भय इथले संपत नाही

Submitted by - on 6 February, 2024 - 11:41

काय खरे, आणि काय खोटे समजत नाही.....

काय बरोबर आणि काय चुकीचे समजत नाही .....

काय करावे आणि काय नाही करावे समजत नाही ....

मनाचे एकावे कि डोक्याने चालावे समजत नाही ....

मन मारून जगावे कि मनाप्रमाणे जगावे समजत नाही ....

म्हणूनच भय इथले संपत नाही .

मनाप्रमाणे जगणे मस्तच ...... पण डोक्याने जगल्यावर बाकी सगळे खुश. (बाकी सगळे म्हणजे जी चार लोक , जी आपल्याला नाव ठेवत राहतात ती खुश.)

ती चार लोक आपल्याला फक्त नाव ठेवतात.

स्वतः मात्र मानाप्रमाणेच जगतात. एकदम बिनधास्त ... कारण त्यांना कोणी नाव ठेवण्याची भीती नसते ना ... का ? .. कारण नाव ठेवणारे ते चारच असतात कि.... मग त्यांना कोण नाव ठेवणार ?

चला तर मग ...त्या चार च्या लिस्ट मध्ये आपले नाव जोडू .

मग आपणही मनाप्रमाणे जगू.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users