लागतात(रोबो ने उभ्या तिरक्या शिडी ला धक्का मारल्याने ती समोरच्या भिंतीवर पडून पेंट चिप झाला, आरसा फुटला असे होऊ शकते(झाले आहे पेंट चे)
5. हा रोबो असणे हे एखादे गुणदर्शक लहान मूल घरात असण्यासारखे आहे.मूल वेगवेगळ्या लीला करून दाखवते त्यामुळं कौतुक वाटतेच,पण लक्ष ठेवावे लागते.

हे पूर्वीचे धागे, यावर खूप माहिती आहे
https://www.maayboli.com/node/81055
https://www.maayboli.com/node/39354?page=1
https://www.maayboli.com/node/76732

आमच्याकडे एमआयचा रोबो आहे. तुम्ही सांगितलेत तेच मेडचे प्रॉब्लेम होते, ज्येना एकटे राहत होते आणि वयोमानामुळे फारशी सफाई करू शकत नव्हते त्यावेळी घेतला.
१. धूळ चांगली साफ होते. पण केस वगैरे पडलेले असले तर रोबोच्या मिश्यात, रोलरमध्ये अडकतात. खूपच अडकले तर रोलर नीट फिरत नाही मग कात्री घेऊन ते केस कापावे लागतात.
२. घरात खाली पडलेले कागदाचे कपटे वगैरे व्हॅक्यूम होतात. पण लेगो ब्रिक्स, क्रेयॉन्स वगैरे वस्तूमुळे फिल्टर ब्लॉक होऊ शकतो. अशा वस्तू टाकणारी माणसे घरात असल्यास हे प्रकार रोबो-रनपूर्वी उचलणे किंवा त्यांना उचलायला लावणे यात आपली मानसिक शक्ती खर्च होऊ शकते. पण त्यांच्यावरच रोबो नीट चालतो की नाही हे बघण्याची जबाबदारी टाकल्यास हे साध्य होऊ शकते.
३. अश्या माणसांनी चित्रकला, क्राफ्ट इत्यादी करताना जमिनीवर पडलेले डाग रोबो घालवू शकत नाही. अशा वेळी 'हाथ बदलेगा हालात'च करावे लागते.
४. मऊ पायपुसणी, जमिनीपर्यंत लोळणारे पडदे वगैरे रोलरमध्ये अडकू शकतात. त्यामुळे ती आधीच बाजूला काढणे हे जास्तीचे काम होते.
५. घरात घालायच्या स्लिपरवर वगैरे रोबो चढून बसतो व उतरू शकत नाही अशावेळी आपण इंटरवेन करावे लागते.
६. अनु म्हणाल्या तसे हलक्या वस्तू धक्का लागून पडू शकतात.
७. खुर्च्या टेबलं खूपच इकडे तिकडे झाली असतील तर त्याचा मॅप गंडतो. मग पुन्हा रिसेट करावा लागतो.
८. आमचा रोबो वेट वाईप करतो त्यामुळे दररोज त्याच्या मिनी टॅंकमध्ये पाणी भरावे लागते कारण कपॅसिटी फार कमी आहे. त्याचा कापडी खरखरीत मॉप ३-४ दिवसामागे काढून धुतला तर जास्त फायदा होतो.

या सगळ्या गोष्टींमुळे सुरुवातीला रोबो वापरण्याचा वैताग येऊ शकतो. पण घरातल्या सगळ्यांना शिस्त लागली की आपला वेळ आणि मनस्ताप वाचतो.

