जावा स्क्रिप्ट्, कॉम्युटरकोडीन्ग, मिडल स्कुल ते हायस्कुल नविन स्टेम कोर्सेसची चर्चा!

Submitted by प्राजक्ता on 15 April, 2024 - 13:10

आमच्या इथल्या लायब्रररित कोडीन्ग क्लब सुरु केलाय, मुलगा तो अ‍ॅटेन्ड् करतोय.. त्याला त्यात आवड निर्माण झाली आहे
https://replit.com ही वेबसाइट ते वापरत आहेत.
दोन एक सेशन नतर क्लब सपेल, त्याला यात अजुन काय काय करता येइल? आम्ही दोघही नवरा बायको या क्षेत्रातले नाही बेसिक थोड फार माहिती आहे पण डिपमधे माहिती नाही.
तुमच्या पैकी कुणाची मुल कोडीन्ग क्लब/क्लासेस करतात का? मी एक इस्ट कोस्टचा बॉस्टनच्या आमच्या गावातला क्लब बघितला पण तो फारच महाग वाटतोय.सो कॅल याबाबतित लेट बॅक आहे.
भारतात असे क्लासेस आहेत का जे तो इथुन करु शकेल..मी पुणे कोडिन्ग क्लासेस सर्च केले तर भर्पुरच जन्त्री आली त्याने अजुन गोन्धळायला झाल..
एआय ,डेटा सायन्स इज न्यु इन थिन्ग हे विविध माध्यमातुन वाचायला मिळतय, ते शिकायला सुरवात कशी आणी कधी करायची?
इन जनरलच त्याला स्टेमशी रिलेटेड काहीही असेल तर शिकायला करायला आवडतय...अजुन काय काय शिकता येइल्? तो सहावित आहे..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोबॉटिक्स टीम्स आहेत का बघ तुझ्या जवळपास. त्यात मेकॅनिकल बिल्डिंग, प्रोग्रामिंग, एलेक्ट्रिकल वर्क असे बरेच काही शिकायला आणि काम करायला मिळते. त्यात मग पुढे ज्यात इन्टरेस्ट असेल त्यात अजून डीप शिकता येते. बर्‍याच स्कूल्स च्या टीम्स असतात नाहीतर प्रायव्हेट क्लब्ज पण असतात.
कोडिंग क्लासेस हल्ली खूप असतात सगळीकडे पण बहुधा ते चालवणार्‍यांचे मॉडेल म्हणजे स्वतः न शिकवता मिनिमम वेज वर कॉलेज किंवा हाय्स्कूल च्या मुलांना शिकवायला ठेवतात. मुलांना शिकवण्यापेक्षा जास्तीत जास्त बॅचेस घेऊन पैसे कमवण्याकडे जास्त कल असतो. म्हणजे पैसे घ्या. पण नीट शिकवा. पण तसे होत नाही. असा आपला माझा अनुभव.

माझा अनुभव सांगते.
Covid लॉकडाऊन च्य काळात पाचवितल्या मुलाला खान अँकॅडमी वरती जावा स्क्रिप्टचाचंकोर्स दाखवलेला. त्याला तो आवडला, त्याने पूर्ण केला. मग नंतर वर्षभर जावास्क्रिप्ट वापरून त्याने कुटुंबातल्या सगळ्यांसाठी वाढदिवसाला शुभेच्छा कार्ड बनविली. प्रत्येक कर्डत काही नवीन लॉजिक try करत गेला... सगळे मिळून १०-१२ तरी प्रोग्रॅम्स केले असतील.

तर सांगायचा मुद्दा हा की ऑनलाईन , फ्री मध्ये बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. ते करायचे. थोड शिकल्यावर स्वतः च छोटे छोटे प्रोजेक्ट/ ॲप्स करायचे.. त्यांचं लॉजिक develop होत, hands on मिळत.

मग पुढे शलेत वगवेगळे clubs/ courses असतातच.
फ्री आहे म्हणजे चांगलं नसेल अस अजिबात मनात बाळगू नका..

मुलांसाठी फ्री ऑनलाईन कोर्सेस:
Khan academy
Code.org

Code.org वरती जावा, जावास्क्रिप्ट, python , Ani अशा अनेक programming languages चे कोर्सेस आहेत.