देऊळ

Submitted by Revati1980 on 19 April, 2024 - 08:55

देऊळ

हिंदू धर्माचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे मूर्तिपूजा आणि मंदिरे. श्रद्धेचे, निष्ठेचे, भक्तीचे रूप म्हणजे मूर्तिपूजा. सिंध व पंजाब या प्रदेशांतील उत्खननांत सिंधुसंस्कृतीचे जे अवशेष सापडले त्यांत विविध प्रकारच्या मूर्ती मिळाल्या. त्यांतील एक मूर्ती शिवाची असून, काही मूर्ती देवीच्या होत्या. वैदिक आर्यांची संस्कृती यज्ञप्रधान असल्याने वेदात सूर्य, इंद्र, वरुण, द्यौ, अग्नी, इत्यादी निसर्गदेवतांची स्तुती व प्रार्थना केलेली आहे. वैदिक आर्यांमध्ये मूर्तिपूजा प्रचलित होती, असे मानायला वेदातील अनेक ऋतांमध्ये देवतांच्या मानवरूपी आकृतीचे वर्णन केलेले आढळते. ऋग्वेदाच्या ४.२४.१०व्या ऋचेत इंद्राच्या प्रतिमेचा उल्लेख सापडतो.

'क इमं दशभिर्ममेन्द्रं क्रीणाति धेनुभिः।'

'दहा धेनू देऊन माझ्या या इंद्राला (अर्थात् इंद्राच्या मूर्तीला) कोण बरे विकत घेईल?' असा या ऋचेचा अर्थ होतो.

यजुर्वेदातील तैत्तिरीय संहितेत सांगितल्याप्रमाणे देवाची भौतिक आणि काल्पनिक अशी दोन्ही रूपे प्रचलित होती. तैत्तिरीय ब्राह्मणात तसेच वाजसनेयी संहितेत तीन देवतांच्या सुवर्ण मूर्तीचा तर तैत्तिरीय आरण्यकात सात सूर्यमूर्तींचा उल्लेख आहे. यावरुन वैदिक काळात मूर्तीपूजा होत असे. वैदिक युगाच्या अंती मंदिर संस्कृती यागशाळांच्या रूपात सर्वप्रथम जन्मली. नंतर क्रमशः मंदिर वा देवालयाच्या संकुलापर्यंत विकसित झाली.

हिंदू मंदिरे म्हणजे केवळ इमारती नाहीत तर ती समाजाचा पाया, विश्वास, निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक असून धर्माचे आणि देवत्वाचे मूर्त स्वरूप आहे. जनजागृती, समाजप्रबोधन, शिक्षण, मूल्ये, शक्ती, भक्ती आध्यात्मिक ऐक्य, सामाजिक संघटन, कार्यात्मक अभिव्यक्ती किंवा वैश्विक समन्वय म्हणजे हिंदूंची मंदिर संस्कृती. मंदिरे उभारणे आणि बांधणे हे अत्यंत पुण्याचे कार्य आहे हे सनातन धर्माचे चक्रवर्ती सम्राट आणि राजांना माहीत असल्यामुळे तसेच, हिंदू धर्मातील सर्वांचा विकास, प्रगती, आणि संघटीत शक्ती साधायला समूहाला एकत्र आणणे आवश्यक असल्याने मानव आणि राजा, म्हणजे देव यांच्यात एक दुवा साधणारे साधन म्हणून सुद्धा मंदिरे आणि देवळे बांधली गेली.
मंदिरांना देवालय, म्हणजे देवाचे घर असेही म्हटले जाते. मानवाला कृतार्थ करण्यासाठी देवाने, ईश्वराने पृथ्वीवर निवास करण्यासाठी निवडलेले पवित्र स्थळ म्हणजे मंदिर. मंदिराला ईश्वराचा प्रासाद तर, मंदिराचे शिखर वा अधिष्ठानावरील उभारणीला विमान म्हणतात.
संपूर्ण मंदिर एक दिव्य प्रतीक असून गर्भगृह हे मस्तक, मुखमंडप म्हणजे नाक, अंतराळ म्हणजे मान, सभामंडप हा देह, प्राकार म्हणजे हात, शिखर वा कळस म्हणजे चौल. ईश्वराचे वैश्विक रूप मंदिरात प्रतिबिंबित होते. ज्या भूमीवर मंदिराची उभारणी होते, तो भूलोक,अधिष्ठानपीठ- भुवर्लोक, स्तंभ - स्वरलोक, प्रस्तर-महालोक, शिखर-जनलोक, आमलसार- तपलोक आणि स्तूपिका म्हणजे सत्यलोक अशा या सप्त लोकांचे दर्शन मंदिराच्या रूपात होते.