आम्ही प्रत्येक खोलीनंतर,किंवा 2 खोल्या झाल्यानंतर मॉप धुतो(मदतनीस मावशींची सुट्टी 2 दिवस किंवा पुढे झाल्यास दर दिवसाआड लावतो, आणि घरात बरीच धूळ येते.)
केस बरेच अडकतात.मग रोबो ची सफाई करावी लागते.
पण सवय झाली की रोबो ने स्वच्छ पुसलेले स्वतः बसून बघताना मजा येते Happy
मला 'तुम्ही' म्हटले नाही तरी चालेल.माझे मानसिक वय कमी आहे Happy

थँक्स mi_anu, MazeMan खूप चांगल्या टिप्स दिल्याबद्दल. एमआय आणी इकोव्हॅक चे मॉडेल्स हि बघते.
आमचा रोबो वेट वाईप करतो त्यामुळे दररोज त्याच्या मिनी टॅंकमध्ये पाणी भरावे लागते कारण कपॅसिटी फार कमी आहे>>>> किती कॅपॅसिटी आहे?

तुम्ही कधी पासून वापरत आहात रोबो व्याकुम? आफ्टर सेल्स सर्विस कशी आहे?

मुले मोठी आहेत म्हणून लेगोस, क्राफ्ट आणी जास्त कचरा नसतो, आणी मी बघितलेल्या दोघी मॉडेल्स मध्ये इन्व्हिसिबल वॉल किंवा नो टच झोन आहे.

आम्ही 3 वर्षं वापरतोय.आफ्टर सेल्स सर्व्हिस आता सुधारली आहे असं ऐकून आहे.अजून (टचवुड) वेळ आली नाही.
आपण बदलण्यासारखे स्पेअर्स असले तर अमेझॉन वर मिळतात.
मिनी टॅंक मध्ये एकदा भरलेले पाणी पूर्ण घराच्या 1 वेळच्या पोछा ला पुरते.कपॅसिटी पाहिली नाही पण बहुतेक अर्धा पाऊण लिटर असेल.अर्धा मग पाण्याइतकी. मोठा मग.लगेच रोज वापरणार नसल्यास पाणी पूर्ण रिकामे करून टॅंक उपडा ठेवावा.आम्ही एकदा 2 आठवडे टॅंक रिकामा करायला विसरलो होतो.नंतर बाटली स्वच्छ करायचा ब्रश, बार्बेक्यू स्कीवर्स ना फडके बांधून आतले शेवाळे साफ करावे लागले.
डायनिंग टेबल च्या खुर्च्या बरोबर रोबो च्या व्यासाच्या मापाच्या आहेत.त्यामुळे कधीकधी खुर्चीत अडकून 'प्लिज हेल्प मी आउट' म्हणतो.सर्व खुर्च्या शक्यतो वेगळ्या खोलीत ठेवून देतो.आणि दार बंद करून खोली दर खोली काम करतो.तसं नाही केलं तरी चालतं अर्थात.
माझा सूर 'फार नखरे आहेत' वाला झालाय खरा.पण तरी तो आणि त्याचं काम आवडतं.

मिनी टॅंक मध्ये एकदा भरलेले पाणी पूर्ण घराच्या 1 वेळच्या पोछा ला पुरते, आफ्टर सेल्स सर्व्हिस घ्यायची वेळ आली नाही अजून >>> सेम हिअर. एक-दीड फुलपात्र असावी कपॅसिटी. वीज नाही तरी पाणी वाचवतोच. तरी मॅन्यूअल शोधून सांगेन.
.

एमआय आणी इकोव्हॅक बघितले बाकी ही companies बघितल्या recent reviews मध्ये aftersale problems आणी २-४ महिन्यात बंद पडणे वैगेरे reviews बघून थोडे confusion होत आहे प्रॉडक्ट फायनल करताना. ऍमेझॉन आणी फ्लिपकार्ट वर फक्त रिप्लेसमेंट option आहे रिटर्न नाही.

थँक्स mi_anu, MazeMan वेळ काढून रिप्लाय केल्याबद्दल.

माझा सूर 'फार नखरे आहेत' वाला झालाय खरा.पण तरी तो आणि त्याचं काम आवडतं.>>>>>>>> माझ्या कामवाली पेक्षा कमीच नखरे आहेत, दर ४ दिवसांनी तो आजारी तरी पडत नाही. Happy

प्रॉडक्ट्स १०००० पासून १ लाख पर्यंत आहेत सेल्फ empty, सेल्फ cleaning आणी बरंच काही.

