सरकारी नोकरी चे स्तोम का ?

Submitted by स्वरुपसुमित on 19 February, 2024 - 07:24

नुकतीच तलाठी भरती झाली
बातमी अशी आलो कि ३५ लाख भरले
आत्ता बेरोजगार खूप आहेत पण आपण फक्त एका सॉ इंजिनेर च्या दृष्टी कोनातून बघू
त्यात पण टेस्टिंग

bsc phy ,फी ३३००० आसपास
सीड इन्फोटेक कोर्से २१०००

नोकरी सुरुवातीला ३००००
५ वर्षे अनुभव असला कि कोणालाही ६०००० खाली पगार नाही
१० वर्षे १ लाख ,ते इंडस्ट्री नुसार एकदम कमी

ac मध्ये बसायचे ,wfh असले कि अजून चांगले
नोकरी गेली तर भरपूर कंपनी आहेत दुसरी मिळते
फक्त सुरुवातीला interview crack करणे थोडे अवघड

तलाठी

पगार ४०००० ,वेतन आयोग आले कि मगच वाढणार
निवास स्थान अत्यंत बकाल
पोलिसांहून जीवाचा धोका जास्त ,निम्म्या रात्री उठून वाळू चोरी पकडावी लागते
पैसे खातात पण धोका तेवढाच acb ने पकडले तर बांबू
केव्हा पण बदली
शासन काही पण काम सांगते ,आत्ता मराठा सर्वेक्षण साठी तलाठी बाई चा विडिओ viral झाला होता
नोकरी ची शाश्वती थोडी जास्त पण दररोज भांडण ,किरकिर ,राजकारणी लोकांचा इगो,गाव गुंड

३५ लाख खूपच जास्त होतात असे मला वाटत

Group content visibility: 
Use group defaults

कठीण नोकरी आहे खरी.मुख्यतः राजकारणी आणि वाळू तस्करांकडून असलेल्या धोक्यामुळे जास्त. तलाठी बनायला काय करावं लागतं?mpsc का upsc?(खरंच माहीत नाही म्हणून विचारते.तलाठी आणि कलेक्टर वेगवेगळे ना?)

acb ने पकडले तर बांबू>> लागे बांधे असतात. acb चा उपयोग नावडत्याला, डोईजड झालेल्याला, अगदीच उघडपणे भ्रष्टाचार करतोय काहीतरी ऍक्शन दाखवली पाहिजे अशाला धडा शिकवण्यास किंवा लागेबांधे नसलेला भलताच कुणी पैसे खात असेल त्याला पकडण्यास होत असावा.

तलाठी ही महसूल खात्यातील अतिशय निम्न स्तरावरची पोस्ट आहे तर कलेक्टर ही अतिशय उच्च स्तरावरची.

ओके, आता तलाठी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात शोधलं.व्हिलेज अकाऊंटंट. ही हायररकी अजिबात माहीत नाही.कलेक्टर म्हणजे मोठं पद, कठीण upsc परीक्षा, नंतर कठीण lbsnaa मध्ये ट्रेनिंग हे आता वेब सिरिजेस बघून माहीत झालंय.

माझ्या माहितीप्रमाणे तलाठी, सर्कल, नायब तहसिलदार आणि त्या वरचे पद म्हणजे तहसिलदार ..! माझे काका
नायब तहसिलदार म्हणून निवृत्त झाले. तलाठी भरतीची परीक्षा मला वाटते दहावी पास कुणीही देऊ शकते.

तहसिल कार्यालय आणि तलाठी कार्यालयात कामानिमित्त फेऱ्या मारणाच्या अनुभवातून सांगते, तलाठी ह्या पदाबद्दल प्रत्येक गावात खूप आदर असतो. त्याच्याकडे आसपासच्या दोन-चार गावांचा कार्यभार असतो. तलाठ्याला कार्यालयात आणि सदर भागात ' त्यात्या' म्हणून संबोधलं जातं. त्याच्यासोबत प्रत्येक गावात एक सहकारी असतो. त्याला' काठ्या' म्हणतात. जसा शंकरा सोबत नंदी तसा हा काठया..!

' जे लिहिले असेल भाळी.. ते बदलवी तलाठी..!' अशी म्हण तलाठ्याबद्दल म्हटली जाते. सातबाऱ्यावर नाव नोंदणी करणं हे तलाठयाच्या हाती असतं.

माझं काम बाकी आहे तलाठी कार्यालयात त्यामुळे मी जास्त लिहित नाही.. पण महसूल खात्याचा आणि तलाठी कार्यालयाचा मला आलेला अनुभव चांगला आहे.