मंदिराच्या शैलीचा विचार केला तर शिल्पशास्त्रात तीन शैली, नागर, द्राविड व वेसर अशी मानली जातात.
हिमालय ते विंध्य पर्वतापर्यंतची मंदिरे नागर शैलीची, विंध्य पर्वत ते कृष्णा नदीपर्यंत वेसर शैलीची तर कृष्णा नदी ते कन्याकुमारीपर्यंत द्राविड शैलीची मंदिरे दिसतात. दक्षिण भारतात द्राविड शैलीची असंख्य मंदिरे आहेत. वेसर शैली अन्य दोन्ही शैलींचे मिश्रण आहे.

नागर मंदिराचे आठ विभाग असे- मूळ पाया,चौथरा
भिंत, आणि कपोत हे चार भाग सरळ असतात.
गल म्हणजे छप्पर आणि भिंत यांच्या मधला भाग, शिखर, आमलक,आणि कळस.

द्राविड शैलीत देवालयाचे गोपूर, मंडप, विमान व वेदिका असे चार भाग होतात. वेसर शैलीची मंदिरे वर्तुळाकृती वा लंबवर्तुळाकृती असतात. केरळमध्ये अशी मंदिरे असून त्यांना 'मिश्रक' असेही दुसरे नाव आढळते.

मंदिरांची द्राविड शैली संपन्न केली ती दक्षिणेच्या समर्थ व कलासक्त राजवंशांनी. पल्लव (इ. स. ६०० ते ९००), चोळ (इ. स. ९०१ ते ११५०), पांड्य (इ. स. ११०० ते १३५०), विजयनगर (इ. स. १३०० ते १५६५) आणि मदुरेचे नायक (इ. स. १६०० ते १७००) या अनेक सम्राटांनी मंदिरे बांधली. महाबलीपुरमची अद्वितीय शिल्प लेणी आणि कांचीपुरम इथली कैलासनाथ व वैकुंठपेरुमल मंदिरांच्या निर्मितीचे श्रेय पल्लव राजांचे आहे. तंजावरचे बृहदीश्वर मंदिर आणि गंगैकोंडचोळपुरम् येथील मंदिरांची निर्मिती आणि उभारणी चोळ राजांनी अशा पद्धतीने केली आहे की त्या वेळचे वास्तू शास्त्रज्ञ अतिशय प्रगत तंत्रज्ञान वापरत असावेत की काय असे वाटते. तमिळनाडूवर सुमारे दोन शतके अधिराज्य गाजविणाऱ्या पांड्य राजांनी चिदंबरम, जंबकेश्वर, श्रीरंगम्, कुंभकोणम् येथील मंदिरे व अजोड कलाकुसरींनी नटलेली गोपुरे निर्माण केली. होयसाळ ( १०००-१३००) राजवंशाच्या योगदानाचा परमोत्कर्ष आपल्याला हम्पीतले चेन्नकेशव मंदिर, बेल्लारी, होयसळेश्वर, हळेबीड आणि केशव मंदिर, सोमनाथपूर यात दिसतो.

महाराष्ट्रातील बऱ्याच मंदिरांची रचना हेमाडपंती आहे. चुना-सिमेंटचा वापर न करता ही मंदिरे उभारलेली आहेत. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांपुढे दीपमाळा असतात. दक्षिणेकडे जशी गोपुरे, तशी महाराष्ट्रात दीपमाळांची रांग असते.

मंदिर पूर्वाभिमुख असावे, असा एक प्राचीन संकेत आहे. 'नारदीय संहिते'त पूर्वाभिमुख मंदिर उत्तम पश्चिमाभिमुख मध्यम, उत्तराभिमुख कनिष्ठ आणि दक्षिणाभिमुख त्याज्य मानले आहे. आग्नेय दिशेला मंदिराचे द्वार कधीही असू नये (आग्नेयादिषु कोणेषु द्वार नैव विधीयते). 'अपराजितपृच्छा' ग्रंथात 'न देवाः दक्षिणाभिमुखाः' असा उल्लेख आहे.