विचार करताना असे वाटते की एकदा प्रॉडक्ट घेताना जास्त सुविधा बघून घ्यावा, पण reviews वाचल्यावर प्रॉडक्ट लाईफ जास्तित जास्त २ वर्ष असेल जास्त चालला तर आपले लक, पण जर reviews प्रमाणे १ वर्षात बंद पडला तर? आणी सतत बदलती technology मुळे आज ३०-४० हजार चा एक रोबो घेण्या ऐवजी १०-२० हजार पर्यंत बेसिक मॉडेल घ्यावे आणी २ वर्षा नंतर परत नवीन टेकनॉलॉजि असलेला घ्यावा असा विचार चालू आहे. रिअली व्हेरी much confused Sad

10-20 हजार वाला अप्रोच बरोबर आहे.किमान 5 वर्षं चालला तर पैसे वसूल.
सध्या 12 ते 19 हजार च्या रेंज मध्ये चांगल्या पॉवर चे क्लिनर्स अमेझॉन वर मिळत आहेत.ज्याचे चांगले रिव्ह्यू जास्त संख्येत आहेत तो बघून घ्या(आणि 1 स्टार, 2 स्टार रिव्ह्यू का 1 स्टार, 2 स्टार आहेत तेही वाचा.कदाचित त्या 1 स्टार देणाऱ्यासाठी डील ब्रेकर असलेली गोष्ट तुमच्या साठी 'चालेल हे' असेल.
(कितीही मोह झाला तरी कमी हॉर्स पॉवर वाले मॉडेल घेऊ नका, आणि हायर चे प्रॉडक्ट घेऊ नका.एम आय किंवा इकोव्हॅक बघा.युरेका फॉर्ब्स व्हॅक्युम क्लिनर च्या धंद्यात भारतात सर्वांच्या आधी आले असले तरी त्यांच्या कस्टमर सर्व्हिस आणि मॉडेल्स बद्दल जरा शंका आहे.त्यांचे साधे व्हॅक्युम क्लिनर आम्हाला लाभले नाहीयेत.वेट अँड ड्राय चांगला चालू आहे.त्यांचा रुंबा कोणाकडे असेल तर रिव्ह्यू विचारा.)

खूप सारे प्रॉडक्ट्स बघितले आणी खालील कंपॅरिसन चार्ट बनवला इथे टाकते आहे कोणाला रोबो vaccum घ्यायचा असेल तर कामात येईल. मी पहिले ३ (ECOVACS Deebot N10, ECOVACS Deebot OZMO T8, ILIFE A80 Pro) चे youtube reviews बघून यातला एक फायनल करेन, Ecovac च्या दोघी मॉडेल्स ला auto empty station आणी vibrating mop नंतर ऍड करता येते म्हणून Ecovac ला प्रेफरेन्स आहे.

Screenshot_6.png

चायनिज कंपनी आहे म्हणून मी इकोवास कॅन्सल केला.

आय्लाइफ ए २० चांगला आहे. (२६ के) एक वर्श चालला तरी बाईचे पैसे वसूल होतील म्हणून घेतलाय.

mi_anu हो जरूर.

मेधावि -- कधी घेतला तुम्ही?, मॉपिंग चांगले होते का? aftersales सर्विस कशी आहे? तुमचा अनुभव कसा आहे?

बर्याच reviews नेगेटिव्ह कंमेंट्स आहेत ऍमेझॉन वर २-३ महिन्यात प्रॉडक्ट प्रॉब्लेम देतो म्हणून , काही खाली दिले आहेत >>
Within 4-5 days of usage the product started giving issues. Battery issue, noise issue and mop issues
ILIFE I20 HAS BEEN GIVING ISSUES SINCE DAY ONE AND AFTER ONE MONTH I SENT THE MACHINE BACK FOR REPAIR AND THEY RETURN IT AFTER LOTS OF FOLLOWS UPS
We have used it for only a week or so, but all of a sudden a few days ago, it has gone off and won't come on.
the product stopped working after three months of purchase

एप्रिल मधेच घेतलाय.

