Astrophotography शिकायची आहे.

Submitted by बोकलत on 1 April, 2024 - 02:01

नमस्कार मित्रांनो. मला astrophotography शिकायची ईच्छा आहे. कसं सुरू करू कळत नाहीये. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

बोकलत जी, आज योगायोगाने परत आलात की आजच्या तारखेचा महिमा.. मागे तुम्ही माबो सोडताय असे कुठेतरी वाचले होते

असो, astro photography साठी बरीच माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे, YouTube वर ही अनेक व्हिडिओ आहेत. I guess तुम्ही ते आधी बघितले असतीलच, नसतील तर आता बघा. पुण्यात अनेक amature photography clubs आहेत, त्यांना जॉईन करू शकता म्हणजे प्रात्यक्षिक ही होईल.

तसेच पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्था (JVP) आहे, त्यांना संपर्क करा. त्यांचे astronomy che सेशन्स होत असतात, त्यात तुम्हाला फोटोग्राफीची संधी मिळेल आणि लोकांशी ओळख ही होईल. निरभ्र आकाशाच्या शुभेच्छा.

मी खरोखरच मायबोली सोडले. मी कुठल्याच धाग्यावर प्रतिसाद देत नाही. आता पण इथे माहिती मिळवण्यासाठी आलो आहे असो प्रतिसादासाठी दोघांचे आभार.

बोकलत, पुण्यात असलात तर ३ ते ५ मे दरम्यान ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा वर्कशॉप आहे astrophotography चा. तुम्हाला हवे असतील तर मला डिटेल्स कळले की कळवते.

मी मुंबईत आहे पुण्याला जाणं सध्या शक्य नाही होणार. 6-7 ला stargazing mumbai सोबत आकाश निरीक्षणाला जाणार आहे भंडारदऱ्याला. त्यात बेसिक फोटोग्राफी शिकवतील मोबाईलवरून. अजून पुढे advanced लेव्हल शिकायची ईच्छा आहे.

मी मुंबईत आहे
>>>
मुंबईत खगोल मंडळ आहे, त्यांना संपर्क करा.

मी खरोखरच मायबोली सोडले. मी कुठल्याच धाग्यावर प्रतिसाद देत नाही. आता पण इथे माहिती मिळवण्यासाठी आलो आहे
>>>
नो प्रोब्लेम बोकलतजी, तुमच्या कॉमेंट आणि अमानवीय किस्से मजेशीर असतात, वाचक म्हणून त्या मिस करतोय, बाकी काही नाही.

खगोल मंडळात हे होत नाही. आकाशदर्शन होते.
मुंबईतून हा छंद करणे अवघड आहे. स्वच्छ अंधारी आकाश मिळणाऱ्या जागा खूप दूर आहेत. सर्वच मोठ्या शहरांचा विस्तार वीस किलोमीटर वाढला आहे.
तशा जागा सापडल्यावर उपकरणे हवीत. Camera , tripod (strong and heavy). डास चावू नयेत म्हणून उपाय.

खगोल मंडळात हे होत नाही. आकाशदर्शन होते.
>>>
बरोबर, पण तिथे समविचारी लोकांशी ओळख होऊ शकते जे astrophotography करतात. त्यांच्या सोबत फोटोग्राफी प्लॅन करता येऊ शकते.

बोकलत welcome back
तुमचे प्रतिसाद वाचनीय असतात

फोटोतले लाल ठिपके म्हणजे बरोबर नाही.( Noise). जागा चांगली आहे, प्रयत्न चांगला आहे पण यंत्र बरोबर नाही. Camera मध्ये सेन्सर टाईप CM0S असणारे बरेच असतात ते विडिओसाठी चांगले. CCD सेन्सर पाहिजे आकाशाच्या फोटोसाठी.

धन्यवाद कुंतल. अलीकडे नवीन काही लिहिणं झालं नाही. काही लिहिलं तर कॅलिग्राफी पेजवर पोस्ट करेन.
धन्यवाद srd. हा raw फोटो आहे. थोडाफार एडिट केलाय. गेलेलो तिथे पण लाईट पोल्यूशन जरा वाटत होतं. एक जण Dslr घेऊन आला होता त्यात चांगले येत होते फोटो. कुठला फोन चांगला राहील काही सुचवाल का?