मंदिराचा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र भाग म्हणजे गर्भगृह. गर्भगृहावरच्या आमलकापर्यंत वा घुमटापर्यंतच्या उंच रचनेला विमान तर
गर्भगृहाला जोडून बाहेर मुखमंडप असतो, याला
अर्धमंडप वा शुकनासी असे म्हणतात. मुखमंडप आणि गर्भगृह यांना जोडणाऱ्या मार्गाला अंतराळ म्हटले जाते. अर्धमंडपात कासवाची प्रतिमा जमिनीवर दगडात कोरलेली असते. गर्भगृहात जाताना कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांना आवरून, त्यांचा संयम करून प्रवेश करावा असा संकेत असतो .

मुखमंडपापुढे विशाल नृत्यमंडप वा नवरंग असतो. यालाच सभामंडप म्हटले जाते. या सभामंडपात प्रवचने, कीर्तने, पुराणवाचन, भजन, गायन, नर्तन, धार्मिक निरूपणे असे बहुविध कार्यक्रम नित्य चालतात.

मंदिराच्या मंडपातील खांबांची रचना पाच प्रकारांची असते. १) चार बाजू असलेला ब्रह्मकान्त, २) आठ बाजू असलेला विष्णुकान्त, ३) सहा बाजू असलेला स्कन्दकान्त, ४) पाच बाजू असलेला शिवकान्त आणि ५) गोल वा १६ बाजू असलेला रुद्रकान्त स्तंभ.

सभामंडपापुढे त्या त्या देवतेच्या निःस्सीम भक्ताची वा वाहनाची मूर्ती असते. उदा. शिवापुढे नंदी, विष्णूपुढे गरुड, गणेशासमोर मूषक, देवीपुढे व्याघ्र वा सिंह इत्यादी. त्या मूर्तीला जोडूनच ध्वजस्तंभ वा विजयस्तंभ असतो. त्यावर पितळ वा तांब्याचा ध्वज असतो. ध्वजावर एका बाजूला ॐकार वा स्वस्तिक, तर दुसऱ्या बाजूला वाहनाची मुद्रा असते. ध्वजस्तंभासमोरच्या बलिपीठ वेदीवर देवतेचे पवित्र चरणकमल असतात. उपदेवतांचा नैवेद्य याठिकाणी अर्पण केला जातो. संपूर्ण मंदिराभोवती उंच भिंतीचे संरक्षण असते. त्या उंच भिंतीला प्राकार असे नाव आहे.

गर्भगृहाभोवतीची प्रदक्षिणा 'अंतरमंडप', गर्भगृहा बाहेरील 'अंतरहार', त्याबाहेरील 'मध्यान्तहार', तटाच्या आतील 'मर्यादाहार', तर तटाबाहेरील 'महामर्यादा' प्रदक्षिणा म्हणून ओळखल्या जातात. मुख्य देवतेचे मंदिर संपूर्ण मंदिर संकुलाचे वैभव असले तरी उपदेवतांची लहान मंदिरे चार कोपऱ्यात असतात त्यांना अंग आलय, म्हणजे देवालयाचे उपांग म्हणतात.

हिंदू मंदिरांची विभागणी शैव, शाक्त आणि वैष्णव अशा तीन प्रकारात करतात. मंदिरातील मूर्तीचेही चल आणि अचल (ध्रुव) असे दोन प्रकार आहेत. मंदिरातील मूर्तीची वैशिष्ट्ये त्यांच्या 'मुद्रां' वरून लक्षात येतात. मूर्तीच्या संदर्भात 'मुद्रा' ही संज्ञा मुखाच्या नव्हे, तर हाताचा पंजा व बोटे यांच्या स्थिती आणि आसन, चिह्न,वस्त्र आणि अलंकार हे सर्व लक्षात घेऊन मुद्रा होते. मुद्रा व आसन यामध्ये अभयमुद्रा म्हणजे संरक्षण, वरदमुद्रा म्हणजे वरदान, पद्मासन म्हणजे कमलासन, योगासन म्हणजे ध्यानमुद्रा यांना विशेष महत्त्व आहे. शिवशक्ती मूर्तीत डमरू, त्रिशूळ, पाश, अंकुश, बाण, खड्ग यांना विशेष महत्त्व आहे. तर विष्णू मूर्तीत चक्र, शंख, गदा व पद्म यांना प्राधान्य आहे.

