खामोश सफर

Submitted by सामो on 14 February, 2024 - 12:19

-अन्यत्र पूर्वप्रकाशित--------------------

मिश्र भूपाळी' रागातील हे गाणे - https://www.youtube.com/watch?v=PzaqgXpGjrs

कश्ती का खामोश सफर है, शामभी है तनहाई भी
दूर किनारे पे बजती है लहरोंकी शेहेनाई भी|
.
अहाहा लाटांच्या सनईचे सूर आणि त्या सुरांवरती आंदुळणारी एक नाव, आंदुळणारी दोन हृदये. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले सुधा मलहोत्रा व किशोर कुमार यांच्या आवाजातील, हे गाणे. या गाण्यावर मला वाटतं मतकरींनी एका फार सुंदर लेख लिहिलेला आहे.
हे गाणे ऐकताना, कितीदा ऐकले तरी मन भरतच नाही. फार हुरहूर लावुन जाते हे गाणे. गेल्या जन्मीचे, काहीतरी हरवलेलं आठवते न आठवते तोच निसटते आहे असे काहीसे वाटते. खरं तर दोन प्रेमिकांचा हा खाजगी संवाद. एका उत्कट क्षण जेव्हा एकमेकांच्या मनातील भावनांना कदाचित आज शब्दरूप मिळेलही, नाहीसुद्धा मिळणार.

'लेकिन ये शर्मीली निगाहें मुझको इजाज़त दें तो कहूँ
ये मेरी बेताब उमंगें थोड़ी फ़ुर्सत दें तो कहूँ'

हे hesitation , हि अनिश्चितता, .... कॉलेजच्या पावसाळी misty दिवसांची आठवण घेऊन येते. बोलायचे तर असते पण धीर कोणात असतो? अस्फुट भावना ....

जो कुछ तुमको कहना है, वो मेरे ही दिल की बात न हो
जो मेरे ख़्वाबों की मंज़िल उस मंज़िल की बात न हो

सुधा मल्होत्रांच्या आवाजातील, हे आर्जव, उत्सुकता, तिच्या हृदयातील धडधड किती सुंदर रीतीने व्यक्त करते.

किशोर - कहते हुए डर सा लगता है, कहकर बात न खो बैठूँ
ये जो ज़रा सा साथ मिला है, ये भी साथ न खो बैठूँ
.
सुधा - कबसे तुम्हारे रस्ते पे मैं, फूल बिछाये बैठी हूँ
कह भी चुको जो कहना है मैं आस लगाये बैठी हूँ

तिची ही उत्सुकताच त्याला सारं काही सांगुन जाते. आणि मग गाण्याचा क्लायमॅक्स येतो. तो म्हणतो, अगं वेडे तुझ्या या अधीरतेनेच्, या हृदयाच्या धडधडीनेच मला सर्व काही सांगून टाकले. जेव्हा हृदयाने हृदयाला, उत्कटतेने प्रतिसाद दिला,तेव्हा आता शब्दांचे काय घेऊन बसलीस.
.
आणि मग ती विचारत राहाते "अरे बोला ना. सांगा ना. शब्दबद्ध तर कर तुझ्या भावना." कोण जाणे किती वर्षांनी या भावना शब्दबद्ध होतील, कदाचित अगदी आयुष्याच्या शेवटी हात हातात घेउन ति तिला या भावना सांगेल, खरं तर सांगू पाहील, प्रयत्न करेल आणि तरीही त्या समर्पकतेने व्यक्त होणारच नाहीत.
.
सुधा : कह भी चुको, कह भी चुको जो कहना है
किशोर : छोड़ो अब क्या कहना

कोणत्याही भावुक व्यक्तीला भुरळ घालणारे हे अतिशय serene , गाणे जणू काही दोन प्रेमिकांच्या मधील सुमधुर प्रार्थनाच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो माझं अत्यंत आवडतं गाणं. तू केलेलं विश्लेषण पण खूपच भावलं.
हे आणि ते वो देखे तो उनकी इनायत हि दोन गाणी किशोरची मला थोडी हटके वाटतात.