चांगला आहे अजून तरी. पोछा फार उत्तम नाही होत पण ठिक आहे.

आ. से. सर्वीस चांगली आहे. पुण्यात तरी.

अजून घेतला नसेल तर milagrow चां पण विचार करा
गेले 3 वर्षे रोज वापरत आहोत, काहीही तक्रार नाही
काही शंका असतील तर त्यांची customer service टीम तातडीने उत्तरे देते
आता battery कमी वेळ चालते आहे , त्यामुळे buyback मध्ये त्यांचेच पुढचे मॉडेल घेणार आहे

थँक्स मेधावी, सामान्य वाचक

अजून घेतला नसेल तर milagrow चां पण विचार करा >>> तुमचा मॉडेल कोणता आहे? मॉपिंग कसे करतो?

मला कामवालीला रिप्लेस करेल असा vaccum + Mop हवा आहे. सगळ्या रोबो मध्ये vaccum छान आहे पण मॉपिंग मध्ये प्रॉब्लेम आहे.

मी Milagrow मॉडेल्स बघितले पण youtube वर सगळे sponsored reviews आहेत आणी ऍमेझॉन वर हि खूप कमी review आहेत त्यात बरेच नेगेटिव्ह ही आहेत, म्हणून consider नाही केला.

या बद्दल सध्या काही माहिती/ अनुभव आहेत का कोणाचे. म्हणजे कोणता घ्यावा किंवा घेऊ नये. घ्यायचा विचार डोक्यात आल्यामुळे चौकशीला सुरुवात केली आहे.

हा धागा तीन महिन्यापूर्वी का नाही दिसला? पण असो, ऑक्टोबरच्या सुरुवातीला युरेका फोर्ब्सचा रोबो घेतला, पहिले काही दिवस vaccum + mopping असे कॉम्बिनेशन एकत्र, वेगवेगळे वापरले. जर घरातील केर काढून मग mopping केले तर परिणाम खूप चांगला आहे असे लक्षात आले. आता जर रोबो घेतला तर केर कशाला काढायचा असा प्रश्न येईल, पण जर असे केले नाही तर रोबोचा कंटेनर लवकर भरून जातो. १५ ते २५ च्या रेंजमधील रोबोचे कंटेनर लहान असल्यामुळे मोठे घर असेल तर असे होऊ शकते. मॉपिंगने खूप छान पुसल्या जाते पण हट्टी चिकट डाग नाही निघत, ते स्वतः साफ केले तर तो बाकीचे पुसून घेतो. आम्ही मॉपचे कापड ओले करतो मॉपिंग सुरु करण्यापूर्वी, चांगले परिणाम दिसले.

रोबोरॉकचा हा गेल्याच आठवड्यात घेतला.
१२००० पास्कल सक्शन प्रेशरचा आहे. व्हॅक्युम, आणि ड्राय आणि वेट मॉप करतो. हार्डवुड, सिरॅमिक, कार्पेटला वेगवेगळ्या सक्शनने व्हॅक्युम करतो. कार्पेट स्वच्छ करताना मॉप पॅड वर उचलुन घेतो. कोपर्‍यातील केर बाहेत काढायला वर्तुळाच्या बाहेर डोकावणारे ब्रश आहेत ते फिरतात. कोपर्‍यात पुसुन घ्यायला मॉप पॅड्स पण परीघाच्या बाहेर येतात आणि पुसतात. अजुन पर्यंत तीन वेळाच वापरला आहे आणि आवडलेला आहे.