देवतांच्या मूर्ती घडवण्याचे वेगळे शास्त्र आहे. त्याला 'ताल', आणि 'मान' म्हणतात. ताल संज्ञा मुद्रेशी निगडीत आहे. हाताच्या मध्यमेपासून मनगट याची उंची, रुंदी यांचा विचार 'ताल'मध्ये केला जातो. 'मान' वा 'नवताल'मध्ये मूर्तीच्या मुखाच्या नऊ पट देहाची उंची असावी, असा शास्त्रसंकेत आहे. प्रत्येक स्थळी या नियमांचे पालन केले जातेच असे नाही. मूर्ती घडविण्याचे स्वातंत्र्य शिल्पकाराला आहे. तथापि संस्था वा यजमान यांचा संदर्भ ध्यानात घेऊनच मूर्ती घडविण्याचे स्वातंत्र्य मूर्तिकार घेतो.

पूजेसाठी उत्सवमूर्ती उपयोगात आणतात. अशी मूर्ती आठ प्रकाराची असावी असे भागवत ग्रंथात लिहीले आहे. , 'शैली दारुमयी लौही, लेप्या लेख्या च सैकती । मनोमयी मणिमयी, प्रतिमाष्टविधा स्मृता ।।' पाषाणाची, लाकडाची, लोहादी धातूंची, मातीची, चित्ररूप, वाळूची, मनोमय आणि रत्नमय अशा आठ प्रकारच्या प्रतिमा पूजेसाठी वापरावेत. सामान्यतः तांबे वा पितळेची मूर्ती उत्सवासाठी वा पूजेसाठी प्रस्थापित करतात. पण सोने व चांदीची मूर्तीही उत्सवासाठी सिद्ध करण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे.

मुख्य मूर्ती सामान्यतः पाषाणाची असते. पाषाणाचे तीन प्रकार असतात- पुरुष, स्त्री व नपुंसक. ज्या दगडाच्या घर्षणातून अग्नीकण येतात तो पुरुष पाषाण होय. अंगभूत विविध रंगांच्या छटा असणारा आणि नाद निर्माण करणारा पाषाण स्त्री जातीचा, तर अत्यंत टणक व जराही नाद नसणारा पाषाण नपुंसक जातीचा होय.
पुरुष पाषाणांपासून मुख्य देवतेची, स्त्री पाषाणापासून देवीची आणि अधिष्ठानासाठी, पायाभूत आधारशीलेसाठी नपुंसक पाषाणाचा वापर होतो.
विष्णूचे प्रतीक शाळिग्राम, देवीचे प्रतीक धातूखण्ड, शिवाचे प्रतीक स्फटिक, गणेशाचे प्रतीक लालखण्ड सर्वमान्यता संपूर्ण देशात आहे. शिवलिंगाचे प्राधान्याने चार प्रकार (शिरोवर्तन वा शिर ध्यानात घेता) आहेत. त्रपुष, छत्र आकार, अर्धचन्द्र, आणि कुक्कुटाण्ड.
मंदिराच्या गर्भगृहात अधिष्ठानावर इष्टमूर्ती उभारणे, याला स्थापना म्हणतात आणि मंत्रोच्चारासहित ती मूर्ती अर्चनेसाठी, पूजेसाठी सुप्रतिष्ठित करणे, याला प्रतिष्ठा म्हणतात. ही प्रतिष्ठा पाच प्रकारांची असते त्यात
प्रतिष्ठापना म्हणजे मंत्रादी संस्काराने मूर्तीला चेतन करणे, स्थापना म्हणजे घरातील पूजा वा नित्यअर्चना करण्यासाठी, स्थितस्थापना म्हणजे अधिष्ठान व मूर्तीची एकत्र स्थापना करणे, आस्थापना म्हणजे अगोदर अधिष्ठान व नंतर मूर्तिस्थापना करणे आणि उत्थापना म्हणजे जीर्ण वा भंगलेली मूर्ती विसर्जित करणे असे हे पाच प्रकार.

प्राणप्रतिष्ठेनंतर रोजची देवपूजा अपरिहार्य आहे. देवालयातील वा घरातील मूर्तीची षोडशोपचार पूजा करतात. ते सोळा उपचार असे आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प.
किमान एक वेळा वा जास्तीत जास्त सहा वेळा हे पूजन केले जाते. अनेक प्रतिष्ठित मंदिरांत दोन वा तीन वेळा अशी पूजा केली जाते. प्रातःकालीन पूजेत मूर्तीला पंचामृताचा अभिषेक असतो. उत्तम वस्त्रे, आभूषणे आणि अलंकार यांनी मूर्ती सजविली जाते. प्रतिदिनी नैवेद्य दाखविला जातो. गर्भगृहाचा दरवाजा बंद करून हे सर्व करण्याचा संकेत आहे. दरवाजा उघडल्यावर आरती होते. नंतर भजन करण्याचीही पद्धत आहे. मुख्य देवतेबरोबर इतरही चार किंवा अधिक देवतांचे पूजन पंचायतन पूजा पद्धतीनुसार होते.