आणि या गाण्यात तो शेवटी राहू दे आता आपण सोबतच असणार आहोत तर कशाला काही सांगायचं? या आशयाचं जे गातो ते अफलातून आहे.

धन्यवाद सामो, उत्कृष्ट गाणं, उत्तम निरूपण!

सुधा मल्होत्राचा आवाज या गाण्यातील भावना व्यक्त करण्यासाठी किती योग्य आहे! हे बेअरिंग सुधा मल्होत्रासाठी नैसर्गिक वाटतं. तिचं दुसरे फेमस गाणं आठवा, तुम अगर भूलभी जाओ, तो ये हक है तुमको... तीच आंदोलने?!
आणि किकु साहेबांना दंडवत घालूनही म्हणावंसं वाटतं की मला हे गाणं हेमंतदांच्या स्वरांत ऐकायला आवडेल.

डोळ्यासमोर नजारा येतो...
तिन्हीसांजा दाटून आल्या आहेत. पश्चिमक्षितिजावर लालिमा टिकून आहे, पण काळवंडलेल्या आकाशात संध्यानक्षत्रं उमलू लागली आहेत. हिरव्याकाळ्या पाण्यावर तरंगणारी चितकबरी नाव हल्क्या हवेत डुचमळते आहे. वल्ह्यांच्या चुबळक चुबळक या आवाजाव्यतिरिक्त आवाज नाहिये. दोन प्रेमी जीव आपल्या प्रेमाचा इज़हार करण्याची वाट शोधताहेत, व्याकुळलेत. आशंकित शब्द अस्फुटताहेत.

या माहौलात, किशोरकुमारचा रेझोनंट स्वर पाण्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होईल.
पण हेमंतदांचा आश्वासक खर्ज? तो पाण्यात विरघळून जाईल! प्रेयसीला कवळून घेईल..!

सुधा मल्होत्राच्या थरथरत्या, शंकित स्वराच्या यिनला कदाचित किशोरदांचा पुरूषी स्वराचा यांगच योग्य, पण, मला हेमंतदांच्या मखमली स्वराची आस जास्त. संगीतकार स्वतः हेमंतदा आहेत, कलाकार किशोरदा आहेत. म्हणून गाणं किशोरदांचं हे योग्यच. पण तरीही...

किती सुन्दर कल्पना, बुआ!

Happy आणि तुमचे शब्दही किती डौलदार निवडलेले..... नाव नुसतीच नाही तर...चितकबरी नाव...!! Happy

असच मला अजून एक शब्द फार आवडतो.. किनखापी! पण वापरायची वेळच येत नाही!!!

जो कुछ तुमको कहना है, वो मेरे ही दिल की बात न हो
जो मेरे ख़्वाबों की मंज़िल उस मंज़िल की बात न हो>>> वॉव!!!

सुंदर लेख.

माझ्या अत्यंत प्रिय गाण्याचे अप्रतिम रसास्वादन.... डोळ्यासमोर अख्ख काव्य उभं केलत...... छोडो अब क्या कहना (लिखना) है!! Happy
>>>> आणि या गाण्यात तो शेवटी राहू दे आता आपण सोबतच असणार आहोत तर कशाला काही सांगायचं? या आशयाचं जे गातो ते अफलातून आहे.>>> अगदी अगदी दक्षिणा

काव्यात हुरहूर , संकोच, आदर आणखीन काय काय .. किती रेशमी भावनांचा संवाद आहे ! किशोरदांचा पुरुषी , आत्मविश्वासपूर्ण खंबीर आवाज अगदीच mis match वाटतो !

मला उगाचच वाटत राहिलं की हे गायला जगजीत ~ चित्रा च् पाहिजेत !!
सोच अपनी अपनी ..