दिवाळीच्या आधी आम्ही युरेका फोर्ब्सचा स्मार्टक्लीन nuo रोबो घेतला, सक्शन पॉवर 5000 आहे, तीनच खोल्या असल्याने ठीक आहे (555 एरिया आहे) . फार लावला जात नाहीये. डेमोला आलेले, मॅपिंग करून दिलं त्यांनी. जिथे जिथे फर्निचर होतं, ते बाजूला केलं की बावचळतो कारण तेव्हा ते बाजूला केलं नव्हतं. पाऊण वीत जागा असेल फर्निचरखाली तर जाऊन साफ करतो. लादी पुसताना, पाणी फक्त अकवागार्डचं घालायचं. फिनेल, lyzol काही घालायचं नाही. लादी पुसताना आम्ही high power वर ठेवतो मग लादी पुसल्यासारखी वाटते. सध्या तरी आम्ही एकेक दिवस एकेक खोली करतोय.

फर्निचर बाजूला करून केर, लादी करताना झोन वाईज देतो, मग तो नीट करतो कारण डेमो साठी आलेले तेव्हा ते बाजूला केलं नव्हतं त्यामुळे त्याच्या डोक्यात शिरत नाही (आमच्याकडून बरीच गॅप झाली की आळशी होतो की काय तो असंही वाटतं, मध्ये बरीच पडलेली) पण विशिष्ट झोन निवडला की बऱ्यापैकी करतो. कधी कधी मला मठ्ठही वाटतो तो Lol मग ते मशीन ऑफ करून परत सुरू करतो, मग स्मार्ट होतो. कधी कधी त्यातली बाई मिसगाईड करते त्याला असा मला संशय येतो. जास्त वापरल्यावर सांगेन, सध्यातरी बरा वाटतोय. 33 हजाराचा 18, 500 त मिळाला, डायरेक्ट युरेका फोर्ब्स कडून, फेस्टिव्हल ऑफर्स होत्या. नवरा अमेझॉन वरून नको म्हणाला, डेमो ला आले नाही तर काय त्यामुळे. माझ्याकडून लादी पुसणे फार होत नाही, त्यासाठी नवरा म्हणाला घेऊया. मदतनीस ताई जुन्या यायच्या अधूनमधून, त्यांना वेळ नसतो, नवीन कोणाला मुलगा घरी येऊ देत नाही हेही एक कारण रोबो घ्यायचं.

गुंतवळ ब्रशमध्ये अडकते, ती मी हाताने काढते.

वापरुन झाला की मॉपिंग पॅड धुवून वाळवून ठेवते.

मी जो घेतलाय त्यात केस अडकत नाहीत हे आणखी एक चांगलं फीचर आहे.
ते करायला त्यांनी एकच मोठा गोल फिरणारा दाते वाला रोटर असतो त्या ऐवजी दोन लहान रोटर एकमेकांच्या विरुद्ध फिरणारे आणि त्यांचे ग्रुव्ह बाहेरून आतल्या बाजूला. हे दोन रोटर जवळ येतात तिथे छोटी भेग आणि खाली डस्ट पॅन, ज्यात हे केस रोल होऊन सक्शन ने आत पडतात.
एकही केस काढावा लागला नाही.

मस्तच की अमित
अन्जु ताईची पोस्ट मजेदार आहे.
कधी कधी मला मठ्ठही वाटतो तो Lol मग ते मशीन ऑफ करून परत सुरू करतो, मग स्मार्ट होतो. कधी कधी त्यातली बाई मिसगाईड करते त्याला असा मला संशय येतो.>>> smiley36.gifयाला खुप हसले.

घराला हात लागलाच पाहीजे. फरशी स्वच्छ करताना तंद्री लागते. मेडिटेशनचा अनुभव येतो. अस्वच्छ फरशीवर फडकं फिरलं कि ती स्वच्छ होते. बिफोर अँड आफ्टर बघताना स्वर्गीय आनंद मिळतो. हा आनंद आपण मशीन्सला का द्यायचा ? त्याला मन नाही, भावना नाहीत. तो वीज खर्च करून घर स्वच्छ करतो. त्यात आपुलकीची भावना नाही. त्याचे कॅलरीज जळत नाहीत. तो अन्न खात नाही. वीज खातो ज्यामुळं कार्बन उत्सर्जन होतं. कपड्यांना इस्त्री केली तरी कार्बन उत्सर्जन होतं. आता रिंकल्स अच्छे है अशा मोहीमा निघू लागल्या आहेत. तसेच गंदा फर्श अच्छा है अशा मोहीमा निघायच्या आधीच आपण हाताने स्वच्छ करायला सुरूवात केली पाहीजे.