पूजा जशी नित्य असते, तशीच ती नैमित्तिकही असते. चतुर्थी, एकादशी, शिवरात्री, वैकुंठ एकादशी, दसरा इत्यादी विशेष दिनी ही पूजा करतात. त्यादिवशी जप, अभिषेक, कीर्तन, प्रवचने, निरूपणे, विशेष पूजा असा कार्यक्रम असतो. उत्सवमूर्तीला रथोत्सव नावाने रथातून मिरविले जाते.

मंदिरातील कला मंदिरातील कलांना पुरातन काळापासून राजाश्रय आणि लोकाश्रयही मिळाला आहे. भारतीय गोपुरांवरील शिल्पकला जगद्विख्यात आहे. प्रत्येक मंदिरावर कोरलेली शिल्पे जिवंत वाटतात. सर्व मंदिर हे एक संकुल असल्यामुळे गायन, वादन, नर्तन, नृत्य यांना मंदिरात सदैव प्रोत्साहन मिळाले आहे. रंगावली, दीपोत्सव, विशेष अन्नपदार्थ, ज्योतिष, रथनिर्मिती, धातूंची भांडी निर्मिणे, पूजेची फुल झाडे इत्यादी अनंत कलांना, शास्त्रांना मंदिराच्या प्राकारात सदैव प्रोत्साहनच लाभले आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, जोपासना, संवर्धन, संक्रमण, जागरण इत्यादी सर्व करण्याचे फार मोठे श्रेय मंदिरांना आहे.

मंदिरांनी संपूर्ण समाजावर आपला विशेष प्रभाव पाडला आहे. निराश मनाला श्रद्धा-निष्ठेचा प्रकाश दाखविण्याचे अपूर्व कार्य मंदिरांनीच केले आहे. मंदिराची उभारणी आणि स्थैर्य यासाठी स्थपती, गवंडी, लोहार, सुतार, कुंभार, शिल्पी इत्यादी अनेकांना रोजगार लाभला आहे. नित्य होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामुळे प्रवचनकार, निरूपणकार, व्याख्याते, नर्तक, गायक, वादक इत्यादी अनंत प्रबोधनकारांना आणि कलाकारांना सदैव प्रोत्साहन लाभले आहे. संशोधनाचे आणि ज्ञानप्रसाराचे प्रचंड कार्य मंदिरांनी सदैव केले आहे. अनेक मंदिरांच्या प्राकारात औषधी वनस्पतींचे संशोधन चालू आहे. अनेक मंदिरे वैद्यकीय सेवा मोफत देत असतात. अन्नदान हे तर मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. माणसांतील वा संस्थांमधील अनेक भांडणे सामंजस्याने संपविण्याचे अलौकिक कार्य मंदिरांनी केले आहे.

मंदिरे आणि मूर्तिपूजा या हिंदू धर्म-संस्कृतीच्या वैभवामुळे झालेला आणि होत असलेला आर्थिक विकास नजरेआड करता येत नाही.

Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या काही ओळीतच थाप. सिंधू संस्कृतीत कोणतीही शिवाची मूर्ती सापडली नाहीये. एका वेगवेगळ्या प्राण्यांच्या सोबत असलेल्या माणसाचे चित्र असलेले टेराकोटा सील सापडले, त्याला बळेच पशुपतीनाथ नाव देऊन ही शिवाची मूर्ती असा दुष्प्रचार चालू केला. स्त्री मूर्ती ही बळेच देवीची मूर्ती हा त्यातलाच अपप्रचार.

<<पहिल्या काही ओळीतच थाप. सिंधू संस्कृतीत कोणतीही शिवाची मूर्ती सापडली नाहीये. एका वेगवेगळ्या प्राण्यांच्या सोबत असलेल्या माणसाचे चित्र असलेले टेराकोटा सील सापडले, त्याला बळेच पशुपतीनाथ नाव देऊन ही शिवाची मूर्ती असा दुष्प्रचार चालू केला. स्त्री मूर्ती ही बळेच देवीची मूर्ती हा त्यातलाच अपप्रचार.>>
शोना, तू बाळा फरशीवर रांगून रांगून थकला असशील ना.. जा बेटा, आईला कडेवर उचलून घ्यायला सांग. जा, तुझी दुद्दु प्यायची वेळ पण झालीय आता.