तलाठी, सर्कल,नायब तहसीलदार, तहसीलदार, सब रजिस्ट्रार अत्यंत लाचखोर जमाती काही नगण्य अपवाद सोडले तर....
आमच्याकडं एक बेवड्या तलाठ्याल दारु पाजून एकाची जमीन दुस-यानं ढापली. तहसील कार्यालयात शेतकरी कागदपत्रांसाठी येतात तेव्हा सर्रास पैसे घेतले जातात. सबरजिस्ट्रारला प्रत्येक रजिस्ट्रेशनचे पैसे मिळतात....एक महाशय ड्रावर अर्धा उघडा ठेवत त्यात दक्षिणा टाकावी लागायची.
हल्ली सातबारा डाऊनलोड करता येतो.

>>>>>तलाठी ह्या पदाबद्दल प्रत्येक गावात खूप आदर असतो.>>>>दुर्जनांचा दबदबा असतो कारण सामान्य अगतिक असतात. सध्या मी अनुभवतोय.... तहसील कार्यालयात जमीनीचे कागदपत्र व्यवस्थित जतन केले नाहीत त्यामुळे खोटी केस निस्तरतोय...कागदपत्रा साठी माहिती अधिकारात आजपर्यंत ४ अर्ज झाले. फलोत्पत्ती काही नाही अजून तरी.

अनिरुद्ध > हो बरोबर आहे.. मला लल्लाटी शब्दच आठवता आठवत नव्हता.

दत्तात्रेयजी, तुमचा अनुभव खरंच चीड आणणारा आहे. तुम्हाला तुमच्या कामात सकारात्मक यश मिळो हि सद्‌भावना..!

मलाही प्रत्येक वेळेस चांगला अनुभव आलायं किंवा येईलच असं नाहीये. आपल्या कर्तव्याला जागून काम करून देणारे कर्मचारी होते तसेच बऱ्याच वेळा उद्धट उत्तरे देणारा कर्मचारी वर्गही भेटलाय.

आपली व्यवस्थाच अशी आहे की, जिथे सरकारी काम पडते तिथे सामान्य जनतेला जुलमाचा रामराम करावाच लागतो. ' अडला हरी... ' सारखी परिस्थिती सामान्य जनतेची असते. एखाद्या अडलेल्या गरजूची आर्थिक आणि मानसिक अडवणूक आणि पिळवणूक करणं हे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या सद्सदविवेकबुद्धी वर आणि त्याच्या कर्तव्य निष्ठेवर अवलंबून असते.

सध्याच्या अनुभवानुसार बराच कर्मचारी वर्ग तरूण आणि उच्चशिक्षित आहे. त्यामुळे असेल पण अडलेल्या कामासाठी जास्त अडवणूक झाली नाही.

निरिक्षणानुसार , कुठल्याही प्रकारची अडवणूक न करता काम मार्गी लावण्याच्या बाबतीत स्त्री कर्मचारी वर्ग ( पुरुष स्त्री तुलना करायचा उद्देश नाही ) जास्त तत्पर वाटला.

>>>>>तलाठी ह्या पदाबद्दल प्रत्येक गावात खूप आदर असतो.>>>>दुर्जनांचा दबदबा असतो कारण सामान्य अगतिक असतात. सध्या मी अनुभवतोय.... तहसील कार्यालयात जमीनीचे कागदपत्र व्यवस्थित जतन केले नाहीत त्यामुळे खोटी केस निस्तरतोय...कागदपत्रा साठी माहिती अधिकारात आजपर्यंत ४ अर्ज झाले. फलोत्पत्ती काही नाही अजून तरी.

नवीन Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 February, 2024 - 02:28

मला पास पोर्ट ला आला होता अनुभव

नडा

तलाठी १० पास लागतो आणि 'सॉ इंजिनेर' त्यात पण टेस्टिंग ला ... ही शिक्षण/ स्किलसेट काहीतरी वेगळा असेल ना? पोर्टेबल असेल कदाचित, पण तलाठी नाही? तर टेस्टिंग कर इतकं पोर्टेबल असतं का? कल्पना नाही बाबा काही हल्लीच्या इंड्याची.

>>>नडा>>>
स्वरुपसुमित मी माहिती आयोगाकडं केस करणार ‌....
Indian evidence act खाली कोर्ट केस करील.

एकदा कलेक्टर सपत्निक तहसीलदाराच्या घरी जेवायला जातात, तिथले वैभव पाहून सौ. कलेक्टर पतीला विचारतात की तुम्हाला बढती मिळून तुम्ही तहसिलदार केव्हा होणार ?