जेव्हढे यंत्रांच्या आहारी जाल तेव्हढे तुम्ही सुस्त, आळशी, अनारोगी, चिडचिडे होत जाणार. वेळ वाचल्यावर करायचे काय म्हणून तुम्ही सोशल मीडीयात येणार. त्यामुळे अजून कार्बन उत्सर्जन होणार. त्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढत जाणार. उष्मा वाढत जाणार. यामुळे अजून चीड्चीड होत जाणार. मग तुम्ही ते फ्रस्ट्रेशन मायबोलीवर विरोधी मतांवर काढणार. अंगावर वस्सकन धावून जाणार. यामुळे नवे मायबोलीकर घाबरणार. तुमचा बीपी शूट होणार. तिकडे बाहेर तापमान वाढत जाणार.

यामुळे एक तर पृथ्वी तरी नष्ट होणार किंवा तुम्ही तरी. यातले आधी जे होईल ते होईल.

@एक लेखक, मीही अशीच एक प्रतिक्रिया देणार होतो परंतू मायबोलीवर लेखाच्या विषयाला धरूनच लिहिण्याची पद्धत आहे. मग ते ज्योतीष असो किंवा अंधश्रद्धा. उगाच फाटे फोडणे ( ट्रोल?) करत नाहीत.
( अवांतर: DIY एका तीन फुटी काठीला फडके बांधले आहे ते भिजवून लादी पुसणे झाडणे एकत्रच करता येते. फडके जुन्या पडद्याच्या पॉलिएस्टर कापडाचे असल्याने ते कुजत नाही. तीन इंचीपेक्षा उंच असलेल्या कपाटाखालीही साफसफाई करता येते. धुवायला सोपे. पाण्यात बुचकळून जोरात हलवायचे किंवा घुसळायचे. पंधरा वीस मिनिटांचे काम. कोणताही खर्च नाही, शिवाय व्यायाम फुकट. दहा ते सत्तर वयाची कोणतीही व्यक्ती करू शकते.)
बाकी चालू द्या. हा प्रतिसाद इथेच संपवतो.