हॅहॅहॅ
लहान बाळ सुद्धा तुमचा भंकस लेख फाडून फेकून देऊ शकतो हे तुम्हीच मान्य केले बरे झाले.

सांगलीत राहणाऱ्या सरड्याची धाव हरभट रोड ते आयर्विन पुलापर्यंत. लेखावर बौद्धिक टीका जमली नाही तर “ तीन मिनिटात ब्राह्मणांचा वंश विच्छेद करतो” अशा बढाया मारणाऱ्या योगेश सावंत याच्या जातकुळीतील “ शरद” पवार पुरस्कृत फालतू व्यक्ती. बालवाडीत प्रवेश घे बेटा.

नव्या लेखकाने /लेखिकेने लिहिलेल्या लेखावर बौद्धिक टीका जमली नाही तर “ आवरा आता,” “ व्हॉट्स ॲप वरून घेतले काय?” “ फिदी फीदी हसत दात दाखवणारी इमोजी” अशा तऱ्हेचे अनेक नकारात्मक प्रतिसाद टाकून, लेखकाला सळो की पळो करून त्याचे खच्चिकरण करायचे आणि इथून पळवून लावायचे असा एक अजेंडा राबवला जातो. आपण अशा तिखट प्रतिसादाला जहाल उत्तर दिले की लगेच यांचे पाय दाबणारे चमचे झोपडपट्टीतल्या बायका नळावर भांडतात त्या प्रमाणे झगडायला येतात किंवा सगळ्यांना गोळा करून मर्सिया गातात किंवा ऍडमीन अथवा वेमा याच्याकडे रडत जातात. पहिलीत शिकणारी मुलं आपल्या मित्राने धक्का दिला की रडत जातात पालकांकडे तसं. या गँगने केलेल्या अशा कारवायांमुळे बरेच चांगले लेखक कंटाळून इथून निघून गेले आहेत. माझे सभासदत्व रद्द करा आणि माझे सर्व लेख उडवून टाका अशी विनंती ॲडमीनकडे वेळोवेळी बऱ्याच लेखकांनी बऱ्याच वेळा केलेली आहे.

पण मी तसे करणार नाही. जशास तसे उत्तर मिळेल आणि ते ही जहाल.

माझ्या बाबतीत या लेखावर दोन दीड शहाण्यांनी स्वतःचा तिसरा मजला रिकामा आहे याचे प्रात्यक्षिक दाखवले. मी जो लेख लिहिला त्यासाठी पाच इंग्रजी पुस्तकातून संदर्भ घेतला. हा लेख म्हणजे कपोल कल्पित कथा नाही की त्याला थापा म्हणावे. मंदिर सोडून मशिदीत जाणाऱ्या ज्या कौमीने थापा म्हंटले आणि त्यासाठी मला खोडून काढणाऱ्या चार ओळी लिहिल्या त्याने स्वतःचा सोर्स कुठून घेतला हे सांगावे लागते, याचीही अक्कल नाहीं हे सिद्ध केले. दुसऱ्या एका (स)रड्याने कौमीला मम म्हंटले, नवऱ्याच्या हाताला हात लावून म्हणावे तसे आणि डोक्यावर जाळीदार टोपी घातली. स्वतःची अक्कल गहाण ठेवली की सिग्नलवर पावैया करावा लागतो तसे.

हे वाचल्यानंतर ऍडमीनकडे तक्रारीचा पूर वाहायला लागेल. माझे सभासदत्व रद्द करावे अशी मागणी करतील. तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही असे दिसले तर मायबोलीतली ही टोळी दारुल उलूम देवबंदचे छुपे मुखपत्र आहे असे खुशाल समजा, गझवा ए हिंद, लव जिहाद, स्टॅलिन, हिटलर, माओ, अफझल गुरू, याकूब मेमन, कसाब अशा लोकांना आणि तत्सम प्रवृत्तींना यांचा मूक पाठिंबा आहे असे माना. जयचंद ठाऊक आहे ना?

निकले हैं वो लोग मेरी शख्सियत बिगाड़ने,
जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं।

....