क्रोमातून दीड वर्षापूर्वी युरेका फोर्ब्सचा " robo LVAC VOICE PRO " ३० हजाराला घेतला. अगदी उत्तम काम करत आहे. ३१ मिनिटात ४५ स्क्वेअर मीटर फरशी साफ करतो. लो सक्शनला फक्त १४% बॅटरी वापरली जाते. हाय सक्शन वापरून बघितले, विशेष फरक पडत नाही. गालिचा असेल तरच जास्त पॉवर लागते, एरवी लो सक्शन बेस्ट. फरशी खूपच गुळगुळीत झाल्याने चार्जिंग डॉकवर चढताना त्याची चाके जागेवरच फिरतात, त्यावर उपाय म्हणून डॉक समोर फरशीवर ग्रीप पट्टी आडवी लावावी लागली. वर्षभरात फक्त एकदा moping pad आणि filter बदलले. Roller brush अद्याप व्यवस्थित काम करतोय.
Robo cleaner पहिल्यांदा जेव्हा रूम स्कॅन करतो तेव्हा रूम फार मोठे असेल तर त्याचे दोन भाग करतो. घरचा हॉल २५० स्वे. फू. असल्याने तो दोन भागात विभागला गेला. आपण मॅन्युअली त्यात सुधारणा करू शकतो. उदा. डायनिंग टेबल मध्येच विभागले गेल्यास आपण पूर्ण टेबल एकाच विभागात ठेवू शकतो. पहिला भाग साफ करत असताना सगळ्या खुर्च्या दुसऱ्या भागात ठेवल्याने रोबोला अडथळा येत नाही आणि सफाईला कमी वेळ लागतो. दुसऱ्या भागाची सफाई सुरू करताना सगळ्या खुर्च्या साफ केलेल्या भागात ठेवायच्या. थोडे कष्ट पडतात परंतु गरजेचे आहे. बाथरूमसमोरील पायपुसणे,चप्पल रोबोच्या मार्गातून बाजूला ठेवावे.
कपाट किंवा पलंगाखाली सफाई रोज नाही केली तरी चालू शकते. त्यासाठी नो मॉप झोन एरिया आखून दिला तर रोबो त्या भागात जात नाही. मी आठवड्यातून एकदाच हा झोन हटवतो व सफाई करून घेतो. उंबऱ्यावरून रोबो बाहेरजाऊ नये म्हणून तेथेही अशी लक्ष्मण रेषा आखता येते.
मला ह्या रोबोचे पाणी वापरून फरशी पुसायचे काम अजिबात आवडले नाही. धुळीने माखलेले पॅड ओले झाल्याने फरशीवर फराटे दिसतात. मुळात फरशी खूपच स्वच्छ करत असल्याने फरशी पुसायची गरजच पडत नाही. फारच चिकट डाग असतील तर कपड्याने पुसून घेतो.
रोबोची देखभाल -
रोबोला नळाचे पाणी मानवत नाही त्याचा पंप खराब होतो, RO चेच पाणी वापरावे लागते.
रोज रोबोचे कंटेनर आणि एअर फिल्टर साफ करावे. धुळीचे सूक्ष्म कण फिल्टरवर जमा झाल्याने सक्शनवर परिणाम होतो.
मशिनसोबत दिलेल्या ब्रशने एअर फिल्टर साफ करावे. ह्याच ब्रशला रोलर ब्रशमध्ये अडकलेले केस, धागे काढण्यासाठी कटर असते त्याने ते काढावे.
चाकांना चिकटलेला थर आणि गुंडाळलेले धागे, केस आठवड्यातून एकदा साफ करावे.
मॉपिंग पॅड रोज ब्रशने साफ करावे व चारपाच दिवसांनी एकदा धुवून वाळवून वापरावे.
गरज नसेल तर उगाच हाय सक्शन वापरू नये. बॅटरीचे लाईफ कमी होते. बॅटरी महाग असते आणि घरच्या घरी बदलता येत नाही.
रोबो कधी गंडतो ?
१) सेन्सर समोरील भागावर धूळ जमल्यास कधी कधी रोबो भरकटतो.
२) वायफाय बंद पडल्यास .
३) रोबो अपडेट झाल्यास. अशा वेळेस तो उगाचच इकडे तिकडे फिरतो. त्यासाठी त्याचे पॉवर बटण थोडावेळ बंद करून चालू करावे. कधी कधी अपडेट पूर्ण झाल्यास क्लिनिग मॅपमध्ये बदल होतो. असे क्वचितच होते परंतु झाल्यास पुन्हा एकदा रूम मॅप स्कॅन करून घ्यावा.
३) चुंबकीय क्षेत्रामध्ये हा प्रवेश करत नाही. घराजवळून हाय व्होल्टेज केबल जात असेल तर त्या भागात गडबडतो, गोलगोल फिरतो.

घर छोटे आणि अडगळ फार असेल तर फार महागाचा आणि मोठ्या आकाराचा रोबो घेऊ नका. छोटा रोबो विना अडथळा सहज काम करतो. घरात जमिनीवर कायमस्वरूपी गालिचा नसेल तर उगाच हाय पॉवरच्या मागे लागू नका.
कामवाल्या बाईपेक्षा हजार पटीने चांगले आणि वेळेवर ( तसा टाइम सेट केल्यास ) काम करतो. आपण बाहेर गावाहून आल्यास घर साफ करावे लागत नाही. त्यामुळे किंमतीने महाग वाटत असला तरी तो त्याच्या कामामुळे महाग वाटत नाही.

आग्या 1990 (मोबाईलवर आकडे रोमन येतायेत) फार छान पोस्ट, धन्यवाद. ही पोस्ट नवऱ्यालाही वाचायला देईन.

केस अडकतात ते साफ करण्याचा ब्रश दिलाय का बॉक्स उघडून बघते. खरंतर नवराच त्या दिवशी सर्व बघत होता. मी विशेष लक्ष दिलं नाही, टेक्निकली मी जरा ढ आहे.

मी high mode वर mopping देते, आमच्याकडे फराटे दिसत नाहीत, स्वच्छ होते लादी. मला लादी पुसणे प्रकार जास्त आवडला खरं तर. आता ती बॅटरी त्यामुळे down होत असेल तर विचार करेन. तुम्ही scanning लिहिलंत, त्यालाच डेमो वाले मॅपिंग म्हणत होते.

सेन्सरसमोरील भाग साफ करून घेतो. ते नवऱ्याच्या लक्षात आलं मध्ये, त्यामुळे भरकटत असेल असं.

रूम क्लिनिंग साठी standard mode देतो. Mopping साठी high.

प्राजक्ता थँक्स.

माझ्याकडे इकोव्हॅक आहे.

मॉपिंगच्या आदल्या रात्री मी फुलझाडूने केर काढून घेतो.

रात्रभर हवेतली धूळ जिला प्रदूषणाच्या परिभाषेत सस्पेन्डेड फ्लोटिन्ग पार्टिकल्स म्हणतात त्यापैकी बरीचशी धूळ जी साधारण उजेडात डोळ्यांना दिसत नाही ती खाली बसते.

यंत्र सुरू केल्यावर डीबॉट जमिनीवरील धूळ तसेच आत खेचलेल्या हवेतील धूळ शोषून घेतो. जमिनीवर सूक्ष्म खळगे असतील, खासकरून अडचणीच्या ठिकाणी तर त्यातील धूळ शोषून घेतो. सामानाची हलवाहलव करतांना कधी ग्राउटिंग्मध्ये सूक्ष्म खळगे झाले असतील तर त्यातील धूळकचरा शोषून घेतो. हे यंत्राशिवाय शक्य होत नाही.

मॉप पॅड बाटलीत मध्ये सुमारे ३००-३५० मिलि पाणी राहते. आरओ पाणी वापरतो. सोफा सेट आणि एका जड टेबलला तळाला नायलॉन गट्टू बसवले आहेत. त्यामुळे ते सहज सरकवता येतात. डीबॉट डावीकडे अस्तांना सारे उजवीकडे सरकवून घेतो आणि अर्ध्यावर आला की पुसलेल्या डावीकडच्या भागात सरकवून घेतो.

मॉप पॅड मात्र प्रत्येक वेळी साध्या पाण्याने स्वच्छ करून घेतो.
डायनिंग टेबलच्या खुर्च्या मात्र फारशा जड नसल्यामुळे घराबाहेर ठेवतो. गावातले घर असल्यामुळे हे शक्य होते. फ्लॅटमध्ये हे करता येणार नाही.

वायफाय अडकले तर मात्र डीबॉट गडबडतो. तसेच दुसरे काही ब्लू-टूथ अगोदर बंद करावे लागते. डॉकिन्ग स्टेशन आणि डीबॉटमधील संपर्क ब्लूटूथवरच चालतो.

सारे झाले की की शेवटी स्टेशन डीबॉटमधला कचरा शोषून घेते. स्टेशनमधला कचरा दर वेळी रिकामा करून घेतो आणि सारे ब्रशेस स्वच्छ करून घेतो.

लादी मात्र कपबशीएवढी स्वच्च्छ होते. जवळजवळ अकराशे चौ फूट ५०-५५ मिनिटात स्वच्छ होते. चार खोल्या होईपर्यंत न्याहारी तयार होते आणि खातखात बाकीच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवता येते. पाण्याचा पंप सुरू करणे, कपडे वॉशिंग मशीन सुरू करणे इ. नित्याची कामे करता करता जमीनही स्वच्छ होते. फारसे श्रम करावे लागत नाहीत.

एकंदरीत चांगला अनुभव आहे.